आयुष्याच्या रणांगणात
होतच राहतील स्वाऱ्या
वाघासारख्या चढाया कर
संकट परतविणाऱ्या
जरी होतील किती वार
तरी हार नकोस मानु
पराभवाचा विचारसुद्धा
तू मनात नकोस आणु
घोंगावणारी वादळेही
शिकवण देतात नवी
नवं त्यातुन शिकण्याची
तुझी दृष्टी मात्र हवी
बेडरपणे तुटुन पड
संकटांवर आता
थांबु नको येईल म्हणत
वाचविण्याला त्राता
झेलत राहा पाऊसवारा
कणखर बनत जाशील
हार मानेल संकटसुद्धा
सक्षम असा होशील
नसेल जरी जगात साऱ्या
आज तुझे काही
तरी नसेल भविष्यातही
असे मुळीच नाही
थकु नकोस लढत राहा
निधडेपणाच शान आहे
मदमस्त या दुनियेविरुद्ध
हा लढ्याचा ऐलान आहे
- शार्दुल हातोळकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3083
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
सहमत .. पैंबुकाकांशी .. मस्त
उत्तम !! आयुष्याशी लढायला
आवडली कविता.
मस्त लय भारी.
मोलाचा प्रतिसाद !!
In reply to मस्त लय भारी. by प्रमोद देर्देकर
अत्यंत स्फुर्तीदायक कविता !!