खिसा रिकामा होण्यापूर्वी!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
19 Aug 2018 - 11:47 am
गाभा: 

हल्ली माणसं जास्त आणि नोकर्‍या कमी झालेत.पण पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे.मग एखादी चांगली नोकरी मिळावी म्हणून पहिला पर्याय कोणता? साहजिकच नोकरी लावणार्‍या रिक्रुटमेंट एजन्सीजचा!

पण बर्‍याचवेळा अशा संस्थांद्वारा फसवणूक होण्याची शक्यता असते.आलेल्या उमेदवाराच्या हतबलतेचा फायदा घेऊन,त्याच्याकडून काही पैसे आगाऊ घेऊन अमुकतमुक कंपनीत चिकटवण्याचं आश्वासन दिलं जातं.स्वत: पात्र उमेदवार हीच मोठी उपलब्धी असते.तरीही या उमेदवारांकडून पैसे घेतले जातात.रक्कमही मोठी असते.
काही वेळा तर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून पैसे घेऊन पोबारा करणारेही भेटतात.नोकरी लावतो असे सांगून फसवणूकीचे असे अनेक प्रकार असू शकतात.

असाच अजून एक प्रकार म्हणजे विविध MLM कंपन्यांमधे पैसे गुंतवायला आणि त्यातून भरघोस अार्थिक फायदा मिळेल अशी आमिषं दाखवणार्‍या कंपन्या.यात बर्‍याचदा आपल्या अोळखीचाच माणूस ही स्किम घेऊन येतो.सतत फोन आणि मेसेजेस करुन ती योजना कशी फायद्याची आहे ते पटवत राहतो.एखाद्या ठिकाणी हॉलमधे कंपनीनं सर्वांना एकदम बकरा बनवण्यासाठी बोलवलेलं असतं.तिथंही हा 'आपला सगासोयरा' आपल्याला घेऊन जातो.काही वेळा आपण फसतो,बळी पडतो तर काही वेळा सावधही होतो.बर्‍याचदा या मित्रालाही बळीचा बकरा बनवून तुमच्यापर्यंत सोडलेलं असतं.

या दोन्ही प्रकारातून होतो तो फक्त मानसिक त्रास!

तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना,परिचितांनाही असे अनुभव आलेत का? असे फसवणूकीचे अनुभव शेअर करता यावेत आणि पर्यायाने ही फसवणूक टळावी, जास्तीतजास्त लोक सावध व्हावेत यासाठीच हा धागा.

अनुभव शेअर करणार्‍या,उपयुक्त माहिती देणार्‍या सर्वांचे आधीच आभार!

__/\__

प्रतिक्रिया

परवा एका गोड आवाजात गोड गोड बोलणाऱ्या मुलीचा कॉल आला. माज्या मित्राचा रेफरन्स होता. ती बोलली, " तुम्हाला आमच्या बिजनेस मध्ये पार्टनर होण्याची संधी आहे. आम्ही आमच्या बिजनेस चे मुंबईत एक्सपान्शन करतोय. आम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. तुम्हाला रात्री 8 वा घटकोपरच्या r सिटी मॉल च्या बाजूला 15 मिन. अगोदर यावे लागेल. अधिक डिटेल तुमच्या मित्राला विचारा....." सोबत doc काय लागतात ते आणि पत्ता मला मेसेज केला.

त्यानंतर मी मित्राला फोन केला तर तो बोलला अरे मी तुझं नाव दिलेलं. पण तू खरच भाग्यवान आहेस तुला आमच्या बिजनेस ग्रुप मध्ये काम करायची संधी मिळतेय. फक्त दोन इंटरव्हीव असतील की जे तुला क्रॅक करायचे आहेत...... भाव तू इजि क्रॅक करशील. बेस्ट ऑफ लक!! ब्ला ब्ला ब्ला!!! मी मिटिंग मध्ये आहे उद्या कॉल करतो.

दुसऱ्या दिवशी मला उत्कंठा लागल्याने मीच कॉल केला. त्याला प्लॅन विचारला, काम विचारलं... तर ते काहीच सांगेन... फक्त ऐव आणि तेव...... आणि फालतू उदाहरण आणि फालतू लेक्चर. आणि त्याची प्रगती आणि भावनिक साद.

मग मी मिपा वरील जाणकार लोकांच्या कानावर ही गोष्ट घातली. मग मला mlm(मलम) विषयी समजलं. प्रकार तसाच वाटलं पण पद्धत थोडी अद्ययावत वाटली. इथे पहिला इंटरव्हीव होणार होता. मी मार्केटिंग च्या आशा फंडया विषयी जाणून होतो. मित्रांना फसताना पाहिलं होतं. पण हे थोडं वेगळंच होत.

आज मजा इंटरव्हीव आहे.... सकाळी मित्राने कॉल केला.... मग त्याला बिजनेस चे उद्देश, कार्य विचारली. मिपाकरांच्या कायप्पा वर झालेल्या चर्चेतील मुद्दे घेऊन उलट तपासणी केली. मग तो भावनिक झाला. भावनेवर बोलायला लागला. तरीही मी माज्या मुद्यांवर कायम राहिलो. मग ती काहीतरी बोलायच म्हणयन बोलला की 1ट्वेल प्लस बर टायप आहे. आपण त्यांना डेव्हलपमेंट पुरवायची. तुला एक टापय खोलवा लागेल, तुला ट्रेनजक्शन करावी लागतील... etc. पण अजून डिटेल सांगितली नाहीत. शेवटी मी बोकलो येतो आणि मजा no. बंद करून ठेवला.

सध्या मी जॉब च्या शोधत आहे. जॉबसाठी उतावीळ असलो तरी पण असल्या फांद्यात पडण्याऐवढा मूर्ख नक्कीच नाही. मी या अशा प्रकारला भुललो नसतो तरी वाटखर्चीचा पैसा वाया गेला असता. पैसा जाउद्याहो पण वेळेचं काय?? तो तर खूप अमूल्य आहे. तो ही वाया गेला असता.

असो मलम विषयी अधिक माहिती दिल्याबद्दल वाघेकाका, वरूनभौ, केदारभाऊ, जिरगे सर आणि इतर सर्व मिपाकरांचा आभारी आहे.

तुमच्या माहितीत असे प्रकार कुणासोबत होत असेल तर त्याविषयी जाणकारांच मार्गदर्शन घ्या.... भूलथापांना आणि भावणीकतेला बळी पडू नका.

धागा काढले बद्दल आभारी आहे.

नाखु's picture

19 Aug 2018 - 4:03 pm | नाखु

अॅमवे, जपान लाईफ ह्या मुळे सहज म्हणूनही कुणी अश्या परिचित,आप्तेष्टांकडे जात नाही,

मुळातच आपण फसलोय,अडकलोय हे पुरेपूर माहिती असूनही आपल्याच मित्राला, नातेवाईकांना त्यात ओढण्याची अवदसा का आठवते हे मला आजतागायत समजले नाही.
आयुष्यभराचे संबंध ही जखम घेऊन सांभाळावे लागतात

पोळलेला पांढरपेशा नाखु

मला इन्व्हेस्टमेंट प्लॅन वाल्यांचे गेले दोन महिने झाले फोन येत आहेत , दोन वर्षात दुप्पट च्या योजना सांगत असतात . सुरवातीला मी उलटतपासणी च्या मूड मध्ये होतो त्यामुळे कसं शक्य आहे , कुठल्याही बँका दोन वर्षात दुप्पट करू शकत नाही मग तुम्ही कसे काय करू शकता असे टाईमपास करण्यासाठी प्रश्न विचारत असे . त्यामुळे कधी कधी त्यांची उद्धट भाषा ऐकावी लागल्या मूळे थोडा वेळ डोकं डिस्टर्ब असायचे .
आता मला फोन आले की नम्रपणे ' माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यामुळे गुंतवणूक करू शकत नाही ' असे सांगून ' thank you ! Thank you !! Thank you !!! ' असे बोलून फोन कट करतो , जेणेकरून आपल्या डोक्याला त्रास होत नाही .

चामुंडराय's picture

19 Aug 2018 - 9:00 pm | चामुंडराय

"माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यामुळे तुम्हीच मला पैसे द्या" असे म्हटले तर काय होईल? :)

अभ्या..'s picture

20 Aug 2018 - 12:48 am | अभ्या..

मी मागतो बिनधास्त.
तुम्हीच माझ्या धंद्याला भांडवल द्या, तुमच्यापेक्षा एक टक्का व्याज जास्त देतो म्हणाले की फोन ठेवतात.
एमलेम असले की प्रिंटिंगचा काही काम आहे का विचारतो, पांप्लेट्स, ब्रोशर, व्हिजिटिंग कार्डे कायबी छापून देतो म्हणले की फोन ठेवतात.

उपयोजक's picture

20 Aug 2018 - 8:51 am | उपयोजक

असं पाहिजे!! :)

अभ्या..'s picture

20 Aug 2018 - 4:41 pm | अभ्या..

अ‍ॅक्चुअली असेच करतो, ह्यातून एक काय साध्य होते की जे लोक आपली मैत्री, नाते वगैरे पणाला लावतात ना त्यांना सरळ सरळ विचारता येते "बाबारे धंद्याला गिर्हाईक पाहिजे की माझी आठवण आली मग धंद्याला लागणार्‍या प्रिंटींगसारख्या गोष्टींना माझी आठवण का नाही येत?" काहीजण खजील होतात, काहीजण दुसर्‍याकडून ऑलरेडी करुन घेतलेय रे असे म्हणले की "काय राव, ह्यापेक्षा कमी किमतीत मी दिले असते की, तुम्हाला मित्राची किंमत नाही राव, फसवलं की तुम्हाला" असे सांगून डबल गिल्ट देतो. काही निर्ढावलेले लोक "आम्हाला प्रिंटिंग वरुनच(मुंबई, नोयडा बियडा) येते, साहेब करुन आम्हाला देतात किंवा नेक्श्ट टाइमला तुला देऊ" असे सांगितले की "सांग तुझ्या साहेबाला मला भेटायला. किंवा काम घेऊन ये, मेंबरशिप घेऊन जा"असे साम्गायचे. शक्यतो काढता पाय घेतात हे लोक. जरी चुकुन माकून काम दिलेच तर लावायचा त्यातच अरबी. ;)

अमर विश्वास's picture

19 Aug 2018 - 8:58 pm | अमर विश्वास

इन्व्हेस्टमेंट करताना कायम तारतम्य बाळगावे ...

Yearly returns
Fixed deposit : 7 to 8%
Large cap MF : 12 to 15%
Small Cap MF : can go up to 50% but they are volatile.. an go down to -50% as well

त्यामुळे योग्य मार्गाने केलेली कोणतीही गुंतवणूक दुप्पट व्हायला किमान ४ ते ६ वर्षे लागतात ...

दोन वर्षात दामदुप्पट वगैरे स्कीम्स पासून दूर राहणेच सर्वोत्तम

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2018 - 9:45 pm | अमरेंद्र बाहुबली

आताच सहा महिन्यांपूर्वी माझा नातेवाईक भाऊ चंदीगडला गेला होता. माझ्या एका क्लासमेंट सोबत. तिथे एकाने नोकरी लावून देतो म्हणून बोलावलं. पण प्रत्यक्षात तो कपड्याचा ब्रँड होता. आणि चेन बनवायची होती 15 हजार भरून
दोघे आले खाली हाथ.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2018 - 9:47 pm | अमरेंद्र बाहुबली

5 वर्षा आधी मी पण असाच फसणार होतो.
मी डिप्लोमा झाल्यावर नाशिक ला नोकरी शोधायला आलो होतो.
एक कॉलेजची मुलगी fb वर भेटली. तिचा स्वतः हुन फोन आला. तिने मला सेमिनारच्या ठिकाणी भेटायला बोलावलं. सेमिनार ची फी 50 रुपये होती. ते ebez का असं काहीतरी कंपनीच सेमिनार होत. कॉम्प्युटर शिक्षण वै. पांढरा शर्ट आणि काली पॅन्ट घालून बोलवलं होत. तिथे एक जण कोट टाय घालून आला. त्याच एकदम बनावट जंगी स्वागत झालं. त्याने थोडी स्पीच दिली. नंतर एक मुलगा आयफोन नाचवत स्टेजवर आला. म्हणे मी 2 महिन्यात मिळवला. नंतर मला त्या मुलीने 10 हजार भरायला लावले. मी पण तयार झालो. नंतर आत्याच्या घरी राहत होतो तिथे माझ्या आत्ये बहिणीने 2 दिवस समजावलं. शेवटी मी तो नाद सोडला. ती मुलगी रोज फोन करत होती. मी नंतर फोन उचलणं सोडलं. नंतर दोन महिन्याने तो आयफोन वाला मुलगा मला नाशिकच्या पाथर्डी फाट्याच्या होंडा शोरूम मध्ये भेटला. (धुळ्यातल्या होंडा शोरम मध्ये 1 महिना काम केलं होतं त्याचा पगार घ्यायला मी नाशिकच्या शोरूम मध्ये आलो होतो) तो आयफोन वाला तिथे नोकरी मागायला आला होता. त्याला विचारलं तुला नोकरीची काय गरज? तर तो म्हणे तो आयफोन माझा नव्हता मला फक्त तस बोलायला सांगितलं होतं.

रानरेडा's picture

19 Aug 2018 - 9:54 pm | रानरेडा

जपान लाईफ या लक्ष रुपये किंवा अधिक च्या गादी ने १९९८- २००३-४ पर्यंत धुमाकूळ घातला होता . यावर मिपा वर एक धागा पण आहे .

जपान लाईफ ची पण दोन presentations झेलली आहेत . दुसर्याला मी अर्ध्यात उठून आलो होतो . नंतर जपान लाईफ साठी अजून एक जण आला , त्याला मात्र सांगितले कि गादी खरच फार चांगली आहे . , पण चुंबक असल्याने लोहयुक्त रक्त खालो ओडले जाते , त्यामुळे उठणे बंद होते. असे जर्मन संशोधन आहे असे सांगितले .

मित्र बरोबर साथ द्यायला होतेच ( आम्ही तर एक MD मित्राला पण याची घ्यायला बोलावणार होतो) सांगायला आलेल्याची छान फाडून आम्ही मजा केली .

चामुंडराय's picture

19 Aug 2018 - 11:02 pm | चामुंडराय

सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला देखील माझ्या एका नातेवाईकाने ती लाखाची गादी घ्यायची गळ घातली होती. काय मस्त झोप येते असे काही बाही सांगत होता. एक लाख गादीसाठी खर्च केल्यावर मस्त तर सोड, मला झोप देखील यायची नाही असे म्हटल्यावर त्याचा चेहरा पडला - हा मासा काही गळाला लागायचा नाही. :)

मराठी कथालेखक's picture

1 Sep 2018 - 10:52 pm | मराठी कथालेखक

पण चुंबक असल्याने लोहयुक्त रक्त खालो ओडले जाते , त्यामुळे उठणे बंद होते. असे जर्मन संशोधन आहे असे सांगितले .

काय उठायचे बंद होते ? :)

टवाळ कार्टा's picture

2 Sep 2018 - 1:35 am | टवाळ कार्टा

अख्खा माणूस म्हणायचे आहे त्यांना...."सकाळचे लाकूड" नाही ;)

भंकस बाबा's picture

3 Sep 2018 - 6:31 pm | भंकस बाबा

मी काही भलतेच समजलो होतो.
पण या रस्त्याला जायचे नाही म्हटल्यावर काहीही समजलो तरी काही फरक पडत नाही (इथे एक डोळा मारलेली स्माइली कल्पावी)

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2018 - 7:39 pm | मराठी कथालेखक

पण मला तरी अजून वाटते की रानरेडा यांना 'तेच' म्हणायचे होते.. :)
असो ते पुन्हा धाग्यावर येवून खुलासा करतील तर बरे

लई भारी's picture

20 Aug 2018 - 11:31 am | लई भारी

अनेक प्रस्ताव आलेत वेगवेगळ्या लोकांकडून.
नेहमीच्या ट्रिक्स आहेतच, महागाई किती वाढतेय, नोकरी करून काय होणार आहे इ. इ.

अक्षरमित्र यांचा पण अनुभव वाचला.

एकदा 'वर्क फ्रॉम होम' ची मोट्ठी जाहिरात बघून आणि १० लोकांचे फोन आले म्हणून एका मित्रासाठी 'HerbaLife' च्या सेमिनारला पुण्यात सोहराब हॉल च्या जवळ कुठेतरी गेलो.
रजिस्ट्रेशन फी काहीतरी ५० रु. होती. सेमिनार भर तेच, आमचे प्रॉडक्ट कसे भारी आहेत आणि त्यानंतर चढत्या क्रमाने या बिझनेस मधील यशस्वी व्यक्तींचे १०-२० सेकंदाचे प्रत्यक्ष सादरीकरण. ज्याचा शेवट नोकरी सोडून हा बिझनेस केल्यामुळे मर्सिडीज ची महागडी कार/बंगला घेऊ शकणाऱ्या सिनियर व्यक्तीच्या अनुभव कथनाने झाली.
अर्थातच सगळे भारावून गेले होते.
पण एवढा वेळ काय/कसे करायचे हे सांगितलेच नव्हते. पुढील गोष्टी समजण्यासाठी २ हजार(नक्की आठवत नाही,पण मोठी रक्कम होती) भरून त्यांचं 'किट' घ्यायचं आणि पुढच्या सेशन ला थांबायचं मग ते सांगणार काय करायचं आहे ते. बाहेर बरेच लोकं पहिल्या सेशन साठीच रांगेत उभे होते.
मी तटस्थ असल्यामुळे माझ्या सोबतच्यांना घेऊन तिथून कटलो, पण बाकीची नुकतीच पदवीधर झालेली तरुण मंडळी आणि काही ज्येष्ठ नागरिक, गृहिणी या गोंधळून गेल्या होत्या.
त्या नंतर मी कोल्हापूरसह बऱ्याच ठिकाणी यांच्या सेमिनार साठी गोळा झालेल्या गाड्या बघितल्या(गाडीवर मागे कंपनीचे नाव टाकून घेतलेले असते). कसे काय चालते काय माहित?

एमू पालन हे एक फ्रॉड काही काळापूर्वी उगवून पसरलं होतं. एमूच्या अंड्याला प्रचंड किंमत असते आणि त्याचं मांस ही खास फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये प्रचंड मागणी असलेली लुसलुशीत महाग डेलीकसी आहे तस्मात फाईव्ह स्टार हॉटेलवाले एमू-मांसाच्या एकेका किलोला हजारो रुपये देऊन तुमच्याकडे मागणीसाठी रांगा लावतील वगैरे असं चित्र उभं करणाऱ्या कंपन्या आणि कन्सल्टंट आले. गुळगुळीत कागदावर हाय ग्रेड प्रिंटिंग करून pamphlets तयार झाली.

वास्तविक याचे अंडे किंवा मांस याला काही मागणी नाही. चव तर नाहीच नाही. लुसलुशीत नाही तर वातड आहे, खुद्द ऑस्ट्रेलिया या मूळ देशातही तो कोणाला खायला फारसा आवडत नाही (चुभुदेघे) अशी माहिती नंतर पुढे येत गेली आणि अनेक लोकांनी कर्ज काढून लाखो रुपये गुंतवून घेतलेले एमू संख्येने वाढून बसले. त्याचं दाणापाणी वाढत गेलं आणि गिऱ्हाईक नसल्याने उलट नॉनतारांकित मांसाहारी हॉटेलांच्या दारादारात जाऊन कॉम्प्लिमेंटरी मांस वाटून, हे ट्राय करून बघा असं तोंड वेंगाडायची वेळ आली.

काहींनी ते डोईजड झालेले एमूचे कळप मोठ्या संख्येने जंगलात सोडून दिल्याचीही बातमी आठवते.

गावठी फिलॉसॉफर's picture

20 Aug 2018 - 3:17 pm | गावठी फिलॉसॉफर

इमू पालन मध्ये सरकारचाही हस्तक्षेप होता.... आणि कर्ज हे बँकातून उपलब्द झाल्याने आणि ते प्रोजेक्ट बुडाल्याने सरकारने त्याची१००% कर्जमाफी केली आहे..... माज्या ओळखीत तीन शेतकरी(धनदांडगे) आहेत.... त्यांना त्यात एक रुपयाही नुकसान झालं नाही.

सागवान आणि एमू फार्मिंग या एका लायनीवरच्या दोन गोष्टी म्हणता येतील.

आता ऐकू येणारं कडकनाथ औषधी कोंबडा हे नावही यातलाच पुढचा एपिसोड ठरेल काय ? एका अंड्याचा दर १०० रुपये प्लस मायनस सांगतात सगळीकडे. मांस / तयार कालवण याचे दर दीड हजार, तीन हजार असे असावेत अनुक्रमे. कोणी जाणतात का या कोंबड्याविषयी?

गावठी फिलॉसॉफर's picture

20 Aug 2018 - 3:49 pm | गावठी फिलॉसॉफर

कडकनाथ ही कोंबडीची प्रजात आहे. प्रमुख्याने mp मध्ये आढळते..... ईच्यात लोह चे प्रमाण जास्त असते..... ही जातीचा ९८% कलर काळा असतो... आणि हिचे रक्त शुद्ध काळेच असते. यात कमी फॅट असते. आणि काही विशिष्ट जीवनसत्व असतात असं बोललं जातं.

हे गडचिरोली साईटला मिळत असे.... परंतु उर्वरित महाराष्ट्रात याचे उत्पादन साधारण चार पाच वर्षांपूर्वी सुरू झाले... याच्या अंड्याची किंमत कधीच १०० रु नव्हती.... याची किंमत५०-६० रु होती...... सध्या याचे उत्पादन जास्त असल्याने ती किंमत ३०-३५ रु आली आहे. तर जिथे नवीन उत्पादन सुरू आहे तिथे २०-२५ रु तुम्हाला अंडी मिळू शकतात.

याचे प्रमाण वाढल्याने किमती स्वस्त झाल्या आहेत. याकंबर मटण हे उग्र आणि मताट चविसारखे लागते( मी खात नाही, मित्राने सांगितले) त्यामुळे त्याला मागणी कमी आहे.

सध्या कडकनाथ आउटडेटेड झाले आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात इंग्लिश अंडे(लेअर) केले तर फायदेशीर ठरते.

अभ्या..'s picture

20 Aug 2018 - 4:50 pm | अभ्या..

इमू च्या आधी घरच्या घरी गोणपाटावर मश्रूम तयार करण्याचा प्रोजेक्ट झाला, नंतर सागवान आले. त्याआधी अ‍ॅमवे, मोदीकेअर टाईपमध्ये भरपूर एमेलेम झाले. आरएसएम पण झाले. मध्ये काही ठिकाणी चिटफंड झाले. इमूनंतर उस्मानाबादी शेळ्या बंदिस्त जागेत पालनाचे प्रोजेक्ट आले. (इमू आणि ऊस्मानाबादी शेळ्या हे गव्हरन्मेण्ट अ‍ॅप्रुव्हड स्कीम्स होत्या, त्यात काहीही न पाळणार्‍याणीच हात धुवून घेतले) ऑनलाईन डेटाएंट्रीचे प्रोजेक्ट, इंटरनेट आले तेम्व्हा वेबस्पेस स्कीम, अलिकडे अलिकडे बिटकॉइन स्कीम(चक्क बिटकॉईनच्या रेटवर मटका लावल्यागत स्कीमा आहेत हो), जपानी गाद्या, ब्युटीपार्लरचे कीट, ओलाउबेरला लावायच्या गाड्या हे पण झाले. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात लकीड्रॉ स्कीम फार फेमस. दर महिना हजार रुपये भरण्याची स्कीम असते. ५०० मेंबर गोळा करतात. पहिले बक्षीस ४-५ लाखाची एखादी कार असते. वीस तीस मोटारसायकली, दहाबारा तोळे सोने, स्मार्टफोन, एलईडी, वॉशिंग मशीन आदी बक्षीसे असतात. दहा सोडतीनंतर उरलेल्या मेंबरांना ४-५ हजाराची एखादी वस्तू गळ्यात घातली जाते. ह्याचा सरळ हिशोब आम्ही घातला होता. तो असा.
कलेक्शन
दर महिना : १००० गुणिले ५०० = ५ लाख
दहा महिन्याने टोटल कलेक्शन : ५० लाख.
अंदाजे बुडीत्/थकलेले/कॅन्सल्ड : २ लाख
एकूण : ४८ लाख
खर्च :
बक्षीसे :
एक कार (ही एक्स शोरुम असते, ऑनरोड नाही, तेही शक्त्यतो पेट्रोलचे बेसिक मॉडेल) ३.८० लाख
२० मोटारसायकली (हे पण एक्सशोरुम, स्पोकव्हील बेसिक मॉडेल प्लॅटिना, सीडी१०० सारखे लोकॉस्ट, ते ही बल्क पर्चेस मध्ये स्वस्तात) ८ लाख
१०० स्मार्ट्फोन (लावा, झोलो, मायक्रोमॅक्स सारखे लो कॉस्टते ही बल्क पर्चेस मध्ये स्वस्तात) ३ लाख
बाकी इतर बक्षीसे : १५ लाख
पब्लिसिटी: एक लाख
मार्केटिंग वाल्यांना वेतनः ३ लाख (५ लोक, ६००० महिना, १० महिने)
टोटल खर्च ३४ लाख.
अगदी इकडे तिकडे कमज्यादा करुन सुध्दा हि स्कीम चालवणारा ५ ते ८ लाख वर्शात कमावतो. लकी ड्रॉ नावालाच अस्तो, मुख्य प्राईज आणि निम्मे इतर प्राईज चक्क मॅनेज करुन दिले जातात. खूप लोक्स असे पण आहेत की त्यांच्या अ‍ॅटेटाईम २० २० स्कीम्स चालू असतात. कित्येक व्यावसायिकांच्या टेबलावर अशे दहाबारा ब्रोशर आणि स्कीम कार्डे पडलेली असतात.

चिनार's picture

20 Aug 2018 - 1:10 pm | चिनार

माझा एक अनुभव..
१. या प्रकारात अडकवण्यासाठी महिलावर्ग हा सॉफ्ट टार्गेट असतो. आपल्याला बोलावताना वहिनींना घेऊन या असा आग्रह असतो.
२. आपल्याशी बोलताना. "तुम्हाला पार्टनर बनवून आम्ही तुमच्यावर किती मोठे उपकार करत आहोत" असा एक आविर्भाव कायम जाणवतो.

आनन्दा's picture

20 Aug 2018 - 4:29 pm | आनन्दा

मला एकदा लिन्कड इन वर एका माणसाने रिक्वेस्ट टाकली. आपण नवीन व्यवसाय करण्यास इच्छुक आहात का म्हणून. मी तसाही याबाबतीत ओपन आहे, आणि समोरचा पण कोणत्या तरी एम एन सी मध्ये डायरेक्तर वगैरे होता. मग म्हटलं भेटूया.
कोथरुडला सी सी डी मध्ये भेट्लो.. पूर्ण प्रोफेश्नल, २ तास बोल्लो, पण दोन तासात धन्द्याबद्दल एक अक्षर नाही. माझे आयुष्य या धंद्यामुळे कसे बदलले वगैरे चालु होते.
मी सगळ संपल्यावर विचारले मला काय करावे लागेल?
तो म्हणाला सोपे आहे, आम्ही तुला एक साईट बनवुन देउ, तु त्या साईतवर ट्रॅफिक आणुन सेल करायचा. त्याबद्दल तुला कमिशन.. तु जितके पैसे इन्वेस्ट करशील त्या प्रमाणात जास्त कमिशन. २ लख टाकले तर ७ टक्के, ३ लाख टाकले तर १० टक्के वगैरे.

मी ठीक आहे म्हणून निघालो.. थोडा रिसर्च केल्यावर कळले की हा अ‍ॅम्वेचा नवीन प्रकार होता, आणि यात सगळे मोठेमोठे लोक सामील आहेत.. मोठे म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर असलेले.

हो..CCD वगैरे ह्या लोकांच्या नेहमीच्या जागा आहेत. तिथे गेल्यावर एखादा बकरा कापायची तयारी सुरू असतेच..
माझ्या एका लांबच्या नात्यातल्या बहिणीने मला ह्यात अडकवायचा प्रयत्न केला होता. CCD मध्ये बोलावून २ तास मुलाखत झाली. आणि आत्ताच्या आत्ता ३ लाखाचा चेक दे म्हणाली. मी नाही म्हटल्यावर...अडीच लाख...दोन लाख..सव्वा लाख..एक लाख...अगदी २५ हजार तरी दे इथपर्यंत विनवणी केली तिने..मी सटकलो लगेच...

मी नोकरीला लागले तेव्हा पासून अशा अनेक उद्योगाच्या ऑफर घेऊन खूप अगदी जवळचे नातेवाईक आले होते.
वजन जास्त असल्यामुळे herbilife आणि Amway वाले तर हमखास मागे लागतात .
आई काही नाही म्हणू शकत नाही मग मीच (भले कोणी मला जास्ती आगाऊ/बावळट म्हणो ) सरळ भाषेत नकार देते .
तेच सगळे नातेवाईक आता घरी येण्याचे किंवा या उद्योगा बदल बोलायचे टाळतात, चांगले पैसे तर सोडा त्यांनी जेवढे गुंतवले आहेत ते सुद्धा मिळाले नाहीत.
हे सगळे पाहिल्यावर आता मात्र आई कशाला लवकर हो म्हणतच नाही, आणि स्टॉक मार्केट ,SIP ,fixed deposit अशा उत्तम पैसे गुंतवणुकीच्या सुविधा असताना अशा फसव्या गोष्टीच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही हे आता चांगलेच कळले आहे तिला.
मागे एकदा माझ्या एका ऑफिस मधल्या मैत्रिणीने मला QNET साठी ऑफर केली ,परंतु माझ्याकडे पैसे नाहीत हे कळल्यावर लगेच ते लोकच मागे झाले.
नंतर त्या मुलीला कंपनीने काढून टाकले आता एका BPO मध्ये काम करते असा कळलं ,बिचारी.....
फ्री सेमिनार नक्की अटेंड करते , काही नाही तरी या लोकांची भाषण शैली आणि पटवून द्यायची पद्धत आणि अजून कोणत्या प्रकारे याला नकार देऊ शकू हे शिकण्यासाठी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2018 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

कचर्‍यातून सोने मिळवायची युक्ती तुम्हाला जमली आहे ! :)

मूळात भोंदू प्रकार असतानाही, त्याचा "कारभार (पक्षी : मॅनेजमेंट आणि मार्केटिंग)" करण्यात या लोकांचा हातखंडा असतो... अर्थातच, तसे असल्याशिवाय, माती विकून सोन्याचा भाव वसूल करणे, शक्य झाले नसते. :)

बाजीप्रभू's picture

21 Aug 2018 - 6:06 am | बाजीप्रभू

मला हल्लीच एक फोन आला,
सर आप ट्रेडिंग करते हो क्या.. शेअर मार्केट, लिक्विडीटी वैगरे वैगरे मे इन्टरेस्टेड हो क्या?.
मी म्हणालो मैं ट्रेडिंग करता हूं लेकिन वो अलग टाईपका ट्रेडिंग हैं... कौनसा सर? म्हणालो मैं "हॉर्स ट्रेडिंग" करता हूं... पठया सुरवातीला गंगारला... हॉर्स ट्रेडिंग? वो क्या होता है सर?
मी: अरे वो नै क्या इलेक्शन के टाईमपे करते है.. वैच. कार्पोरेट इलेक्शन, स्टेट और लोकसभा इलेक्शन के टाईम पे करते है वैच.. मराठीमे उस्को "घोडेबाजार" बोलते है.. तुंभी करो बहुत कमाई होता है...

पठया ने फोन कट केला हेवेसांन...

कपिलमुनी's picture

21 Aug 2018 - 11:28 am | कपिलमुनी

फुकट सेमिनार आणि सोबत जेवण असेल तर नक्की जावा . उशिरा जा , जेवून लौकर परत या !

मलाही येतात फोन त्या लोकांचे , सुरुवातीला तर खूप यायचे . नंतर मी त्यांचे पर्सनल नंबर मागायला लागलो आणि अगदीच वेळ असेल तर लॅपटॉपवर ' फार्र्टिंग साउंड एफेकट " म्हणून व्हिडिओज आहेत ते त्यांना निवांतपने ऐकवत बसतो. त्यांना आधिच अशी अट घालतो कि दोन मिनिटे थांबा , फोन ठेवू नका मला तुमचे म्हणणे एकायचे आहे पण त्याआधी मला जरा वेळ द्या . बिच्चारे काहीजण थांबायचे ऐकत पण नंतर त्यांच्या मध्ये मला वाटत मी सायको म्हणून प्रसिधद झालो असेन . मला डी एन डी विनंती वोडाफोनला कधीच करावी लागली नाही . सुदैवाने आता फोन फार म्हणजे फार कमी येतात ... अगदीच नाही म्हणा ना ..

मास्टरमाईन्ड's picture

9 Sep 2018 - 7:17 pm | मास्टरमाईन्ड

"लॅपटॉपवर ' फार्र्टिंग साउंड एफेकट " म्हणून व्हिडिओज आहेत ते त्यांना निवांतपने ऐकवत बसतो."

हा हा हा ते लोक नंतर किती चरफडत असतील याचा विचार करुन अजून हसतोय. मी पण आता हे वापरून बघतो.
मला डी एन डी विनंती वोडाफोनला कधीच करावी लागली नाही . +१११११११

१९९४-९५ ला मनीग्रोअर नावाची स्किम आली होती. जळगावचा कुणीतरी प्रमोटर होता. नवीन सदस्याने २००० रुपये भरायचे.त्यातले ५०० रुपये वरच्या साखळीतिल चार लोकांना जाणार. (नवीन मेंबरला तोपर्यंत घंटा) . मग ज्याचे २००० रुपये गेलेत त्याने ४ मेम्बर गोळा करायचे. चार मेम्बरांनी प्रत्येकी २००० भरायचे. त्यातले प्रत्येक मेंबराचे ५०० रुपये याच्या खिशात, उरलेले वरच्या साखळीतल्या मेंबरांच्या खिशात. जे वरच्या साखळीत होते आणि साखळी चालू होती तोपर्यंत त्यांचे खिसे भरपुर भरत होते. हे लोकच ही स्किम कीती चांगली आहे, मी किती कमावले असे गाजर दाखवुन मित्रांना, नातेवाईकांना किंवा आपल्या हाताखालच्या लोकांना पटवायचे. यात ना काही प्रॉडक्ट होता, ना कसला बिझिनेस होता. ही स्किम म्हणजे आपल्या पैशाने पहिल्यांदा दुसर्‍यांचे खिसे भरायचे आणि आता आपले पैसे गेलेत म्हणून दुसर्‍यांच्या खिशातुन काढायचे असली बोगस स्किम होती. त्यात ज्यांना ४ मेम्बर जमवता आले नाहीत त्यांचे २००० गेले. पण या स्किमने पुण्यात त्या वेळी धुमाकूळ घातला होता.लोक पार पागल झाले होते. जेंव्हा पेपर मध्ये याबद्द्ल बातम्या आल्या तेंव्हा ही स्किम बंद झाली.
मध्यंतरी एक दोस्त समुद्रातील खनिजापासुन बनवलेली डिस्क घेऊन आला होता (यालाही कुणीतरी ओळखीच्यानेच बकरा बनवलेला होता). व्यास साधारण १०० मिमि अणि २० मिमि जाड, किंमत १७००० रुपये.(चक्क काचेची डिस्क दिसत होती. नेटवर गुगलले तर ती चायना मेड काचेची डिस्क होती ). गुढगेदुखी, सांधेदूखी असनार्‍यांनी ती डिस्क दुखर्‍या भागावर फिरवायची. लगेच आराम मिळतो म्हणे. डायाबिटीस कमी होतो, रक्तदाब व्यवस्थित होतो असे असंख्य फायदे. पण छुपी स्किम तीच. आपण ती डिस्क १७००० हजार रुपयांना विकत घ्यायची आणि दोन मेंबर मिळवायचे. त्यांनी प्रत्येकी १७००० ला डिस्क विकत घ्यायची आणि त्यांनी नवीन बकरे शोधायचे. मी दोस्ताला वाटेला लावला.
पॉलीसीवर बोनस मिळालाय आणि आम्ही तुम्हाला मिळवुन देतो, त्यासाठी अमूक अमूक रुपये ट्रान्स्फर करा असे फोन इतक्या वेळा येतात की आता शिव्या घातल्याशिवाय गत्यंतरच नाही. हे फोन दिल्लीवरुन येत असतात. अजून एक फोन कायम येत असतो. तुम्हारे नाम पर दिल्ली कोर्ट का समन्स निकला चूका है और हमारे वकिल आपकी मदद कर सकते है. नंबर ब्लॉक केला तर दुसर्‍या फोन वरुन कॉल करतात.

आनन्दा's picture

23 Aug 2018 - 9:13 am | आनन्दा

मला आलेला फोन, मी त्याला म्हणलं की मी फोन रेकॉर्ड करतोय, अबी आता सायबरकराईम कडे कंपलेंट करणार आहे म्हणून.

ठेवूनच दिला.

गिऱ्हाईक नक्की जाळ्यात सापडणार नाही याची खात्री पटून कालापव्यय नको म्हणून त्याने ठेवून दिला असण्याची शक्यता १०० पैकी ९९% आहे. सायबर क्राईम कंप्लेंट वगैरेच्या भीतीने मुळीच नाही.

त्यातले अनेकजण हाती वेळ असला किंवा फ्रस्ट्रेटेड असले किंवा स्वभावत: अग्रेसिव्ह असले तर ते उलट "जिसके पास कंप्लेंट करनी है कर लो, हम तक कोई पहूंच नही सकता" वगैरे उलट ऐकवून चार शिव्याही घालून दाखवतील. आणि त्यांचा आत्मविश्वास खराही असतो कारण खरोखर बहुतांश मोबाईल नंबर एकतर खोट्या नावांनी मिळवलेले असतात किंवा स्पूफ करून सॉफ्टवेअरद्वारे खोटे दर्शवलेले असतात. फार क्वचित अशा लोकांपर्यंत कायदा पोचतो, तोही बहुधा अन्य कारणाने सापडले तर. कॉल रेकॉर्ड करून कंप्लेंट दिल्याच्या आधाराने ट्रेस करत कायदेशीर कारवाईसाठी अधिकारी त्यांच्या प्रत्यक्ष लोकेशनपर्यंत पोचल्याचं उदाहरण असलं तर ते रोचक ठरेल.

ट्रम्प's picture

23 Aug 2018 - 7:30 pm | ट्रम्प

हे मात्र खरं आहे !!!
सगळ्या शक्यता गृहीत धरून ते लोक फोन करत असतात त्यामुळे ' रेकॉर्डिंग चालू आहे , सायबर क्राईम ला कम्प्लेन करीन ' वैगेरे उडवून लावतात .
माझ्या मित्राने असाच ढोस भरला असता त्यानीं मित्राच्या बहिणी बद्दल वाईट शिव्या दिल्या , मित्राने टिपिकल पुणेरी स्टाईल मध्ये त्याला शिव्या घातल्या . पण दोन दिवस मित्राचे डोकं फिरलेले होते .
इथे प्रतिक्रिया देणाऱ्यां पैकी एक ही नाही ज्याने पोलीस चौकीत कम्प्लेन करून सोक्षमोक्ष लावला कारण आपल्याला आणि
त्या हारामखोरांना माहीत आहे फोनवर आर्थिक आमिष दाखवणे म्हणजे गुन्हा नाही आणि महाराष्ट्रातील पोलीस शिवीगाळ साठी नोएडा , ऊ प्र मध्ये येऊन त्यांना गजाआड करणार नाहीत .
त्यामुळे असल्या फोनला नम्रपणे उत्तरे देऊन फोन कट करणे आणि आपला सेल्फरेस्पेक्ट वाढवणे .
मला फोन आले की मी त्यांना ' ते जगातील सर्व शक्तिमान , आदरणीय ' आहेत असे समजून नम्रपणे बोलतो .

भंकस बाबा's picture

26 Aug 2018 - 11:06 pm | भंकस बाबा

एक गोष्ट लक्षात घ्या, आलेले फोन हे मोबाईल नम्बर असतात. त्यामुळे ते ट्रेस होत नाहीत.
मला अशाच एका फ़ोनवरुन तुमचे कार्ड ब्लॉक करत आहोत , जर चालू ठेवायचे असेल तर अमुक प्रोसीजर करावी लागेल असा फोन आला होता. या प्रकारच्या गुन्हाची माहिती असल्याने मी त्याला उद्धटपणे उत्तर दिले , तर वर तो इसम मलाच धमकवायला लागला. शेवटी त्याला निर्वाणीचे बोललो राजा तू हा मोबाईल नम्बर ठेवून एका लैंडलाइन ने फोन कर , मी मुंबई पोलिसमधे आहे 10 मिनिटात तुझ्या गां... मसाला भरतो. पण अशा उत्तराची त्यांना सवय असते, त्याने फोन कट केला.
आता असे फोन आले की बेधडक सांगतो की बंद कर ते कार्ड , मला नकोच आहे ते, इतके बोलले की समोरचा गार होतो व फ़ोन ठेवून देतो.

दादा कोंडके's picture

23 Aug 2018 - 12:55 am | दादा कोंडके

यातल्या बर्‍याच प्रकारचे अनुभव गाठिशी आहेत. पण याच बरोबर अजून एक प्रकार आहे. अध्यात्मिक संस्थांमार्फत लूट.
यात इस्कॉन आणि तत्सम येतात. तसंच आर्ट ऑफ लिवींगचं एक पाशात्य वर्जन आहे, लँडमार्क म्हणून. एका मित्राने एका सेमिनारला बोलावलं होतं. त्यात एक बाई प्रत्येकाला एक व्यक्तीगत आणि खासगी समस्या विचारत होती आणि स्वस्तातल्या सेल्फहेल्प पुस्त्तकातली चार-पाच वाक्य टाकून अलना-फलाणा त्यांचा कोर्स करा म्हणत होती. आणि तुम्ही मुरलेले असाल तर त्यांचा कावा लगेच लक्षात येतो. तुमची समस्या तर काहिच नाही आमच्याकडे अमुक अमुक झालेली लोकं येतात आणि बरं होउन जातात म्हणाली. पैसे भरायला कुणिच तयार होइना तसं ती म्हणाली की आज जर फी भरलीतर सूट मिळणार आहे. नंतर म्हणालीकी रविशंकरने त्यांचाकडेच कोर्स केलाय आणि मग स्वतःचं दुकान चालू केलंय.
या अशा लोकांचे आयटी वैग्रे एलिट लोकं टार्गेट असतात.

सर्वसाक्षी's picture

23 Aug 2018 - 5:58 pm | सर्वसाक्षी

आद्य ठग श्री अशोक शेरेगर. मुंबईत वर्षभर अनेक लोकांना भरपूर पैसे मिळाले, अट फक्त एकच - दोन सदस्य मिळवुन द्या, त्यादोघांनी प्रत्येकी दोघे वाढवले की तुहाला आजन्म घर बसल्या पैसे मिळणार! हे साहेब पैसे एका वर्षात दुप्पटही करुन द्याय्चे, काही भाग्यवंतांना मिळालेही. उरलेले खल्लास

मग एक दिवस बुड्बुडा फुटला. साहेब पुढे पकडले गेले पण पैसे किती जणांना परत मिळाले शंकाच आहे. हा सद्गृहस्थ बहुधा बी ई एस टी मध्ये नोकरीला होता.

माझ्या एका मित्राला त्याला नव्याने ओळख झालेल्याने अत्यंत दुर्मिळ असे सुगंधी तेल विकायची एजन्सी मिळवून द्यायचे अमिष दाखवत दहा हजार मागितले होते. म्हणे एकदा एजन्सी मिळाली की लोक तेल मागत येतील, फार प्रसिद्ध असे गुणकारी आणि सुगंधी आहे. मग घर बसल्या चाळीस टक्के मार्जिन.

मला जर ' आमच्या कंपनी तर्फे तुम्हाला फ्री हॉलिडे मिळत आहे' असा कॉल आला तर मी माझी ती मिळू घातलेली मौल्यवान भेट त्या फोन करणार्‍याला सप्रेम भेट देउ करतो - 'माझ्या ऐवजी तुम्हीच आपल्या जोडीदारा बरोबर जा'

नजदीककुमार जवळकर's picture

31 Aug 2018 - 2:14 pm | नजदीककुमार जवळकर

खिलजीं चा प्रतिसाद +100

फोन नंबरवर डीएनडी सर्व्हिस चालू करुन घ्यावी.

Telecom Regulatory Authority of India (TRAI) यांचे असे एक अ‍ॅप आहे ज्या द्वारे तुम्ही तक्रार नोंदवु शकता. मी हे सध्या वापरतोय आणि फालतु कॉल आणि मेसेजेसचा ओघ आटला आहे अस जाणवत.
अ‍ॅप :-
Do Not Disturb (DND 2.0)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade

दादा कोंडके's picture

4 Sep 2018 - 12:22 am | दादा कोंडके

एक तर हे अ‍ॅप लटकतं आणि अनेक नंबर रिपोर्ट केले तरी दिवसाला पण्णास कॉल आणि मेसेजेस आहेतच. त्यापेक्षा ट्रूक्वालरचा उपयोग करतो आता.

माझा अनुभव तरी या अ‍ॅप बद्धल चांगला आहे, माझा नेटवर्क ऑप्रेटर तक्रार नोंदवल्यावर कॉल करुन विचारणा देखील करतो.
ट्रू कॉलरचा डेटाबेस या आधी हॅक झालेला आहे,त्यामुळे माझा पास ! अ‍ॅप लटकत असेल तर अ‍ॅप परमिशन्स आणि मेमरी युसेज एकदा चेक करुन पहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika Music