अमुची चिमुकली गादी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
17 Nov 2008 - 10:34 pm

हेमू अधिकारी काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना काय? एखादी फाटकी पिशवी काढून टाकल्यासारखी वृत्ती त्यांच्यात आली होती.डॉक्टरांची चूक नाही म्हणा.संवयीचा परिणाम.
हे सर्व हेमूकडून ऐकून त्यांच्या नातवाच्या मनातली भावना कवितेत सुचली.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरिर
अमुच्या चिमुकल्या गादिवर
पोसलिस तू किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे ऑक्सिजन
जरूरी नसे भरण्या क्लोरीन
पंपाविना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे

चूक जहाली निसर्गाची
दिसते पिशवी चाड कशाची
द्दा टाकून झाला वापर
असेच म्हणती डॉक्टर

श्रीकृष्ण सामंत

कविताविचार

प्रतिक्रिया

दिनेश's picture

17 Nov 2008 - 11:08 pm | दिनेश

सामंतसाहेब,
लाजवाब !!! अश्याच भावना व गंभीर अवस्था माझी २६ वर्षांपूर्वी झाली होती माझ्या आईचे ऑपरेशन झाल्यावर जेव्हा डॉक्टरांनी काढलेला गर्भाशय दाखवला तेव्हा. वाचताना नकळत स्मृती जाग्या झाल्या.
धन्यवाद!!!
दिनेश

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Nov 2008 - 1:08 am | श्रीकृष्ण सामंत

दिनेश,
आपल्यालाही अशा अवस्थेतून जावं लागलं हे वाचून खूप वाईट वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:21 am | सर्किट (not verified)

मुंबई आणि भारताच्या क्रिकेट चमूत खेळणारे हेमू अधिकारी ते हेच का ? ते सध्या कॅलिफोर्नियात आहेत का ? ते तुम्हाला कुठल्या बाजारात भेटले होते ? भारत बझार ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Nov 2008 - 2:09 am | श्रीकृष्ण सामंत

अरे सर्किट,
तू असतोस कुठे?.खूप दिवसानी प्रतिसाद द्दायला आलास!.अमेरिकेत एकॉनॉमी डाऊन झाली म्हणून इतकं मनाल लावून घ्यायचं.?
जे डाऊन होतं ते अप होणार.हा जगाचा नियमच आहे.
आणि हेमू अधिकारी म्हणजे तो क्रिकेटवीर एकटाच नावाचा का रे?
"आमच्या कोकणात जेका तेका दाजी म्हणतत म्हणून काय हे दाजी भाटवडेकर म्हणजे दाजी ह्या नावाचो तेंचोच मक्तो काय?
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com