"तू " अधिक " मी " किती ?

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
25 Jan 2019 - 3:25 pm

किती सोपा प्रश्न होता माझा

"तू " अधिक " मी " किती ?

तू उत्तर दिलेस "दोन"

अंतर्मुख होऊनि शोधू लागलो

आपण आहोत तरी कोण ?

मला अपेक्षीत “एक " होते

आपल्यात मुळी अंतरच नव्हते

दोन देण्यामागे कारण काय होते?

जर तू माझ्यात होतीस

मग मी तुझ्यात का नव्हतो ?

आणि मी तुझ्यात नव्हतो

तर मी कुठे होतो ?

गणित सोपे जरी वाटले दुरून

अवघड झाले उत्तरावरून

का दिलेस तू विचित्र उत्तर ?

कुढत गेलो पुढे निरंतर

जवळ घेतला मद्याचा प्याला

शोधत गेलो मला स्वतःला

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

इतिहासप्रेमकाव्यजीवनमानडावी बाजू

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jan 2019 - 3:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी याच कोड्याचे उत्तर २ + (१० किंवा १२ किंवा १५) इतके आले असते,
साधारण ७० च्या दशकात हाच १० किंवा १२ किंवा पंधराचा आकडा ३ ते ४ पर्यंत खाली आला
९० ते २००० च्या दशकात २ पर्यंत आणि नंतर एक पर्यंत खाली आला
आता तो शुन्यावर जातो का असे वाटते आहे.

पैजारबुवा,

मार्कस ऑरेलियस's picture

30 Jan 2019 - 2:13 pm | मार्कस ऑरेलियस

=)))))

वरीजीनल ईनोद पैजार बुवा !!

धन्यवाद पैंबू काका ,, धन्यवाद .. आपला प्रतिसाद पाहता , सत्तर वर्षांपूर्वी परिस्थिती फार सुंदर होती असे म्हणायला हरकत नाही .. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते काही खोटे नाही ..