समस्त मिपाकरांना नम्र विनंती , मदतीची अपेक्षा.
दोन दिवसांपूर्वी Q-NET च्या चक्रवयूहात अडकलोय , ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल?
विशेष माहिती द्यावयाची असेल तर व्यनि करावे ही विनंती
आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा
ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत, आणि आम्ही कोणीही नवीन बकरा होऊ शकत नाही
MLM (Multi Level Marketing) उर्फ मराठीत "मलम"
Q-NET हा जर MLM (Multi Level Marketing) चा प्रकार असेल तर, अशा गोष्टी सामान्यतः नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांमध्ये आधी प्रसवल्या जातात.उदा. अॅम्वे किंवा पियरलेस...
त्यामुळेच, आनन्दा, ह्यांनी तो प्रतिसाद दिला...
अडकलोय म्हणजे? तुम्हाला बाहेर पडता येइल कि..
वर आनन्दा यानि सान्गितल्या प्रमाणे...
आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा
ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत,
--एकदा Q-NET मधे अडकलेला
जर तुम्हाला तुमचे पैसे हवे असतील तर त्यन्च्या मौडेल प्रमाणे बकरे शोधा आणि लावा तुमच्या लाइनी मधे.
मला जमनार नव्हते म्हणुन अक्कल खाती टाकुन सोडुन दिले. आणि परत अश्या फास्ट मनी च्या मागे लागनार नाही अशी गाठ बान्धुन घेतलि.
एवढे पैसे टाकलेत ? एवढी मोठी उडी नाही घेत मी लगेच. तसे एवढे पैसे एकरकमी नसतातच माझ्याकडे . ह्या ह्या ...
मी काहीतरी मिनिमम किमत असलेल घेतलं होत ..बायोडीस्क ..का काहीतरी. तीस हजार होती त्याची किमत. पण त्यांचे बिझिनेस मौडेल असे आहे की ते तुमचे पैसे इथे गुंतवू तिथे गुंतवू ..दुप्पट करून देऊ अस नाही म्हणत. एखाद्या वस्तूची शिफारस कोणाला केली समजा साबण ..की मी वापरला आहे बर का तू पण वापरून बघ. जर त्याने तो घेतला तर ती साबण कंपनी तुम्हाला काही देत नाही पण आम्ही देऊ .....amway सारख पण जास्त .... पण त्यामुळे तुम्ही तो ट्री व्यवस्थित मैनेज करायला पाहिजे. म्हणजे नवीन बकरे पकडा , त्याना समजावून सांगा ..नाही बधले तर त्यांना सेमिनार ला घेऊन जा.
हेच मला जमत नव्हते..
तुम्हाला शुभेच्छा.
साबु भाई
आप की दुवाए काम करने लगी है,
थोडं थोडं यश मिळतंय , पण एक गोष्ट शिकलो तात्या.
विश्वासघात हा नेहमी विश्वासातल्या माणसाकडूनच होत असतो.
अर्थात, ते शिकण्या साठी फार मोठी फीस द्यावी लागली.....
पुण्यामधल्या कमीत कमी दहा लोकांना तरी ह्या जाळ्यांतून बाहेर काढल्या शिवाय
ती फीस वसूल होणार नाहीये
तुम्हाला असेच यश मिळो. मला पण अशाच एका जवळच्या मित्राने ह्यात ओढले होते पण त्याने फसवले असे मी म्हणणार नाही. जे काही आहे ते त्यानी स्पष्ट सान्गितले होते. आणी काही लोकानी रग्गड कमावले सुद्धा.
लगे रहो...
अहो पैलवान , खरोखरच लाखो अडकलेत म्हणूनच ओरडतोय.
तुमची शंभर रुपयांची नोट हरवली तरी हळहळ वाटते की नाही?,
अर्थात ते मेहनती चे असतील तर.
आणी अगदी कोटींच्या गोष्टी करताय म्हणजे हडपसर गावामध्ये तुमची शेती वगैरे आहे कि काय?
तसं नाही , आमचे विचार लाखाच्या वरच जात नाहीत म्हणून विचारलं (कृपया हलके घ्या )
हडपसर मध्ये शेती आहे, तरी कष्टानंच कमावलेले पैसे असतात. १००ची काय पाच रुपयाची पण हळहळ वाटतेच. पण 'आमचा आत्मा वाचवा' असं ऑनलाईन टाकण्याऐवढं किती अडकलंय याची उत्सुकता होती.
बाकी वेगवेगळ्या आकर्षक, लोभस अन गोंडस वेष्टनातील मलम योजनांना अजून लोक बळी पडतात आणि काही लोक अजून इतरांना बळी पाडत राहतात याचं वैषम्य वाटतं.
कर्त्या वयातली विशी तिशीतली पोरं सिग्नलला 'घरबसल्या XXXX हजार कमवा' अशा चिठ्ठ्या वाटताना बघितली की वाईट वाटतं.
ओके, आता सांगतो
दोन लाख नव्वद हजार आणी वर डीडी चं कमिशन तीन हजार
टोटल मिलाके होगये दोन लाख त्र्याण्णव हजार.
मेहनत का पैसा है बॉस....उनके Xड मे हाथ डालके एकेक रुपिया निकालुंगा
मेहनत का पैसा है बॉस....उनके Xड मे हाथ डालके एकेक रुपिया निकालुंगा
हे जर खरंच शक्य असतं तर आधी ते केलं असतं आणि मग इथे कोणत्या साबणाने हात धुतला ते लिहीलं असतं. पण ते शक्य नसल्याने इथे काही मदत मिळते का ते चाचपडत आहात. :)
गावडे साहेब
हे तुम्ही उपहासाने लिहिलंय कि विनोदाने ते कळालं नाही....असो.
तीन तारखेला खरंच चाचपडत होतो....पण आज नाही.
ते शब्द फक्त डायलॉग म्हणून टाकलेले नाहीत....प्रयत्न चालू आहेत.
एकदा का ह्यातून एकेक रुपया सकट बाहेर पडलो की पूर्ण ष्टोरी डिटेलवार , त्या टोळीच्या नावासहित लिहितो.
काल दुपारी ठीक तीन वाजुन एकतीस मिनिटांनी हिच्या मोबाईलने एसेमेस टोन दिला.
मी सहज वाचला...
Dear Customer,
Thank you for banking with Bank Of Maharashtra.
Your A/c No xxxx has been credited by Rs. 2,89,940.00 on 29-NOV-2018 ABCXYZ111999 VIHAAN DIR. A/c Bal is Rs.वगैरे वगैरे....
आयला !....पैसं आलं की !
तर मित्रानो...अशा रीतीने आम्ही ह्या चक्रवयूहातुन सुखरूप एकेक रुपया सकट बाहेर पडलो आहोत
ताबडतोब एक मोहीम चालू केली....
क्यु-नेट मध्ये अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याची....
पैसा कष्टाचा असो, सापडलेला असो वा वारसाहक्काने आलेला असो, पाच रुपये असो वा पाच कोटी, तो जपणं महत्वाचं!!
तुमचे कष्टाचे पैसे परत मिळवले हे वाचून मनापासून आनंद झाला.
इथून पुढे काळजी घ्या.
जर गुंतवणूक रुपयांत असेल तर 30 दिवस अन्यथा डॉलर मध्ये असेल तर 7 दिवसांत प्रॉडक्ट्स न वापरता क्लेम केला तर पैसे परत मिळतात.
साधारण ८०-९०% गुंतवलेले असतात, तर १०-१५% आपल्या n+१ला गेलेले त्याच्याकडून मिळवावे लागतात. पाचेक टक्के प्रशासकीय खर्च कदाचित मिळत नसावा.
अर्थात जबरदस्त चिकाटीने फॉलोअप आणि योग्य तिथं गोड अन कडक वागणं, थोडंफार पोलिसी धमकी करावी लागते.
एक चेन्नई ,एक ओरिसा आणी दोन पुण्याचे
मागच्या दोन दिवसात चार लोकांना ह्यातून बाहेर काढण्याचं समाधान....
तो दोस्तो...दिल थाम के बैठिये
जल्द हि आप के लिये हम लेकर आयेगे,एक धमाकेदार और जबरदस्त कहानी
क्यू-नेट : एक खतरनाक चक्रव्यूह (ईस्टमन कलर मे)
प्रतिक्रिया
आपले मित्र आणि नातेवाईक हवे
जरा विस्कटून सांगाल काय....
MLM (Multi Level Marketing)
ये Q-NET क्या हय?
मलम आहे एक.
ओके...
Q-NET
मीवाना : https://en.wikipedia.org/wiki/Qnet
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ - http://www.mi
धन्यवाद भाऊ....
https://www.misalpav.com/node/43582
अहुन चालु आहे Q-NET???
मेहनत का पैसा है साबू साहब
माझे पण मेहनत चेच होते..
अक्कल खाती टाकुन सोडुन दिले?
३ लाख ????? बापरे....
साबु भाई
अरे वा..
काय होणार..
SOS???
अहो पैलवान
हलकंच घेतोय
किती अडकलंय याची उत्सुकता ?
मेहनत का पैसा है बॉस....उनके
गावडे साहेब
अर्रे वा..!! आंगाश्शी.. :D
आयला !....पैसं आलं की !
अभिनंदन.
+१
हि खरी बातमी आहे. पण कसे काय
वडगांवकर, अभिनंदन!!!
एक नम्बर..
भारीच ...............
प्रोडक्ट घेतल्यावर पैसे मिळणे
Q net रिफंड
जरुर लिखेंगे...और वो भी,अलीबाबा और चालीस चोरो के नाम के साथ.
ई.क. नको हो ....
लवकर लिहा
अभिनंदन