ऐलान

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
9 Dec 2018 - 9:54 am

आयुष्याच्या रणांगणात
होतच राहतील स्वाऱ्या
वाघासारख्या चढाया कर
संकट परतविणाऱ्या

जरी होतील किती वार
तरी हार नकोस मानु
पराभवाचा विचारसुद्धा
तू मनात नकोस आणु

घोंगावणारी वादळेही
शिकवण देतात नवी
नवं त्यातुन शिकण्याची
तुझी दृष्टी मात्र हवी

बेडरपणे तुटुन पड
संकटांवर आता
थांबु नको येईल म्हणत
वाचविण्याला त्राता

झेलत राहा पाऊसवारा
कणखर बनत जाशील
हार मानेल संकटसुद्धा
सक्षम असा होशील

नसेल जरी जगात साऱ्या
आज तुझे काही
तरी नसेल भविष्यातही
असे मुळीच नाही

थकु नकोस लढत राहा
निधडेपणाच शान आहे
मदमस्त या दुनियेविरुद्ध
हा लढ्याचा ऐलान आहे

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2018 - 3:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान आहे कविता, आवडली...
पैजारबुवा,

सहमत .. पैंबुकाकांशी .. मस्त कविता आहे ...

एक ठिणगी कुठेतरी आत लपलेली

धगधग धगधग चालू होती

थोडीशी बावरलेली

कौल वाऱ्याचा हवा तिला

मिळता मिळता राहिला

आतल्याआत विझून गेली

वणवा नाही पहिला

नंदिनी's picture

14 Dec 2018 - 11:03 pm | नंदिनी

उत्तम !! आयुष्याशी लढायला प्रेरणा देणारी कविता !!

पद्मावति's picture

15 Dec 2018 - 3:21 pm | पद्मावति

आवडली कविता.

प्रमोद देर्देकर's picture

15 Dec 2018 - 9:01 pm | प्रमोद देर्देकर

मस्त लय भारी.
आवडली.
हिंदीतील " कोशिश करनेवालों की कभी हार नाही होती" सारखी मराठीतली कविता .

प्रत्येक आत्महत्या करणार्याचा विचार मनात येणाऱ्या शेतकऱ्यानं एकदा तरी वाचावी.
निराशा पळून जाईल त्याची.

शार्दुल_हातोळकर's picture

17 Dec 2018 - 11:51 am | शार्दुल_हातोळकर

एका कवीसाठी यापेक्षा अधिक सन्मान काय असु शकेल कि ज्याची कविता एखाद्या निराश माणसाचा जीव वाचविण्याइतपत प्रेरणादायी समजली जावी !!

पैजारबुवा, खिलजि, नंदिनी, पद्मावती, प्रमोदजी सर्वांचे मनापासुन आभार !! __/\__

देशप्रेमी's picture

21 Feb 2019 - 11:52 am | देशप्रेमी

अत्यंत स्फुर्तीदायक कविता !!

प्रमोदजींच्या प्रतिक्रियेशी प्रचंड सहमत !!