दिलासा .....

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
31 May 2018 - 8:18 am

दिलासा .....

भरती असो कि ओहोटी
सगळं काही वाहून न्यावं लागत
कुणाला दिलासा देऊ ?
त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत
कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही !

इंद्रधनू असेल सप्तरंगी
क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला
कुणाला दिलासा देऊ ?
त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात
कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही !

दिवस मग मागून रात्र
सायंकाळ दोघांना पाहावी लागते
कुणाला दिलासा देऊ ?
त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही
की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत !

काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष !
रोज, हा नेमाने रोज येतो
कुणाला दिलासा देऊ ?
तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे
कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही !

.....फिझा

कविता

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

31 May 2018 - 11:42 am | चाणक्य

मस्त. खूप दिवसांनी लिहिलंत.

हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट केली कविता ! दखल घेतल्याबद्दल धन्यवाद !

खिलजि's picture

31 May 2018 - 5:33 pm | खिलजि

सुंदर आहे

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अभ्या..'s picture

1 Jun 2018 - 9:07 am | अभ्या..

वाह,
जबरदस्त लिहिलंय.

फिझा's picture

1 Jun 2018 - 2:01 pm | फिझा

धन्यवाद !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Jun 2018 - 8:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ओघवती आणि रेखीव