"गंमत केली" म्हणालास तू...

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 Dec 2019 - 7:56 am

"गंमत केली" म्हणालास तू
"कळले मजला" मीही म्हटले.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.

लाईक होते असंख्य त्यावर
डीपी जेव्हा नवा ठेवला
पाठवले तू smile जेव्हा
इथे खुशीचे तरंग उठले.

नुसते smile, ठाक कोरडे
तरी पोचते ओल त्यातली.
एक इमोजी सांगून जातो
शब्दांना जे नसते जमले.

म्हणो कुणी हा सोशल मीडिया
नाही शाश्वत फक्त दिखावा.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.

काहीच्या काही कविताकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Dec 2019 - 8:59 am | प्रचेतस

खूप छान.

गवि's picture

14 Dec 2019 - 9:00 am | गवि

वाह, उत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2019 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह, उत्तम.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2019 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली, छान झाली आहे
पैजारबुवा,

पुलेशु

प्राची अश्विनी's picture

16 Dec 2019 - 11:33 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांना!

स्वधर्म's picture

16 Dec 2019 - 12:05 pm | स्वधर्म

आवडली कविता

श्वेता२४'s picture

16 Dec 2019 - 12:12 pm | श्वेता२४

इंग्रजी व मराठी शब्दांची सरमिसळ छान केली आहे. खूप आवडली.

मी नाही करणार इथे पुढे गम्मत......

मी नाही करणार इथे पुढे गम्मत......

आता नाही आहे , माझ्यात तेव्हढी हिम्मत ...

सर्वच्या सर्व आवडले

आठवले म्हणून पाठवले

मला माहित है ,

तुम्ही नाराज नै

हलकेच घ्याल असे वाटले

म्हणून हेपण लगेच आठवले

==)))) ==)))) ==))))

राघव's picture

16 Dec 2019 - 12:56 pm | राघव

:-)

मुक्त विहारि's picture

16 Dec 2019 - 3:50 pm | मुक्त विहारि

हा एक उत्तम सिनेमा, आंतरजालीय संभाषणावर आधारित आहे.

जमल्यास जरूर बघा.

खूप आवडीचा चित्रपट आहे. आठवण करून दिल्याबद्दल आभार. खूप दिवसांत बघितलेला नाही. आता परत बघणे आले. :-)

मुक्त विहारि's picture

16 Dec 2019 - 10:46 pm | मुक्त विहारि

आणि मेग रायनने देखील तोडीस तोड अभिनय केला आहे....

राघव's picture

17 Dec 2019 - 1:09 pm | राघव

येस्स..!
आणि त्यांचाच त्या आधीचा.. Sleepless in Seattle.. तोही चांगलाय.
पण You Have Got Mail जास्त चांगला जमलाय! :-)

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 6:34 pm | जॉनविक्क

तवा सर्फ तुम बगून समादान पावलो

प्राची अश्विनी's picture

17 Dec 2019 - 8:41 am | प्राची अश्विनी

पाहिलाय. आवडलेला अर्थातच. रेडिफ मेल वर खातं होतं त्या काळात माझं. :)

मुक्त विहारि's picture

17 Dec 2019 - 7:18 pm | मुक्त विहारि

तोच सिनेमा आठवत होता. ..

गणेशा's picture

19 Dec 2019 - 6:32 pm | गणेशा

साधी सरळ आणि मस्त कविता..

चांदणे संदीप's picture

22 Dec 2019 - 12:40 am | चांदणे संदीप

कवितेला एक कडक स्माईल करणारी स्मायली! :)

सं - दी - प

मदनबाण's picture

22 Dec 2019 - 11:31 am | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4

पद्मावति's picture

23 Dec 2019 - 3:13 pm | पद्मावति

मस्तंच.