स्पर्धेबाहेरची श श क गतानुगतिक

anandkale's picture
anandkale in जनातलं, मनातलं
22 Feb 2019 - 7:53 pm

सरदार लुटीची पाहणी करीत होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही होता.

आत खणणाऱ्या सैनिकाला सांगितले.

"इथे खोदु नका, तो बडा पत्थर उचला पायखान्यात लावायला"

सैनिकाने शेंदूर लावलेला दगड उखणून काढला.

पुढच्या देवळात मौल्यवान वस्तूंची पोती भरण्याचे काम चालले होते.

" मिळेल ते सगळे भर पण बूतला हात लावू नका "

गोंधळलेल्या पोराने विचारले "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?"

" तेल पोतलेला दगड पायखान्यात चांगला बसतो, पाणी ओतले कि सगळे वाहून जाते"

"तो बुत सोन्याची खाण आहे. बात सगळीकडे फैलेल कि खान इतका ताकतवर, बाकी सगळी देवळे फोडली पण इथे त्याचे काही चालले नाही. शेवटी मला किंवा तुला इकडे कधीतरी परत यायचेच आहे."

कथालेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2019 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

कथाबीज छान आहे. पण, "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?" हे वाक्य गोंधळात टाकणारे आहे. बुत (मूर्ती) तर देवळातच ठेवायची आहे ना, पुढच्या लुटीच्या उद्येशाने?

शेंदूर लावलेला दगड हा पहिला बुत

शेंदूर लावलेला दगड हा पहिला बुत