Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सत्यजित... on गुरुवार, 04/12/2018 - 04:56
चांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती... रातराणीचे सुगंधी फूल आहे ती! वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते... मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती! आजही,प्राजक्त आला हातघाईवर! मंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती! आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी... केस सावरण्यातही मश्गूल आहे ती! ती म्हणाली..शेवटी,निर्माल्य होवू दे... मी विठूला वाहिलेले फूल आहे ती! ================================ ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन् लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती! येथल्या प्रत्येक स्त्रीचे कर्ज जाणूया... की,जिवांना सांधणारा पूल आहे ती! —सत्यजित

Submitted by श्वेता२४ on गुरुवार, 04/12/2018 - 11:16

Permalink

एक नंबर

काय लिहलेय तुम्ही. खूपच छान
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 04/12/2018 - 14:56

Permalink

सुरेख !

सुरेख ! भावपूर्ण आणि अर्थपूर्ण !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 04/13/2018 - 00:25

In reply to सुरेख ! by सस्नेह

Permalink

प्लस वण!

प्लस वण!
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 04/13/2018 - 01:22

Permalink

आवडेश

सत्यजित, गझल आवडली. विशेषत: निखारेवालं कडवं अत्यंत समर्पक आहे. शेवटल्या कडव्यात कर्ज च्या जागी मर्म चपखल दिसला असता असं वैयक्तिक मत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Sat, 04/14/2018 - 04:52

In reply to आवडेश by गामा पैलवान

Permalink

धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपल्या मताचा आदर आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by दुर्गविहारी on Fri, 04/13/2018 - 12:01

Permalink

मस्तच ! असंच सकस लिखाण येउ देत. पु.क.शु.

मस्तच ! असंच सकस लिखाण येउ देत. पु.क.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Sat, 04/14/2018 - 04:56

In reply to मस्तच ! असंच सकस लिखाण येउ देत. पु.क.शु. by दुर्गविहारी

Permalink

धन्यवाद!

आपल्याकडून सतत मिळणारी दाद व शुभेच्छा,माझ्यासाठी प्रोत्साहनीय आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Fri, 04/13/2018 - 12:30

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ म्हादया...... on Fri, 04/13/2018 - 16:01

Permalink

छान

+१
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 04/13/2018 - 17:38

Permalink

छान..!!

छान..!!
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Sat, 04/14/2018 - 05:07

Permalink

सर्व रसिक प्रतिसादकांचे आभार!

श्वेता,स्नेहांकिता,अ.आ.,पद्मावती,आ.म्हा.,विशुमित... आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sat, 04/14/2018 - 17:44

Permalink

सुंदर.

शेवटचे दोन शेर विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 04/14/2018 - 18:38

Permalink

सुंदर!

सुरेख कविता
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5396 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com