लेखन करा

मिसळपाववर तुमचे लेखन करण्यासाठी खालील पैकी अनुरूप पर्याय निवडा. मिसळपाव.कॉम वर प्रकाशित करीत असलेले लेखन हे तुमचेच असलेल पाहिजे असा नियम आहे. अधीक माहितीसाठी मिपाचे अधिकृत धोरण वाचावे. लेख लिहिण्यात काही अडचण आल्यास सर्वप्रथम मदत पाने बघावीत शक्यतो तुमची अडचण तेथे आधीच कुणीतरी विचारलेली असेल व सविस्तर उत्तर सुध्दा तेथे उपलब्ध असेल. मदत पानांतून तुमची अडचण दूर झाली नसेल तर मिपाच्या साहित्य संपादकांची मदत घेऊ शकता. शक्यता ही सुध्दा आहे की तुमचा लेख चुकला असल्यास एखादे साहित्य संपादक तुमचा लेख दुरूस्त करण्यास आले सुध्दा असतील.

मिपावरील प्रमुख साहित्य प्रकार.


लेख

ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!


चर्चा

चर्चा हा प्रकार समाजातील चालु घडामोडी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्याकरीता आहे. येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल. चर्चेच्या संबंधीत वर्गीकरण निवडण्याचा पर्याय खाली दिलेला आहे. हे वर्गीकरण तुमचे लेखन कुठल्या विषयाशी संबंधीत आहे हे ठरवेल. पुढे भविष्यात या विषयाच्या लेखांना शोधण्यासाठी व त्यांची सूची बनविण्यासाठी ह्या वर्गीकरणाची मदत होईल. त्यामुळे केवळ तुमच्या विषयाशी संबंधीत असलेलेच वर्गीकरण निवडा. विषयाशी संबंध नसलेलं वर्गीकरण विनाकारण जोडल्यास लेखन अप्रकाशित करता येईल. वर्गीकरणात किमान एक आणि कमाल पाच शब्द निवडता येतील. एखादा शब्द लिहायला सुरूवात केल्यावर तो शब्द आधीच जोडलेला असेल तर तो तेथे दिसेल तो निवडावा. असा शब्द न आल्यास तुम्ही स्वत:हून जोडू शकता.

काव्य

कवी, गझलकार, विडंबनकार, चारोळ्याकार, मुक्तककार इत्यादी मंडळींचे हे सन्माननीय स्थान आहे. साक्षात भास्कर महाराज जे पाहू शकत नाहीत ते पाहाण्याची नजर असलेल्या सर्व मंडळींचे येथे मनापासून स्वागत आहे!

तंत्रजगत

नवीन तंत्रज्ञानाविषयी येथे लिंहीता येईल. संगणक, मोबाईल, वाहन क्षेत्र किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातील तंत्रज्ञानावर येथून लेख लिहिता येतील.

पाककृती

सर्व खवय्यांचे आणि बल्लवाचार्यांचे आणि अन्नपूर्णा गृहिणींचे हे मंदिर आहे. आपल्याला माहिती असलेल्या निरनिराळ्या प्रांतातल्या, निरनिराळ्या पद्धतीच्या पाककृती या सदराद्वारा इतरांनाही माहीत करून द्या आणि खाण्याचा आनंद शतगुणित करा! अहो शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! :)

प्रश्नोत्तरे
तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल आणि त्याचे उत्तर अन्य सदस्यांकडून हवे असल्यास या प्रकारात तो प्रश्न विचारला जावा. येथे प्रश्न विचारताना केवळ तोकडा प्रश्न न देता तो सविस्तर द्यावा. किंवा त्याबाबत थोडी पार्श्वभूमी असल्यास ती द्यावी म्हणजे अन्य लोकांना तुमचा प्रश्न समजायला सोपे जाईल.

भटकंती

येथे पर्यटन विषयक लेखन प्रकाशित करावे. या प्रकारात प्रवास वर्णन तर अपेक्षीत आहेच सोबतच जावं कसं? रहावं कुठे ? खावं काय? आणि काय आवर्जून बघावं हे सुध्दा यावं म्हणजे अन्य सदस्यांना सोईचं होईल.

मिपा कलादालन
हा विभाग वेगवेगळ्या कलाप्रकारासाठी आहे. येथे तुमची रेखाटने, चित्रे, फोटो आणि इतर कलेचा नमुना देता येईल. फक्त कलाकृती देण्यासाठी या विभागाचा वापर करावा. एखाद्या कलाविषयावर चर्चा काथ्याकूट मधे करता येईल.

राजकारण
भारतीय राजकारण विशेषतः २०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबतच्या लेखांसाठी हे खास दालन आहे.

कृषी
कृषी संबंधात सर्व माहितीसाठी हे खास दालन आहे.परंपरागत शेती, सेंद्रीय शेती, शाश्वत शेती, नवीन कृषी तंत्रज्ञान,परसबागेतील शेती आदी विषयांवर येथून लिहिता येईल.