(तनुने नानास मी टू म्हणणे )

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 Jan 2019 - 12:41 pm

पेरणा अर्थात

तनुने नानास मी टू म्हणणे
रसिकांच्या मनी अदम्य लवथव
पडद्यावरचे विश्व विभ्रमी
कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव

नटसम्राटासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती मिडीयाची
लाईक डीस्लाईक मोजुनी थकती
व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती

हलकट स्पर्शी फोडा मुस्काट
जागेवराती लंपटाचे
मौन रहाणे अनेक वर्षे
विणती जाळे संशयाचे

पैजारबुवा,

Biryaniकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडशांतरसबालगीतविडंबनशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Jan 2019 - 2:19 pm | चांदणे संदीप

खत्तरर्नाक!

Sandy

वा पैजारबुवा....शीघ्र विडंबन आवडले!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

टिपीकल पैजारबुवा !

शार्दुल_हातोळकर's picture

3 Jan 2019 - 5:27 pm | शार्दुल_हातोळकर

जोरदार विडंबन !!

दुर्गविहारी's picture

3 Jan 2019 - 7:25 pm | दुर्गविहारी

जबरी, आवडले. ;-)

अनन्त्_यात्री's picture

3 Jan 2019 - 10:38 pm | अनन्त्_यात्री

पैजारबुवांस साष्टांग नमस्कार वि.वि.
माझी कविता आपणांस विडंबनीय वाटली हे कळल्यावर भरून पावलो . :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2019 - 9:22 am | ज्ञानोबाचे पैजार

आपण उत्कृष्ठ दर्जाचा कच्चा माल पुरवला, आम्ही थोडीशी रंगरंगोटी केली इतकेच.
पैजारबुवा,

पैंबुकाका, विडंबन लय आवडलंय बरं का .. छान

नाखु's picture

5 Jan 2019 - 10:01 am | नाखु

तन सुंदर मन मलिन ये है मोहमाया!!
जरी वेश बावळा अंतरगी "नाना" कळा !!

लाईकडिस्लाईक गावकुसाबाहेर असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु

मुक्त विहारि's picture

5 Jan 2019 - 4:51 pm | मुक्त विहारि

मस्त...

हिच्या मुळे नानाची मनात असलेली प्रतिमा बिलकुल मलिन झाली नाही .
मला वाटतं त्या फालतू बाई विषयी मराठी मध्ये चर्चाच नको

अनुप ढेरे's picture

5 Jan 2019 - 9:57 pm | अनुप ढेरे

मौन रहाणे अनेक वर्षे
विणती जाळे संशयाचे

हे चूक आहे. तनुश्रीने तीन वेळा तक्रार केली आहे चार आणि सहा वर्षापुर्वी.

नाखु's picture

6 Jan 2019 - 9:48 pm | नाखु

तनुची तक्रार कुणीही अंगला लावून घेतली नाही,मग अंगाशी आली असं म्हणायचं आहे का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jan 2019 - 12:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम विडंबन.
"तनुश्रीने तीन वेळा तक्रार केली आहे चार आणि सहा वर्षापुर्वी."
१० वर्षापुर्वि अतिप्रसंग झाल्यावर तीने ताब्डतोब तक्रार नोंदवली होती. पण तेव्हा पोलिसांनी व एका राजकिय पक्षाने धमक्या देण्याचा प्रयत्न केला.

अरेरे...यावेळेस बुवाबाजी नाही पटली! असो

मदनबाण's picture

7 Jan 2019 - 7:36 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZERO

दुर्गविहारी's picture

9 Jan 2019 - 1:43 pm | दुर्गविहारी

भारी लिहीलयं. पण काही गोष्टी पटल्या नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2019 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा

पै जार! =))