Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फिझा on गुरुवार, 05/31/2018 - 08:18
दिलासा ..... भरती असो कि ओहोटी सगळं काही वाहून न्यावं लागत कुणाला दिलासा देऊ ? त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही ! इंद्रधनू असेल सप्तरंगी क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला कुणाला दिलासा देऊ ? त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही ! दिवस मग मागून रात्र सायंकाळ दोघांना पाहावी लागते कुणाला दिलासा देऊ ? त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत ! काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष ! रोज, हा नेमाने रोज येतो कुणाला दिलासा देऊ ? तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही ! .....फिझा

Submitted by चाणक्य on गुरुवार, 05/31/2018 - 11:42

Permalink

वाह

मस्त. खूप दिवसांनी लिहिलंत.
  • Log in or register to post comments

Submitted by फिझा on Fri, 06/01/2018 - 14:01

In reply to वाह by चाणक्य

Permalink

हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट

हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट केली कविता ! दखल घेतल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 05/31/2018 - 17:33

Permalink

सुंदर आहे

सुंदर आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 06/01/2018 - 09:07

Permalink

वाह, जबरदस्त लिहिलंय.

वाह, जबरदस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by फिझा on Fri, 06/01/2018 - 14:01

In reply to वाह, जबरदस्त लिहिलंय. by अभ्या..

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 06/01/2018 - 20:49

Permalink

क्या बात...

ओघवती आणि रेखीव
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1715 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com