Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वडगावकर on Sat, 11/03/2018 - 09:59
समस्त मिपाकरांना नम्र विनंती , मदतीची अपेक्षा. दोन दिवसांपूर्वी Q-NET च्या चक्रवयूहात अडकलोय , ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल? विशेष माहिती द्यावयाची असेल तर व्यनि करावे ही विनंती
  • Log in or register to post comments
  • 16301 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Sat, 11/03/2018 - 10:20

Permalink

आपले मित्र आणि नातेवाईक हवे

आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत, आणि आम्ही कोणीही नवीन बकरा होऊ शकत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश म्हेत्रे on Sat, 11/03/2018 - 22:22

In reply to आपले मित्र आणि नातेवाईक हवे by आनन्दा

Permalink

जरा विस्कटून सांगाल काय....

....तुमचा प्रतिसाद डोक्यावरुन गेला हो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 11/03/2018 - 22:52

In reply to जरा विस्कटून सांगाल काय.... by सतिश म्हेत्रे

Permalink

MLM (Multi Level Marketing)

MLM (Multi Level Marketing) उर्फ मराठीत "मलम" Q-NET हा जर MLM (Multi Level Marketing) चा प्रकार असेल तर, अशा गोष्टी सामान्यतः नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांमध्ये आधी प्रसवल्या जातात.उदा. अ‍ॅम्वे किंवा पियरलेस... त्यामुळेच, आनन्दा, ह्यांनी तो प्रतिसाद दिला...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 11/03/2018 - 10:36

Permalink

ये Q-NET क्या हय?

ये Q-NET क्या हय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sat, 11/03/2018 - 11:34

In reply to ये Q-NET क्या हय? by मुक्त विहारि

Permalink

मलम आहे एक.

मलम आहे एक.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 11/03/2018 - 13:07

In reply to मलम आहे एक. by आनन्दा

Permalink

ओके...

ओके...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Sat, 11/03/2018 - 11:46

Permalink

Q-NET

म्हणजे काय ? थोडी सविस्तर माहिती द्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sat, 11/03/2018 - 13:41

In reply to Q-NET by प्रसाद_१९८२

Permalink

मीवाना : https://en.wikipedia.org/wiki/Qnet

मी वाचलेलं नाहीये : https://en.wikipedia.org/wiki/Qnet -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Sun, 11/04/2018 - 03:51

Permalink

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ - http://www.mi

खिसा रिकामा होण्यापूर्वी! - https://www.misalpav.com/node/43188 Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ - http://www.misalpav.com/node/38257
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Sun, 11/04/2018 - 12:49

In reply to Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ - http://www.mi by नेत्रेश

Permalink

धन्यवाद भाऊ....

धन्यवाद भाऊ.... थोडासा आशेचा किरण दिसतोय,पाच सहा दिवसात सांगतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 11/05/2018 - 22:29

Permalink

https://www.misalpav.com/node/43582

https://www.misalpav.com/node/43582
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Wed, 11/07/2018 - 14:11

Permalink

अहुन चालु आहे Q-NET???

अडकलोय म्हणजे? तुम्हाला बाहेर पडता येइल कि.. वर आनन्दा यानि सान्गितल्या प्रमाणे... आपले मित्र आणि नातेवाईक हवे असतील तर गेले ते पैसे बुडाले असे समजून सोडून द्या आणि स्वस्थ बसा ते गेलेले पैसे काही केले तरी परत मिळणार नाहीत, --एकदा Q-NET मधे अडकलेला
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on गुरुवार, 11/15/2018 - 12:03

In reply to अहुन चालु आहे Q-NET??? by साबु

Permalink

मेहनत का पैसा है साबू साहब

तुम्ही पण अडकला होतात? , मग पुढे काय झालं? तुमचं आणी तुमच्या पैशांचे . आपला अनुभव आमच्या सारख्याना मार्गदर्शक होईल सर.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on गुरुवार, 11/15/2018 - 19:35

In reply to मेहनत का पैसा है साबू साहब by वडगावकर

Permalink

माझे पण मेहनत चेच होते..

जर तुम्हाला तुमचे पैसे हवे असतील तर त्यन्च्या मौडेल प्रमाणे बकरे शोधा आणि लावा तुमच्या लाइनी मधे. मला जमनार नव्हते म्हणुन अक्कल खाती टाकुन सोडुन दिले. आणि परत अश्या फास्ट मनी च्या मागे लागनार नाही अशी गाठ बान्धुन घेतलि.
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Fri, 11/16/2018 - 10:52

In reply to माझे पण मेहनत चेच होते.. by साबु

Permalink

अक्कल खाती टाकुन सोडुन दिले?

तीन लाख असेच सोडून दिले?, अक्कल खाती बरीच रक्कम जमा केलीत राव
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Fri, 11/16/2018 - 13:56

In reply to अक्कल खाती टाकुन सोडुन दिले? by वडगावकर

Permalink

३ लाख ????? बापरे....

एवढे पैसे टाकलेत ? एवढी मोठी उडी नाही घेत मी लगेच. तसे एवढे पैसे एकरकमी नसतातच माझ्याकडे . ह्या ह्या ... मी काहीतरी मिनिमम किमत असलेल घेतलं होत ..बायोडीस्क ..का काहीतरी. तीस हजार होती त्याची किमत. पण त्यांचे बिझिनेस मौडेल असे आहे की ते तुमचे पैसे इथे गुंतवू तिथे गुंतवू ..दुप्पट करून देऊ अस नाही म्हणत. एखाद्या वस्तूची शिफारस कोणाला केली समजा साबण ..की मी वापरला आहे बर का तू पण वापरून बघ. जर त्याने तो घेतला तर ती साबण कंपनी तुम्हाला काही देत नाही पण आम्ही देऊ .....amway सारख पण जास्त .... पण त्यामुळे तुम्ही तो ट्री व्यवस्थित मैनेज करायला पाहिजे. म्हणजे नवीन बकरे पकडा , त्याना समजावून सांगा ..नाही बधले तर त्यांना सेमिनार ला घेऊन जा. हेच मला जमत नव्हते.. तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Sun, 11/18/2018 - 14:01

In reply to ३ लाख ????? बापरे.... by साबु

Permalink

साबु भाई

साबु भाई आप की दुवाए काम करने लगी है, थोडं थोडं यश मिळतंय , पण एक गोष्ट शिकलो तात्या. विश्वासघात हा नेहमी विश्वासातल्या माणसाकडूनच होत असतो. अर्थात, ते शिकण्या साठी फार मोठी फीस द्यावी लागली..... पुण्यामधल्या कमीत कमी दहा लोकांना तरी ह्या जाळ्यांतून बाहेर काढल्या शिवाय ती फीस वसूल होणार नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Mon, 11/19/2018 - 17:19

In reply to साबु भाई by वडगावकर

Permalink

अरे वा..

तुम्हाला असेच यश मिळो. मला पण अशाच एका जवळच्या मित्राने ह्यात ओढले होते पण त्याने फसवले असे मी म्हणणार नाही. जे काही आहे ते त्यानी स्पष्ट सान्गितले होते. आणी काही लोकानी रग्गड कमावले सुद्धा. लगे रहो...
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on गुरुवार, 11/15/2018 - 18:28

Permalink

काय होणार..

अक्कल खाती जमा करुन परत अश्या वाटेला गेलो नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 11/15/2018 - 18:33

Permalink

SOS???

Qnet मध्ये कोणाचे वैयक्तिक काही लाख / कोटी/काही शे कोटी/ काही हजार कोटी अडकलेत का? अगदी 'आमचा आत्मा वाचवा' असं बोंबलण्याइतकं काय झालं?
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Fri, 11/16/2018 - 10:59

In reply to SOS??? by तुषार काळभोर

Permalink

अहो पैलवान

अहो पैलवान , खरोखरच लाखो अडकलेत म्हणूनच ओरडतोय. तुमची शंभर रुपयांची नोट हरवली तरी हळहळ वाटते की नाही?, अर्थात ते मेहनती चे असतील तर. आणी अगदी कोटींच्या गोष्टी करताय म्हणजे हडपसर गावामध्ये तुमची शेती वगैरे आहे कि काय? तसं नाही , आमचे विचार लाखाच्या वरच जात नाहीत म्हणून विचारलं (कृपया हलके घ्या )
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 11/16/2018 - 11:14

In reply to अहो पैलवान by वडगावकर

Permalink

हलकंच घेतोय

हडपसर मध्ये शेती आहे, तरी कष्टानंच कमावलेले पैसे असतात. १००ची काय पाच रुपयाची पण हळहळ वाटतेच. पण 'आमचा आत्मा वाचवा' असं ऑनलाईन टाकण्याऐवढं किती अडकलंय याची उत्सुकता होती. बाकी वेगवेगळ्या आकर्षक, लोभस अन गोंडस वेष्टनातील मलम योजनांना अजून लोक बळी पडतात आणि काही लोक अजून इतरांना बळी पाडत राहतात याचं वैषम्य वाटतं. कर्त्या वयातली विशी तिशीतली पोरं सिग्नलला 'घरबसल्या XXXX हजार कमवा' अशा चिठ्ठ्या वाटताना बघितली की वाईट वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Fri, 11/16/2018 - 11:30

In reply to हलकंच घेतोय by तुषार काळभोर

Permalink

किती अडकलंय याची उत्सुकता ?

ओके, आता सांगतो दोन लाख नव्वद हजार आणी वर डीडी चं कमिशन तीन हजार टोटल मिलाके होगये दोन लाख त्र्याण्णव हजार. मेहनत का पैसा है बॉस....उनके Xड मे हाथ डालके एकेक रुपिया निकालुंगा
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/16/2018 - 16:12

In reply to किती अडकलंय याची उत्सुकता ? by वडगावकर

Permalink

मेहनत का पैसा है बॉस....उनके

मेहनत का पैसा है बॉस....उनके Xड मे हाथ डालके एकेक रुपिया निकालुंगा
हे जर खरंच शक्य असतं तर आधी ते केलं असतं आणि मग इथे कोणत्या साबणाने हात धुतला ते लिहीलं असतं. पण ते शक्य नसल्याने इथे काही मदत मिळते का ते चाचपडत आहात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Fri, 11/16/2018 - 16:53

In reply to मेहनत का पैसा है बॉस....उनके by सतिश गावडे

Permalink

गावडे साहेब

गावडे साहेब हे तुम्ही उपहासाने लिहिलंय कि विनोदाने ते कळालं नाही....असो. तीन तारखेला खरंच चाचपडत होतो....पण आज नाही. ते शब्द फक्त डायलॉग म्हणून टाकलेले नाहीत....प्रयत्न चालू आहेत. एकदा का ह्यातून एकेक रुपया सकट बाहेर पडलो की पूर्ण ष्टोरी डिटेलवार , त्या टोळीच्या नावासहित लिहितो.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Fri, 11/16/2018 - 17:44

In reply to गावडे साहेब by वडगावकर

Permalink

अर्रे वा..!! आंगाश्शी.. :D

अर्रे वा..!! आंगाश्शी.. :D आता तुमच्या डिटेलवार ष्टोरीची वाट बघतोय हो..
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Fri, 11/30/2018 - 14:40

Permalink

आयला !....पैसं आलं की !

काल दुपारी ठीक तीन वाजुन एकतीस मिनिटांनी हिच्या मोबाईलने एसेमेस टोन दिला. मी सहज वाचला... Dear Customer, Thank you for banking with Bank Of Maharashtra. Your A/c No xxxx has been credited by Rs. 2,89,940.00 on 29-NOV-2018 ABCXYZ111999 VIHAAN DIR. A/c Bal is Rs.वगैरे वगैरे.... आयला !....पैसं आलं की ! तर मित्रानो...अशा रीतीने आम्ही ह्या चक्रवयूहातुन सुखरूप एकेक रुपया सकट बाहेर पडलो आहोत ताबडतोब एक मोहीम चालू केली.... क्यु-नेट मध्ये अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याची....
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 11/30/2018 - 14:48

In reply to आयला !....पैसं आलं की ! by वडगावकर

Permalink

अभिनंदन.

वडगावकर, अबब, इतके पैसे परत मिळाले! वडगावी खाक्या दाखवला काय? जाणायची ( = जाणून घेण्याची ≠ जाण्याची) उत्सुकता आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 12/01/2018 - 17:25

In reply to अभिनंदन. by गामा पैलवान

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Fri, 11/30/2018 - 21:28

In reply to आयला !....पैसं आलं की ! by वडगावकर

Permalink

हि खरी बातमी आहे. पण कसे काय

हि खरी बातमी आहे. पण कसे काय केलेत हे ? वाचायला आतुर !!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 11/30/2018 - 21:59

In reply to आयला !....पैसं आलं की ! by वडगावकर

Permalink

वडगांवकर, अभिनंदन!!!

पैसा कष्टाचा असो, सापडलेला असो वा वारसाहक्काने आलेला असो, पाच रुपये असो वा पाच कोटी, तो जपणं महत्वाचं!! तुमचे कष्टाचे पैसे परत मिळवले हे वाचून मनापासून आनंद झाला. इथून पुढे काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Fri, 11/30/2018 - 22:04

In reply to आयला !....पैसं आलं की ! by वडगावकर

Permalink

एक नम्बर..

कडक..
  • Log in or register to post comments

Submitted by शुभां म. on Fri, 11/30/2018 - 14:51

Permalink

भारीच ...............

भारीच एकदम अशक्य काम तुम्ही शक्य केलं , सविस्तर माहिती नक्कीच आवडेल वाचायला.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 11/30/2018 - 22:00

Permalink

प्रोडक्ट घेतल्यावर पैसे मिळणे

प्रोडक्ट घेतल्यावर पैसे मिळणे अशक्य वाटते. नसेल घेतले तर पैसे परत मिळत असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 12/01/2018 - 07:35

In reply to प्रोडक्ट घेतल्यावर पैसे मिळणे by मार्मिक गोडसे

Permalink

Q net रिफंड

जर गुंतवणूक रुपयांत असेल तर 30 दिवस अन्यथा डॉलर मध्ये असेल तर 7 दिवसांत प्रॉडक्ट्स न वापरता क्लेम केला तर पैसे परत मिळतात. साधारण ८०-९०% गुंतवलेले असतात, तर १०-१५% आपल्या n+१ला गेलेले त्याच्याकडून मिळवावे लागतात. पाचेक टक्के प्रशासकीय खर्च कदाचित मिळत नसावा. अर्थात जबरदस्त चिकाटीने फॉलोअप आणि योग्य तिथं गोड अन कडक वागणं, थोडंफार पोलिसी धमकी करावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Sat, 12/01/2018 - 08:54

Permalink

जरुर लिखेंगे...और वो भी,अलीबाबा और चालीस चोरो के नाम के साथ.

एक चेन्नई ,एक ओरिसा आणी दोन पुण्याचे मागच्या दोन दिवसात चार लोकांना ह्यातून बाहेर काढण्याचं समाधान.... तो दोस्तो...दिल थाम के बैठिये जल्द हि आप के लिये हम लेकर आयेगे,एक धमाकेदार और जबरदस्त कहानी क्यू-नेट : एक खतरनाक चक्रव्यूह (ईस्टमन कलर मे)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sat, 12/01/2018 - 14:17

In reply to जरुर लिखेंगे...और वो भी,अलीबाबा और चालीस चोरो के नाम के साथ. by वडगावकर

Permalink

ई.क. नको हो ....

वडगावकर, अहो ते इस्टमन कलर वगैरे नको हो. इथं मिपावरच काय ते पांढऱ्यावर काळं करा. :-) तुमची पराक्रमगाथा वाचायला जीव आसुसलाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on गुरुवार, 12/06/2018 - 12:27

In reply to जरुर लिखेंगे...और वो भी,अलीबाबा और चालीस चोरो के नाम के साथ. by वडगावकर

Permalink

लवकर लिहा

खूप महत्त्वाचा विषय. नुकतीच एक मैत्रीण अॅमवे विषयी बोलून गेली अाहे. तिला त्यातून लवकर बाहेर पड म्हणून सांगण्यासाठी मुद्दे हवे अाहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 12/05/2018 - 16:24

Permalink

अभिनंदन

अभिनंदन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com