राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने
133864
प्रतिक्रिया
336
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे
निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा
In reply to ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे by पगला गजोधर
अतिरेक करू नये
In reply to ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे by पगला गजोधर
नेमका कोणता कायदा ?
सर,
In reply to नेमका कोणता कायदा ? by माहितगार
धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक
In reply to सर, by पगला गजोधर
बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची
In reply to धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक by बिटाकाका
मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं
In reply to बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची by पगला गजोधर
लोकांना त्यांची हवी ती उपासना
In reply to मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं by बिटाकाका
ओके. संविधानाने
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
राज्यकारभारावर कुठल्याही
In reply to ओके. संविधानाने by बिटाकाका
कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे
In reply to राज्यकारभारावर कुठल्याही by पगला गजोधर
४ बायका, तोंडी ३ सेकंदात
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
देश आधी धर्म नंतर
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
मला वाटतं...
In reply to नेमका कोणता कायदा ? by माहितगार
थोडक्यात काय तर आम्ही धर्म
In reply to मला वाटतं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निसटत्या बाजू १
In reply to मला वाटतं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
ऑब्जेक्शन मीलॉर्ड.
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
निसटत्या बाजू २
In reply to ऑब्जेक्शन मीलॉर्ड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न
In reply to निसटत्या बाजू २ by माहितगार
चांगला उपक्रम
सण साजरे करण्या बद्दल काय मत
सण साजरे करण्या बद्दल काय मत
In reply to सण साजरे करण्या बद्दल काय मत by मराठी_माणूस
मला वाटतं...!
In reply to सण साजरे करण्या बद्दल काय मत by मराठी_माणूस
मी काय म्हणतो गरबा नृत्यात
In reply to मला वाटतं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिलिप भावा, देश ही कल्पना
In reply to मला वाटतं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर
......"भारत माझा देश आहे.
In reply to ' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर by दीपक११७७
......"भारत माझा देश आहे.
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
भारत माझा देश आहे।
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
@यानावाला
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
छान प्रतिसाद
In reply to @यानावाला by दीपक११७७
जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध
In reply to @यानावाला by दीपक११७७
तस नव्हं
In reply to जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध by प्रकाश घाटपांडे
नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य
In reply to @यानावाला by दीपक११७७
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
जबरी LLRC
In reply to सारे भारतीय माझे बांधव आहेत. by arunjoshi123
हे वाक्य फारच विनोदी आहे
नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते.वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे. नास्तिकता = आधुनिकता म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. असो.अस्तिकता = सनातन ता ?
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
बाकी चालू द्या
In reply to अस्तिकता = सनातन ता ? by पगला गजोधर
काही हजार वर्षांपासून
In reply to अस्तिकता = सनातन ता ? by पगला गजोधर
हम्म...!
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
बैठक
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
मस्त मस्त. छान चळवळ आहे,
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे
मस्त प्रतिसाद.
In reply to मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे by प्रकाश घाटपांडे
पंथ?
In reply to मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे by प्रकाश घाटपांडे
निसटत्या बाजू ३
२९५ ए मध्ये भारतीय कायदा
In reply to निसटत्या बाजू ३ by माहितगार
निसटत्या बाजू ४
निसटत्या बाजू ५
निसटत्या बाजू निसटू द्या.
:) ठिके सर, पण नास्तीक
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निसटत्या बाजू निसटू द्या.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
अहो, गळलेले मुद्दे दाखवणं
In reply to असो by माहितगार
बारकाव्यांमध्ये राक्षस असतो
In reply to अहो, गळलेले मुद्दे दाखवणं by गवि
निसटती बाजू
In reply to बारकाव्यांमध्ये राक्षस असतो by माहितगार
आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ.
In reply to निसटती बाजू by गवि
सुरेख मांडलंत! धन्यवाद!!!
In reply to आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ. by माहितगार
सहमत
In reply to अहो, गळलेले मुद्दे दाखवणं by गवि
राहीतै,
In reply to सहमत by राही
निषेध.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
अगदी अगदी.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
निसटत्या बाजू ६
नास्तिकता चळवळ करा किंवा
आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय.
In reply to नास्तिकता चळवळ करा किंवा by श्रीगुरुजी
पुन्हा एकदा सेल्फ
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक लोकांच्या आणि
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने.नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल.कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे.जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे.हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना? असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.