Q-NET मध्ये अडकलोय SOS

Primary tabs

वडगावकर's picture
वडगावकर in काथ्याकूट
3 Nov 2018 - 9:59 am
गाभा: 

समस्त मिपाकरांना नम्र विनंती , मदतीची अपेक्षा.
दोन दिवसांपूर्वी Q-NET च्या चक्रवयूहात अडकलोय , ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल?
विशेष माहिती द्यावयाची असेल तर व्यनि करावे ही विनंती

प्रतिक्रिया

आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा

ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत, आणि आम्ही कोणीही नवीन बकरा होऊ शकत नाही

सतिश म्हेत्रे's picture

3 Nov 2018 - 10:22 pm | सतिश म्हेत्रे

....तुमचा प्रतिसाद डोक्यावरुन गेला हो.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2018 - 10:52 pm | मुक्त विहारि

MLM (Multi Level Marketing) उर्फ मराठीत "मलम"

Q-NET हा जर MLM (Multi Level Marketing) चा प्रकार असेल तर, अशा गोष्टी सामान्यतः नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांमध्ये आधी प्रसवल्या जातात.उदा. अ‍ॅम्वे किंवा पियरलेस...

त्यामुळेच, आनन्दा, ह्यांनी तो प्रतिसाद दिला...

मुक्त विहारि's picture

3 Nov 2018 - 10:36 am | मुक्त विहारि

ये Q-NET क्या हय?

आनन्दा's picture

3 Nov 2018 - 11:34 am | आनन्दा

मलम आहे एक.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2018 - 1:07 pm | मुक्त विहारि

ओके...

प्रसाद_१९८२'s picture

3 Nov 2018 - 11:46 am | प्रसाद_१९८२

म्हणजे काय ? थोडी सविस्तर माहिती द्या.

गामा पैलवान's picture

3 Nov 2018 - 1:41 pm | गामा पैलवान

मी वाचलेलं नाहीये : https://en.wikipedia.org/wiki/Qnet
-गा.पै.

खिसा रिकामा होण्यापूर्वी! - https://www.misalpav.com/node/43188
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ - http://www.misalpav.com/node/38257

वडगावकर's picture

4 Nov 2018 - 12:49 pm | वडगावकर

धन्यवाद भाऊ....
थोडासा आशेचा किरण दिसतोय,पाच सहा दिवसात सांगतो.

पाषाणभेद's picture

5 Nov 2018 - 10:29 pm | पाषाणभेद
साबु's picture

7 Nov 2018 - 2:11 pm | साबु

अडकलोय म्हणजे? तुम्हाला बाहेर पडता येइल कि..
वर आनन्दा यानि सान्गितल्या प्रमाणे...
आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा
ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत,

--एकदा Q-NET मधे अडकलेला

वडगावकर's picture

15 Nov 2018 - 12:03 pm | वडगावकर

तुम्ही पण अडकला होतात? , मग पुढे काय झालं?
तुमचं आणी तुमच्या पैशांचे .
आपला अनुभव आमच्या सारख्याना मार्गदर्शक होईल सर.

जर तुम्हाला तुमचे पैसे हवे असतील तर त्यन्च्या मौडेल प्रमाणे बकरे शोधा आणि लावा तुमच्या लाइनी मधे.
मला जमनार नव्हते म्हणुन अक्कल खाती टाकुन सोडुन दिले. आणि परत अश्या फास्ट मनी च्या मागे लागनार नाही अशी गाठ बान्धुन घेतलि.

तीन लाख असेच सोडून दिले?, अक्कल खाती बरीच रक्कम जमा केलीत राव

साबु's picture

15 Nov 2018 - 6:28 pm | साबु

अक्कल खाती जमा करुन परत अश्या वाटेला गेलो नाही.

पैलवान's picture

15 Nov 2018 - 6:33 pm | पैलवान

Qnet मध्ये कोणाचे वैयक्तिक काही लाख / कोटी/काही शे कोटी/ काही हजार कोटी अडकलेत का?

अगदी 'आमचा आत्मा वाचवा' असं बोंबलण्याइतकं काय झालं?

वडगावकर's picture

16 Nov 2018 - 10:59 am | वडगावकर

अहो पैलवान , खरोखरच लाखो अडकलेत म्हणूनच ओरडतोय.
तुमची शंभर रुपयांची नोट हरवली तरी हळहळ वाटते की नाही?,
अर्थात ते मेहनती चे असतील तर.

आणी अगदी कोटींच्या गोष्टी करताय म्हणजे हडपसर गावामध्ये तुमची शेती वगैरे आहे कि काय?
तसं नाही , आमचे विचार लाखाच्या वरच जात नाहीत म्हणून विचारलं (कृपया हलके घ्या )

पैलवान's picture

16 Nov 2018 - 11:14 am | पैलवान

हडपसर मध्ये शेती आहे, तरी कष्टानंच कमावलेले पैसे असतात. १००ची काय पाच रुपयाची पण हळहळ वाटतेच. पण 'आमचा आत्मा वाचवा' असं ऑनलाईन टाकण्याऐवढं किती अडकलंय याची उत्सुकता होती.

बाकी वेगवेगळ्या आकर्षक, लोभस अन गोंडस वेष्टनातील मलम योजनांना अजून लोक बळी पडतात आणि काही लोक अजून इतरांना बळी पाडत राहतात याचं वैषम्य वाटतं.
कर्त्या वयातली विशी तिशीतली पोरं सिग्नलला 'घरबसल्या XXXX हजार कमवा' अशा चिठ्ठ्या वाटताना बघितली की वाईट वाटतं.

वडगावकर's picture

16 Nov 2018 - 11:30 am | वडगावकर

ओके, आता सांगतो

दोन लाख नव्वद हजार आणी वर डीडी चं कमिशन तीन हजार
टोटल मिलाके होगये दोन लाख त्र्याण्णव हजार.

मेहनत का पैसा है बॉस....उनके Xड मे हाथ डालके एकेक रुपिया निकालुंगा