सरदार लुटीची पाहणी करीत होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही होता.
आत खणणाऱ्या सैनिकाला सांगितले.
"इथे खोदु नका, तो बडा पत्थर उचला पायखान्यात लावायला"
सैनिकाने शेंदूर लावलेला दगड उखणून काढला.
पुढच्या देवळात मौल्यवान वस्तूंची पोती भरण्याचे काम चालले होते.
" मिळेल ते सगळे भर पण बूतला हात लावू नका "
गोंधळलेल्या पोराने विचारले "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?"
" तेल पोतलेला दगड पायखान्यात चांगला बसतो, पाणी ओतले कि सगळे वाहून जाते"
"तो बुत सोन्याची खाण आहे. बात सगळीकडे फैलेल कि खान इतका ताकतवर, बाकी सगळी देवळे फोडली पण इथे त्याचे काही चालले नाही. शेवटी मला किंवा तुला इकडे कधीतरी परत यायचेच आहे."
वाचन संख्या
2004
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथाबीज छान आहे. पण,
शेंदूर लावलेला दगड हा पहिला
In reply to कथाबीज छान आहे. पण, by डॉ सुहास म्हात्रे
शेंदूर लावलेला दगड हा पहिला