"गंमत केली" म्हणालास तू
"कळले मजला" मीही म्हटले.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.
लाईक होते असंख्य त्यावर
डीपी जेव्हा नवा ठेवला
पाठवले तू smile जेव्हा
इथे खुशीचे तरंग उठले.
नुसते smile, ठाक कोरडे
तरी पोचते ओल त्यातली.
एक इमोजी सांगून जातो
शब्दांना जे नसते जमले.
म्हणो कुणी हा सोशल मीडिया
नाही शाश्वत फक्त दिखावा.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16070
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान.
वाह, उत्तम.
असंच म्हणतो.
In reply to वाह, उत्तम. by गवि
सुरेख
।,, पोटेनशीअलं पुर्ण वापरले गेले नाही
धन्यवाद सर्वांना!
छान
नेहमीप्रमाणेच आवडली
मी नाही करणार इथे पुढे गम्मत......
:-)
You Have Got A Mail
खूप आवडीचा चित्रपट आहे. आठवण
In reply to You Have Got A Mail by मुक्त विहारि
टाॅम Hanks चा अभिनय तर उत्तम आहेच. ...
In reply to खूप आवडीचा चित्रपट आहे. आठवण by राघव
येस्स..!
In reply to टाॅम Hanks चा अभिनय तर उत्तम आहेच. ... by मुक्त विहारि
आमी इंग्रजी न जाणणारे होतो
In reply to येस्स..! by राघव
पाहिलाय. आवडलेला अर्थातच.
In reply to You Have Got A Mail by मुक्त विहारि
तुम्ही लिहिलेली कविता वाचतांना...
In reply to पाहिलाय. आवडलेला अर्थातच. by प्राची अश्विनी
साधी सरळ आणि मस्त कविता..
मस्तच!
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4मस्तंच.