Skip to main content

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 08/04/2018 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने 133864
प्रतिक्रिया 336

प्रतिक्रिया

ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावे, वलेखात उल्लेख केल्या अश्या चळवळी समाज मन जिवंत असल्याचेच निदर्शक आहे, असे मी मानतो.

In reply to by पगला गजोधर

निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा रद्द करून काय होणार? पुढारी, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या बदनामीविरूद्ध कायदे आहेतच की. तेसुद्धा रद्द नको व्हायला?

In reply to by पगला गजोधर

कोणत्याच गोष्टीतच अतिरेक करू नये .... अशी श्रद्धा कि ज्यामुळे समाजाचे नुकसान होत नाही त्यावर उगाच हल्ला चढवू नये त्याचाच बरोबर भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि त्यातून होणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पिळवणूक थांबलीच पाहिजे ...कारखान्यात नवीन यंत्राचे उदघाटन करताना पूजा आणि नारळ फोडणे नाही केलं तरी चालतं, तसेच कोणाला त्रास होत नसेल तर प्रथा म्हणून केलं तरी चालत , तारतम्य बाळगावं या नास्तिक समूहात काह अर्थ धर्मविरोधी असा घेतलं जाऊ नये अशी अपेक्षा ,, नास्तिकांचे स्वतःचे हक्क असतील व त्याचे संरक्षण यासाठी हि निर्माण झाली असावी असे वाटते .. आणि हो यात सर्व धर्माचे ( जन्माने) सहभागी व्हावेत अशी अपेक्षा

राम राम
धर्माच्या बदनामीच्या कायद्याला
धर्माच्या बदनामी विषयक नेकमा कोणता कायदा भारतात आहे त्याच्या बेअर अ‍ॅक्टचा दुवा मिळू शकेल ? http://indiankanoon.org नावाची साईट शोधण्यासाठी सोपी आहे किंवा इअतरत्रही नेमके कायदे आणि कलमे संदर्भासह स्पस्।ट करावे ह नम्र विनंती.

In reply to by माहितगार

सर, हमरा च्युक्याच, जगभरातील, ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावेत... . असे वाचावे.. Additionally जर भारताला आपले धर्म निरपेक्षकत्व , टिकवून ठेवायचे असेल... तर अश्या (लेखातील उल्लेखलेल्या )चळवळी सामाजिक विचारमन ढवळून काढण्यास उपयुक्त..

In reply to by बिटाकाका

बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची "धर्मनिरपेक्षकत्व" याची प्रमाण व्याख्या काय ते सांगता का ? कारण हिंदुत्ववादीपणाची तुमची प्रमाण व्याख्या एका दुसऱ्या धाग्यावर तुम्ही सांगितली होती, व तुमच्या व्याख्येला तुम्हीच केंद्रस्थानी (बुल्सआय प्रमाणे) ठेवून, तुम्हीच त्याभोवती आपल्या प्रतिक्रियेचा परीघ आखला होता...

In reply to by पगला गजोधर

मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं तुम्ही अनावधानाने म्हणाला असाल असे मी मागच्या धाग्यावर गृहीत धरून दुर्लक्षिले होते, इथे परत दिसतेय. तुम्हाला वाचायला येत असेलच असे गृहीत धरतो. ---------------------------------- मी मागच्या धाग्यावरही सांगितले होते की माझी व्याख्या ही माझी नसून शब्दकर्त्याची आहे. ती पटत नसेल तर तुम्ही तुमची व्याख्या सांगा असा आग्रह ही धरला, तिकडे तुम्ही फिरकले नाही, ते एक असोच. -------------------------------- मागच्या अनुभवावरून शहाणा होऊन यावेळी तुम्ही आधी बाण मारण्याची वाट बघतो, वर्तुळे कशी मारायची ते मंग बघू मांगे पुडे! चला सांगा बरं तुमची व्याख्या आधी.

In reply to by बिटाकाका

लोकांना त्यांची हवी ती उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य, व राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे, सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य.

In reply to by पगला गजोधर

ओके. संविधानाने "राज्यकारभारात सर्व धर्मांना समान वागणूक" अशी गृहीत धरले आहे. तुमची व्याख्या त्याच्याशी साधर्म्य दाखवते असे मानू. आता सांगा की नास्तिक चळवळ आणि धर्मनिरपेक्षता याचा काय संबंध.

In reply to by बिटाकाका

राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे
माझ्या प्रतिक्रियेतील हा भाग, त्याबाबत पुरेसा प्रकाश टाकतोय...

In reply to by पगला गजोधर

कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे कुठलाही देव-धर्म न मानणे तर निरपेक्षता म्हणजे सर्वाना समान मानणे. निरपेक्षता जपण्यासाठी नास्तिकता काय कामाची? दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत असे मला वाटते.

In reply to by पगला गजोधर

४ बायका, तोंडी ३ सेकंदात घटस्फोट, बुरखा, कौमार्य चाचणी, सुंता (मुले व मुलींची) इ. आमच्या उपासना पद्धतीचाच भाग आहे आणि या बाबींची चिकित्सा होऊच शकत नाही असे एक मोठा गट म्हणतो. मग असे करण्याचे त्यांना स्वातंत्र्य द्यावे का?

In reply to by पगला गजोधर

"सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य" - हो पण स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी हि येते हे आपणास मान्य असावे - "उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य", पाहिजे ना पण त्याचा त्रास/परिणाम सार्वजनिक जीवनावर नाही झाला पाहिजे .. उदाहरण कोणत्याही धर्माचं प्रार्थना रस्त्यावर करणे ( मग तो नमाज असो कि महाआरती असो " .. दुसरे याचा अर्थ देशात सामान नागरी कायदा नसावा असं होतो का ? ख्रिस्ती बहुसंख्याक असेलेल्या देशात सुद्धा समान नागरी कायदा आहे मग भारतात की नाही? असं काय वेगळं आहे भारतात? आज कॅनडा सारखया देशात भारतासारखेच अनेक धर्माचे येवढेंचक नव्हे तर वर्णाचे लोक राहतात तिथे आहे, ऑस्ट्रेलियात आहे .. ( मी अमेरिकेचे नाव ह्यात घेत नाही कारण तिथे सतत गॉड चा उल्लेख सरकारे शपथांमध्ये असतो ) सर्वधर्मसमभावाची एवढे वर्षे न्हेरू गांधी व्याख्या म्हणजे "मला पाहिजे ते मी करेन" देश नंतर ... इतर ठिकाणी देश आधी धर्म नंतर असं अर्थ आहे

In reply to by माहितगार

धार्मिक भावना दुखावण्याचे जे प्रकार आहेत ते प्रचंड त्रासदायक असावे असे वाटते. रंगीत दगड, पूतळे, प्राचीन ग्रन्थातील काल्पनिक पात्रे, महापुरुष, पुस्तके त्यांची पाने, ओळी, वगैरे इत्यादि मुळे या नास्तिक चळवळीला कायदेशीर प्रक्रियांचा त्रास बातमीत सांगितल्या प्रमाणे सोसावा लागला असे दिसते. आमचा एक वकील मित्र म्हणतो. आयपीसी च्याप्टर पंधरा कलम दोनशे पंचान्नव नुसार ज्यात... Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडक्यात काय तर आम्ही धर्म नाही संविधान मानतो असे म्हणणारे अशा वेळी संविधान कसे चुकीचे आहे दाखवायला पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर '२९५ ए ' वेगळे आहे आपण त्याचा खाली वेगळा विचार करु पण आपण जे २९५ क्र.चे कलम दिले त्यात तुमचे स्वतःचे नास्तिक असण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कुठे थांबले आहे ?
Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ? प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्ती स्वातम्त्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा आणि त्यासाठी केसेस टाकण्याचा आधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी केसेस नास्तीकांनीही टाकाव्यात आस्तीकांनीही टाकाव्यात . केसेसच टाकू द्यायच्या नाही त्यासाठी कायदाच नको म्हणणे दुसर्‍या पक्षाचे न्याय मागण्याच्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा येते. कायदे आणि खटल्यांवर विश्वास आहे म्हणून लोक न्यायालयात जातात, तुम्ही (म्हणजे सर नव्हे) न्याय यंत्रणेचा कायद्याचा आधार काढून घेतला की रस्त्यावरच्या संघर्षांची संख्या वाढते. न्यायव्यवस्था वेगवान झाली पाहिजे म्हणणे आणि प्रतिपक्षास कायदा आणि न्यायव्यवस्था नाकारण्याची अपेक्षा करणे या दोन भिन्न बाबी असाव्यात असे वाटते.

In reply to by माहितगार

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ?
काहीच कारण नाही कोणी मुद्दाम कोणाच्या प्रतीकांना धक्का लावण्याचं. पण कोणी मुद्दाम खोडसाळपणे जरी लावला तर भा.दु. भा.दु. म्हणून जो मास हिस्टेरिया उफाळतो आणि सर्वांचंच नुकसान होतं तो प्रकार टाळण्यासाठी अशा टोकदार आणि ज्वालाग्राही भावना मुळात बनू न देणं आवश्यक आहे. बाह्य प्रतीकं ही फक्त प्रतीकं आहेत. अनटारगेटेड भडका उडवून देण्याचं निमित्त नव्हेत.

In reply to by माहितगार

>>>>>अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ? अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच त्यात काही वाद नाही. पण तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर कोणाकड़े दाद मागायची ? मला तुमच्या उपासनेचा त्रास होत नै ये तो पर्यन्त ठीक आहे. उदा. समजा तुम्ही सार्वजनिक रस्ता अडवून तिथे तंबू ठोकुन दहा दिवस स्पीकरचं तोंड माझ्या घराकडे करून मोठ्या आवाजात ''सीतेच्या चोळीचं राजकारण'' या विषयावर कीर्तन आणि तत्सम पारायण करत आहात. माझं मानसिक संतुलन बिघडनार नाही का ? अशा वेळी मी तुम्हाला तिथे येऊन म्हणालो की 'बंद करा हो हे भजन' तर तुम्ही लगेच गाशा गुंडाळणार की भावनेला ठोकर मारली म्हणून पोलिसात जाणार ? तुम्ही पोलिसात जाणे पसंत कराल. त्याचा त्रास होतो हो...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परवानगीच्या अथवा कायद्याच्या मर्यादा ओलांडून एखादा सार्वजनिक समारंभ होत असेल तर, पोलीस आणि न्याय यंत्रणेकडे रीतसर तक्रार द्या . ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्या परस्पर तोंडी लागण्यासाठी अथवा त्यांच्या प्रतीकांचा अपमान करण्यास कुणी सांगितले ? म्हशींचे सेक्युलर फाईटींग किंवा २६ जानेवारीची परेड सार्वजनिक जागेत होऊसार्वज, मेणबत्त्या आणि भ्र्ष्टाचार विरोधी मोर्चे सार्वजनिक जागेत होऊ शकतात तर सार्वजनिक जागा वापरण्यापासून फक्त धार्मीकांनीच कोणते घोडे मारले आहे ? प्रॉपर्ट्या आणि कायदे नंतर आले संस्कृती आधी उदयास आली आणि सांस्कृतीक उत्सव साजरे सार्वजनिक पणे साजरे करणे सहज मानवी प्रवृत्ती आहे , अभिव्यक्टी नास्तीकांच्या असोत किंवा अस्तीकांच्या असोत चार भिंतीच्या आत कशा दाबता येतील ? सार्वजनीक जागा उत्सवांसाठी नाकारणे म्हणजे जंगलांचे राष्ट्रीयकरण करून आदीवासींना तुन्ही जंगलात का आलात असे विचारण्याच्याच कक्षात मोडते. बरे लोकशाही बहुमत सुद्धा अस्तीकांचे आहे , लोकशाहीत बहुमताचे प्राबल्य असणे ओघानेच येते. अल्पसंख्य नास्तीकांनाही माणूस म्हणून अधिकार हवेत हे समजता येते. सध्याच्या उपराष्ट्रपतींचे पेट्ट वाक्य आहे विरोधी पक्षांना say असावा पण way प्रस्थापितांचा असला पाहिजे आणि लोकशाहीत प्रस्थापितांचे बहुमताचे चालत नसेल तर त्याला लोकशाही म्हणण्यात अर्थ मर्यादीत होतो. तरीही भारतात घटना तुम्हाला खासगीपणासहीत विवीध अधिकार देते घेतल्या परवानग्यांच्या मर्यादे बाहेर गोष्टी होत असतील तर तुम्ही न्याय यंत्र्णेचा आधार घेऊ शकता. काही बाबतीत तरीही सर्व जण मिळून कायदा मोडतात कारण लोकशाही बहुमतावर अवलंबून असते हे वास्तव आहे. कायद्यांच्या पालना बाबत आस्तीक असोत अथवा म्हशीच्या झुंजीत रस असलेले नास्तीक / निधर्मी असोत , कुणी नास्तीक आहे म्हणजे प्रत्येक नास्तीक ट्रॅफीकचे सगळे नियम पाळतो असे होत नसावे, कायदा पालना बाबत सजगते बाबत प्रयत्न होणे जरुर्री आहे त्यासाठी विवीध माध्यमातून आपण आत्ता विषय मांडता आहात तशी जागृती साधता येतेच.
...तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर
कायद्यांच्या आणि मुलभूत अधिकारांची पालनाची अपेक्षा व्यक्त करणे आणि तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत ही नवी कम्यूनीस्ट अंधश्रद्धा खपवून नेण्याचा प्रयत्न दोन भीन्न बाबी आहेत .

In reply to by माहितगार

मी सार्वजनिक ठिकाणच्याही देवाला नमस्कार करतो पण देव भक्ताने बहुमताचा अथवा झुंडीचा आदर करण्यासाठी इतरांना त्राहीमाम वाटावे असे वागावे असे वाटत नाही. मी तुमच वरच्या प्रतिसादातून समर्थन केलय पण सार्वजनिक ठिकाणास गोंधळाचे स्वरुप आले की फक्त नास्तीकांना नव्हे सच्चा आस्तीकांनाही त्रासच होत असतो हे लक्षात घेऊन वाचकांनी या विषयावर सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करावा.

जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते>>>≥> +१११

In reply to by मराठी_माणूस

मला वाटतं एकदा की देवाळुपण नाकारलं की सर्वच नाकारले जात असावे, त्यामुळे देवाला पुढे करून जे सण व्रत वैकल्य असतील तेही नाकारले जात असावे. उदा. वेदामधे देवासुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती आता या कवीकल्पना आजच्या काळात किती रेटनार नाही का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी काय म्हणतो गरबा नृत्यात देव नाही असे समजा आणि गरबा खेळाकी राव ! इतराम्चे सोडून द्या , देवावरचा राग/ नाही म्हणून स्वतःच्या आनंदा आणि उत्साहावर का पाणि टाकायचे ? आपापला गरबा इतरांना खेळू द्यात . ( तुम्हाला कुणी कृष्ण किंवा राधा समजून तुमची भक्ती केली तर तुम्ह त्यांना थांबवू थोडेच शकता : )

' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
यावर एक सुचवतो, नास्तिकाने आस्तिकाला तु चुक आहेस मी बरोबर हे सांगने इतरांच्या वैयक्तिक बाबीत लक्ष घालण्या सारखे आहे. कोणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे वाटते आणि संविधानालाही हेच अपेक्षित आहे. मला जर क्रिकेट आवडत असेल तर फुटबाॅल हा कमी दर्जेचा खेळ आहे किंवा बकवास आहे असे बोलने चुकीचेच आहे. हा उद्योग टाळुन नास्तिकांनी एकत्र येण्यास हरकत नाही-नसावी बाकी लेख खुपच उत्तम लिहिला आहे. चर्चे साठी आदर्श मांडणी. सध्या एवढचं,

In reply to by दीपक११७७

......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." आम्ही विवेकवादी नास्तिक हे मनापासून मानतो. देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे आम्हाला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आम्हाला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे . . आमच्या देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आमच्या दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. आम्ही आमचे विचार भाषणात व्यक्त करतो. लेखात मांडतो. कुणाच्या घरी जाऊन त्यांना सांगत नाही. त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

In reply to by यनावाला

......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." सर्व आस्तीकही हे मनापासून मानतात (विवेकवाद ही केवळ नास्तीकांची मक्तेदारी असते याच्याशी ते असहमत असतात) . देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. हे आस्तीकांनाही पटते . अस्तीकत्वाचाही दृष्टीकोण त्यांना शास्त्रीयच वाटतो आणि या बाबत नास्तीकांशी मत भिन्नता ठेवण्याचा त्यांना घटनादत्त आणि मूलभूत मानवाधिकार असतो असे आस्तीकांना विचारान्ती वाटते . त्या शिवाय आस्तीकत्व , संस्कृती आणि मुल्यांची जपणूक , मटेरीआलीझम पासून दूर रहाणे अशा अनेक बाबतीत मानवी जिवनास सुसह्य करणारे असते असे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आस्तीकांनाहीघटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना आस्तीक वादी दृष्टिकोन अंगीकारणे भारतीय संविधानात कर्तव्य म्हणून स्विकारला जावा त्याचा अवैज्ञानिकतेशी काही संबंध नाही आणि असा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार [ प्रत्येक आस्तीकाचे कर्तव्य आहे "अस आस्तीकांना वाटण्याचा अधिकार आहे. . . त्यांच्या नास्तिक देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आस्तीक दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने आणि मानवी संस्कृतीने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. ते त्यांचे विचार भाषणात व्यक्त करतात . लेखात मांडतात. जिथे संबंधीत कुटूंब प्रमूखाची परवानगी आहे तिथे घरी जाऊन सांगण्यात काही गैर नाही . त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

In reply to by यनावाला

भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

In reply to by यनावाला

देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे
हे कोण ठरवणार, कोणासाठी काय हिताचे आहे? बुरखा घालावा म्हणुन सक्ती करणे जसे अतिरेकी आहे तसेच एखाद्याला घालायचा असेल तर नको घालु म्हणूनही आग्रह धरणे ही अतिरेकीच आहे. माझ्या मागील प्रतिक्रियात blockquote केलेला मुद्दा सांगूनही लोकं ऐकत नाही, नास्तिकते कडे झुकत नाहीत. यावर आहे. मग लोकं ऐकत नाही तर तुम्ही कायं करणार? केवळ नास्तिक लोकंच तार्किक असते तर सगळे शास्त्रिय शोध नास्तकांनाच लागले असते. बादवे, अजूनही भौतिक शास्त्रात युनीफाईड थेरीचा शोध लागलेला नाही. नास्तिक हे ऐवढेच ज्ञानी आहेत तर त्यांनी आपली energy unsolved problem वर खर्च करुन त्याची उत्तरं शोधुन जगाला द्यावी म्हणजे आपोआप लोकं त्याच्या कडे आकर्षित होतीलं. आणि नास्तिकांच्या हातुन मानव कल्याण होऊ शकेलं. बादवे, जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध नाही. सध्या इथच थांबतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आहे ना! सर्व्हायवल इस ट्र्थ
जगतांना सत्य काय आहे हे माहित असणे आवश्यक नाही! असत्या सोबतही छान जगता येते किंवा काय सत्य काय असत्य हे माहीत नसतांनाही छान जगता येते! छान जगणे महत्वाचे!

In reply to by दीपक११७७

नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य मानले असेल आणि त्या कार्यासाठी ती व्यक्ती तनमनधनाने झटत असेल आणि शिवाय त्यात आनंदी असेल तर त्याला तू आपले जीवितकार्य बदल आणि फिजिक्स मध्ये रिसर्च कर असे कोण कसे काय सांगू शकतो बुवा?

In reply to by यनावाला

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
अर्धे भारतीय बायका आहेत, मुली आहेत. ते कसे काय बांधव असणार? ====================== सगळ्या भारतीयांचे वय वेगवेगळे असते. ९० वर्षाच्या म्हातार्‍याला बंधू म्हणायचं? ====================== बंधू म्हणजे जेनेटिक असतो ना? ================================= भारतीय? फक्त कि सुद्धा? बाकीच्या देशातल्या लोकांनी काय घोडे मारलेत? ===================== इतर सजीव तुमचे कुणी लागत नाहीत? =============================== मागच्या पिढ्यांतील मेलेले भारतीय (इसवीसन १३०० इ) हे पण तुमचे बांधवच? =================================================================================================================================================================================================================== आपण नास्तिक आहात, असली धार्मिक वृत्तीची अर्थहीन वाक्ये कृपया वापरणे टाळा आणि वैज्ञानिक नि शास्त्रशुद्ध वाक्ये वापरा. -------------------------------- अन्य लोकांच्या धाग्यांवर देखील आपण प्रतिसाद लिहिता हे पाहून आदर दुणावला आहे.

नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे. नास्तिकता = आधुनिकता म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. असो.

In reply to by पगला गजोधर

काही हजार वर्षांपासून आस्तित्वात असलेल्या आणि इसविसनपूर्व सातव्या शतकात चार्वाकाने नावारुपाला आणलेल्या 'नास्तिकता' या संकल्पनेला "आधुनिक" म्हणता येईल ?! ;) :)

In reply to by मारवा

>>>>>लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. मुळात काथ्याकुटाचा उद्देश ''नास्तिक चळवळ''सुरु असून नास्तिक लोकांची ही चळवळ पुढे कोणत्या मार्गाने जाईल ? त्याची आवश्यकता किती वगैरे साधक बाधक चर्चा व्हावी इतकाच उद्देश् आहे. मिपावरील काथ्याकुटाने त्यांची मंडळी इथे येऊन लिहितील वगैरे असंही वाटलं. आणि भविष्यात अशा चळवळीवर आपण एक धागा कुटला होता त्याचीही आठवण राहील इतकाच प्रांजळ हेतूआहे. लेखातील गृहितके, लेखातील विनोद. लेखातील वाटलेला सहजपणा सोडून आपण नास्तिक चळवळीवर आपले अभ्यासपूर्ण मत लिहावे अशी अपेक्षा आहेच. नसता आपला प्रतिसादही खूपच विनोदी होता म्हणून सोडून द्यावे लागेल. :) -दिलीप बिरुटे

मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही.
प्राचीन काळी देखील चार्वाक पंथ होताच. चार्वाक दर्शन आहेच की. विचार चिकित्सेसाठी व वादसंवादासाठी खुले असावेत. मग ते कोणतेही विचार असोत.पंथाचे काही तोटेही होतात विचार बंदिस्त होतात. झापडे लागतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चार्वाक दर्शन तर होतेच. चार्वाकाच्या मताचे काही किंवा अनेक लोक त्या काळी होते असतीलही कदाचित. पण त्यांचा पंथ होता असेल असे वाटत नाही. समविचारी लोक एकत्र येणे इतक्यापुतीच अलगता असावी. पंथ म्हटला की त्याची अशी काही वेगळी लक्षणे, आचरण, कर्मकांडे असतात. जसा पूर्वीचा नाथपंथ, महानुभाव वगैरे. सध्या जसे समतावादी, भांडवलवादी, हिंदुत्ववादी, उजवे डावे अशा विचारधारा आहेत तशीच चार्वाकदर्शन ही एक विचारधारा आहे. तसेही सर्व दर्शने ह्या विचारधारा आहेत पंथ नाहीत.

भारतीय दंड विधानाच्या '२९५ ए' एवजी २९५ चा हवाला दिला असा हवाला बर्‍या पैकी तार्कीक उणीवेचा होता. विशीष्ट प्रतिकाला धक्का पोहोचवला तरच लागू होतो अन्यथा नाही. वस्तुतः '२५२ ए' ची व्याप्ती अधिक आणि बहिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा कुठे कुठे ओलांडू शकेल अशी आहे. आणि बर्‍ञाच वेळेस काळजीचे कारण असू शकते.
272 [295A. Deliberate and malicious acts, intended to outrage reli­gious feelings of any class by insulting its religion or reli­gious beliefs.—Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of 273 [citizens of India], 274 [by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise], insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 4[three years], or with fine, or with both.] https://indiankanoon.org/doc/305995 वरुन साभार
एकीकडे राजकीय आणि ईतर फायद्यांसाठी भावना भडकवणारी वक्तव्ये जाणीव पूर्वक केली जातात म्हणून या कायद्याची गरज आहे. तर दुसर्‍या बाजूस अभिव्यक्ती स्वातंत्र्य सदसद विवेक बुद्धीने वापरणार्‍यांची अडचण होते हे खरे. इथे खरा प्रश्न आस्तीकतेचा अथवा नास्तीकतेचा नाही, जाणीवपूर्वक भावना न भडकवता अथवा न भडकवून घेता अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी संस्कृती जोपासण्याचा आहे आणि तत्संबंधी सजगता निर्माण करण्याचा आहे . अनेक कायदे पुस्तकात असतात पण अपवादात्मक परिस्थिती शिवाय वापरावे लागत नाहीत अशी या कायद्याची स्थिती असावयास हवी.. इन एनी केस हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या घटनात्मक मूलभूत अधिकाराची कक्षा ओलांडू शकत नाही. प्रश्न कायद्याचे फौजदारी स्वरुप कमीत कमी अपवादात्मक स्थितीतच वापरले जाईल आणि कायद्याचा प्रभाव दिवाणि असेल हे पहाण्याचा आहे. अर्थात कायद्याचा खूप बाऊ करण्याचे ही कारण नाही. पद्मावती सारखे चित्रपट असो अथवा अनेक पुस्तके असोत न्यायालयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू वेळोवेळी उचलून धरली आणि या कायद्याचा फार गैर वापर भारतातल्या आस्तीकांनाही शक्य नसावा कारण प्रत्येक आस्तीक दुसर्‍याच्या आस्ती कत्वाच्या स्वरुपाबाबत टिका करतच आला आहे . त्यामुळे या बाबत हा कायदा भडकाऊन राजकारणि आणि धार्मीक पुढारी सोडून इतरांसाठी शक्य तेवढा सौम्य केला जाण्याची गरज असावी असे वाटते.

In reply to by माहितगार

२९५ ए मध्ये भारतीय कायदा तुमचे intention काय आहे ह्याचा विचार करतो deliberate and malicious नसल्यास तुमच्या स्वातंत्र्याला कोणतीही आच येत नाही. २९५ ए मध्ये इश्वरनिंदा हा शब्द कुठेही नाही (धार्मीक भावना शब्दात अप्रत्यक्षपणे इनक्लूड होत पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुदीतून सुटून जात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुद या कायद्या पेक्षा मोठी समजली जाते ) आणि म्हणूनच मिपावर अशा मनमोकळी चर्चा आणि मनमोकळ्या भूमिका शक्य होतात (जी पाकीस्तानात शक्य होत नाही)

नास्तिक कुणालाच नको असतात”
नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य "वाद करणारे कुणालाच नको असतात" असे हवे आहे का कारण वाद करणारे आस्तीक नास्तिकांना नको असतात , आपण एकट्याने वाद केला कि थकायला होत नाही समोरची बाजूही वादाला आली की थकायला होते असे तर काही नाही ना ? नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य सरसकटी करणाचे म्हणून फसवे आहे. स्वामी विवेकानंदांसारखी नास्तीकांना सांभाळून घेणारी उदाहरणे आहेत , अगदी संघचालकांचे अशातले वाक्य आहे आम्ही कट्टर आहोत पण उदार असण्याबद्दल कट्टर आहोत. वस्तुतः भारतीय संस्कृती नास्तीकांसाठी बरीच उदार आहे. नास्तीक स्त्रीयांची अधिक पंचाईत होते तरी आस्तीक कुटूंबीय नास्तीक सुनांना सांभाळून घेत असल्याची नव्हे काही कारणाने घटस्फोट होऊन मुलगा आणि सूनेचे नवे विवाह झाले तरी आधीच्या सूनेचा मान कायम ठेवल्या गेल्याची विनोदी उदाहरणेही याच देशात पहावयास मिळतात. सार्वजनिक ठिकाणी नास्तीक होणे आणि भारतीय कुटूंबात स्त्रीला नास्तीकता राखणे कठीण असते. भारतीय पुरुषांना कौटूंबीक व्यक्तीगत स्तरावर नास्तीक असणे जरासे सोपे आहे. ( विभक्त कुटूंबातील मुस्लीम स्त्रीस जाहीर न करता व्यक्तीगत स्तरावर नास्तीक होणे हिंदू स्त्री पेक्षा बरेच सोपे असावे पण जाहीर पणे नास्तीकता मुस्लीमस्त्रीस अगदी प्राणघातक सिद्ध होऊ शकते हिंदू स्त्रीस फारफारत काडीमोड घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी लागेल एवड्।एच ) पण एनीवे ज्यांना आदर , प्रेरणा, विश्वास, श्रद्धा या सर्व बाबी समजतात त्यांना व्यक्तिगत स्तरावर नास्तीकता टिकवणे सहसा कठीण जाण्याचे कारण नव्हे.

मूळ बातमीत खालील वाक्य आहे.
ती कॉन्व्हेंटमध्ये होती. तिथे .... धर्माचा पगडा जास्त. तिच्या वर्गातल्या मुलांनी तिला फार घाबरवलं होत..... "तिच्या घरात देव मानणारं कोणी नव्हतं, तिची आई (म्हणजे मी) कधी पूजा करणाऱ्यातली किंवा देवाला हात जोडणाऱ्यातली नव्हती, मग तिने का देव मानावा? पण तिच्या बरोबरीच्या सात-आठ वर्षांच्या मुलांना हे मान्य होणारं नव्हतं." देव न मानणं हे किती मोठ पाप आहे हे ती मुलं माझ्या मुलीला ठसवून सांगत होती आणि माझी मुलगी एकटी पडली होती. तिला कोणी समजून घेतलं नाही. अगदी शिक्षकांनीही नाही."
१) बहुसंख्य नास्तीक असलेल्या मुलात एखादे आस्तीक मूल गेले तर विरुद्ध दिशेने अशीच स्थिती होणार नाही का ? मुलांनी कुंकू का लावले ? मेंदी का काढली ? , छूम छूम का घातले ? म्हणून शिक्षा करणार्‍याही शाळा मुलांच्या मनावर आघातच करत असतात. पालकांनी नास्तीक असणे ठिक आहे . आस्तीकांचा सेन्स बद्दल प्रश्न विचारणार्‍यां नास्तीक पालकांनी कॉमन सेन्स शिल्लक न ठेवणे हे समजणे जरा आवघड जाते. बोलून चालून धार्मीक शाळेत घालायचे आणि शिक्षकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे तसेही चूक आहे. पण इन एनी केस आपल्या विचाराचे नसलेले आपल्या आसपास अनेक जण असतात अशी वेळ धार्मीक बाबतीतच नव्हे अधार्मीक बाबतीत सुद्धा येऊ शकते. खासकरून आपण बहुसंख्य समाजापेक्षा वेगळे वागत असू तर मुलांच्या मनाची आधी पासून तयारी करुन घेणे शिक्षकांशी अ‍ॅडव्हान्समध्ये संवाद साधून ठेवणे हे गरजेचे असावे त्याची काळजी या बातमीतील विशीष्ट पालकानी कितपत घेतली होती याची शंका वाटते. २)
देव मानणं हे किती मोठी चूक आहे हे ती नास्तीक माझ्या आस्तीक स्नेह्याला ठसवून सांगत होते आणि माझा आस्तीक स्नेही एकटा एकटी पडला होता. त्याला कोणी समजून घेतलं नाही. त्याच्या बुद्धीला आस्तीकता प्रमाण वाटत असूनही अगदी बुद्धीप्रामाण्यवाद्याम्नी सुद्धा नाही."
आस्तीक नास्तीकांवर का आक्षेप घेऊ शकतात हे समजण्यास हे कदाचित अल्पसे साहाय्यभूत ठरावे.

नास्तिक चळवळ आणि त्यांच्या भविष्यातील वाटांबद्दलही थोडं अधिक लिहा प्लीज. म्हणजे चर्चा मूळ वाटेवर येईल.;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) ठिके सर, पण नास्तीक मंडळींनी हाच मोकळेपणा जरासा आस्तीकांबद्दलही दाखवावयास हरकत नसावी . पण एनी वे . नास्तीकांनी एकत्र यावे आधारगट निर्माण करावा ते ठिक आहे पण उत्सवात असो अथवा व्यासपिठांवर असो एकटे रहावे असे व्यक्तीशः वाटत नाही. आस्तीक आणि नास्तीक दोघेही समाजाचे घटक आहेत त्यांना सन्मानाने स्वतःच्या विचारांनी जगता येण्यास हरकत नसावी. केवळ आमचेच खरे हा अट्टाहास नसावा. आकाशवाणिवर सकाळी भावगीते वाजवली जात त्या काळातला आस्तीक कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे ते पंढरीच्या विठू राया अशा दोन्ही गाण्यात एका मागो माग रंगून जात असत हे आठवते. कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे हृदयातला भगवंत राहीला उपाशी लिहिणारी मंडळी, किंवा महादेवाच्या पिंडी आधी घरातल्या जच्चा बच्चांना दूध पाजण्यास सांगणारी खूलभर दुधाची कहाणी आस्तीक ऐकत आणि समजतही असत. वेगवेगळ्या भूमिका रंगवत भातुकलीचा खेळ खेळणार्‍या लहानग्यात आणि कर्मकांडात रमलेल्यात फारसा फरक नसावा. भातुकलीच्या खेळामधली नवरा नवरी खोटी आहेत तरी तेवढ्या क्षणापुरते रमून मुले जशी बाहेर पडतात तसे बर्‍याच अंशी आस्तीकही बाहेर पडत असतात. काही अडचणी रहातात नाही असे नाही पण स्टीरीओ टायपींग करुन एकमेकांना वेगळे पाडण्याचा आणि पडण्याचा खेळ दोन्ही बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हननास कारणीभूत होऊ शकतो तो टाळला पाहीजे म्हणजे आधारगट बनवताना पंथ बनवण्याची भानगड जी आहे ती कदाचित मागे लागणार नाही आणि किमानपक्षी व्यक्तीगत जिवनात कडवटपणा न आणता एक नास्तीक म्हणून आनंदाने जगता येऊ शकेल. नास्तीकांच्या आधार गटातही आधार देऊ इच्छित आस्तीकांना त्यांना एकटे वाटणार नाही अशा पद्धतीने सामावून घेण्यास हरकत नसावी. सार्वजनिक जिवनात नाही पण व्यक्तिगत जिवनातल्या नास्तीकतेबाबत समाज सर्वसाधारण पणे अलिप्त धोरण बाळगतो. कुटूंबीय सहसा समजून घेत असतात . सार्वजनिक जिवनातही नास्तीकता हद्दीच्या बाहेर पूश केली नाहीतर भारतात तुम्हाला पंतप्रधान झालेली उदाहरणेही पहाण्यास मिळतील. सार्वजनिक जिवनातही नास्तीकता सोशल मार्केटींग टेक्नीक एवजी र्‍हेटॉरीक वापरुन पूश करणार्‍यांना मात्र अधिक आधाराची म्हणण्यापेक्षा मानसिक तणावातून वाचण्यासाठी वेळोवेळी बाब्रेपिकनक करुन रिलॅक्स होण्याची ब्रेक घेण्याची गरज असू शकते. असे वाटते असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निसटत्या बाजू निसटू द्या.
डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून.

In reply to by गवि

निसटत्या बाजू वैचारीक लोकांनी नाही दाखवल्या इतरांच्या हातात चर्चा जाऊन हाती जे लागते ते प्रत्येक वेळी लोणी नसते. निसतत्या बाजू दोन्हीकडे असतात याचे नास्तीकांना भान कितीही ताक पाजवूनही येईल का याची शंकाच वाटते . या वाटा आधीच निसरड्या आहेत, ताकाची देवाण घेवाण न सांडता केली म्हणजे थंडक मिळते. नाहीतर लोण्यावरुन पाय घसरुन ताकाच्या भांडी खणखणायला वेळ तसा मुळी लागत नाही. सरांच्या विनंतीचा मान ठेवला विषय बदलला पण नास्तिक गटाने पुन्हा विषय काढले तसे निसटत्या बाजूंचे प्रदर्शनही पुन्हा आपसूक सुरु झाले. असो

In reply to by माहितगार

अहो, गळलेले मुद्दे दाखवणं बरोबरच आहे हो. पण तुम्ही सम्यक मध्यम भाषेत बसवून ते सांगताना इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की आपण कुठून सुरु केलं त्याचा ट्रैक सामान्य मेंदू ठेवू शकत नाही. किती लोक सहमत होतील ते माहीत नाही पण माझा मेंदू तरी निसटत्या बाजू सीरीज वाचताना भंजाळून जातो. हाच इफेक्ट चर्चा प्रस्ताव वाचतानाही येतो. विषय रोचक , म्हणून वाचायचं तर असतं, पण अहो, मुद्देसूद मांडणी याचा अर्थ मुद्देसरोवर, मुद्देसागरात बुडून वाचक गटांगळ्या खाऊ लागावा असा होत नाही. हायकोर्ट वकील किंवा न्यायाधीश यांच्याइतकी मुद्देतपशीलवाचनशक्ति सामान्य माणसाला नसू शकते किंवा कसे? ;-) असा अर्थ होता.

In reply to by गवि

बारकाव्यांमध्ये राक्षस असतो अशी म्हण आहे. माझे काम मला जमणारी मांडणी करणे आहे. आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे. जेव्हा मनाला विचार पटत असतात तेव्हा लोक क्लिष्टही सोपे करुन घेतात आणि इतरांपर्यंतही गरजेनुसार अधिक सोपे करुन पोहोचवतात.

In reply to by माहितगार

आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे.
निसटती बाजू. यात समोरच्याला गृहीत धरण्याचा धोका संभवतो किंवा कसे? इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?

In reply to by गवि

...इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?
गृहीत धरण्याचा प्रश्न कुठे येतो. ज्या क्षणी समजणे अवघड जाते लोक वाचन थांबवत असतील फारतर मनात चीड चीड करतील पण माझ्या शैलीच्या मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य याचा त्यांनी आदर करावा जमेल मिळेल तेवढे घ्यावे अथवा कुणीतरी काहीतरी बरळत असेल असा विचार करुन सोडून द्यावे. यात माझी जोखीम काहीच नाही , काही असेल तर जे समजून घेण्यात कमी पडतील त्यांची असली तर असेल. जगातल्या प्रत्येक परिस्थितीला मर्यादा असतात. आपण मर्यादीत क्षमतेची माणसे असतो. आपल्याला जसे घडेल तसे करावे . माझ्या लेखनात काहीच घेण्यासारखे वाटत नाही तेव्हा लोक फाट्यावर मारतात त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहे. मला माझ्या पद्धतीने व्यक्त होण्याचे आणि आपल्याला अशी मनमोकळी टिका करण्याचे आणि असेच उत्तर देण्याचे मला स्वातंत्र्य आहे. तेव्हा आपण सर्वजण आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ.

In reply to by राही

राहीतै, आपल्या प्रतिसादातून व्यक्त झालेल्या मतांशी सहमत नसण्याचे काहीच कारण वा प्रत्यवाय दिसत नसतानासुद्धा अधिक काळजी घेऊन मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असे मत व्यकत करणे अधिक योग्य राहिल किंवा नाही तरी निदान असहमती व सहमतीच्या सीमेव्वर असणार्‍यांना पर्याय उपलब्ध होऊन नीट सारांश निघू शकतो हे पहाणे योग्य होईल किंवा नाही याचा निर्णय प्रत्येकाने घ्यावा असे सुचवले तर ते वावगे ठरणार नाही अश्या निष्कर्षाप्रत येणे अधिक श्रेयस्कर असेल.

In reply to by गवि

>>> डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून. भागवताची कथा सांगतांना एकही इंग्रजी शब्द येता कामा नये असा एक अलिखित नियम आहे, त्यामुळे भागवत बाटल्या जायचं. आज तुम्ही ''आर. सी.'' इंग्रजी शब्द वापरुन चक्क मला बाटवलं आहे, मी आपल्या ''आरसी'' धोरणाचा निषेध व्यक्त करुन ''ब्लाइंडर'' वरच उपवास सोडेन अशा आशावादावर आपले आभार मानतो. ';) -दिलीप बिरुटे

मूळ वृत्तपत्रीय लेखातील
...त्याला उगाच, 'ते काहीही असो, पण जगात एक शक्ती असतेच जी सगळं नियंत्रित करते', अशी तर्कशून्य शेपूट कोणी जोडत नाही.
हे वाक्य नास्तीक भूमिका तर्कशुद्ध असतात आणि आस्तीक भूमिका तर्कशुद्ध असूच शकत नाहीत असे स्व -प्रमाणपत्र देते
....आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही ही आस्तिक माणस निरर्थक वाद वाढवतात.
प्रस्थापित भूमिकेत आस्तीक असतील तर, वाद वाढवणारे प्रस्थापित विरोधी ठरतील प्रस्थापीत नव्हे . आणि म्हणून वादाची आणि जर काही तथाकथित मानसिक थकवा आला तर त्याची जबाबदारी नास्तीकांनाही शेअर करावी लागते.
...अरे म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही,"
हे असे नास्तिकांकडूनही होऊ शकते . त्याचा नास्तिक अथवा आस्तीक असण्याशी संबंध असलाच पाहीजे असे नाही. जगात मानव निसर्गतः केवळ रॅशनल विचारांवर जगला असता तर मानवी विकासास एवढी हजारो वर्षे खर्ची घालावी लागली नसती. माणसांना देवाचा शोध लागण्याच्या आधीची माणसे अधिक रॅशनल होती अथवा देव हकल्याने बहुसंख्य मानव आपोआप अधिक रॅशनल होईल असे नसावे. देव नाही म्हटले तरी त्याचे इरॅशनलपण इतर बाबतीत मानव दाखवतच राहील . मुद्द्याची गोष्ट ही की उपरोकत वाक्य हे नास्तीकांनी आस्तीकांचे अनावश्यक केलेले स्टीरीओटायपींग आहे एवढेच.

नास्तिकता चळवळ करा किंवा जनआंदोलन करा किंवा सौदी अरेबिया/मालदीव सारखे एक धर्म सोडून इतर धर्मपालनावर बंदी आणा किंवा रशिया/चीन सारखे नास्तिकता सक्तीची करा, आस्तिकता कधीही नष्ट होणार नाही व नास्तिकता कधीही विजयी होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे. हजारो वर्षापासून आस्तिक लोक खोट्या समजूतीला जागत आले. कधीही कोणत्या धर्माशास्त्रात्रील देव कोणाला दिसला नाही, फाफट पसार्‍याच्या अनाकलनीय रुढी निर्माण झाल्या. कोणत्याही देवाला जगातली विषमता, दु:खे दिसली नाहीत. देवाला बोलायला जावे तर आबा तोबा करुन घेणारी विसाव्या शतकातली मंडळी बघितली की हसायला येतं आणि म्हणे नास्तिकता कधी विजयी होणार नाही. नास्तिका जिंकलीच आहे, धाडस कोणात नाही. भिती वाटते. नको देवाची कटकट कोण मागे लावून घेईल. नाय का ? नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते. कोणत्याही सक्तीशिवाय त्यांनी आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे. जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. आपण फार फार तर आम्ही नाय बॉ येणार तुमच्या चळवळी- बिलवळीत इतकं बोलून मोकळं व्हावं. प्रवचन किर्तनाची सवय असलेल्यांना एक उदाहरण सांगतो, तसं काही सांगितल्या शिवाय त्यांचे डोळे उघडत नाही. एका स्त्रीला तीन मुलं होती. तीनही मुले आंधळी होती आणि स्त्री देखील आंधळी होती. त्या स्त्रीला चौथा मुलगा झाला त्याला चांगले डोळे होते. तो मुलगा आईला सांगायचा निसर्ग कसा हिरवा आहे. पाने फुले फळे त्याची वर्णने करायचा. त्यावेळी त्याच्या आईला वाटायचं की आपल्या या चौथ्या मुलातच काही विकृती आली आहे. माझ्यासह माझ्या तीनही मुलांना असं काही वेगळं कधी दिसलं नाही, या चौथ्या मुलालाच वेगळं कसं दिसतं. आईने विचारलं की हे सर्व कशामुळे दिसते ? मुलगा म्हणाला डोळ्यामुळे. झालं आपल्या मुलात काहीतरी विकृती आहे असे समजून त्या सर्वांनी त्याचे डोळे काढून टाकले. आस्तिकांनो, नास्तिक लोकांना जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे, ती आपण जपली पाहिजे. त्यांना सोबत केली पाहिजे त्यांचे डोळे काढू नये असे वाटते. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा एकदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आणि कमकुवत आधार. तिथे धागा लेखाची सुरवातच "नास्तिक कुणालाच नको असतात” लेखाच्या दुव्याने झाली आहे . आधार गटाची स्थापना करावी लागतीए ..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे. जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने. नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते. थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल. कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे. जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना? असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.