मिसळपाव .कॉम (मिपा)चे काम कसं चालतं?

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
23 Apr 2020 - 11:09 pm

नमस्कार,

गेली १३ वर्षे आपलं मिसळपाव.कॉम संकेतस्थळ अव्याहत सुरू आहे. लोकांना मराठीत व्यक्त होता यावं आणि मराठी लोकांशी गप्पा मारता याव्या व चर्चा करता यावी या साध्या हेतूने मिसळपाव.कॉम सुरू झाले होते. तेव्हाच्या म्हणजे २००७ मध्ये आंतरजालावर मराठी सहज लिहीता यावी व सहज व्यक्त होता यावे ही सुध्दा प्रेरणा होती.

मिपा गेल्या काळात अनेक उतार चढावांतून गेलंय. आणि अनेक लोक सुरूवातीपासून येथे आहेत. आज येथे लिहीतोय ते नवीन आलेल्या सदस्यांना मिसळपाव.कॉमचे काम कसे चालते हे कळायला हवे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.

मिसळपाव.कॉमवर प्रकाशित झालेले लेख किंवा प्रतिक्रिया वाचण्यासाठी तुम्हाला सदस्यं होणे गरजेचे नाही. मात्र लिहीण्यासाठी म्हणजे तुमचे लेख, तुमच्या मनातील विषयावरील चर्चा, तुमची पाककृती, तुमचे प्रवासवर्णन आदी सर्व लिहिण्यासाठी तुम्ही मिसळपाव.कॉमचे सदस्यं होणे गरजेचे आहे. त्यासोबत अन्य लोकांच्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी सुध्दा तुम्ही सदस्यं असणे आवश्यक आहे.

सदस्यं कसे होता येईल?
- सदस्य होण्यासाठी तुम्ही या पानावर जाऊन एक छोटा अर्ज भरून द्यायचा आहे. तेथे तुमचे सदस्यं नाम, तुमचा ईमेल पत्ता आणि तुमच्या खात्यासाठी तुम्हाला वापरायचा तो पासवर्ड(संकेताक्षर) द्या. आणि त्या अर्जाखालील बटनावर टिचकी मारून तो अर्ज मिपावर सुपुर्त करा. एक दोन दिवसांत तुमचे खाते सक्रिय केले जाईल. तुम्ही तुमचे सदस्यं नाम आणि पासवर्ड देऊन मिपामध्ये सामील होऊ शकता.
या सर्व प्रक्रियेत तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही admin@misalpav.com या पत्यावर ईमेल पाठवू शकता. तुमची अडचण सोडवण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करू.
लेखन कसे करता येईल?
- मिपावर सदस्यं झाल्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा उजव्या समासात (साईडबार) तुम्हाला आवागमन नावाचा चौकोणी कोडना दिसेल. त्यात मध्ये अनेक पर्याय आहेत. हे तुमच्यासाठी आहेत. जसे की येथून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता. तुमचे प्रोफाईल भरू शकता. त्याशिवाय कुणाचे व्यक्तीगत संदेश आलेले बघु शकता, तुमच्या खरडवहीत कुणी लिहीले असेल तर ते पाहून त्यांना उत्तर देऊ शकता. या खाली एक लेखन करा नावाचा पर्याय आहे. यावर टिचकी मारली की मग मिपावर लिहीण्याचे वेगवेगळे पर्याय तुमच्या समोर येतील. यातील तुम्हाला अनुकुल असलेल्या पर्यायावर जाऊन तुमचे त्या पर्यायानुसार असलेले लेखन प्रकाशित करा.

एक गोष्ट लक्षात घ्या मिसळपाव.कॉमवर अन्य कुणाचे लेखन तुमच्या नावावर प्रकाशित करण्यावर बंदी आहे. लेखन तुमचेच असावे असा नियम आहे.

लेखन करण्यात अडचण आहे? मदत हवीये? काय करू?
- तुम्हाला मिसळपाव.कॉम वर लेखन प्रकाशित करण्यासाठी काही मदत हवी असल्यास येथे साहित्य संपादक आहेत. ते तुम्हाला लेख प्रकाशित करण्यात मदत करतील. ते तुम्हाला लेख प्रकाशित करून देणार नाहीत तर विनंतीवरून तुम्हाला लेख प्रकाशित करण्यात मदत करतील. मिपावर तुमच्या लेखात चित्रे जोडण्याची पध्दती जरा गौरसोयीची आहे त्याबाबत ते मदत करतील. तसेच ही चित्रे जोडण्याची गैरसोय लवकरच आम्ही दूर करतोय हे नक्की.

मिपावर वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. जसे आता शतशब्द कथा नावाची स्पर्धा सुरू आहे. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी सुध्दा तुम्ही साहित्य संपादकांना संपर्क केला पाहिजे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन डायरी नावाची एक लेखमाला सुरू आहे यात रोज नवीन सदस्यं आपला लेख देतो. तुम्हाला आपला लेख द्यायचा असल्यास साहित्य संपादकांना संपर्क करावा.

माझा लेख किंवा प्रतिक्रिया दिसत नाही? काय झाले असेल?
- मिसळपाव.कॉमवर अनेक लोक वेगवेगळे लेख व चर्चा प्रकाशित करत असतात. त्यासोबत अनेक चर्चा मध्ये आपले मत मांडतात. अनेकदा असे लेखन किंवा प्रतिक्रिया ह्या मिसळपावच्या नियमाच्या बाहेरचे असल्यामुळे तसे लेख व प्रतिक्रिया अप्रकाशित केले जातात. मिसळपाव.कॉमवर खुप कठीण नियम नाहीत. येथे तसे लेखन करू नये जे आपण आपल्या समाजात करत नाही. कुठल्याही धर्म,पंथ किंवा महान नेत्यांना वाईट बोलणे आदी करू नये असे साधे आणि सोपे नियम आहेत. मात्र अनेकदा लोक भावनेच्या भरात अश्या चुका करतात. अनेकदा काही अतिउत्साही सदस्यं अन्य लोकांचे प्रकाशित साहित्य आपल्या नावावर प्रकाशित करतात. अशा वेळेस मिसळपावचे संपादक हस्तक्षेप करतात. ते तश्या प्रकारच्या लेख व प्रतिक्रिया यांचेवर कारवाई करून अप्रकाशित करतात. अनेकदा अश्या चांगल्या कामात सहकार्य न करता एखादा सदस्यं कायम चुकिचेच वागणार अश्या अट्टाहासाने वागत असेल तर शेवटी त्या सदस्यावर कारवाई केली जाते व त्यांचे खाते निलंबीत केले जाते. संपादनाच्या कामात व्यवस्थापनाकडून सहसा हस्तक्षेप केल्या जात नाही.

तुम्हाला मिसळपाव.कॉमवर काही चुकीचे प्रकाशित झालेले आढळल्यास संपादक मंडळास तसे सूचीत केल्यास त्यावर कारवाई करता येईल. मिसळपाव.कॉम हे हौशी संकेतस्थळ आहे. आमच्यापैकी कुणीही पुर्णवेळ मिपाचे काम करत नाही. आपापले कामधाम सांभाळून येथील सगळे व्यवस्थापक, संपादक, साहित्यसंपादक, सल्लागार, हितचिंतक असे सगळे मिपासाठी काहीना काही करत असतात. त्यामुळे कदाचित तुम्हाला प्रतिसाद मिळायला वेळ लागू शकतो हे लक्षात असू द्या ही विनंती.

मला मिपाच्या कामात कसे सहभागी होता येईल?
- तुम्हाला मिपाच्या कामात सहज सहभागी होता येईल. मिपावर लिहीते व्हा, प्रतिक्रिया द्या हा सर्वात उत्तम मार्ग आहे. मिपाच्या कामात सहभागी व्हायचे असल्यास तुम्ही साहित्य संपादक किंवा संपादक होऊ शकता. त्यासाठी तुम्ही संपादक मंडळाला व्यक्तिगत निरोप पाठवू शकता. दर काही महिन्यांनी मिपाच्या कामात नवीन लोकांना सहभागी करून घेत असतो.

मला मिपावर एखादी अडचण असेल तर काय केले पाहिजे?
- मिसळपावर नवीन सदस्यांसाठी मदत पानं तयार आहेत. तेथे तुम्ही यापुर्वी विचारलेले प्रश्न वाचू शकता. तुमची अडचण तेथे सोडवल्या गेली नाही तर तेथे प्रश्न विचारू शकता. त्यानंतर साहित्य संपादक व संपादक तुमच्या मदतीस आहेतच.

या सर्वांवरून नवीन सदस्यांना मिसळपाव.कॉमचे काम कसे चालते याची कल्पना आली असावी. मिसळपाव.कॉमवर येत रहा. लिहीत रहा, वाचत रहा ही विनंती. लवकरच आपण मिसळपाव.कॉममध्ये काही बदल करणार आहोत. त्यावेळीसुध्दा असाच एक नवीन धागा काढूया. चर्चा करून मिपामध्ये बदल करूया.

धन्यवाद.

हे ठिकाणधोरणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

लेखाचे स्वागत. नवनवीन वाचक येत्या काळात मिसळपाव या साइटचे सभासद होतील आणि लेखन करतील अशी अशा करूया. शिवाय जे जुने सभासद बरीच वर्षं लिहित नाहीत तेही लिहू लागतील याची खात्री आहे.

लेखासोबत फोटो दिल्याने वाचनाचा आनंद वाढतो आणि विषय कळायलाही मदत होते. फोटो देण्यासाठी तो फोटो या साईटवर अपलोड करण्याची गरज असते परंतू तेवढी मेमरी स्टोरेज प्रत्येक सभासदाला देण्यात अडचण आहे. तरीही त्यात एक मार्ग म्हणजे 'गूगल_फोटोज' या गूगलच्या फोटो स्टोरेजचा उपयोग करून घेणे हा आहे. प्रत्येक Gmail account ला गूगल १५ जीबी ( १५ हजार एमबी ) एवढी मेमरी फुकट देते. शिवाय ही साईट वाइरसमुक्तही आहे. तिथे फोटो अपलोड करून साठवून - शेअरिंग परमिशन घेऊन - ती लिंक एचटीएमएलच्या इमेज tag मध्ये योग्य तऱ्हेने वापरून लेखासाठी फोटोची व्यवस्था करता येते.

आगामी काळात मिसळपाव डॉट कॉम साईटवर प्रति सभासद काही १०० - १५० एमबी मेमरी उपलब्ध झाल्यास काम फारच सोपे होणार आहे. परंतू जे सभासद खूप लेख, खूप फोटो देतात ते गूगल फोटोज वापरत राहाणारच. किंवा हाई रेझलूशन फोटो देण्यासाठी वापर चालूच ठेवावा लागेल.

मिपा अधिकाधिक मनोरंजक आणि माहितीपर होत राहो हीच इच्छा.

मदनबाण's picture

24 Apr 2020 - 11:29 am | मदनबाण

प्रोफाइल पिक्चर दर थोड्या काळाने अचानक लुप्त होतो, त्यामुळे दर वेळी प्रोफइल पिक्चर अपलोड करत रहावे लागते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा ही नम्र विनंती !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Yahi Pyar Hai (The Unwind Mix) by Meiyang Chang & Shashaa Tirupati

जव्हेरगंज's picture

24 Apr 2020 - 5:08 pm | जव्हेरगंज

+१
आणि साईज पण वाढवावी. फारंच छोटी साईज आहे सध्याची!

माझा पण प्रोफाइल पिक्चर गायब झाला
एवढा वे़ळ ध्यानच नाहि गेल

प्रचेतस's picture

24 Apr 2020 - 7:27 pm | प्रचेतस

मालक लिहिते झाल्यामुळे बरे वाटले.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2020 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे

हॅ हॅ काही धोरणाविषयी वाद वा संभ्रम निर्माण झाल्यास शेवटचा अधिकार मालकांचा असेल हे लिवायच राह्यलय ना!

प्रचेतस's picture

25 Apr 2020 - 10:23 am | प्रचेतस

=))

सेंटर, डावे, उजवे, जस्टिफाय असे पर्याय नसल्याने फक्त डाव्या बाजूने फोटो किंवा मजकूर येतो.
ती सोय करता आली तर बरे होईल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2020 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, तुम्ही अधून मधून लिहित राहा. बोलतं राहीलं पाहिजे असं वाटतं.
नव लेखकांना दिशादर्शकवजा लेखन पोहचले. ड्युटीवर काळजी घ्या.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

25 Apr 2020 - 11:37 am | कंजूस

फार्म्याटिंग?

सेंटर, डावे, उजवे, जस्टिफाय असे पर्याय नसल्याने फक्त डाव्या बाजूने फोटो किंवा मजकूर येतो.
ती सोय करता आली तर बरे होईल...
सेंटर, डावे, उजवे, जस्टिफाय असे पर्याय नसल्याने फक्त डाव्या बाजूने फोटो किंवा मजकूर येतो.
ती सोय करता आली तर बरे होईल...

सेंटर, डावे, उजवे, जस्टिफाय असे पर्याय नसल्याने फक्त डाव्या बाजूने फोटो किंवा मजकूर येतो.
ती सोय करता आली तर बरे होईल...
सेंटर, डावे, उजवे, जस्टिफाय असे पर्याय नसल्याने फक्त डाव्या बाजूने फोटो किंवा मजकूर येतो.
ती सोय करता आली तर बरे होईल...

हे सर्व साध्या CSS inline <div> आणि <p> styles मध्ये करता येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2020 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. आवडला फॉर्मेट...कधी लिहिलंच तर निवडेन हा फॉर्मेट. काळानुसार मिपा बदलते आहेच. वेगवेग फॉर्मॅटींग पाहिजेत.
मोफत वावरायला मिळतं हे आमचं भाग्यच. आहे त्यात समाधानी आहोतच पण बदल होत गेले पाहिजेत. धन्स कंजुशकाका.

-दिलीप बिरुटे

हे सर्व साध्या CSS inline आणि styles मध्ये करता येते.

एक विनंती आहे - लेखमाला एकत्र ओवण्याची आणि स्व-संपादनाची सोय लेखकाला देता आली तर बघा प्लीज.
_/\_

कुमार१'s picture

25 Apr 2020 - 5:32 pm | कुमार१

+१११११
सर्व मिपा कट्टे एकत्र शोधता येतील अशी सोय जमेल ?

ह्या क्षेत्रातील शून्य माहिती असल्यामुळे पडलेले प्रश्न (हे विचारणे प्रशस्त आहे किंवा नाही माहित नाही, नसल्यास काढून टाकावे):

असे संकेतस्थळ चालवणे हे खर्चिक काम आहे का ?
मिसळपावचा आर्थिक भार निलकांत एकटेच उचलतात का?
मिपासाठी एखादी टीम (पेड किंवा अनपेड) काम करते का (संपादक सोडून)?