उद्वेग विसरून कसं चालेल?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
4 Nov 2008 - 10:54 pm

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणार्‍याला
विसरून कसं चालेल?

गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?

जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?

लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग

मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?

शेवटी काय?

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

4 Nov 2008 - 11:00 pm | लिखाळ

छान कविता.. पहिली पाच कडवी जास्त आवडली

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात

हा हा.. यात शब्दांनी मस्त मजा आणली आहे :)
-- (ओरिजिनल कसला कसला) लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Nov 2008 - 1:25 am | श्रीकृष्ण सामंत

लिखाळ,
आपल्याला त्या ओळी वाचून इतका आनंद झाला हे वाचून खूप बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

7 Nov 2008 - 8:07 am | अरुण मनोहर

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात

केव्हातरी नाही, नेहमीच मुखवटे असतात. जन्माला येतो तेव्हा आत्माच शरीराचा मुखवटा चढवून आला असतो, हा अध्यात्मिक भाग सोडुन द्या. पण सगळ्यांशीच आपण वेगवेगळे मुखवटे घालून वागत असतो.
माझा ऑफीसमधला जपानी मित्र विनोदाने म्हणायचा- "मी जेव्हा टॉयलेट मधे असतो, तेव्हाच फक्त 'मी' असतो!"

--(नाटक्या)

सुचेल तसं's picture

7 Nov 2008 - 8:51 am | सुचेल तसं

ही कविता तुम्ही आधी प्रसिद्ध केली होती.

http://www.misalpav.com/node/2376


Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

अरे खरंच की! तेव्हा कशी वाचण्यात आली नाही देव जाणे..!

मिपावरच्या बर्‍याच गोष्टी निवांतपणे वाचायला साला टाईमच भेटत नाय! :)

असो,

तात्या.

सुचेल तसं's picture

7 Nov 2008 - 8:58 am | सुचेल तसं

तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही हे पाहून सामंत काकांनी कविता परत टाकली वाटतं. ;)

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 9:36 am | श्रीकृष्ण सामंत

सुचेल तसं,
कविता वाचल्यावर आपल्या लक्षात आलं की पूर्वी ही कविता लिहिली होती हे वाखाणण्या सारखं आहे.कवितेच्या आशयाचं तर हे यश असावं का? चला,अशातर्‍हेन तरी प्रतिक्रिया मिळावी हे काय कमी आहे.
(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं's picture

7 Nov 2008 - 10:08 am | सुचेल तसं


(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका

प्रामाणिकपणा आवडला

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 8:54 am | विसोबा खेचर

साला, जोरदारच कविता केली आहे राव...!

आपला,
(सुपातला) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 9:10 am | श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रियेच्या संख्येवर लेखनाची यशस्वीता मानता येत नसावी.कारण शुन्य प्रतिक्रियेच्या लेखनाची शेकडो वाचने झाली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं's picture

7 Nov 2008 - 9:20 am | सुचेल तसं

सामंत काका,

टेक इट ईझी!!! प्रतिसादाबद्दलचं वाक्य मजेखातर टाकलं आहे.

मुळ मुद्दा हा की हीच कविता तुम्ही तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 9:40 am | श्रीकृष्ण सामंत

सुचेल तसं,
द्दाटस ओके.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मदनबाण's picture

7 Nov 2008 - 9:50 am | मदनबाण

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणार्‍याला
विसरून कसं चालेल?
सुरेख...

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2008 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मस्त !!! आवडली कविता.

अनिल हटेला's picture

7 Nov 2008 - 10:08 am | अनिल हटेला

आवडली कविता !!

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

हे खास !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शिंगाड्या's picture

7 Nov 2008 - 10:14 am | शिंगाड्या

कविता आवडली

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 11:11 am | श्रीकृष्ण सामंत

अरुण मनोहर,सुचेल तसं,तात्याराव, मदनबाण,डॉ.दिलीप,अनिल हटेला,शिंगाड्या,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

क्षितिजा's picture

21 Nov 2008 - 5:47 pm | क्षितिजा

आवडली कविता.

विनायक प्रभू's picture

21 Nov 2008 - 6:04 pm | विनायक प्रभू

कविता खूप आवडली.

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 8:49 pm | टवाळचिखलू

मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

खोल कवीता ...

- हिम्मतवान चिखलू

शितल's picture

21 Nov 2008 - 9:29 pm | शितल

सहमत
हेच कडवे जास्त भावले. :)

प्राजु's picture

21 Nov 2008 - 9:17 pm | प्राजु

छान आहे कविता.
जीवनाचं दर्शन घडवते. आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

21 Nov 2008 - 9:36 pm | रेवती

कविता आहे.
धन्यवाद सामंतकाका!

रेवती

वेताळ's picture

21 Nov 2008 - 9:58 pm | वेताळ

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

हमखास हे घडतेजीवनात.
जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

बहोत खुब...
छान कविता
वेताळ

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Nov 2008 - 11:03 pm | श्रीकृष्ण सामंत

क्षितिजा,विनायक प्रभू,टवाळचिखलू,शितल,प्राजु,रेवती,
वेताळ,
आपल्या सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com