एक चांदणी माझ्या घरात डोकावते

Primary tabs

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
2 Mar 2020 - 4:02 pm

दुधाळ चांदव्यात,
प्रखर तेजाळते
एक चांदणी माझ्या,
घरात डोकावते

मी बसतो दडून,
तिच्यापासून
ती हलत नाही,
टक लावते

माझा मी लिहितो,
हळुवार गुणगुणतो
ही, मी लिहिलेले,
गावाला ऐकवते

चालत राहते रात्र,
ही चांदणी मात्र
अमीट असल्याच्या,
थाटात वावरते

उशीरा कधीतरी,
फिरते माघारी
ती गेल्यावर तिची,
टिमटिम आठवते

रात्रभर छळते,
मला जागवते
पहाटे निमूट माझ्या,
कवितेत उतरते

- संदीप चांदणे

कविता माझीशांतरसवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2020 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान लिहिली आहेस संदीप,
मजा आली वाचताना
पैजारबुवा,

शलभ's picture

2 Mar 2020 - 7:04 pm | शलभ

सुंदर. खूप छान.

प्रचेतस's picture

3 Mar 2020 - 8:30 am | प्रचेतस

अप्रतिम.

प्राची अश्विनी, तू आणि पैजारबुवा (खंग्री विडंबने)... मिपावरील कवितांना सध्या परत भाग्याचे दिवस येत आहेत.

चांदणे संदीप's picture

3 Mar 2020 - 12:22 pm | चांदणे संदीप

कविता कशी सुचते यावर एक गंमत सांगतो. खरं म्हणजे मलाही ते न उलगडलेले कोडेच आहे म्हणा अजून... असो, म्हणूनच गंमत!

या आणि याआधीच्या माझी कवितेचा संदर्भ घेऊन:
साधारणपणे कुणालाही असं वाटणं साहजिक आहे की कवितेत चांदण्या वगैरे आणल्यात म्हणजे कवी मस्त रात्री निवांत बसून चांदण्या एन्जॉय वगैरे करतोय किंवा प्रेयसी नाही किमान बायकोला रात्री छान जवळ घेऊन बसला आहे रात्रीच्या आभाळाकडे बघत किंवा गेलाबाजार, घराच्या बाहेर रात्री गार वार्‍यात मित्रांसोबत 'बसून' गप्पा वगैरे मारत बसलेला असताना अशा छान छान कल्पना डोक्यात असतील. कसलं आलंय डोंबलाच! याच्या अगदी उलट गेल्या दोन आठवड्यापासून रोज ऑफिसमध्ये लेट होतोय. रात्रीच्या त्या ऑफिसमधल्या नीरस, नव्हे, अतीईईईईई-नीरस वातावरणात, हातातलं काम मारूतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय असं दिसत असताना या कविता आजिबात कुठेही एक चांदणी दिसत नसताना डोस्क्यात आलेल्या आहेत आणी मी त्या हातातले काम बाजूला ठेऊन लिहून काढत रात्रीच्या उशीराला अजून ताणलेलं आहे. आता बोला! आहे की नाही गंमत?

सं - दी - प

प्रचेतस's picture

3 Mar 2020 - 12:41 pm | प्रचेतस

म्हणूनच म्हणतात 'जे न देखे रवी, ते देखे कवी' :)

लिहित राहा. वाचत आहेच.

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2020 - 8:58 am | प्राची अश्विनी

सुरेख!

श्वेता२४'s picture

3 Mar 2020 - 12:34 pm | श्वेता२४

आवडली