नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

Primary tabs

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
8 Apr 2018 - 10:08 am
गाभा: 

राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.

मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
नास्तिक चळवळ
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 10:33 am | पगला गजोधर

ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावे,
वलेखात उल्लेख केल्या अश्या चळवळी समाज मन जिवंत असल्याचेच निदर्शक आहे, असे मी मानतो.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 4:04 pm | श्रीगुरुजी

निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा रद्द करून काय होणार? पुढारी, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या बदनामीविरूद्ध कायदे आहेतच की. तेसुद्धा रद्द नको व्हायला?

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 8:42 am | चौकस२१२

कोणत्याच गोष्टीतच अतिरेक करू नये .... अशी श्रद्धा कि ज्यामुळे समाजाचे नुकसान होत नाही त्यावर उगाच हल्ला चढवू नये त्याचाच बरोबर भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि त्यातून होणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पिळवणूक थांबलीच पाहिजे ...कारखान्यात नवीन यंत्राचे उदघाटन करताना पूजा आणि नारळ फोडणे नाही केलं तरी चालतं, तसेच कोणाला त्रास होत नसेल तर प्रथा म्हणून केलं तरी चालत , तारतम्य बाळगावं

या नास्तिक समूहात काह अर्थ धर्मविरोधी असा घेतलं जाऊ नये अशी अपेक्षा ,, नास्तिकांचे स्वतःचे हक्क असतील व त्याचे संरक्षण यासाठी हि निर्माण झाली असावी असे वाटते .. आणि हो यात सर्व धर्माचे ( जन्माने) सहभागी व्हावेत अशी अपेक्षा

माहितगार's picture

8 Apr 2018 - 11:16 am | माहितगार

राम राम

धर्माच्या बदनामीच्या कायद्याला

धर्माच्या बदनामी विषयक नेकमा कोणता कायदा भारतात आहे त्याच्या बेअर अ‍ॅक्टचा दुवा मिळू शकेल ?

http://indiankanoon.org

नावाची साईट शोधण्यासाठी सोपी आहे किंवा इअतरत्रही नेमके कायदे आणि कलमे संदर्भासह स्पस्।ट करावे ह नम्र विनंती.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 11:50 am | पगला गजोधर

सर,
हमरा च्युक्याच,

जगभरातील, ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावेत...
.
असे वाचावे..

Additionally

जर भारताला आपले धर्म निरपेक्षकत्व , टिकवून ठेवायचे असेल...
तर अश्या (लेखातील उल्लेखलेल्या )चळवळी सामाजिक विचारमन ढवळून काढण्यास उपयुक्त..

धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक चळवळ याचा संबंध काय??

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 12:14 pm | पगला गजोधर

बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची "धर्मनिरपेक्षकत्व" याची प्रमाण व्याख्या काय ते सांगता का ?
कारण हिंदुत्ववादीपणाची तुमची प्रमाण व्याख्या एका दुसऱ्या धाग्यावर तुम्ही सांगितली होती, व तुमच्या व्याख्येला तुम्हीच केंद्रस्थानी (बुल्सआय प्रमाणे) ठेवून, तुम्हीच त्याभोवती आपल्या प्रतिक्रियेचा परीघ आखला होता...

बिटाकाका's picture

8 Apr 2018 - 12:32 pm | बिटाकाका

मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं तुम्ही अनावधानाने म्हणाला असाल असे मी मागच्या धाग्यावर गृहीत धरून दुर्लक्षिले होते, इथे परत दिसतेय. तुम्हाला वाचायला येत असेलच असे गृहीत धरतो.
----------------------------------
मी मागच्या धाग्यावरही सांगितले होते की माझी व्याख्या ही माझी नसून शब्दकर्त्याची आहे. ती पटत नसेल तर तुम्ही तुमची व्याख्या सांगा असा आग्रह ही धरला, तिकडे तुम्ही फिरकले नाही, ते एक असोच.
--------------------------------
मागच्या अनुभवावरून शहाणा होऊन यावेळी तुम्ही आधी बाण मारण्याची वाट बघतो, वर्तुळे कशी मारायची ते मंग बघू मांगे पुडे! चला सांगा बरं तुमची व्याख्या आधी.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 12:45 pm | पगला गजोधर

लोकांना त्यांची हवी ती उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य,
व राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे, सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य.

बिटाकाका's picture

8 Apr 2018 - 1:20 pm | बिटाकाका

ओके. संविधानाने "राज्यकारभारात सर्व धर्मांना समान वागणूक" अशी गृहीत धरले आहे. तुमची व्याख्या त्याच्याशी साधर्म्य दाखवते असे मानू. आता सांगा की नास्तिक चळवळ आणि धर्मनिरपेक्षता याचा काय संबंध.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 1:42 pm | पगला गजोधर

राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे

माझ्या प्रतिक्रियेतील हा भाग, त्याबाबत पुरेसा प्रकाश टाकतोय...

बिटाकाका's picture

8 Apr 2018 - 3:11 pm | बिटाकाका

कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे कुठलाही देव-धर्म न मानणे तर निरपेक्षता म्हणजे सर्वाना समान मानणे. निरपेक्षता जपण्यासाठी नास्तिकता काय कामाची? दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत असे मला वाटते.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 4:07 pm | श्रीगुरुजी

४ बायका, तोंडी ३ सेकंदात घटस्फोट, बुरखा, कौमार्य चाचणी, सुंता (मुले व मुलींची) इ. आमच्या उपासना पद्धतीचाच भाग आहे आणि या बाबींची चिकित्सा होऊच शकत नाही असे एक मोठा गट म्हणतो. मग असे करण्याचे त्यांना स्वातंत्र्य द्यावे का?

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 8:53 am | चौकस२१२

"सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य"
- हो पण स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी हि येते हे आपणास मान्य असावे
- "उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य", पाहिजे ना पण त्याचा त्रास/परिणाम सार्वजनिक जीवनावर नाही झाला पाहिजे .. उदाहरण कोणत्याही धर्माचं प्रार्थना रस्त्यावर करणे ( मग तो नमाज असो कि महाआरती असो "

.. दुसरे याचा अर्थ देशात सामान नागरी कायदा नसावा असं होतो का ?
ख्रिस्ती बहुसंख्याक असेलेल्या देशात सुद्धा समान नागरी कायदा आहे मग भारतात की नाही?
असं काय वेगळं आहे भारतात? आज कॅनडा सारखया देशात भारतासारखेच अनेक धर्माचे येवढेंचक नव्हे तर वर्णाचे लोक राहतात तिथे आहे, ऑस्ट्रेलियात आहे .. ( मी अमेरिकेचे नाव ह्यात घेत नाही कारण तिथे सतत गॉड चा उल्लेख सरकारे शपथांमध्ये असतो )
सर्वधर्मसमभावाची एवढे वर्षे न्हेरू गांधी व्याख्या म्हणजे "मला पाहिजे ते मी करेन" देश नंतर ...
इतर ठिकाणी देश आधी धर्म नंतर असं अर्थ आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धार्मिक भावना दुखावण्याचे जे प्रकार आहेत ते प्रचंड त्रासदायक असावे असे वाटते. रंगीत दगड, पूतळे, प्राचीन ग्रन्थातील काल्पनिक पात्रे, महापुरुष, पुस्तके त्यांची पाने, ओळी, वगैरे इत्यादि मुळे या नास्तिक चळवळीला कायदेशीर प्रक्रियांचा त्रास बातमीत सांगितल्या प्रमाणे सोसावा लागला असे दिसते. आमचा एक वकील मित्र म्हणतो. आयपीसी च्याप्टर पंधरा कलम दोनशे पंचान्नव नुसार ज्यात...

Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.

-दिलीप बिरुटे

बिटाकाका's picture

8 Apr 2018 - 12:04 pm | बिटाकाका

थोडक्यात काय तर आम्ही धर्म नाही संविधान मानतो असे म्हणणारे अशा वेळी संविधान कसे चुकीचे आहे दाखवायला पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 1:22 pm | माहितगार

सर '२९५ ए ' वेगळे आहे आपण त्याचा खाली वेगळा विचार करु पण आपण जे २९५ क्र.चे कलम दिले त्यात तुमचे स्वतःचे नास्तिक असण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कुठे थांबले आहे ?

Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ?

प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्ती स्वातम्त्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा आणि त्यासाठी केसेस टाकण्याचा आधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी केसेस नास्तीकांनीही टाकाव्यात आस्तीकांनीही टाकाव्यात . केसेसच टाकू द्यायच्या नाही त्यासाठी कायदाच नको म्हणणे दुसर्‍या पक्षाचे न्याय मागण्याच्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा येते. कायदे आणि खटल्यांवर विश्वास आहे म्हणून लोक न्यायालयात जातात, तुम्ही (म्हणजे सर नव्हे) न्याय यंत्रणेचा कायद्याचा आधार काढून घेतला की रस्त्यावरच्या संघर्षांची संख्या वाढते.

न्यायव्यवस्था वेगवान झाली पाहिजे म्हणणे आणि प्रतिपक्षास कायदा आणि न्यायव्यवस्था नाकारण्याची अपेक्षा करणे या दोन भिन्न बाबी असाव्यात असे वाटते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ?

काहीच कारण नाही कोणी मुद्दाम कोणाच्या प्रतीकांना धक्का लावण्याचं. पण कोणी मुद्दाम खोडसाळपणे जरी लावला तर भा.दु. भा.दु. म्हणून जो मास हिस्टेरिया उफाळतो आणि सर्वांचंच नुकसान होतं तो प्रकार टाळण्यासाठी अशा टोकदार आणि ज्वालाग्राही भावना मुळात बनू न देणं आवश्यक आहे. बाह्य प्रतीकं ही फक्त प्रतीकं आहेत. अनटारगेटेड भडका उडवून देण्याचं निमित्त नव्हेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ?

अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच त्यात काही वाद नाही. पण तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर कोणाकड़े दाद मागायची ? मला तुमच्या उपासनेचा त्रास होत नै ये तो पर्यन्त ठीक आहे.

उदा. समजा तुम्ही सार्वजनिक रस्ता अडवून तिथे तंबू ठोकुन दहा दिवस स्पीकरचं तोंड माझ्या घराकडे करून मोठ्या आवाजात ''सीतेच्या चोळीचं राजकारण'' या विषयावर कीर्तन आणि तत्सम पारायण करत आहात. माझं मानसिक संतुलन बिघडनार नाही का ? अशा वेळी मी तुम्हाला तिथे येऊन म्हणालो की 'बंद करा हो हे भजन' तर तुम्ही लगेच गाशा गुंडाळणार की भावनेला ठोकर मारली म्हणून पोलिसात जाणार ? तुम्ही पोलिसात जाणे पसंत कराल. त्याचा त्रास होतो हो...!

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 2:38 pm | माहितगार

परवानगीच्या अथवा कायद्याच्या मर्यादा ओलांडून एखादा सार्वजनिक समारंभ होत असेल तर, पोलीस आणि न्याय यंत्रणेकडे रीतसर तक्रार द्या . ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्या परस्पर तोंडी लागण्यासाठी अथवा त्यांच्या प्रतीकांचा अपमान करण्यास कुणी सांगितले ?

म्हशींचे सेक्युलर फाईटींग किंवा २६ जानेवारीची परेड सार्वजनिक जागेत होऊसार्वज, मेणबत्त्या आणि भ्र्ष्टाचार विरोधी मोर्चे सार्वजनिक जागेत होऊ शकतात तर सार्वजनिक जागा वापरण्यापासून फक्त धार्मीकांनीच कोणते घोडे मारले आहे ? प्रॉपर्ट्या आणि कायदे नंतर आले संस्कृती आधी उदयास आली आणि सांस्कृतीक उत्सव साजरे सार्वजनिक पणे साजरे करणे सहज मानवी प्रवृत्ती आहे , अभिव्यक्टी नास्तीकांच्या असोत किंवा अस्तीकांच्या असोत चार भिंतीच्या आत कशा दाबता येतील ?

सार्वजनीक जागा उत्सवांसाठी नाकारणे म्हणजे जंगलांचे राष्ट्रीयकरण करून आदीवासींना तुन्ही जंगलात का आलात असे विचारण्याच्याच कक्षात मोडते. बरे लोकशाही बहुमत सुद्धा अस्तीकांचे आहे , लोकशाहीत बहुमताचे प्राबल्य असणे ओघानेच येते. अल्पसंख्य नास्तीकांनाही माणूस म्हणून अधिकार हवेत हे समजता येते. सध्याच्या उपराष्ट्रपतींचे पेट्ट वाक्य आहे विरोधी पक्षांना say असावा पण way प्रस्थापितांचा असला पाहिजे आणि लोकशाहीत प्रस्थापितांचे बहुमताचे चालत नसेल तर त्याला लोकशाही म्हणण्यात अर्थ मर्यादीत होतो. तरीही भारतात घटना तुम्हाला खासगीपणासहीत विवीध अधिकार देते घेतल्या परवानग्यांच्या मर्यादे बाहेर गोष्टी होत असतील तर तुम्ही न्याय यंत्र्णेचा आधार घेऊ शकता. काही बाबतीत तरीही सर्व जण मिळून कायदा मोडतात कारण लोकशाही बहुमतावर अवलंबून असते हे वास्तव आहे. कायद्यांच्या पालना बाबत आस्तीक असोत अथवा म्हशीच्या झुंजीत रस असलेले नास्तीक / निधर्मी असोत , कुणी नास्तीक आहे म्हणजे प्रत्येक नास्तीक ट्रॅफीकचे सगळे नियम पाळतो असे होत नसावे, कायदा पालना बाबत सजगते बाबत प्रयत्न होणे जरुर्री आहे त्यासाठी विवीध माध्यमातून आपण आत्ता विषय मांडता आहात तशी जागृती साधता येतेच.

...तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर

कायद्यांच्या आणि मुलभूत अधिकारांची पालनाची अपेक्षा व्यक्त करणे आणि तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत ही नवी कम्यूनीस्ट अंधश्रद्धा खपवून नेण्याचा प्रयत्न दोन भीन्न बाबी आहेत .

मी सार्वजनिक ठिकाणच्याही देवाला नमस्कार करतो पण देव भक्ताने बहुमताचा अथवा झुंडीचा आदर करण्यासाठी इतरांना त्राहीमाम वाटावे असे वागावे असे वाटत नाही. मी तुमच वरच्या प्रतिसादातून समर्थन केलय पण सार्वजनिक ठिकाणास गोंधळाचे स्वरुप आले की फक्त नास्तीकांना नव्हे सच्चा आस्तीकांनाही त्रासच होत असतो हे लक्षात घेऊन वाचकांनी या विषयावर सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करावा.

कुमार१'s picture

8 Apr 2018 - 11:18 am | कुमार१

जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते>>>≥> +१११

मराठी_माणूस's picture

8 Apr 2018 - 12:19 pm | मराठी_माणूस

सण साजरे करण्या बद्दल काय मत आहे ह्या लोकांचे ?

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 12:24 pm | पगला गजोधर
सण साजरे करण्या बद्दल काय मत आहे ह्या लोकांचे ?

कुठले सण ?
कोण लोकं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं एकदा की देवाळुपण नाकारलं की सर्वच नाकारले जात असावे, त्यामुळे देवाला पुढे करून जे सण व्रत वैकल्य असतील तेही नाकारले जात असावे.

उदा. वेदामधे देवासुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती आता या कवीकल्पना आजच्या काळात किती रेटनार नाही का ?

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 1:47 pm | माहितगार

मी काय म्हणतो गरबा नृत्यात देव नाही असे समजा आणि गरबा खेळाकी राव ! इतराम्चे सोडून द्या , देवावरचा राग/ नाही म्हणून स्वतःच्या आनंदा आणि उत्साहावर का पाणि टाकायचे ? आपापला गरबा इतरांना खेळू द्यात . ( तुम्हाला कुणी कृष्ण किंवा राधा समजून तुमची भक्ती केली तर तुम्ह त्यांना थांबवू थोडेच शकता : )

दिलिप भावा, देश ही कल्पना देखील तिकडलीच आहे मंतो. काय करायचं तिचं?

दीपक११७७'s picture

8 Apr 2018 - 12:56 pm | दीपक११७७
' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.

यावर एक सुचवतो, नास्तिकाने आस्तिकाला तु चुक आहेस मी बरोबर हे सांगने इतरांच्या वैयक्तिक बाबीत लक्ष घालण्या सारखे आहे.
कोणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे वाटते
आणि संविधानालाही हेच अपेक्षित आहे.
मला जर क्रिकेट आवडत असेल तर फुटबाॅल हा कमी दर्जेचा खेळ आहे किंवा बकवास आहे असे बोलने चुकीचेच आहे.

हा उद्योग टाळुन नास्तिकांनी एकत्र येण्यास हरकत नाही-नसावी

बाकी लेख खुपच उत्तम लिहिला आहे. चर्चे साठी आदर्श मांडणी.

सध्या एवढचं,

यनावाला's picture

8 Apr 2018 - 4:56 pm | यनावाला

......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." आम्ही विवेकवादी नास्तिक हे मनापासून मानतो. देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे आम्हाला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आम्हाला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे

. . आमच्या देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आमच्या दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. आम्ही आमचे विचार भाषणात व्यक्त करतो. लेखात मांडतो. कुणाच्या घरी जाऊन त्यांना सांगत नाही. त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 5:16 pm | माहितगार

......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." सर्व आस्तीकही हे मनापासून मानतात (विवेकवाद ही केवळ नास्तीकांची मक्तेदारी असते याच्याशी ते असहमत असतात) . देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. हे आस्तीकांनाही पटते . अस्तीकत्वाचाही दृष्टीकोण त्यांना शास्त्रीयच वाटतो आणि या बाबत नास्तीकांशी मत भिन्नता ठेवण्याचा त्यांना घटनादत्त आणि मूलभूत मानवाधिकार असतो असे आस्तीकांना विचारान्ती वाटते . त्या शिवाय आस्तीकत्व , संस्कृती आणि मुल्यांची जपणूक , मटेरीआलीझम पासून दूर रहाणे अशा अनेक बाबतीत मानवी जिवनास सुसह्य करणारे असते असे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आस्तीकांनाहीघटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना आस्तीक वादी दृष्टिकोन अंगीकारणे भारतीय संविधानात कर्तव्य म्हणून स्विकारला जावा त्याचा अवैज्ञानिकतेशी काही संबंध नाही आणि असा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार [ प्रत्येक आस्तीकाचे कर्तव्य आहे "अस आस्तीकांना वाटण्याचा अधिकार आहे.

. . त्यांच्या नास्तिक देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आस्तीक दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने आणि मानवी संस्कृतीने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. ते त्यांचे विचार भाषणात व्यक्त करतात . लेखात मांडतात. जिथे संबंधीत कुटूंब प्रमूखाची परवानगी आहे तिथे घरी जाऊन सांगण्यात काही गैर नाही . त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 5:49 pm | माहितगार

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

दीपक११७७'s picture

8 Apr 2018 - 7:50 pm | दीपक११७७

देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे

हे कोण ठरवणार, कोणासाठी काय हिताचे आहे?
बुरखा घालावा म्हणुन सक्ती करणे जसे अतिरेकी आहे तसेच एखाद्याला घालायचा असेल तर नको घालु म्हणूनही आग्रह धरणे ही अतिरेकीच आहे.
माझ्या मागील प्रतिक्रियात blockquote केलेला मुद्दा सांगूनही लोकं ऐकत नाही, नास्तिकते कडे झुकत नाहीत. यावर आहे. मग लोकं ऐकत नाही तर तुम्ही कायं करणार?

केवळ नास्तिक लोकंच तार्किक असते तर सगळे शास्त्रिय शोध नास्तकांनाच लागले असते.
बादवे,
अजूनही भौतिक शास्त्रात युनीफाईड थेरीचा शोध लागलेला नाही. नास्तिक हे ऐवढेच ज्ञानी आहेत तर त्यांनी आपली energy unsolved problem वर खर्च करुन त्याची उत्तरं शोधुन जगाला द्यावी म्हणजे आपोआप लोकं त्याच्या कडे आकर्षित होतीलं. आणि नास्तिकांच्या हातुन मानव कल्याण होऊ शकेलं.

बादवे,
जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध नाही.
सध्या इथच थांबतो.

मराठी_माणूस's picture

9 Apr 2018 - 11:33 am | मराठी_माणूस

छान प्रतिसाद

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2018 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध नाही.

आहे ना! सर्व्हायवल इस ट्र्थ :)

दीपक११७७'s picture

9 Apr 2018 - 1:34 pm | दीपक११७७

आहे ना! सर्व्हायवल इस ट्र्थ

जगतांना सत्य काय आहे हे माहित असणे आवश्यक नाही! असत्या सोबतही छान जगता येते किंवा काय सत्य काय असत्य हे माहीत नसतांनाही छान जगता येते!
छान जगणे महत्वाचे!

नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य मानले असेल आणि त्या कार्यासाठी ती व्यक्ती तनमनधनाने झटत असेल आणि शिवाय त्यात आनंदी असेल तर त्याला तू आपले जीवितकार्य बदल आणि फिजिक्स मध्ये रिसर्च कर असे कोण कसे काय सांगू शकतो बुवा?

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

अर्धे भारतीय बायका आहेत, मुली आहेत. ते कसे काय बांधव असणार?
======================
सगळ्या भारतीयांचे वय वेगवेगळे असते. ९० वर्षाच्या म्हातार्‍याला बंधू म्हणायचं?
======================
बंधू म्हणजे जेनेटिक असतो ना?
=================================
भारतीय? फक्त कि सुद्धा? बाकीच्या देशातल्या लोकांनी काय घोडे मारलेत?
=====================
इतर सजीव तुमचे कुणी लागत नाहीत?
===============================
मागच्या पिढ्यांतील मेलेले भारतीय (इसवीसन १३०० इ) हे पण तुमचे बांधवच?
===================================================================================================================================================================================================================
आपण नास्तिक आहात, असली धार्मिक वृत्तीची अर्थहीन वाक्ये कृपया वापरणे टाळा आणि वैज्ञानिक नि शास्त्रशुद्ध वाक्ये वापरा.
--------------------------------
अन्य लोकांच्या धाग्यांवर देखील आपण प्रतिसाद लिहिता हे पाहून आदर दुणावला आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 2:35 pm | श्रीगुरुजी

जबरी

LLRC

नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते.

वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे.
नास्तिकता = आधुनिकता
म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच
एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो.
असो.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 1:48 pm | पगला गजोधर

अस्तिकता = सनातन ता ?
असे जर असेल, तर कदाचित
नास्तिकता = आधुनिकता
असू शकेल का ??

माहितगार's picture

8 Apr 2018 - 3:56 pm | माहितगार

अस्तिकता आणि सनातन वाद या भिन्न बाबी आहेत असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2018 - 7:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही हजार वर्षांपासून आस्तित्वात असलेल्या आणि इसविसनपूर्व सातव्या शतकात चार्वाकाने नावारुपाला आणलेल्या 'नास्तिकता' या संकल्पनेला "आधुनिक" म्हणता येईल ?! ;) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो.

मुळात काथ्याकुटाचा उद्देश ''नास्तिक चळवळ''सुरु असून नास्तिक लोकांची ही चळवळ पुढे कोणत्या मार्गाने जाईल ? त्याची आवश्यकता किती वगैरे साधक बाधक चर्चा व्हावी इतकाच उद्देश् आहे. मिपावरील काथ्याकुटाने त्यांची मंडळी इथे येऊन लिहितील वगैरे असंही वाटलं. आणि भविष्यात अशा चळवळीवर आपण एक धागा कुटला होता त्याचीही आठवण राहील इतकाच प्रांजळ हेतूआहे.

लेखातील गृहितके, लेखातील विनोद. लेखातील वाटलेला सहजपणा सोडून आपण नास्तिक चळवळीवर आपले अभ्यासपूर्ण मत लिहावे अशी अपेक्षा आहेच. नसता आपला प्रतिसादही खूपच विनोदी होता म्हणून सोडून द्यावे लागेल. :)

-दिलीप बिरुटे

रानरेडा's picture

10 Apr 2018 - 12:46 am | रानरेडा

बैठक म्हणजे "चला बसू या " वाली कि लावणीची ?
पहिल्या प्रकार्साठी मी कधी हि तयार आहे ..

अभ्या..'s picture

8 Apr 2018 - 2:06 pm | अभ्या..

मस्त मस्त. छान चळवळ आहे,
करताहेत काहीनाकाहीतरी. करत राहिले पाहिजे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2018 - 2:15 pm | प्रकाश घाटपांडे

मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही.

प्राचीन काळी देखील चार्वाक पंथ होताच. चार्वाक दर्शन आहेच की. विचार चिकित्सेसाठी व वादसंवादासाठी खुले असावेत. मग ते कोणतेही विचार असोत.पंथाचे काही तोटेही होतात विचार बंदिस्त होतात. झापडे लागतात.

arunjoshi123's picture

9 Apr 2018 - 1:18 pm | arunjoshi123

मस्त प्रतिसाद.

राही's picture

9 Apr 2018 - 4:51 pm | राही

चार्वाक दर्शन तर होतेच. चार्वाकाच्या मताचे काही किंवा अनेक लोक त्या काळी होते असतीलही कदाचित. पण त्यांचा पंथ होता असेल असे वाटत नाही. समविचारी लोक एकत्र येणे इतक्यापुतीच अलगता असावी. पंथ म्हटला की त्याची अशी काही वेगळी लक्षणे, आचरण, कर्मकांडे असतात. जसा पूर्वीचा नाथपंथ, महानुभाव वगैरे. सध्या जसे समतावादी, भांडवलवादी, हिंदुत्ववादी, उजवे डावे अशा विचारधारा आहेत तशीच चार्वाकदर्शन ही एक विचारधारा आहे. तसेही सर्व दर्शने ह्या विचारधारा आहेत पंथ नाहीत.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 3:16 pm | माहितगार

भारतीय दंड विधानाच्या '२९५ ए' एवजी २९५ चा हवाला दिला असा हवाला बर्‍या पैकी तार्कीक उणीवेचा होता. विशीष्ट प्रतिकाला धक्का पोहोचवला तरच लागू होतो अन्यथा नाही. वस्तुतः '२५२ ए' ची व्याप्ती अधिक आणि बहिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा कुठे कुठे ओलांडू शकेल अशी आहे. आणि बर्‍ञाच वेळेस काळजीचे कारण असू शकते.

272 [295A. Deliberate and malicious acts, intended to outrage reli­gious feelings of any class by insulting its religion or reli­gious beliefs.—Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of 273 [citizens of India], 274 [by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise], insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 4[three years], or with fine, or with both.] https://indiankanoon.org/doc/305995 वरुन साभार

एकीकडे राजकीय आणि ईतर फायद्यांसाठी भावना भडकवणारी वक्तव्ये जाणीव पूर्वक केली जातात म्हणून या कायद्याची गरज आहे. तर दुसर्‍या बाजूस अभिव्यक्ती स्वातंत्र्य सदसद विवेक बुद्धीने वापरणार्‍यांची अडचण होते हे खरे. इथे खरा प्रश्न आस्तीकतेचा अथवा नास्तीकतेचा नाही, जाणीवपूर्वक भावना न भडकवता अथवा न भडकवून घेता अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी संस्कृती जोपासण्याचा आहे आणि तत्संबंधी सजगता निर्माण करण्याचा आहे . अनेक कायदे पुस्तकात असतात पण अपवादात्मक परिस्थिती शिवाय वापरावे लागत नाहीत अशी या कायद्याची स्थिती असावयास हवी.. इन एनी केस हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या घटनात्मक मूलभूत अधिकाराची कक्षा ओलांडू शकत नाही. प्रश्न कायद्याचे फौजदारी स्वरुप कमीत कमी अपवादात्मक स्थितीतच वापरले जाईल आणि कायद्याचा प्रभाव दिवाणि असेल हे पहाण्याचा आहे.

अर्थात कायद्याचा खूप बाऊ करण्याचे ही कारण नाही. पद्मावती सारखे चित्रपट असो अथवा अनेक पुस्तके असोत न्यायालयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू वेळोवेळी उचलून धरली आणि या कायद्याचा फार गैर वापर भारतातल्या आस्तीकांनाही शक्य नसावा कारण प्रत्येक आस्तीक दुसर्‍याच्या आस्ती कत्वाच्या स्वरुपाबाबत टिका करतच आला आहे . त्यामुळे या बाबत हा कायदा भडकाऊन राजकारणि आणि धार्मीक पुढारी सोडून इतरांसाठी शक्य तेवढा सौम्य केला जाण्याची गरज असावी असे वाटते.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 4:14 pm | माहितगार

२९५ ए मध्ये भारतीय कायदा तुमचे intention काय आहे ह्याचा विचार करतो deliberate and malicious नसल्यास तुमच्या स्वातंत्र्याला कोणतीही आच येत नाही. २९५ ए मध्ये इश्वरनिंदा हा शब्द कुठेही नाही (धार्मीक भावना शब्दात अप्रत्यक्षपणे इनक्लूड होत पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुदीतून सुटून जात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुद या कायद्या पेक्षा मोठी समजली जाते ) आणि म्हणूनच मिपावर अशा मनमोकळी चर्चा आणि मनमोकळ्या भूमिका शक्य होतात (जी पाकीस्तानात शक्य होत नाही)

माहितगार's picture

8 Apr 2018 - 3:36 pm | माहितगार

नास्तिक कुणालाच नको असतात”

नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य "वाद करणारे कुणालाच नको असतात" असे हवे आहे का कारण वाद करणारे आस्तीक नास्तिकांना नको असतात , आपण एकट्याने वाद केला कि थकायला होत नाही समोरची बाजूही वादाला आली की थकायला होते असे तर काही नाही ना ?

नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य सरसकटी करणाचे म्हणून फसवे आहे. स्वामी विवेकानंदांसारखी नास्तीकांना सांभाळून घेणारी उदाहरणे आहेत , अगदी संघचालकांचे अशातले वाक्य आहे आम्ही कट्टर आहोत पण उदार असण्याबद्दल कट्टर आहोत. वस्तुतः भारतीय संस्कृती नास्तीकांसाठी बरीच उदार आहे. नास्तीक स्त्रीयांची अधिक पंचाईत होते तरी आस्तीक कुटूंबीय नास्तीक सुनांना सांभाळून घेत असल्याची नव्हे काही कारणाने घटस्फोट होऊन मुलगा आणि सूनेचे नवे विवाह झाले तरी आधीच्या सूनेचा मान कायम ठेवल्या गेल्याची विनोदी उदाहरणेही याच देशात पहावयास मिळतात.

सार्वजनिक ठिकाणी नास्तीक होणे आणि भारतीय कुटूंबात स्त्रीला नास्तीकता राखणे कठीण असते. भारतीय पुरुषांना कौटूंबीक व्यक्तीगत स्तरावर नास्तीक असणे जरासे सोपे आहे. ( विभक्त कुटूंबातील मुस्लीम स्त्रीस जाहीर न करता व्यक्तीगत स्तरावर नास्तीक होणे हिंदू स्त्री पेक्षा बरेच सोपे असावे पण जाहीर पणे नास्तीकता मुस्लीमस्त्रीस अगदी प्राणघातक सिद्ध होऊ शकते हिंदू स्त्रीस फारफारत काडीमोड घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी लागेल एवड्।एच ) पण एनीवे ज्यांना आदर , प्रेरणा, विश्वास, श्रद्धा या सर्व बाबी समजतात त्यांना व्यक्तिगत स्तरावर नास्तीकता टिकवणे सहसा कठीण जाण्याचे कारण नव्हे.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 3:53 pm | माहितगार

मूळ बातमीत खालील वाक्य आहे.

ती कॉन्व्हेंटमध्ये होती. तिथे .... धर्माचा पगडा जास्त.
तिच्या वर्गातल्या मुलांनी तिला फार घाबरवलं होत.....

"तिच्या घरात देव मानणारं कोणी नव्हतं, तिची आई (म्हणजे मी) कधी पूजा करणाऱ्यातली किंवा देवाला हात जोडणाऱ्यातली नव्हती, मग तिने का देव मानावा? पण तिच्या बरोबरीच्या सात-आठ वर्षांच्या मुलांना हे मान्य होणारं नव्हतं."

देव न मानणं हे किती मोठ पाप आहे हे ती मुलं माझ्या मुलीला ठसवून सांगत होती आणि माझी मुलगी एकटी पडली होती. तिला कोणी समजून घेतलं नाही. अगदी शिक्षकांनीही नाही."

१) बहुसंख्य नास्तीक असलेल्या मुलात एखादे आस्तीक मूल गेले तर विरुद्ध दिशेने अशीच स्थिती होणार नाही का ? मुलांनी कुंकू का लावले ? मेंदी का काढली ? , छूम छूम का घातले ? म्हणून शिक्षा करणार्‍याही शाळा मुलांच्या मनावर आघातच करत असतात. पालकांनी नास्तीक असणे ठिक आहे . आस्तीकांचा सेन्स बद्दल प्रश्न विचारणार्‍यां नास्तीक पालकांनी कॉमन सेन्स शिल्लक न ठेवणे हे समजणे जरा आवघड जाते. बोलून चालून धार्मीक शाळेत घालायचे आणि शिक्षकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे तसेही चूक आहे. पण इन एनी केस आपल्या विचाराचे नसलेले आपल्या आसपास अनेक जण असतात अशी वेळ धार्मीक बाबतीतच नव्हे अधार्मीक बाबतीत सुद्धा येऊ शकते. खासकरून आपण बहुसंख्य समाजापेक्षा वेगळे वागत असू तर मुलांच्या मनाची आधी पासून तयारी करुन घेणे शिक्षकांशी अ‍ॅडव्हान्समध्ये संवाद साधून ठेवणे हे गरजेचे असावे त्याची काळजी या बातमीतील विशीष्ट पालकानी कितपत घेतली होती याची शंका वाटते.

२)

देव मानणं हे किती मोठी चूक आहे हे ती नास्तीक माझ्या आस्तीक स्नेह्याला ठसवून सांगत होते आणि माझा आस्तीक स्नेही एकटा एकटी पडला होता. त्याला कोणी समजून घेतलं नाही. त्याच्या बुद्धीला आस्तीकता प्रमाण वाटत असूनही अगदी बुद्धीप्रामाण्यवाद्याम्नी सुद्धा नाही."

आस्तीक नास्तीकांवर का आक्षेप घेऊ शकतात हे समजण्यास हे कदाचित अल्पसे साहाय्यभूत ठरावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नास्तिक चळवळ आणि त्यांच्या भविष्यातील वाटांबद्दलही थोडं अधिक लिहा प्लीज. म्हणजे चर्चा मूळ वाटेवर येईल.;)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 4:59 pm | माहितगार

:) ठिके सर, पण नास्तीक मंडळींनी हाच मोकळेपणा जरासा आस्तीकांबद्दलही दाखवावयास हरकत नसावी .

पण एनी वे . नास्तीकांनी एकत्र यावे आधारगट निर्माण करावा ते ठिक आहे पण उत्सवात असो अथवा व्यासपिठांवर असो एकटे रहावे असे व्यक्तीशः वाटत नाही. आस्तीक आणि नास्तीक दोघेही समाजाचे घटक आहेत त्यांना सन्मानाने स्वतःच्या विचारांनी जगता येण्यास हरकत नसावी. केवळ आमचेच खरे हा अट्टाहास नसावा. आकाशवाणिवर सकाळी भावगीते वाजवली जात त्या काळातला आस्तीक कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे ते पंढरीच्या विठू राया अशा दोन्ही गाण्यात एका मागो माग रंगून जात असत हे आठवते. कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे हृदयातला भगवंत राहीला उपाशी लिहिणारी मंडळी, किंवा महादेवाच्या पिंडी आधी घरातल्या जच्चा बच्चांना दूध पाजण्यास सांगणारी खूलभर दुधाची कहाणी आस्तीक ऐकत आणि समजतही असत. वेगवेगळ्या भूमिका रंगवत भातुकलीचा खेळ खेळणार्‍या लहानग्यात आणि कर्मकांडात रमलेल्यात फारसा फरक नसावा. भातुकलीच्या खेळामधली नवरा नवरी खोटी आहेत तरी तेवढ्या क्षणापुरते रमून मुले जशी बाहेर पडतात तसे बर्‍याच अंशी आस्तीकही बाहेर पडत असतात. काही अडचणी रहातात नाही असे नाही पण स्टीरीओ टायपींग करुन एकमेकांना वेगळे पाडण्याचा आणि पडण्याचा खेळ दोन्ही बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हननास कारणीभूत होऊ शकतो तो टाळला पाहीजे म्हणजे आधारगट बनवताना पंथ बनवण्याची भानगड जी आहे ती कदाचित मागे लागणार नाही आणि किमानपक्षी व्यक्तीगत जिवनात कडवटपणा न आणता एक नास्तीक म्हणून आनंदाने जगता येऊ शकेल.

नास्तीकांच्या आधार गटातही आधार देऊ इच्छित आस्तीकांना त्यांना एकटे वाटणार नाही अशा पद्धतीने सामावून घेण्यास हरकत नसावी. सार्वजनिक जिवनात नाही पण व्यक्तिगत जिवनातल्या नास्तीकतेबाबत समाज सर्वसाधारण पणे अलिप्त धोरण बाळगतो. कुटूंबीय सहसा समजून घेत असतात . सार्वजनिक जिवनातही नास्तीकता हद्दीच्या बाहेर पूश केली नाहीतर भारतात तुम्हाला पंतप्रधान झालेली उदाहरणेही पहाण्यास मिळतील.

सार्वजनिक जिवनातही नास्तीकता सोशल मार्केटींग टेक्नीक एवजी र्‍हेटॉरीक वापरुन पूश करणार्‍यांना मात्र अधिक आधाराची म्हणण्यापेक्षा मानसिक तणावातून वाचण्यासाठी वेळोवेळी बाब्रेपिकनक करुन रिलॅक्स होण्याची ब्रेक घेण्याची गरज असू शकते. असे वाटते असो.

निसटत्या बाजू निसटू द्या.

डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:42 pm | माहितगार

निसटत्या बाजू वैचारीक लोकांनी नाही दाखवल्या इतरांच्या हातात चर्चा जाऊन हाती जे लागते ते प्रत्येक वेळी लोणी नसते. निसतत्या बाजू दोन्हीकडे असतात याचे नास्तीकांना भान कितीही ताक पाजवूनही येईल का याची शंकाच वाटते . या वाटा आधीच निसरड्या आहेत, ताकाची देवाण घेवाण न सांडता केली म्हणजे थंडक मिळते. नाहीतर लोण्यावरुन पाय घसरुन ताकाच्या भांडी खणखणायला वेळ तसा मुळी लागत नाही. सरांच्या विनंतीचा मान ठेवला विषय बदलला पण नास्तिक गटाने पुन्हा विषय काढले तसे निसटत्या बाजूंचे प्रदर्शनही पुन्हा आपसूक सुरु झाले. असो

अहो, गळलेले मुद्दे दाखवणं बरोबरच आहे हो. पण तुम्ही सम्यक मध्यम भाषेत बसवून ते सांगताना इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की आपण कुठून सुरु केलं त्याचा ट्रैक सामान्य मेंदू ठेवू शकत नाही.

किती लोक सहमत होतील ते माहीत नाही पण माझा मेंदू तरी निसटत्या बाजू सीरीज वाचताना भंजाळून जातो. हाच इफेक्ट चर्चा प्रस्ताव वाचतानाही येतो. विषय रोचक , म्हणून वाचायचं तर असतं, पण अहो, मुद्देसूद मांडणी याचा अर्थ मुद्देसरोवर, मुद्देसागरात बुडून वाचक गटांगळ्या खाऊ लागावा असा होत नाही. हायकोर्ट वकील किंवा न्यायाधीश यांच्याइतकी मुद्देतपशीलवाचनशक्ति सामान्य माणसाला नसू शकते किंवा कसे? ;-)

असा अर्थ होता.

बारकाव्यांमध्ये राक्षस असतो अशी म्हण आहे. माझे काम मला जमणारी मांडणी करणे आहे. आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे. जेव्हा मनाला विचार पटत असतात तेव्हा लोक क्लिष्टही सोपे करुन घेतात आणि इतरांपर्यंतही गरजेनुसार अधिक सोपे करुन पोहोचवतात.

गवि's picture

8 Apr 2018 - 9:13 pm | गवि

आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे.

निसटती बाजू. यात समोरच्याला गृहीत धरण्याचा धोका संभवतो किंवा कसे? इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?

...इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?

गृहीत धरण्याचा प्रश्न कुठे येतो. ज्या क्षणी समजणे अवघड जाते लोक वाचन थांबवत असतील फारतर मनात चीड चीड करतील पण माझ्या शैलीच्या मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य याचा त्यांनी आदर करावा जमेल मिळेल तेवढे घ्यावे अथवा कुणीतरी काहीतरी बरळत असेल असा विचार करुन सोडून द्यावे.

यात माझी जोखीम काहीच नाही , काही असेल तर जे समजून घेण्यात कमी पडतील त्यांची असली तर असेल. जगातल्या प्रत्येक परिस्थितीला मर्यादा असतात. आपण मर्यादीत क्षमतेची माणसे असतो. आपल्याला जसे घडेल तसे करावे .

माझ्या लेखनात काहीच घेण्यासारखे वाटत नाही तेव्हा लोक फाट्यावर मारतात त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहे. मला माझ्या पद्धतीने व्यक्त होण्याचे आणि आपल्याला अशी मनमोकळी टिका करण्याचे आणि असेच उत्तर देण्याचे मला स्वातंत्र्य आहे. तेव्हा आपण सर्वजण आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ.

असंका's picture

9 Apr 2018 - 10:56 am | असंका

सुरेख मांडलंत!
धन्यवाद!!!

राही's picture

9 Apr 2018 - 5:07 pm | राही

आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे याविषयी साशंकता नसावी असे वाटावे किंवा कसे.

पुंबा's picture

10 Apr 2018 - 10:50 am | पुंबा

राहीतै,
आपल्या प्रतिसादातून व्यक्त झालेल्या मतांशी सहमत नसण्याचे काहीच कारण वा प्रत्यवाय दिसत नसतानासुद्धा अधिक काळजी घेऊन मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असे मत व्यकत करणे अधिक योग्य राहिल किंवा नाही तरी निदान असहमती व सहमतीच्या सीमेव्वर असणार्‍यांना पर्याय उपलब्ध होऊन नीट सारांश निघू शकतो हे पहाणे योग्य होईल किंवा नाही याचा निर्णय प्रत्येकाने घ्यावा असे सुचवले तर ते वावगे ठरणार नाही अश्या निष्कर्षाप्रत येणे अधिक श्रेयस्कर असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून.

भागवताची कथा सांगतांना एकही इंग्रजी शब्द येता कामा नये असा एक अलिखित नियम आहे, त्यामुळे भागवत बाटल्या जायचं.
आज तुम्ही ''आर. सी.'' इंग्रजी शब्द वापरुन चक्क मला बाटवलं आहे, मी आपल्या ''आरसी'' धोरणाचा निषेध व्यक्त करुन ''ब्लाइंडर''
वरच उपवास सोडेन अशा आशावादावर आपले आभार मानतो. ';)

-दिलीप बिरुटे

राही's picture

9 Apr 2018 - 4:53 pm | राही

आमच्याकडून फक्त जोरदार टाळ्या

माहितगार's picture

8 Apr 2018 - 4:34 pm | माहितगार

मूळ वृत्तपत्रीय लेखातील

...त्याला उगाच, 'ते काहीही असो, पण जगात एक शक्ती असतेच जी सगळं नियंत्रित करते', अशी तर्कशून्य शेपूट कोणी जोडत नाही.

हे वाक्य नास्तीक भूमिका तर्कशुद्ध असतात आणि आस्तीक भूमिका तर्कशुद्ध असूच शकत नाहीत असे स्व -प्रमाणपत्र देते

....आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही ही आस्तिक माणस निरर्थक वाद वाढवतात.

प्रस्थापित भूमिकेत आस्तीक असतील तर, वाद वाढवणारे प्रस्थापित विरोधी ठरतील प्रस्थापीत नव्हे . आणि म्हणून वादाची आणि जर काही तथाकथित मानसिक थकवा आला तर त्याची जबाबदारी नास्तीकांनाही शेअर करावी लागते.

...अरे म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही,"

हे असे नास्तिकांकडूनही होऊ शकते . त्याचा नास्तिक अथवा आस्तीक असण्याशी संबंध असलाच पाहीजे असे नाही. जगात मानव निसर्गतः केवळ रॅशनल विचारांवर जगला असता तर मानवी विकासास एवढी हजारो वर्षे खर्ची घालावी लागली नसती. माणसांना देवाचा शोध लागण्याच्या आधीची माणसे अधिक रॅशनल होती अथवा देव हकल्याने बहुसंख्य मानव आपोआप अधिक रॅशनल होईल असे नसावे. देव नाही म्हटले तरी त्याचे इरॅशनलपण इतर बाबतीत मानव दाखवतच राहील . मुद्द्याची गोष्ट ही की उपरोकत वाक्य हे नास्तीकांनी आस्तीकांचे अनावश्यक केलेले स्टीरीओटायपींग आहे एवढेच.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 4:51 pm | श्रीगुरुजी

नास्तिकता चळवळ करा किंवा जनआंदोलन करा किंवा सौदी अरेबिया/मालदीव सारखे एक धर्म सोडून इतर धर्मपालनावर बंदी आणा किंवा रशिया/चीन सारखे नास्तिकता सक्तीची करा, आस्तिकता कधीही नष्ट होणार नाही व नास्तिकता कधीही विजयी होणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे. हजारो वर्षापासून आस्तिक लोक खोट्या समजूतीला जागत आले. कधीही कोणत्या धर्माशास्त्रात्रील देव कोणाला दिसला नाही, फाफट पसार्‍याच्या अनाकलनीय रुढी निर्माण झाल्या. कोणत्याही देवाला जगातली विषमता, दु:खे दिसली नाहीत. देवाला बोलायला जावे तर आबा तोबा करुन घेणारी विसाव्या शतकातली मंडळी बघितली की हसायला येतं आणि म्हणे नास्तिकता कधी विजयी होणार नाही. नास्तिका जिंकलीच आहे, धाडस कोणात नाही. भिती वाटते. नको देवाची कटकट कोण मागे लावून घेईल. नाय का ?

नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते. कोणत्याही सक्तीशिवाय त्यांनी आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे. जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. आपण फार फार तर आम्ही नाय बॉ येणार तुमच्या चळवळी- बिलवळीत इतकं बोलून मोकळं व्हावं.

प्रवचन किर्तनाची सवय असलेल्यांना एक उदाहरण सांगतो, तसं काही सांगितल्या शिवाय त्यांचे डोळे उघडत नाही. एका स्त्रीला तीन मुलं होती. तीनही मुले आंधळी होती आणि स्त्री देखील आंधळी होती. त्या स्त्रीला चौथा मुलगा झाला त्याला चांगले डोळे होते. तो मुलगा आईला सांगायचा निसर्ग कसा हिरवा आहे. पाने फुले फळे त्याची वर्णने करायचा. त्यावेळी त्याच्या आईला वाटायचं की आपल्या या चौथ्या मुलातच काही विकृती आली आहे. माझ्यासह माझ्या तीनही मुलांना असं काही वेगळं कधी दिसलं नाही, या चौथ्या मुलालाच वेगळं कसं दिसतं. आईने विचारलं की हे सर्व कशामुळे दिसते ? मुलगा म्हणाला डोळ्यामुळे. झालं आपल्या मुलात काहीतरी विकृती आहे असे समजून त्या सर्वांनी त्याचे डोळे काढून टाकले. आस्तिकांनो, नास्तिक लोकांना जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे, ती आपण जपली पाहिजे. त्यांना सोबत केली पाहिजे त्यांचे डोळे काढू नये असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 10:26 pm | माहितगार

पुन्हा एकदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आणि कमकुवत आधार. तिथे धागा लेखाची सुरवातच "नास्तिक कुणालाच नको असतात” लेखाच्या दुव्याने झाली आहे . आधार गटाची स्थापना करावी लागतीए ..

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 10:50 pm | श्रीगुरुजी

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.

जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने.

नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.

थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल.

कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे.

जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे.

हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना?

असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.

मार्कस ऑरेलियस's picture

8 Apr 2018 - 11:54 pm | मार्कस ऑरेलियस

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.

ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे !
कारण श्रीमदाद्यशंकराचार्यांनी ७ व्या शतकात संपुर्ण भारतभर फिरुन नास्तिकमतांचे विशेषकरुन बौध्दमताचे खंडन केले आणि अद्वैतमताची निर्विवादता सिध्द केली, हे सारे पुराव्याने शाबित करता येते !
कुमारिल भट्टांनी त्या आधी बौध्दांचे च तर्क वापरुन बौध्दमताचे खंडन केले होते ! हेही इतिहासिक साहित्य वापरुन सिध्द करता येते !

असे असताना जाणिवपुर्वक हे "आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे" असले धाधांत असत्य विधानकरणे हा असंमंजस*, अज्ञानमुलक * वाटते .

तळटीप : * : दोन्ही शब्दांचा कॉपीराईट यनावाला कडे आहे तरीही आमचा उत्तरदायित्वास नकार . ख्या ख्या !

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 12:00 am | श्रीगुरुजी

>>>> ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे !

ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही? ते एकीकडे म्हणतात की आस्तिकांचा फार पूर्वीच पराभव झालाय (म्हणजे नास्तिकांचा विजय झालाय) आणि दुसरीकडे नास्तिक चळवळ उभी करायला बघताहेत. राहू दे त्यांना त्यांच्या भ्रमात.

ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही?

>>> ह्म्म.
मी सरांना एकदा भेटलो आहे , शिवाय आमच्या मित्रमंडळात सरांविषयी सर्वांणाच आदर आहे म्हणुन इथे थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट देवुन पहात आहे .

कदाचित सरांनी नास्तिकमतखंडन वाचले नसावे. म्हणुन सर कदाचित असे विधान करत असावेत. तसेही नास्तिकमत खंडन हा विषय अतिषय जुना आणि समजाय्ला अवघड आहे . तसेच त्यावरील साहित्य सहज रित्या उपल्ब्ध्द नाही. म्हणुन सरांना थोडा बेनिफिट ऑफ डाऊट देवुयात , सर प्राध्यापक आहेत ते अभ्यासकरुनच मत मांडतील अन ते यनावाला सारखे अज्ञान आणि अर्धवट वाचनातुन बनवलेल्या मतांवरुन द्वेषमुलक लिखाण करण करणार नाहीत अशी आमची गाढ श्रध्दा अहे !

( नास्तिकमत खंडन : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.404767 पान क्रमांक २६७ ते २७६ )

देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.

देव नाकारणे ही भूमिका घ्यायला एक प्रचंड पातळीची निर्बुद्धता लागते. न भूतो न भविष्यति अशी मूर्खता असल्याशिवाय मनुष्य देव नाकारू शकत नाही.
-------------------------------
सर्वसाधारणपणे प्रचंड निर्बुद्ध भूमिका घ्यायला धाडस लागतेच.
--------------------------------------
अगदी भौतिकशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं निर्बुद्धता हिच नास्तिकता आहे.
=================================================================
वरील विधाने हेत्वारोप, वा आरोप, इ स्वरुपाची नाहीत. ते तांत्रिक निष्कर्ष आहेत. आय रिपिट, दे आर सायंटिफीक स्टेटमेंट्स.

सांरा's picture

8 Apr 2018 - 6:13 pm | सांरा

कुठल्याही समाजात नास्तिक म्हणून राहण्यापेक्षा हिंदू समाजात नास्तिक म्हणून राहणे सोपे आणि सुरक्षित आहे. इतकंच नाही तर त्याच समाजाला ढीगभर शिव्या देता येतात, कुजका मेंदू म्हणून चिडवता येते तेही परिणामांच्या चिंत्याशिवाय.
इतर समाजांत 'मी नास्तिक' नंतर 'आहे' म्हणण्याचा सुद्धा अवकाश देत नाहीत. पाश्चिमात्य देशांची गोष्ट कराल तर ते पण आत्ता आत्ताच tolerant झाले आहेत. शंभर वर्षांपूर्वी ही तिथे हीच स्थिती होती. उलट आपल्या येथे चार्वाकीय तत्वज्ञानाला ही स्वीकारले गेले.
पण gratitude नावाची गोष्टच नाही आपल्यात.

दीपक११७७'s picture

8 Apr 2018 - 10:32 pm | दीपक११७७

हे खरं आहे, भारतातील नास्तिक भितरेच आहेत या सारखं काहीतरी तस्लिमा नसरीन जी म्हणाल्याचे आठवते.

त्याच ना ज्या भितरेपणा अजिबात न दाखवता निडरपणे आपल्या मूळ देशातच कायम राहिल्या त्या?

दीपक११७७'s picture

8 Apr 2018 - 11:40 pm | दीपक११७७

त्या कोण माहीत नाही, ह्या भारतात अाश्रीत आहेत.
स्वधर्मा विरुध्द त्यांनी बंड केला होता.
नास्तिकांनी सर्व आस्थिकांनच्या प्रवृत्ती विरुध्द बंड करावे म्हणजे ह्या बाई म्हणतात तसे भ्याड ठरणार नाहीतं.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 6:30 pm | माहितगार

सर म्हणाले निसटत्या बाजू निसटूद्या तर थोडे तो विषय बाजूला ठेऊ. 'शुभंम करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय ' इथे पर्यंतची प्रार्थना परंपरा नास्तिकांनाही जमावयास हवी . आस्तीकांच्या विरोधी शत्रुबुद्धी विनाशाय म्हणुन पसायदाना सारखे उत्तम प्रार्थना बद्दल नास्तिकांच्या गटात त्यांना विचार जमेल का ?

नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ? हा धागा नास्तिकां साठी प्रेमानेच काढलेला होता त्याची या निमीत्ताने जाहीरात .

अर्धवटराव's picture

8 Apr 2018 - 7:38 pm | अर्धवटराव

अशा आंदोलनांची फार गरज आहे. यात एकच पथ्य पाळायला हवं. बुद्धीप्रामाण्यवाद लोकांना पटवुन द्यायच्या आगोदर आपण स्वतः आचरणात आणायला हवा. बुद्धीप्रामाण्याला धर्म, आस्तीकता, लिंगभेद, समाजभेद, पूर्व-पश्चिम, इ. गुंतावळ्याविरुद्ध भिडवण्याऐवजी आपलं रोजचं जगणं बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर बेतलेलं हवं. प्रामाणीकपणे जर हि कास धरली तर दोन दिवसात आपली पैसा, प्रतिष्ठा, साधनसामुग्रीचा उपयोग आणि एकुणच स्वतःविषयीच्या धारणा अमुलाग्र बदलतील आणि प्रथम आपलं जीवन मुळापासुन रीस्ट्रक्चर करण्याची गरज जाणवेल. यातुन जन्माला येणार्‍या प्रचंड अंतर्विरोधाला जर जिंकता आलं तर आपण किती शिल्लक उरलो याचा लेखाजोखा मांडावा. मग काय वाटेल त्याच्याशी भिडावं... प्रोव्हाइदेड तसं काहि करण्याची गरज जाणवत असेल तर...तसंही आपली बुद्धी पुढील मार्ग दाखवायला समर्थ आहेच.
बुद्धीप्रामाण्यवादाचं गोंडस नाव घेऊन आपल्या व्यतिरीक्त इतरांचीच कातडी सोलायची दांभीक खुमखुमी जिरवायची असेल तर मात्र काम सोपं आहे. हे महाभाग सर्वत्र सापडतील.. अगदी मिपावर सुद्धा ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2018 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता कुठे धागा तापायला लागलाय. त्यातली हवा आताच काढून टाकू नका हो, अर्धवटरावसाहेब ! ;) =))

पैसा's picture

8 Apr 2018 - 7:58 pm | पैसा

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे. साधं झोपतांना देवाच्या नावाने बोटं मोडून पाहा मग कळेल खरंच का इतकं सोपं असतं हे सर्व. आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल. बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;)

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 8:47 pm | श्रीगुरुजी

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे.

LLRC

भारतातील नास्तिक आणि विवेक व बुद्धीप्रामाण्य याचा दुरूनही संबंध नाही. ते जे काय करताहेत त्याला ढोंग म्हणतात. हे लोक अत्यंत भित्रट आहेत. ते खरोखरीच धाडसी असते तर गणेश विसर्जन, सत्यनारायण यांसारख्या सौम्य प्रथांविरूद्ध कंठशोष करण्याऐवजी अतिशय क्रूर प्रथांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले असते. त्याऐवजी सॉफ्ट टारगेट पकडून आपण विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक इ. आहोत या गैरसमजातच ते धुंद आहेत.

आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल.

जोपर्यंत त्यांच्यात ढोंग आहे व प्रामाणिकपणाचा अभाव आहे, जोपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि' हा त्यांचा दर्प कायम आहे, जोपर्यंत ते आस्तिकांना हिणवत राहतील, जोपर्यंत त्यांचा पक्षपात सुरू आहे तोपर्यंत ते कधीही यशस्वी होणार नाहीत.

बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;)

असले काही धागे आले की मिपावरचे तथाकथित महाभाग प्रतिसाद देत नाहीत का आणि काही टाळकरी 'अहो रूपम् अहो ध्वनी' या उक्तीप्रमाणे टाळ कुटत माना डोलवत नाहीत का?

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:55 pm | माहितगार

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात,...

मोडतोड करण्यास बुद्धी लागते तर समृद्ध वनसंपत्तीचा मागे पुढे न पहाता नाशकरणारे बुद्धीमान मानावे लागतील. बाळाला न्हाऊ घातलेल्या पाण्यासोबत आपण बाळ सोडत नाही आहोत हे ही न पाहण्यात कोणता विवेक आणि कोणते बुद्धी प्रामाण्य. स्मजून सुधारुन सुसंस्कृत आणि सुसंस्कारी रहाण्याची सुयोग्य निवड विवेक अथवा बुद्धी प्रामाण्य म्हणवली जाऊ शकत नाही का ? बुद्धीप्रामाण्य आणि विवेक या शब्दांवरनास्ट्तीकांची मक्तेदारी समजणे अंधश्रद्धा याची खात्री करण्याची घाई मुळीच नाही.

अर्धवटराव's picture

8 Apr 2018 - 10:51 pm | अर्धवटराव

या सगळ्या आंदोलनाला उद्देश नास्तिकतेचा पुरस्कार करणे हा आहे, बुद्धीप्रामाण्यवाद नव्हे, हे स्पष्ट सांगायचं ना मग. सोयीस्कर बुद्धीप्रामाण्यवाद, ज्याला शुद्ध मराठीत दांभिकता म्हणतात, स्वतःचं कौतुक करुन घ्यायला त्याचा उपयोग होतोच. नास्तिक आंदोलकांनी त्याचा आनंद उपभोगायला आमची काहिच हरकत नाहि.
प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल वगैरे मंडळी आपल्या मांदियाळीत आणुन बसवणं, सशाने आपल्या कपाळाला गंडस्थळ म्हणणं वगैरे गटण्यास्टाईल गमती जमती बघायला आम्हालाही आवडतं. तुम्ही सुद्धा अ‍ॅन्जोय करत आहात. छान आहे.

सर्वसामान्यपणे खरे तर एकमेकांना अजिबात छेदत नाहीत. पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात.

काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.

यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 8:16 pm | श्रीगुरुजी

पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे.

नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.

होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात.

होळी, फटाके इ. चा आणि आस्तिकतेचा कणभरही संबंध नाही. कालौघात काही सामाजिक समारंभ निर्माण झाले. होळीला लाकडे पेटवून व दिवाळीला किंवा इतर प्रसंगी फटाके जाळून पर्यावरणावर आघात होतो यात तसूभरही शंका नाही. किंबहुना या सर्व विघातक गोष्टींवर तातडीने बंदी यावयास हवी.

बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?

काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.

या प्रथा अत्यंत जीवघेण्या असून त्यावर तातडीने कायदेशीर बंदी हवी. बादवे, मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा.

मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?

यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.

फक्त होळी, फटाके इ. च अघोरी आहे का? इतर अघोरी प्रथांचा कधी उल्लेख सुद्धा करायचा नाही का? त्याबाबतीत कायमच दातखीळ का बसलेली असते? होळी, फटाके इ. हानीकारक आहेतच, पण वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.

साधारणपणे आस्तिक-नास्तिक वादात मी प्रतिसाद देत नाही. पण तुमचा प्रतिसाद वाचून अगदीच रहावलं नाही, म्हणून हा उपप्रतिसाद:

पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे.
नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.

यात आस्तिक-नास्तिक असा भेद नाहीये. दोन्ही बाजूंचे निर्लज्ज लोक निर्लज्जपणे, मूर्ख लोक मूर्खपणे आणि अहंकारी लोक अहंभावाने वागतात.

बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?

भवनांच्या (इमारत) चन्द्र्शालांवरून (गच्ची) खाली पडणे, पतंग पकडताना रस्त्यावरून धावताना वाहनांच्या मध्ये येणे, आणि पतंगाचा मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकणे हे काही अपघात मी पाहिलेत.

मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा.
मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?

मूल उंचावरून फेकणे , लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, या प्रथा मूर्खपणाच्या आहेत आणि नास्तिक त्याला विरोधच करतात. पण एका हिंदू नास्तीकाने एका हिंदू अस्तिकाला त्याच्या वागण्यातली चूक किंवा रुधीतला फोलपणा दाखवला की मुस्लीमान्मधल्या चुकीच्या रुढींची चर्चा सुरु करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा ही जुनी आणि मूर्खपणाची स्त्रातेजी आहे.
बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल निषेधार्ह मानण यात आस्तिक/नास्तिक पेक्षा शाकाहार/मांसाहार हा मुद्दा येतो.

वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.

काहीही हं श्री! तुमच्या मर्यादित वाचनात/अनुभवात या प्रथांचा निषेध करणारे नास्तिक आले नसतील. अभ्यास वाढवा. नेहमीसारखी अर्धवट माहितीवर छातीठोक विधानं (वैश्विक सत्य असल्याच्या थाटात) करू नका.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:28 pm | माहितगार

....आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.

लहान मुलांच्या ही मानसशास्त्रज्ञांना विचारा एकाला एक दुसर्‍याला दुसरी ट्रीटमेंट दिली असे वाटले की मुले नाराज होतात. मोठे अधिक संयम दाखवतात पण स्वाभाविक प्रतिक्रीया बदलत नसतात. त्यामुळे पुरोगाम्यांनी एकास एक आणि दुसर्‍यास दुसरा नियम लावत नाही आहोत या बद्दल अत्यंत सजग असले पाहीजे पण असे प्रत्यक्षात होताना दिसत नाही तेव्हाचे आक्षेप वार्‍यावरही सोडता येत नाहीत.

सुंता आणि एफजीएम या प्रथा, केंसेट बीफोर अटेनींग अ‍ॅडल्टहूड आणि अघोरी नाही असे कसे म्हणता येते मला कल्पना नाही. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी विशीष्ट देवशी केलेल्या प्राण्यांच्या कत्तली नमेक्या कोणत्या प्रकारात मोडतात ? ख्रिशन ननच्या विवाहाधीकारांचे आणि ख्रिश्चन स्त्रीयांच्या घटशोटाच्या अधिकाराचे काय ?

काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.

हे मान्य आहे असे अघोरी प्रकार थांबवण्यात आस्तीकांनी पुरोगामी संत परंपरेचा आदर्श पुढे ठेऊन पुढाकार घेतला पाहीजे .

....यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.

यना बेसिकली इथपर्यंत मर्यादीत नाहीत, हि गोज अ लिटल बियाँड . कि जिथे वैचारीक विवादाला जागा निर्माण होतात.

....संक्रांतीमुळे होणारे अपघात

हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .

.....फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण

एकत्रित आणि थोडे फटाके उडवून सहकार्य करण्यास हरकत नाही. बेसिकली याचा आस्तीकतेपेक्षा उत्सवी आनंदाशी संबंध
अधिक असावा. उत्सव हे आस्तीकतेच्या पलिकडे जाऊन चार भिंतीत न कोडता येणारी सार्वजनिक नैसर्गीक अभिव्यक्ती असते. म्हणून उत्सवांवर हाता बाहेर जाऊ लागल्यास मर्यादीत बंधने ठिक पण सरकसट बंधने घालणे प्रशस्त आणि समर्थनीय ठरत नाही.

...होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी,

लोकसंख्या वाढल्यामुळे प्रमाण पाण्याने लवकर धुतले जातील अशा नॉन ट्क्झीक आणि नैसर्गीक रंगाना प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्यास हरकत नाही. पण आनंद साजरा करणार्‍या उत्सवांची समाजास गरज असते.

अर्थात म्हैस झुंजी बैलगाडी शर्यत अशा प्र्कारातही प्राण्यांना कमी इजा होईल ख्रिसमस मध्ये लाईटचा अपव्याय कमी होईल असा पुरोगामी पणा आस्तीकांनी दाखवण्यास हरकत नसावी.

पण कुणी पुरोगामी तुम्हाला पुरेसे सहकार्य करुनही उत्सव साजरा करण्यास निर्लज्ज वगैरे म्हणत असतील आणि त्यांच्या प्रमाणे तुम्हालाही त्यांनी मर्यादा ओलांडल्याचा संताप आला त्यांच्या निर्ढावलेपणाचा राग आला तर तो घटनात्मक पद्धतींनी अभिव्यक्त करण्यास मुळीच हरकत नाही.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:31 pm | माहितगार

* घटशोटाच्या - घटस्फोटाच्या असे वाचावे.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 8:35 pm | श्रीगुरुजी

....संक्रांतीमुळे होणारे अपघात

हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .

हे बहुतेक हलवा टोचल्यामुळे होणारे मृत्यु किंवा तिळगुळाचा लाडू घशात अडकून श्वास गुदमरल्यामुळे होणारे मृत्यु याच्याशी संबंधित असावे. तसेच तिळगुळ व हलवा करताना इंधनाची होणारी प्रचंड नासाडी याचाही संबंध असावा.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:48 pm | माहितगार

सर टोबी खर नाय ना हो हे ? कि खरेच आहे ?

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 9:37 pm | मार्मिक गोडसे

...संक्रांतीमुळे होणारे अपघात

संक्रांतीला पतंगाची काटाकाटी खेळली जाते. मांज्यामुळे अनेक पक्षी,दुचाकीस्वार जखमी होतात, काहींचा मृत्यू होतो. पतंग उडवताना मुलं इमारतीवरून पडतात, वगैरे,वगैरे....

ओह ओके असा संदर्भ आहे तर , ते मांजावगैरेच प्रॉब्लेम्स आहेत - माम्जाच्या आयातीवर तसेच उत्पादन आणि विक्रीवर बंधने घालण्यास हरकत नाही. मध्यमवर्गीयात अलिकडे पुण्यात तरी माझ्या पहाण्यात हा खेळ फारसा नाही . शहरात गरीब मुलांना खेळण्यास मैदाने नाहीत . त्यांच्या खिशाला परवडणारा खेळ त्यांच्यासाठी जागा आणि साधने पुरवून घेतला गेला पाहीजे. सामान्यांच्या खिशाला परवडनार्‍या खेळाला हात घातला तर राजकार णी त्यांच्या बाजूने बोलतील आस्तीक असोत वा नास्तीक लोकशाहीत लोकांच्या योग्य बाजूचाही विचार करावा लागतो. एनी वे बाकी याचा आस्तीकतेशी नास्तिकतेशी संबंध काय असतो ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे.

संताप येत नाही हाच तर मुळ प्रॉब्लम आहे.

-दिलीप बिरुटे

सर ज्यांच्यात तुम्हाला बदल होऊन हवा आहे त्यांच्या बद्दल ते कितीही चुकीचे असले तरी उपमर्द करणार्‍या भाषेने माणसे तथाकथित विवेक वाद्यांच्या जवळ येतील कि दुरावतील यात विवेकाचे तत्वज्ञान नेमके काय म्हणते ?

यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.

कत्तलखान्यात मशिन्स वापरून रोज करोडो प्राणी मारणे अघोरी आहे का नाही?

आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.

देव नाही असं म्हणायचं आणि अल्ला नाही असं म्हणायचं नाही हा काही बुद्धिप्रामाण्यवाद नाही. नेमका हाच प्रश्न विचारणे विवेकवाद वा बुद्धीप्रामाण्यवाद कशामुळं नाही म्हणे?
=====================
इस्लाम जगात सर्वात अघोरी आणि मागास धर्म असावा. भारतात जगातले दोन नंबरचे सर्वाधिक मुसलमान आहेत. मग नेमकं नास्तिक वि. (त्यामानानं बरे) हिंदू असेच लेख हे नतद्रष्ट, मूर्ख, डरपोक नि दांभिक नास्तिक का पाडत असतात म्हणे? झाडून १००% लेख असेच्च असतात. अस्तिक हिंदू + नास्तिक हिंदू + नास्तिक मुसलमान + लिबरल अस्तिक मुसलमान विरुद्ध कट्टर धर्मांध (अतिरेकी, गजवा ए हिंद, हलाला, तीन तलाक, बुरखा, जिहाद) असं द्वंद्व हवं.
=====================
अगदी कोणत्याही गाढवाला कळेल कि "हिंदूंच्या देवाला" शिव्या घालण्याआधी "मुसलमानांच्या कुप्रथांना" शिव्या घालणं अधिक इष्ट आहे. अगोदरच आपला देश मागासलेला आहे. मग आपल्या मुसलमानांनी किमान हिंदूंइतकं तरी प्रगत जगू नये कि काय?
==========================
नास्तिकांतही हिंदू नास्तिक, मुस्लिम नास्तिक आणि धर्महिन नास्तिक असे प्रकार केले जातात कि काय? पुरोगामी धर्महिन नास्तिकांना मूळात भारतीय मुस्लिमांबद्दल आपुलकी नाही. कितीही नास्तिक बनायचं नाटक केलं तरी धार्मिक द्वेष जात नाही. बिच्चार्‍या मुसलमानांचं नशीबच वाईट.

खर आहे!! मागच्या सन्क्रान्ति मध्ये मि तिळगुळा वरुन घसरुन पडलो आणि मग माझी बाय पास झाली! अश्या ५००००० केसेस झाल्या म्हणे त्या वर्षी....

मार्कस ऑरेलियस's picture

8 Apr 2018 - 7:49 pm | मार्कस ऑरेलियस

नास्तिक कुणालाच नको असतात

कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म !

मुळातच भारतीय धर्मातील टोटल ९ तत्वज्ञानांपैकी ३ स्पष्ट नास्तिक अर्थात वेदांचे प्रामाण्य नाकारणारी आणि उरलेल्या ६ पैकी ५ निरीश्वरवादी अर्थात ईश्वर असे काहीतरी सुपर नॅचरल असते हे मत नाकारणारी ! केवळ अद्वैत ईश्वराचे अस्तित्व मानते पण तेही तो ईश्वर तुच आहेस हे प्रतिपादन करते ! अर्थात भारतीय तवज्ञानांना प्रामुख्याने हिंदु दर्शनांना आजच्या नास्तिकतेचे जी की खर्‍या अर्थाने निरीश्वरवाद आहे तिचे वावडे नाही !

पण अभ्यास करायचाच नसेल अन फक्त अभिनिवेश असेल की कचकुन लेख पाडता येतात तेही काल्पनिक कथा रचुन =)))) मला अमुक जण भेटला अन त्याने तमुक प्रश्न विचारले अन मी त्याला लसुण उत्तरे दिली अन त्याने मला फुटाणा प्रत्युत्तर दिले वगैरे वगैरे !

ही संपुर्ण नास्तिक चळवळ फळवळ अर्धवट आणि ऐकीव माहीतीतुन उभारलेली आहे ! कारण जसे अब्राहमिक धर्मात जसे एक देव , त्याचा कोण तरी प्रचारक , कोणता तरी ग्रंथ आहे तसे हे काहीच घोळ आपल्या कडे नाहीये !

आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ?
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३ ॥
देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥

असो किति वेळा तेच तेच दळण दळायचे ?? आमचे मित्र म्हणतात तसे मिसळपाव चे आस्तिकनास्तिकपाव झाले आहे , आता तुम्ही तर्री वाढवत असाल तर आम्हाला एक्स्ट्रा सेव फरसाण प्लेट आणि पाव मागवावाच लागणार ! पोटभरे पर्यंत मागवु , नंतर टाकुन देवु =)

नको सांडू अन्न नको सेवू वन । चिंती नारायण सर्व भोगी ।।
मातेचिये खांदी बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ।।
नको गुंफो भोगी नको पडो त्यागी । लावुनी सरें अंगी देवाचिया ।।
तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा । उपदेश वेगळा उरला नाही ।।

माहितगार's picture

8 Apr 2018 - 8:45 pm | माहितगार

आमचे मित्र म्हणतात तसे मिसळपाव चे आस्तिकनास्तिकपाव झाले आहे , आता तुम्ही तर्री वाढवत असाल तर आम्हाला एक्स्ट्रा सेव फरसाण प्लेट आणि पाव मागवावाच लागणार ! पोटभरे पर्यंत मागवु , नंतर टाकुन देवु =)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 8:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म !

जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट लोकांकडे दुर्लक्ष करा...! खाली पाहून चालणार्‍या मेंढ्याच्या कळपाला फक्त सांभाळा. जीव लावा.

>>>> आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ?

काहीही समजून सांगू नका. आपण आपल्या भजनात आपला वेळ घालवावा, आपल्याला जे पटतं ते करावं. असे प्रामाणिकपणे सुचवतो. आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 9:04 pm | माहितगार

सर निसट्या बाजू दाखवू नका म्हणताय पण "आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;) " इथे नास्तीकांनाही असा सल्ला देता येऊ शकतो नाही का ?

माहितगार's picture

8 Apr 2018 - 9:13 pm | माहितगार

पुरोगामी भूमिकांच्या मंचांसाठी उणीव यूक्त कमकुवत आधार वापरले जाण्यात नेमका विवेक कुठे असतो ? उणीव यूक्त कमकुवत आधारांचे समर्थन व्हावे अशी भूमिका कशी काय बाळगली जाते ?

मार्कस ऑरेलियस's picture

8 Apr 2018 - 10:05 pm | मार्कस ऑरेलियस

खाली पाहून चालणार्‍या मेंढ्याच्या कळपाला फक्त सांभाळा. जीव लावा.

परत मेंढ्या =)) अहो सर, हेच सांगतोय , मेंढ्या मेढपाळ हे सारे अब्राहमिक धर्मातले संदर्भ आहेत , आपल्याकडे ह्यातले काहीच लागु पडत नाही ! आपल्या कडे उध्दरेत आत्मना आत्मानम !!

काहीही समजून सांगू नका. आपण आपल्या भजनात आपला वेळ घालवावा, आपल्याला जे पटतं ते करावं. असे प्रामाणिकपणे सुचवतो. आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;)

भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥
भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥
होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥

समजुन सांगायची ईच्छाच नाहीये सर ! पण मिपावर वारंवार हे बावळट लोकं खुस्पट काढत आहेत हे स्पष्टपणे दिसले आहे ! कोणत्याही आस्तिकाने मिपावर सत्यनारायण पुजा घाला , ह्यांव व्रत करा अन त्यांव पुजा करा , अन असली चळवळ अन तसली चळवळ चे समर्थन केल्याचे लेख अनेक वर्षात दिसले नाहीयेत ( फार पुर्वी कोणीतरी कोकिळाव्रत कि काय लेख पाडला होता त्यावर काय खिल्ली उडवलेली सर्वांनी ते ही आठवले . ख्याक.)

मी वर म्हणल्याप्रमाणे नास्तिक लोकं तर्री वाढवत असतील तर आम्हाला सेवफरसाणा आणि एक्स्ट्रा पाव वाढवायला मजाच येईल , पोट भरलं की आम्ही टाकुन जाऊ =))))

आस्तिकलोक तुम्हाला कोणालाही आस्त्किक व्हायची सक्ती करत नाहीयेत , मी कशाला तुम्हाला आस्तिक व्हायची सक्ती करु ?

हा प्रतिसाद वाचला नाहीये का ??
https://www.misalpav.com/comment/979007#comment-979007

परत एकदा क्वोट करतो >>>

बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥

- मार्कस ऑरेलियस
सीझर
श्रध्दा सबलीकरण समिती

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 8:08 am | पगला गजोधर

आपला आपण करावा वेव्हार ।
जिंकोनी अंतरमन ग्वाही ।।
सत्य असत्याशी मन केले ग्वाही ।
मानियले नाही बहुमता ।।

संत तुकाराम म्हणतात

माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥

दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥

अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥

दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥

दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥

यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते

चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:

‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’

प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ...

तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ.
बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे
असो

( हा प्रतिसाद चुकुन दुसर्‍या धाग्यावर प्रकाशित झालेला आहे संपादकांना विनंती तो रीपीट प्रतिसाद काढुन टाकावा तो याच धाग्यासाठी होता. )

मार्कस ऑरेलियस's picture

10 Apr 2018 - 12:04 am | मार्कस ऑरेलियस

सदर गोष्टीचा नास्तिक चळवळीशी काय संबंध ?

तुमच्या मते तुकारामांना शरीरधर्मांचे ज्ञान नव्हते म्हणुन त्यांच्या इतर साहित्याची महती कमी होते काय ?

आधीच विषय काय की म्हणे नास्तिकता चळवळ वगैरे कमकुवत आहेत त्यात अजुन हे Whataboutism करुन त्याचे डायल्युशन टाळा जमलं तर !

तुर्तास फक्त नास्तिकता ह्या विषयावर बोलु , तुम्हाला चक्रधर स्वामी प्रिय असतील तर त्यांची नास्तिकतेविषयी काय मते होती ते लिहा पाहु , अगदी विनम्रपणे कबुल करतो कि आमचे चक्रधर स्वामी विषयीचे ज्ञान शून्य आहे , तुम्ही काही सांगितलेत तर आमच्या ज्ञानात भरच पडेल !

बाकी संतांची ह्युमन बायलोजी ची परिक्षा नंतर घ्या सविस्तरपणे!

वाल्मिकी रामायणात जाबाली आणि श्रीरामामधील आस्तिकमत, नास्तिकमताविषयीचा संवाद मूळातून वाचण्यासारखाच आहे. जाबाली नास्तिकमताचा उपदेश करुन रामास अयोध्येस चल म्हणतो तर श्रीराम आस्तिकमताचा पुरस्कार करुन अयोध्येस येण्यास नकार देतो. रामाने केलेले नास्तिकमताचे खंडन मात्र केविलवाणे वाटते.

यथा हि चोरः स तथा हि बुद्ध स्तथागतं नास्तिकमत्र विद्धि ।
तस्माद्धि यः शङ्क्यतमः प्रजानांन नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात् ।।

याप्रमाणे चोर दण्डनीय असतो त्या प्रकारेच बौद्धमतावलंबीही दंडनीय आहेत. तथागत आणि नास्तिकही तसेच. म्हणून प्रजेच्या कल्याणासाठी नास्तिकास शक्य झाल्यास चोराप्रमाणे दण्ड दिला जावा. शिवाय त्या नास्तिकाशीविद्वानाने कधीही वार्तालाप करु नये

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 10:20 am | पगला गजोधर

ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली)
, निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या.
आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 10:21 am | पगला गजोधर

ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली)
, निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या.
आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 10:27 am | प्रचेतस

साधारणतः त्याच काळात व त्यानंतर इस. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत त्यात भर पडत राहिली असावी.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 11:16 am | पगला गजोधर

धन्यवाद,
शिवाय
बंगाल मधे सेकंड ओल्डेस्ट कॉपी ५-६ व्या शतकातील सापडली अशी बातमी आहे जुनी एका न्युज पेप्रात...

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 2:07 pm | श्रीगुरुजी

पुष्यमित्र श्रीशुंग महाराज की जय!

संत तुकाराम म्हणतात

माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥

दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥

अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥

दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥

दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥

यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते

चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:

‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’

प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ...

तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ.
बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे
असो

दादुस्, मधल्या ४०० वर्षात मुसलमानी आक्रमणामुळे बरीच सामाजिक उलथापालथ झाली होती. जिथे जिथे आक्रमणाची तीव्रता जास्त होती तिथे स्त्रियांवर जास्त बंधने येत गेली.

तसे तर महाभारत काळात स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होते आणि वैदिक काळात त्याहून जास्त होते.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2018 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे

ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय ते ईश्वर ईश्वर!जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा. कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................
तुम्हाला विज्ञानाची शपथ घेउन सांगतो कि या श्रद्धा, ईश्वर, भावना या तद्दन फालतू गोष्टी आपल्या बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.ही मानसिक गुलामगिरी आहे. ही चक्क बौद्धीक दिवाळखोरी आहे.वेळीच सावध व्हा अन्यथा विनाश अटळ आहे.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 9:28 pm | माहितगार

__/\__

पैसा's picture

8 Apr 2018 - 9:34 pm | पैसा

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण केव्हाच पाटी बदलली आहे. घाबरु नका, देव तुमचे भले करेल. =))

-दिलीप बिरुटे

काय खरे आहे का? काका?

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2020 - 12:26 pm | प्रकाश घाटपांडे

हल्ली मी कृष्णधवल द्वैतात अडकलेल्यांना जरा ग्रे एरिया दाखवतो. त्यामुळे त्यांना तसे वाटते.वरची प्रतिक्रिया अर्थातच उपहासाने लिहिली आहे. कोणतही टोक गाठणे हे संतुलित करण्यासाठी.

पैसा's picture

8 Apr 2018 - 9:40 pm | पैसा

मनोरंजक चर्चा. रोज असे धागे का येत नाहीत बरे!

अभ्या..'s picture

8 Apr 2018 - 10:16 pm | अभ्या..

बाकी कै असो,
इतक्या निसटत्या बाजू लावून धरणारे मिपासहस्रार्जुन माहीतगारजी आणि त्यांचे प्रतिसाद वाचणारे लोक्स ह्यांचे जाहीर कौतुक याटिकानी करु इच्छितो.
जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा जय विकीमराठी

माहितगार's picture

8 Apr 2018 - 10:28 pm | माहितगार

तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा इथे पर्यंतच !तिकडे दुसरा जय केला आहे, बाकी अनेक आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नास्तिक चळवळीबद्द्ल काही तरी लिहावे. ... नास्तिक चळवळ पुढे कशी जाईल वगैरे. बाकी, आपण सर्वांनी अतिशय शांत चित्ताने चर्चेत सहभाग नोंदवला आहे, भाषाही व्यवस्थित आहे. बाकी, चर्चा चालू ठेवा. मोबाईलवरुन अधेमधे वाचत राहीन. उद्या सायंकाळी लिहायला हजर होईनच.

मुखमस्तीति वक्तव्यं न तालुपतनात् भयम् ! जिव्हायाच्छेदनं नास्ति. अर्थात. जिभेला भोक नाही, त्यामुळे त्याला कुलुप घालण्याचे भय नाही. आणि तोंड आहे म्हणून काय हवे ते बोलायचे, लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. :)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 10:33 pm | माहितगार

सर व्यक्तीशः आदर आहे, पण पुरोआमी भूमिका तकलादू असतात बर्‍याचदा आपल्यालाही लागू पडणारी वाक्ये आणि पद्धती वापरण्याबद्दल साशंक आहे . इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये.

माहितगार's picture

8 Apr 2018 - 10:36 pm | माहितगार

ती डॉळ्यासारखी उदाहरणेही आस्तीकांनीही अनेक वेळा वापरली असावीत असे वाटते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2018 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपापल्या भूमिका आपल्या प्रतिसादाबद्दल नेहमीच आदर आहे, आपण व्यक्तिगत काहीही घेऊ नका. मी कुठे काही बोललो असेल तर ते जनरल असतं. मला उगा डायरीतलं एक वाक्य इथे खरडायचं होतं आणि ते माझ्या स्वतःसाठीच बोललो. त्याचा इथल्या कोणत्याच प्रतिसादाशी संबंध नै ये हो.

>>> इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये.

काय वापरायचं ते वापरा. :)
झोपू का आता..... ??
पाहू का आयपीएल थोडा वेळ ?

का अजूनही नाराजच आहात ?

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

8 Apr 2018 - 11:16 pm | माहितगार

नाराज बिराज कै नै हो, पुरोगामी लोकांनी आपल्या भूमिकांची बांधणी कमकुवत नसलेल्या अधिक चांगल्या आधारावर करावी वाटते म्हणून विरुद्ध बाजूने ख्हरडतो. वेगळ्या पुरोगीमी मित्रासाठी आज लेख लिहिण्यासाठी आजचा वेळ राखला होता तो तुमच्या लेखाच्या प्रतिसादांसाठी खर्च केला, आयपीएल अगदी अवश्य चालू द्यात .

बिटाकाका's picture

8 Apr 2018 - 11:06 pm | बिटाकाका

माहितगार साहेब, तुमचे प्रतिसाद आवडले. अजोंच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!

धर्मराजमुटके's picture

8 Apr 2018 - 11:14 pm | धर्मराजमुटके

अजोंशिवायच धाग्याची शंभरी भरली आहे. अजो आले की २-३ सेंच्युर्‍या नक्की :)

माहितगार's picture

8 Apr 2018 - 11:20 pm | माहितगार

__/|__ बाकी आजचा मान तसा घाटपांडेजींचा हेच खरे !

लोकहो, आपण भारतासारख्या असहिष्णू देशात राहतो म्हणून हि आस्तिक / नास्तिक / अज्ञेयवादी इ. चर्चा तरी करता येते.

जरा शेजारी जाऊन सांगा बघू ... हॅट देव बिव (म्हणजे त्यांच्या भाषेतला) काही नसतो बर्र्र्र का...

इथे तो (त कॅपिटल) आहे कि नाही या विषयावर आपण भांडू शकतो हि त्याचीच कृपा, दुसरे काय?

रच्याकने सेंचुरी झाली वाटतं.

नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा वाटते.
ज्याची त्याची आस्तिकता-नास्तिकता त्याने आपल्यापुरतीच जपावी. कुणाचे प्रबोधन करायला जाऊ नये किंवा कुणाला हिणवायला जाउ नये. जो तो सूज्ञ आहेच. आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.

प्राडॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2018 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.

+१
खरतर आस्तिक वा नास्तिक ही केवळ सोयीसाठी केलेली विभागणी आहे. हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम बँड आहे. या मनाच्या अवस्था आहेत. मेंदुतील रासायनिक बदलांमुळे आस्तिकता वा नास्तिकता यांची आक्रमकता वाढत वा कमी होत जाते. असो
हे टोकाचे नास्तिक किंवा अस्तिक ईश्वरनिंदा किंवा स्तुती याची पातळी कमी जास्त झाली की तुम्ही तिकडे शिफ्ट झालात असा आरोप करु लागतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2018 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या तीन ओळीतला प्रतिसाद चर्चेच्या अनुषंगाने आलेला आहे. नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल. नास्तिकता काही अभिमानाची गोष्ट नाही, ती एक सजग प्रवृत्ती आहे. सांगितल्याशिवाय लोकांना पटत नाही, नास्तिक चळवळीचा प्रयत्न तसा असावा. नास्तिकता कोणाला हिणवायला जात नाही, लोकांचे आणि स्वतःचे प्रबोधनासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारला आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपल्याला नाही पटलं आपणास अलिप्त राहता येते.

>>>>>>डॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला

आपणाकडून इतका बाळबोध वाक्याची अपेक्षा नव्हती. नास्तिक चळवळ सुरु आहे त्यांचे असे असे कार्यक्रम होतात आपल्याकडे नास्तिकतेचा एक मोठा प्रवाह आहे, त्याबद्दल धागा होता. यापूर्वी अशा चळवळीवर धागा आला असेल तर तो माझ्या पाहण्यात नाही. राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत. कधी विडंबनेच आली, कधी स्त्रीया विरुद्ध पुरुष असे विषय, कधी नुसत्या कविता, कधी कोनाडे तर कधी.. असो. अशा विषयांची लाट मिपावर राहीली आहे, तेव्हा आपण मिपाला मिपाके हालपर छोड दो, मिपाला बदलण्याचा प्रयत्न करु नका असा एक सल्ला देईन. आणि चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल

गळ्यात पुठ्ठ्याचे बोर्ड बांधून आम्ही नाशिककर आम्ही नास्तिक असे म्हणत रामकुंडाच्या पार्श्वभूमीवर मिरवणे हे मुद्दामून श्रद्वावंतांना खिजवण्यासारखे वाटते. एकीकडे ते म्हणतात आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही आणि त्याच वेळी गळ्यात बोर्ड बांधून मिरवतात हे पंथ करण्यासारखे वाटत नाही का?

राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत

म्हणून तेच ते विषय परत चघळण्यात गंमत नाही, होतं काय आस्तिक नास्तिक असं काही लिहिल्या गेलं की आस्तिकांच्या झुंडी नास्तिकांच्या अंगावर धावून येतात (नास्तिक लोक संख्येने मिपावर खूप कमी आहेत म्हणून तसं लिहिलं), निसटत्या बाजू मांडणार्‍यांना देखील आवेश येतो मग चांगले धागे उगा मागे पडून चर्चेची पातळी गढूळ होत जाते, ह्या धाग्यावर अजून तसं झालं नाही कदाचित काही आयडी अजूनही येथे न आल्यामुळेही असं झालं असावं.

चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा.

=)) धन्यवाद.

पैसा's picture

9 Apr 2018 - 12:08 pm | पैसा

ज्याची त्याची आस्तिकता-नास्तिकता त्याने आपल्यापुरतीच जपावी. कुणाचे प्रबोधन करायला जाऊ नये किंवा कुणाला हिणवायला जाउ नये. जो तो सूज्ञ आहेच. आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.

बाडिस..

आस्तिक नास्तिक पाव ® स्पा.

श्री. रा. रा. प्रचेतस यांच्या प्रतिसादाला संपूर्ण अनुमोदन.

डीबीसर. नंतर सेटलमेंट करायला बसूयात.

नास्तिक चळवळीला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..!!
============
गेले ४० वर्षे आमच्या घरी श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे चालू आहे. अकोटचे (जि. अकोला) भागवताचार्य यांच्याकडे व्यासपीठ आहे. ते वेद पुराण, श्रुती, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत कबीर आणि इतर वारकरी संतांचे साहित्य/वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नामांकित कीर्तनकारचे मत असायचे. ते जाहीर कीर्तनात (आणि खासगीत देखील) त्यांचे कौतुक करायचे.
एवढेच नाहीतर त्यांनी भूत पिशाच्च , काला जादू, तंत्र मंत्र विद्या, जारण तारण ग्रंथांचा पण विशेष अभ्यास केला आहे असे ते सांगत.
मी या महाराजांना लहापानापासून आदर्श मानले आहे. त्यांच्या काही सल्ल्याना देखील आत्मसात केले आहे. असो.
त्यांना मी २-३ वर्षांपूर्वी एक बाळसुबोध प्रश्न विचारला होता, " महाराज, मेल्यानंतर नक्की काय असते? खरंच आपल्या पाप पुण्यामुळे स्वर्ग नरक मिळतो का ? ८४ लक्ष योनी आणि पुनर्जन्म खरंच असतो का?"
महाराजांचे उत्तर कोणते ही आढेवेढे न घेता थेट होते "असे काही नसते. मेले कि संपलं. त्यामुळे पाप पुण्याचे स्वर्ग नरकाचे पुनर्जन्माचे जास्त विचार करणे सोडून चांगले आयुष्य जाण्याचा प्रयत्न कर."
मी म्हंटले, " तुम्ही तर कीर्तनात लोकांना हेच सांगत असता तुकाराम महाराजांच्या अभंगाचे दाखले देत."
ते: " तुकाराम महारांजांकडे येणारे साधक पुराणातील प्रश्न घेऊन येत. तुकाराम महाराज त्याची उत्तरे पौराणिक वाङ्मयाचे दाखले देऊन अभंगाच्या स्वरूपात देत असत. ते दाखले तुकाराम महाराजांना पटलेलीच होती असे होते नाही. त्यात तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा बराच भाग इंद्रायणीत बुडालेला आहे. आम्ही जे समाजाला सांगत असतो ते यासाठी की लोकांना थोडी तरी भीती असावी जेणे करून ते समाजात वावरताना नीट वागतील."
त्या दिवसापासून माझी पूजा अर्चा खूप कमी पडत गेली. आता तर जवळपास ना च्या बरोबर आहे पण त्याने काही माझे विशेष वाटोळे झालेले दिसले नाही. (इनफॅक्ट व्यावहारिक बऱ्याच गोष्टीत मला चांगला फायदा झाला आहे)
आमच्या वयक्तिक मंदिरातील पांडुरंगाची मूर्ती मला खूप आवडते. रोज जाता जाता बाहेरूनच पाया पडत असतो. प्रसन्न वाटते.
कीर्तनातील "रामकृष्ण हरी " चालू होतानाचे मृदंगाची थाप ऐकली की झिंग चढते, ती नेमकी काय आहे हे माहित नाही. माझ्यासाठी तरी तोच देव आहे.
देवाला (माझ्या मते मंदिरातील मूर्तीला) काही मागायचे नाही ही वारकरी संप्रदायाची आणि आमच्या घराण्याची रीत आहे त्यामुळे तर इतर कर्मकांड करण्याच्या जास्त कोणी फंदात पडत नाही. याने परिस्थितीच्या चढउतारा व्यतिरिक्त विशेष काही वाटोळे झालेले मलातरी अद्याप निदर्शनात आले नाही. .

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 12:14 pm | पगला गजोधर

विशुमितजी

आचार्य व तुम्ही, यान्चा एका विशिष्ठ धर्म आल्याने तुम्ही असं बोलू शकता,
, तुम्ही जर दुसऱ्या विशिष्ठ धर्मातुन असते तर तुम्ही गपगुमान बसला असता...

-
फ्रीभुर्जी

विशुमित's picture

9 Apr 2018 - 12:47 pm | विशुमित

याचा एक किस्सा सांगतो...
माझी एक चुलत बहीण आणि भाऊजी सनातनचे आद्य साधक आहेत. संपूर्ण कुटुंबच म्हणा.
मध्यंतरी पंढरपूर मधील बडवे -उत्पात पुजार्यांचे अधिकार कमी करून परीक्षा घेऊन जातविरहित नवीन पुजाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि त्यानुसार पांडुरंगाची पूजा अर्चा चालू झाली.
माझ्या भाउजीनी त्यावर आक्षेप घेत हे म्हंटले होते की पांडुरंगाची पूजा ब्राह्मणाकरवीच झाली पाहिजे. इतर जातीतील लोकांनी पूजा केल्याने मूर्तीचे पावित्र्य नष्ट होईल. मंत्रोउच्चर चे एक कारण सांगितले गेले.
मी याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या काकू काका आणि बहनीने मला डोळे दाखवले.
बहिणीला त्रास नको म्हणून, तुम्ही म्हणता तसे मी गपगुमान ऐकून घेतले.
====
वरच्या लेवल ला सनातनचे विचार उच्च प्रतीचे असू शकतात पण ते खाली पर्यंत झिरपताना वेगळेच काहीतरी घेऊन येतात. आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच बिथरले हिंदुत्व दिसते. म्हणून स्वधर्माची विशेष काळजी वाटते.

आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच बिथरले हिंदुत्व दिसते.

याच्याशी लै वेळा सहमत! एका धाग्यावर हेच सांगायचं प्रयत्न चालला होता. ठराविक स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या पलीकडे कायतर आहे हे समजून घ्यायचा साधा प्रयत्न पण दिसत नाही. म्हणौन खेदाने म्हणावेसे वाटते, कि पूर्वग्रहाने धर्माला बडवण्याचे काम करणारे नक्कीच दांभिक असतात.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 1:20 pm | पगला गजोधर

खेदाने म्हणावेसे वाटते, कि पूर्वग्रहाने धर्माला बडवण्याचे काम करणारे नक्कीच दांभिक असतात.

.
फक्त "कुठल्या-धर्माला " बडवायचे, यावरून दांभिकतेच्या व्याख्या बदलतात.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 1:48 pm | बिटाकाका

कुठल्या-धर्माला

इथेच तर दांभिकतेचा जन्म आहे.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 1:54 pm | पगला गजोधर

तेच तर म्हणतोय ,

"अमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रप्रेम "
तर
तमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रद्वेष

अरे क्या दिन आया है. प्रा. दिलिपजींनी चक्क विशुमित, गजोधर नि बिटाकाका यांचेत सहमती घडवून आणली. आता मंगूच उरलाय शिक्कामोर्तब करायचा.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 2:13 pm | बिटाकाका

हैला, मज्जाच आहे. कळतंय पण वळत नाही.