Skip to main content

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 04/11/2008 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणार्‍याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? जो तो आपल्या अक्कलेने बोलतो पण मग अक्कलच गहाण ठेवली तर मग मुर्खपणाचं बोलणं होतं हे विसरून कसं चालेल? लहानानी मोठ्यासारखं वागावं अन मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं पण मग मोठेच लहानासारखे वागले तर मग मोठेपणाचे महत्व विसरून कसं चालेल? शेवटी काय? जात्यात रगडलेले पाहून सुपातले हंसतात पण मग सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार हे विसरून कसं चालेल? श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 4952
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

छान कविता.. पहिली पाच कडवी जास्त आवडली कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात हा हा.. यात शब्दांनी मस्त मजा आणली आहे :) -- (ओरिजिनल कसला कसला) लिखाळ.

In reply to by लिखाळ

लिखाळ, आपल्याला त्या ओळी वाचून इतका आनंद झाला हे वाचून खूप बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात
केव्हातरी नाही, नेहमीच मुखवटे असतात. जन्माला येतो तेव्हा आत्माच शरीराचा मुखवटा चढवून आला असतो, हा अध्यात्मिक भाग सोडुन द्या. पण सगळ्यांशीच आपण वेगवेगळे मुखवटे घालून वागत असतो. माझा ऑफीसमधला जपानी मित्र विनोदाने म्हणायचा- "मी जेव्हा टॉयलेट मधे असतो, तेव्हाच फक्त 'मी' असतो!" --(नाटक्या)

In reply to by सुचेल तसं

अरे खरंच की! तेव्हा कशी वाचण्यात आली नाही देव जाणे..! मिपावरच्या बर्‍याच गोष्टी निवांतपणे वाचायला साला टाईमच भेटत नाय! :) असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही हे पाहून सामंत काकांनी कविता परत टाकली वाटतं. ;) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

सुचेल तसं, कविता वाचल्यावर आपल्या लक्षात आलं की पूर्वी ही कविता लिहिली होती हे वाखाणण्या सारखं आहे.कवितेच्या आशयाचं तर हे यश असावं का? चला,अशातर्‍हेन तरी प्रतिक्रिया मिळावी हे काय कमी आहे. (प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका प्रामाणिकपणा आवडला Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

साला, जोरदारच कविता केली आहे राव...! आपला, (सुपातला) तात्या.

प्रतिक्रियेच्या संख्येवर लेखनाची यशस्वीता मानता येत नसावी.कारण शुन्य प्रतिक्रियेच्या लेखनाची शेकडो वाचने झाली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सामंत काका, टेक इट ईझी!!! प्रतिसादाबद्दलचं वाक्य मजेखातर टाकलं आहे. मुळ मुद्दा हा की हीच कविता तुम्ही तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणार्‍याला विसरून कसं चालेल? सुरेख... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मस्त !!! आवडली कविता.

आवडली कविता !! जात्यात रगडलेले पाहून सुपातले हंसतात पण मग सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार हे विसरून कसं चालेल? हे खास !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अरुण मनोहर,सुचेल तसं,तात्याराव, मदनबाण,डॉ.दिलीप,अनिल हटेला,शिंगाड्या, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आवडली कविता.

मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? खोल कवीता ... - हिम्मतवान चिखलू

In reply to by टवाळचिखलू

सहमत हेच कडवे जास्त भावले. :)

छान आहे कविता. जीवनाचं दर्शन घडवते. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता आहे. धन्यवाद सामंतकाका! रेवती

आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात हमखास हे घडतेजीवनात. जात्यात रगडलेले पाहून सुपातले हंसतात पण मग सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार हे विसरून कसं चालेल? बहोत खुब... छान कविता वेताळ

क्षितिजा,विनायक प्रभू,टवाळचिखलू,शितल,प्राजु,रेवती, वेताळ, आपल्या सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com