Skip to main content

"तू " अधिक " मी " किती ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/01/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

वाचने 2524
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी याच कोड्याचे उत्तर २ + (१० किंवा १२ किंवा १५) इतके आले असते, साधारण ७० च्या दशकात हाच १० किंवा १२ किंवा पंधराचा आकडा ३ ते ४ पर्यंत खाली आला ९० ते २००० च्या दशकात २ पर्यंत आणि नंतर एक पर्यंत खाली आला आता तो शुन्यावर जातो का असे वाटते आहे. पैजारबुवा,

धन्यवाद पैंबू काका ,, धन्यवाद .. आपला प्रतिसाद पाहता , सत्तर वर्षांपूर्वी परिस्थिती फार सुंदर होती असे म्हणायला हरकत नाही .. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते काही खोटे नाही ..