आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात
मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?
कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?
अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणार्याला
विसरून कसं चालेल?
गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?
जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?
लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग
मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?
शेवटी काय?
जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4952
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता..
कसले कसले असले तसले झाले
In reply to छान कविता.. by लिखाळ
कविता ठीक वाटली.
ही कविता
अरे खरंच
In reply to ही कविता by सुचेल तसं
तेव्हा
In reply to अरे खरंच by विसोबा खेचर
चुकून होतं कधी कधी
In reply to तेव्हा by सुचेल तसं
(प्रतिसादा
In reply to चुकून होतं कधी कधी by श्रीकृष्ण सामंत
साला,
प्रतिक्रिया आणि लेखन
सामंत
In reply to प्रतिक्रिया आणि लेखन by श्रीकृष्ण सामंत
आभार
In reply to सामंत by सुचेल तसं
अंधार दूर
कवितेत खोल अर्थ
आवडली
कविता आवडली
सर्वांचे आभार
आवडली
सामंत शेठ
मी माझ्याच
१+
In reply to मी माझ्याच by टवाळचिखलू
छान आहे
ग्रेट
सुंदर कविता आहे.
सर्वांचे आभार