रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!

Primary tabs

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Apr 2018 - 4:56 am

चांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती...
रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!

वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...
मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती!

आजही,प्राजक्त आला हातघाईवर!
मंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती!

आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...
केस सावरण्यातही मश्गूल आहे ती!

ती म्हणाली..शेवटी,निर्माल्य होवू दे...
मी विठूला वाहिलेले फूल आहे ती!

================================

ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!

येथल्या प्रत्येक स्त्रीचे कर्ज जाणूया...
की,जिवांना सांधणारा पूल आहे ती!

—सत्यजित

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

12 Apr 2018 - 11:16 am | श्वेता२४

काय लिहलेय तुम्ही. खूपच छान

सस्नेह's picture

12 Apr 2018 - 2:56 pm | सस्नेह

सुरेख !
भावपूर्ण आणि अर्थपूर्ण !

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2018 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण!

गामा पैलवान's picture

13 Apr 2018 - 1:22 am | गामा पैलवान

सत्यजित,

गझल आवडली. विशेषत: निखारेवालं कडवं अत्यंत समर्पक आहे. शेवटल्या कडव्यात कर्ज च्या जागी मर्म चपखल दिसला असता असं वैयक्तिक मत.

आ.न.,
-गा.पै.

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:52 am | सत्यजित...

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपल्या मताचा आदर आहे!

मस्तच ! असंच सकस लिखाण येउ देत. पु.क.शु.

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:56 am | सत्यजित...

आपल्याकडून सतत मिळणारी दाद व शुभेच्छा,माझ्यासाठी प्रोत्साहनीय आहेत!

पद्मावति's picture

13 Apr 2018 - 12:30 pm | पद्मावति

सुरेख!

आगाऊ म्हादया......'s picture

13 Apr 2018 - 4:01 pm | आगाऊ म्हादया......

+१

विशुमित's picture

13 Apr 2018 - 5:38 pm | विशुमित

छान..!!

श्वेता,स्नेहांकिता,अ.आ.,पद्मावती,आ.म्हा.,विशुमित... आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद!

प्राची अश्विनी's picture

14 Apr 2018 - 5:44 pm | प्राची अश्विनी

शेवटचे दोन शेर विशेष आवडले.

पैसा's picture

14 Apr 2018 - 6:38 pm | पैसा

सुरेख कविता