सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

Primary tabs

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
23 Jul 2020 - 2:55 pm

गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती. मला स्वतःला नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, मित्रांच्या अशा किमान दहा ग्रुपवर ही पोस्ट फाॅरवर्ड म्हणून आली होती.

व्हाॅट्सअपवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशी एकुणात आपल्या भारतीय लोकांची मानसिकता झालीये गेल्या काही वर्षात. व्हाॅट्सअपवरचे मॅसेजेस, मग ते नासाच्या तुटणाऱ्या ग्रहांचे असोत, युनेस्कोने जाहीर केलेल्या राष्ट्रगीताचे असोत, वा पाच तोंड असलेल्या शेषनागाच्या दर्शनाचे असोत, आपली लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून, डोळे झाकून आणखी शंभर लोकांना पुढे ढकलून देणार. अगदी त्याच मानसिकतेतून आपल्या लोकांनी वाफ घेण्याच्या गोष्टीची शहानिशा न करता, बहुतेकांनी अडगळीत पडलेले स्टीमर शोधून काढले. काहींनी लगोलग मेडिकल गाठून नवे विकत आणले, आणखी काहींनी अॅमेझाॅनवर चांगल्या प्रतीचे स्टीमर आॅर्डर केले आणि औषधांचा डोस घेतो त्याप्रमाणे सकाळ-दुपार-संध्याकाळ वाफ घ्यायला सुरूवात केली.

केवळ उत्सुकतेपोटी, नाकाच्या पाठी हे अशा प्रकारचे पॅरानेझल सायनस असते का? त्याचे लाॅकिंग मेकॅनिझम म्हणजे नेमके काय? आणि त्यातून खरंच विषाणू थेट फुप्पूसात जावू शकतात हे मी गुगलबाबाला विचारून पाह्यले, पण शेवटी गुगलबाबा म्हणजे कुणी डाॅक्टर नव्हे असं स्वतःची समजूत घालून तो नाद सोडला आणि गपगुमान दुसऱ्या दिवशी मेडिकलमधून साधे स्टीमर विकत घरी आणले.

या मॅसेजच्या वायरलनंतर काही दिवसांनी कूपर हाॅस्पीटलच्या दोन डाॅक्टरांमधला संवाद म्हणून एक आॅडीओ क्लिप व्हाॅट्सअप युनिवर्सिटीवर पसरू लागली. इतके दिवस दुर्लक्षित केलेली ती क्लिप आज सकाळी प्रत्यक्ष एेकली आणि आपला बेंबट्या झाला आहे याची शंभर टक्के खात्री पटली. त्या एकंदर संवादात त्यातल्या कथित डाॅक्टर भोसलेंच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा त्या मॅसेजमधलाच होता. अगदी समोर मॅसेज ठेवून वाचत असल्यासारखा, फक्त अविर्भाव मात्र विश्वातले मोठे गुपीत सांगितल्यासारखा होता. खरेच डाॅक्टर होते कि व्हाॅट्सअॅप युनिवर्सिटीतल्या फाॅरवर्ड्समधून शिकलेले स्वयंघोषित डाॅक्टर होते, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आधी वायरल झालेल्या मॅसेजप्रमाणेच, क्लिपमधल्या संभाषणातली ती व्यक्तीही लोकांपर्यंत अर्धवट आणि चुकीची माहिती पोहचवत होती. एकुणातच आधीच्या मॅसेजमुळे आणि या आॅडीओ क्लिपमुळे, लोकांच्या घाबरलेल्या मानसिकतेला अशा सगळ्या खोट्या गोष्टींतून खतपाणी घालून वेगाने गैरसमज पसरवण्याचे काम आपोआप झालेय यात काही शंकाच नाही.

डाॅ. संग्राम पाटील यांचा या संदर्भातला युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्या क्लिपमधल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातला आवर्जून लक्षात घेण्याजोगा असा दुसरा मुद्दा म्हणजे, ४०° ते ६०° तापमानातली वाफ घेण्यामुळे करोनाचे विषाणू मरत नाहीत, तर त्यामुळे आपलाच चेहरा भाजण्याची शक्यता जास्त होते. करोनाचा विषाणू ७०° किंवा त्यावरील तापमानात जिवंत राहू शकत नाही आणि त्याखालील तापमानाची वाफ घेतली तर त्यामुळे आपल्याला भाजण्याचे चान्सेस जास्त या गोष्टीला अधोरेखित करणे महत्वाचे. करोनाचा विषाणू सुरूवातीचे तीन-चार दिवस घशात/पॅरानेझल सायनसमध्ये राहतो आणि तिथून मग फुप्पूसात शिरतो वैगेरे आॅल बुलशीट !!

ट्रेकिंग करताना सर्वात पुढे वाटाड्या चालत असतो आणि त्याच्या मागोमाग इतर लोक चालत असतात. ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी, ज्या दिशेेने वाटाड्या वाटेने चालत राहील, त्याच्या पाठोपाठ जात रहायचे एवढेच लोकांना ठाऊक असते. पुढे मग तो वाटाड्या चुकीच्या वाटेने चालत राहीला, तरी डोक्याने सारासार विचार करणे थांबवून लोक चुकलेल्या वाटेवरून चालतच राहतात, प्रश्न न करता !! वाट चुकल्याचे जेव्हा कळते, तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच पण त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. फेसबूक, व्हाॅट्सअॅपसारखी समाजमाध्यमे ही त्या वाट चुकवलेल्या वाटाड्यासारखी झालीयेत सध्या. जनता सारासार विचार न करता, चुकीच्या गोष्टींमागे डोळे बंद करून पळते आहे निव्वळ !!

सध्याच्या कठीण काळात, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासोबतच अशा सगळ्या सरसकट येणाऱ्या मॅसेजेसकडे डोळस नजरेने बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

- किसन शिंदे

वावरसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवमत

प्रतिक्रिया

Gk's picture

23 Jul 2020 - 3:10 pm | Gk

वाफ जन्तु मारायला वापरतात
त्याला मोईस्ट हिट म्हणतात
त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते
नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही

सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते

पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

100 degree Celsius la पाण्याची वाफ होते.
मग पाण्याच्या वाफेचे तापमान 60 c aste he khare aahe ka

भुजंग पाटील's picture

23 Jul 2020 - 8:34 pm | भुजंग पाटील

१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते.
पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते.

( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

अत्रन्गि पाउस's picture

23 Jul 2020 - 5:53 pm | अत्रन्गि पाउस

आजच ७ हिल्स हॉस्पिटल च्या एका प्रख्यात डॉक्टरांची लेखी नोट आलीये ह्याच विषयांवर

मराठी कथालेखक's picture

23 Jul 2020 - 6:40 pm | मराठी कथालेखक

काय नोट ?

Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात.
ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात.
व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही.
Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मराठी कथालेखक's picture

23 Jul 2020 - 6:58 pm | मराठी कथालेखक

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही.
दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे.
जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून
स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही
तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो.
असे का समजले जावू नये.

हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे.
जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून
स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही
तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो.
असे का समजले जावू नये.

सुबोध खरे's picture

23 Jul 2020 - 7:47 pm | सुबोध खरे

पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT)

.म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल.

जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते.

यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो.

जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे.

मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा

घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही).

वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो.

याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते.

गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2020 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

23 Jul 2020 - 10:38 pm | कपिलमुनी

नीट रम पिउन घसा गरम करुन कोरोना मारता का आता?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोना जर रम घेऊन निष्प्रभ झाला असता तर, असा नुसता विचार मनात आला.
बाकी, बहाने वालोंंची लॉटरी लागली असती :)

-दिलीप बिरुटे

रमचे रेट सिंगल माल्ट पेक्षा जास्त झाले असते मग :)

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2020 - 11:01 pm | संजय क्षीरसागर

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे !
तो सुटला तर सगळंच काम झालं !

त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :

याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2020 - 11:10 pm | संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.

माझा कोविड अनुभव

थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा.
पण
"नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?
"
ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 10:03 am | सुबोध खरे

आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील).

https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf

Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction)

https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/#

पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल.

त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात,
हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत,
कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत,
ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 10:40 am | सुबोध खरे

आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते.

केवळ अस्तित्व

ना लज्जा रक्षणासाठी उपयोग

ना माशा वारण्यासाठी

सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर
चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही.
Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये.
वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत
अयोग्य आहे .
झाला तर फायदाच होईल.

वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही.
एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल.
इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही ,
वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ...
त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने,
गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात.

करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2020 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही

बस विषयच संपला.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 12:33 pm | सुबोध खरे

वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे.

परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) .

वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही.

टोकाची भूमिका नसावी

त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 12:36 pm | सुबोध खरे

"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही

होय

करोना विषाणू मरतात.

पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का?

नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

संजय क्षीरसागर's picture

26 Jul 2020 - 5:00 pm | संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.

मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

pspotdar's picture

27 Jul 2020 - 1:23 am | pspotdar

he always said, he refer WHO, to whom you refer ???

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 9:45 am | सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं.

त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा.
पण
मीच बरोबर आहे
मी बरोबरच आहे
आणि
मी बरोबर आहेच

असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे

विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे.

शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का?

बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

संजय क्षीरसागर's picture

27 Jul 2020 - 12:33 pm | संजय क्षीरसागर

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो.
आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे.
(नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात.

आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

27 Jul 2020 - 4:01 pm | मराठी कथालेखक

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही

अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 7:33 pm | सुबोध खरे

संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे.

हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

संजय क्षीरसागर's picture

27 Jul 2020 - 10:52 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे.

याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि
गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 10:49 am | सुबोध खरे

शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते.

करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता).

तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते.

क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल.

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.

काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या.

ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

संजय क्षीरसागर's picture

28 Jul 2020 - 1:03 pm | संजय क्षीरसागर

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.

लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला !

थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत !

तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात?

बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला.

तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

संजय क्षीरसागर's picture

29 Jul 2020 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.

दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

सुबोध खरे's picture

29 Jul 2020 - 6:27 pm | सुबोध खरे

तें विधान मुळीच चुकीचे नाही.

स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही.

तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही.

त्याला तापमान कितीही असो.

))=((

संजय क्षीरसागर's picture

29 Jul 2020 - 8:45 pm | संजय क्षीरसागर

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?

यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही.

हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा

ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे

कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

mrcoolguynice's picture

30 Jul 2020 - 12:36 pm | mrcoolguynice

मग याच लक्षणावरून, (delusion of grandeur) ची बाधा
मोदीजींना झाली असावी का ?

श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही.

ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

mrcoolguynice's picture

30 Jul 2020 - 1:49 pm | mrcoolguynice

आधी
मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी...
विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की

तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला
डायरेकट्ट उडी मारली.

सुबोध खरे's picture

31 Jul 2020 - 11:37 am | सुबोध खरे

हो ना

आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत

पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे.

बाकी

महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

mrcoolguynice's picture

31 Jul 2020 - 1:54 pm | mrcoolguynice

बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे..
"विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

सुबोध खरे's picture

31 Jul 2020 - 6:29 pm | सुबोध खरे

विषय भरकटवणे,

मूळ विषय काय आहे त्यात श्री मोदी कुणी आणलं?

आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकाला

माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

सुबोध खरे's picture

1 Aug 2020 - 12:45 pm | सुबोध खरे

मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे.

त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का?

केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं.

दांभिक आणि भंपक पणा आहे.

मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर
संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात.
त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

सुबोध खरे's picture

1 Aug 2020 - 7:23 pm | सुबोध खरे

मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे.

त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

त्याच शहाजोगपणे, संक्षीवर किंवा इतर कोणावरहीसुद्धा कोणी गरळ ओकू नये या धाग्यावर.

सुबोध खरे's picture

3 Aug 2020 - 9:47 am | सुबोध खरे

मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे.

त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही.

तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

mrcoolguynice's picture

3 Aug 2020 - 11:46 am | mrcoolguynice

जर
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे.
तर
त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही.
तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

सुबोध खरे's picture

3 Aug 2020 - 11:58 am | सुबोध खरे

आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे)

आणि

जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय?

नसती लूडबूड

मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला,
जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये.
नस्ता शहाजोगपणा...

सुबोध खरे's picture

4 Aug 2020 - 1:20 pm | सुबोध खरे

जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय?

नसती लूडबूड

मोदींचा उल्लेख आल्यावर एवढं चिडायला तुम्हाला कोणी सांगितलंय ?

नुस्ती घुरघुर

सुबोध खरे's picture

5 Aug 2020 - 9:14 am | सुबोध खरे

जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय?

नसती लूडबूड

mrcoolguynice's picture

5 Aug 2020 - 10:24 am | mrcoolguynice

खरं खरं आडनाव मोदी असल्यासारखी ....
नुसतीच फुसफुस ...

सुबोध खरे's picture

5 Aug 2020 - 10:32 am | सुबोध खरे

बरं बुवा
तुमचीच लाल

"तुमचीसुद्धा लाल " हे उदगार जास्त सयुक्तिक झालं असतें ...

सुबोध खरे's picture

5 Aug 2020 - 12:29 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र

mrcoolguynice's picture

5 Aug 2020 - 1:45 pm | mrcoolguynice

खिक्क

राजाभाउ's picture

28 Jul 2020 - 11:22 am | राजाभाउ

पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 11:30 am | सुबोध खरे

नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे.

बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो.

सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत.

शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते

आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

राजाभाउ's picture

28 Jul 2020 - 12:38 pm | राजाभाउ

समजलं धन्यवाद.

फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

Rajesh188's picture

23 Jul 2020 - 9:27 pm | Rajesh188

बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे.
बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार.
उदाहरणे तरी नीट ध्या.

Gk's picture

23 Jul 2020 - 10:02 pm | Gk

त्याला शॉवर घ्यायचा असेल

बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते..
कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते..
कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk's picture

24 Jul 2020 - 12:50 pm | Gk

वाफेने करोना मरतो

ह्याचे लॉजिक तेच आहे

जे

नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे.
त्या मधील च वाफ ही एक आयडिया.
जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात.
आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस's picture

24 Jul 2020 - 2:26 pm | मराठी_माणूस

करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते.
मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात.
अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

स्वच्छंद's picture

26 Jul 2020 - 2:36 am | स्वच्छंद

समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ.

"....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..."

१) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते

२) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते

३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.

....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....

वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित

....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....

(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188's picture

26 Jul 2020 - 8:52 am | Rajesh188

मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे.
बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात.
तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही.
तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही.
कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

माहितगार's picture

26 Jul 2020 - 11:12 am | माहितगार

क्या बाते !

तिमा's picture

26 Jul 2020 - 11:36 am | तिमा

या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे.
अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते.
सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते.
तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

माहितगार's picture

26 Jul 2020 - 11:50 am | माहितगार

उत्तम प्रतिसाद

सुबोध खरे's picture

26 Jul 2020 - 12:39 pm | सुबोध खरे

हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात.

हम्म

हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा?

२४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो.

जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो.

प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते.

असो.

आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे

मेरा भारत महान.

जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे.

सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे.

सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

मराठी_माणूस's picture

26 Jul 2020 - 2:04 pm | मराठी_माणूस

जर ही आकरणी योग्य असेल तर मग सरकार ह्या मधे का ह्स्तक्षेप करत आहे.

सुबोध खरे's picture

26 Jul 2020 - 2:28 pm | सुबोध खरे

रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का?
सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते.
मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही?

ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये?

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.

सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती

जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2020 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.

खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.

उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.

अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

27 Jul 2020 - 12:24 am | मराठी कथालेखक

नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो.

सुबोध खरे's picture

27 Jul 2020 - 7:36 pm | सुबोध खरे

मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो.

तसेच रहा कि

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?

त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2020 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?

डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :)

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

29 Jul 2020 - 6:30 pm | सुबोध खरे

डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून.

हायला

मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का?

आणि

बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/

उगाच काहींच्या काही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2020 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगाच काहींच्या काही?

बरं....!

-दिलीप बिरुटे