Skip to main content

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 08/04/2018 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने 133861
प्रतिक्रिया 336

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.
ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे ! कारण श्रीमदाद्यशंकराचार्यांनी ७ व्या शतकात संपुर्ण भारतभर फिरुन नास्तिकमतांचे विशेषकरुन बौध्दमताचे खंडन केले आणि अद्वैतमताची निर्विवादता सिध्द केली, हे सारे पुराव्याने शाबित करता येते ! कुमारिल भट्टांनी त्या आधी बौध्दांचे च तर्क वापरुन बौध्दमताचे खंडन केले होते ! हेही इतिहासिक साहित्य वापरुन सिध्द करता येते ! असे असताना जाणिवपुर्वक हे "आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे" असले धाधांत असत्य विधानकरणे हा असंमंजस*, अज्ञानमुलक * वाटते . तळटीप : * : दोन्ही शब्दांचा कॉपीराईट यनावाला कडे आहे तरीही आमचा उत्तरदायित्वास नकार . ख्या ख्या !

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>> ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे ! ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही? ते एकीकडे म्हणतात की आस्तिकांचा फार पूर्वीच पराभव झालाय (म्हणजे नास्तिकांचा विजय झालाय) आणि दुसरीकडे नास्तिक चळवळ उभी करायला बघताहेत. राहू दे त्यांना त्यांच्या भ्रमात.

In reply to by श्रीगुरुजी

ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही?
>>> ह्म्म. मी सरांना एकदा भेटलो आहे , शिवाय आमच्या मित्रमंडळात सरांविषयी सर्वांणाच आदर आहे म्हणुन इथे थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट देवुन पहात आहे . कदाचित सरांनी नास्तिकमतखंडन वाचले नसावे. म्हणुन सर कदाचित असे विधान करत असावेत. तसेही नास्तिकमत खंडन हा विषय अतिषय जुना आणि समजाय्ला अवघड आहे . तसेच त्यावरील साहित्य सहज रित्या उपल्ब्ध्द नाही. म्हणुन सरांना थोडा बेनिफिट ऑफ डाऊट देवुयात , सर प्राध्यापक आहेत ते अभ्यासकरुनच मत मांडतील अन ते यनावाला सारखे अज्ञान आणि अर्धवट वाचनातुन बनवलेल्या मतांवरुन द्वेषमुलक लिखाण करण करणार नाहीत अशी आमची गाढ श्रध्दा अहे ! ( नास्तिकमत खंडन : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.404767 पान क्रमांक २६७ ते २७६ )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.
देव नाकारणे ही भूमिका घ्यायला एक प्रचंड पातळीची निर्बुद्धता लागते. न भूतो न भविष्यति अशी मूर्खता असल्याशिवाय मनुष्य देव नाकारू शकत नाही. ------------------------------- सर्वसाधारणपणे प्रचंड निर्बुद्ध भूमिका घ्यायला धाडस लागतेच. -------------------------------------- अगदी भौतिकशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं निर्बुद्धता हिच नास्तिकता आहे. ================================================================= वरील विधाने हेत्वारोप, वा आरोप, इ स्वरुपाची नाहीत. ते तांत्रिक निष्कर्ष आहेत. आय रिपिट, दे आर सायंटिफीक स्टेटमेंट्स.

कुठल्याही समाजात नास्तिक म्हणून राहण्यापेक्षा हिंदू समाजात नास्तिक म्हणून राहणे सोपे आणि सुरक्षित आहे. इतकंच नाही तर त्याच समाजाला ढीगभर शिव्या देता येतात, कुजका मेंदू म्हणून चिडवता येते तेही परिणामांच्या चिंत्याशिवाय. इतर समाजांत 'मी नास्तिक' नंतर 'आहे' म्हणण्याचा सुद्धा अवकाश देत नाहीत. पाश्चिमात्य देशांची गोष्ट कराल तर ते पण आत्ता आत्ताच tolerant झाले आहेत. शंभर वर्षांपूर्वी ही तिथे हीच स्थिती होती. उलट आपल्या येथे चार्वाकीय तत्वज्ञानाला ही स्वीकारले गेले. पण gratitude नावाची गोष्टच नाही आपल्यात.

In reply to by सांरा (verified= न पडताळणी केलेला)

हे खरं आहे, भारतातील नास्तिक भितरेच आहेत या सारखं काहीतरी तस्लिमा नसरीन जी म्हणाल्याचे आठवते.

In reply to by गवि

त्या कोण माहीत नाही, ह्या भारतात अाश्रीत आहेत. स्वधर्मा विरुध्द त्यांनी बंड केला होता. नास्तिकांनी सर्व आस्थिकांनच्या प्रवृत्ती विरुध्द बंड करावे म्हणजे ह्या बाई म्हणतात तसे भ्याड ठरणार नाहीतं.

सर म्हणाले निसटत्या बाजू निसटूद्या तर थोडे तो विषय बाजूला ठेऊ. 'शुभंम करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय ' इथे पर्यंतची प्रार्थना परंपरा नास्तिकांनाही जमावयास हवी . आस्तीकांच्या विरोधी शत्रुबुद्धी विनाशाय म्हणुन पसायदाना सारखे उत्तम प्रार्थना बद्दल नास्तिकांच्या गटात त्यांना विचार जमेल का ? नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ? हा धागा नास्तिकां साठी प्रेमानेच काढलेला होता त्याची या निमीत्ताने जाहीरात .

अशा आंदोलनांची फार गरज आहे. यात एकच पथ्य पाळायला हवं. बुद्धीप्रामाण्यवाद लोकांना पटवुन द्यायच्या आगोदर आपण स्वतः आचरणात आणायला हवा. बुद्धीप्रामाण्याला धर्म, आस्तीकता, लिंगभेद, समाजभेद, पूर्व-पश्चिम, इ. गुंतावळ्याविरुद्ध भिडवण्याऐवजी आपलं रोजचं जगणं बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर बेतलेलं हवं. प्रामाणीकपणे जर हि कास धरली तर दोन दिवसात आपली पैसा, प्रतिष्ठा, साधनसामुग्रीचा उपयोग आणि एकुणच स्वतःविषयीच्या धारणा अमुलाग्र बदलतील आणि प्रथम आपलं जीवन मुळापासुन रीस्ट्रक्चर करण्याची गरज जाणवेल. यातुन जन्माला येणार्‍या प्रचंड अंतर्विरोधाला जर जिंकता आलं तर आपण किती शिल्लक उरलो याचा लेखाजोखा मांडावा. मग काय वाटेल त्याच्याशी भिडावं... प्रोव्हाइदेड तसं काहि करण्याची गरज जाणवत असेल तर...तसंही आपली बुद्धी पुढील मार्ग दाखवायला समर्थ आहेच. बुद्धीप्रामाण्यवादाचं गोंडस नाव घेऊन आपल्या व्यतिरीक्त इतरांचीच कातडी सोलायची दांभीक खुमखुमी जिरवायची असेल तर मात्र काम सोपं आहे. हे महाभाग सर्वत्र सापडतील.. अगदी मिपावर सुद्धा ;)

In reply to by अर्धवटराव

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे. साधं झोपतांना देवाच्या नावाने बोटं मोडून पाहा मग कळेल खरंच का इतकं सोपं असतं हे सर्व. आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल. बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे. LLRC भारतातील नास्तिक आणि विवेक व बुद्धीप्रामाण्य याचा दुरूनही संबंध नाही. ते जे काय करताहेत त्याला ढोंग म्हणतात. हे लोक अत्यंत भित्रट आहेत. ते खरोखरीच धाडसी असते तर गणेश विसर्जन, सत्यनारायण यांसारख्या सौम्य प्रथांविरूद्ध कंठशोष करण्याऐवजी अतिशय क्रूर प्रथांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले असते. त्याऐवजी सॉफ्ट टारगेट पकडून आपण विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक इ. आहोत या गैरसमजातच ते धुंद आहेत. आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल. जोपर्यंत त्यांच्यात ढोंग आहे व प्रामाणिकपणाचा अभाव आहे, जोपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि' हा त्यांचा दर्प कायम आहे, जोपर्यंत ते आस्तिकांना हिणवत राहतील, जोपर्यंत त्यांचा पक्षपात सुरू आहे तोपर्यंत ते कधीही यशस्वी होणार नाहीत. बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;) असले काही धागे आले की मिपावरचे तथाकथित महाभाग प्रतिसाद देत नाहीत का आणि काही टाळकरी 'अहो रूपम् अहो ध्वनी' या उक्तीप्रमाणे टाळ कुटत माना डोलवत नाहीत का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात,...
मोडतोड करण्यास बुद्धी लागते तर समृद्ध वनसंपत्तीचा मागे पुढे न पहाता नाशकरणारे बुद्धीमान मानावे लागतील. बाळाला न्हाऊ घातलेल्या पाण्यासोबत आपण बाळ सोडत नाही आहोत हे ही न पाहण्यात कोणता विवेक आणि कोणते बुद्धी प्रामाण्य. स्मजून सुधारुन सुसंस्कृत आणि सुसंस्कारी रहाण्याची सुयोग्य निवड विवेक अथवा बुद्धी प्रामाण्य म्हणवली जाऊ शकत नाही का ? बुद्धीप्रामाण्य आणि विवेक या शब्दांवरनास्ट्तीकांची मक्तेदारी समजणे अंधश्रद्धा याची खात्री करण्याची घाई मुळीच नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या सगळ्या आंदोलनाला उद्देश नास्तिकतेचा पुरस्कार करणे हा आहे, बुद्धीप्रामाण्यवाद नव्हे, हे स्पष्ट सांगायचं ना मग. सोयीस्कर बुद्धीप्रामाण्यवाद, ज्याला शुद्ध मराठीत दांभिकता म्हणतात, स्वतःचं कौतुक करुन घ्यायला त्याचा उपयोग होतोच. नास्तिक आंदोलकांनी त्याचा आनंद उपभोगायला आमची काहिच हरकत नाहि. प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल वगैरे मंडळी आपल्या मांदियाळीत आणुन बसवणं, सशाने आपल्या कपाळाला गंडस्थळ म्हणणं वगैरे गटण्यास्टाईल गमती जमती बघायला आम्हालाही आवडतं. तुम्ही सुद्धा अ‍ॅन्जोय करत आहात. छान आहे.

सर्वसामान्यपणे खरे तर एकमेकांना अजिबात छेदत नाहीत. पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात. काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात. यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.

In reply to by सर टोबी

पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो. होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात. होळी, फटाके इ. चा आणि आस्तिकतेचा कणभरही संबंध नाही. कालौघात काही सामाजिक समारंभ निर्माण झाले. होळीला लाकडे पेटवून व दिवाळीला किंवा इतर प्रसंगी फटाके जाळून पर्यावरणावर आघात होतो यात तसूभरही शंका नाही. किंबहुना या सर्व विघातक गोष्टींवर तातडीने बंदी यावयास हवी. बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात? काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात. या प्रथा अत्यंत जीवघेण्या असून त्यावर तातडीने कायदेशीर बंदी हवी. बादवे, मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत? यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते. फक्त होळी, फटाके इ. च अघोरी आहे का? इतर अघोरी प्रथांचा कधी उल्लेख सुद्धा करायचा नाही का? त्याबाबतीत कायमच दातखीळ का बसलेली असते? होळी, फटाके इ. हानीकारक आहेतच, पण वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.

In reply to by श्रीगुरुजी

साधारणपणे आस्तिक-नास्तिक वादात मी प्रतिसाद देत नाही. पण तुमचा प्रतिसाद वाचून अगदीच रहावलं नाही, म्हणून हा उपप्रतिसाद:
पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.
यात आस्तिक-नास्तिक असा भेद नाहीये. दोन्ही बाजूंचे निर्लज्ज लोक निर्लज्जपणे, मूर्ख लोक मूर्खपणे आणि अहंकारी लोक अहंभावाने वागतात.
बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?
भवनांच्या (इमारत) चन्द्र्शालांवरून (गच्ची) खाली पडणे, पतंग पकडताना रस्त्यावरून धावताना वाहनांच्या मध्ये येणे, आणि पतंगाचा मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकणे हे काही अपघात मी पाहिलेत.
मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?
मूल उंचावरून फेकणे , लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, या प्रथा मूर्खपणाच्या आहेत आणि नास्तिक त्याला विरोधच करतात. पण एका हिंदू नास्तीकाने एका हिंदू अस्तिकाला त्याच्या वागण्यातली चूक किंवा रुधीतला फोलपणा दाखवला की मुस्लीमान्मधल्या चुकीच्या रुढींची चर्चा सुरु करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा ही जुनी आणि मूर्खपणाची स्त्रातेजी आहे. बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल निषेधार्ह मानण यात आस्तिक/नास्तिक पेक्षा शाकाहार/मांसाहार हा मुद्दा येतो.
वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.
काहीही हं श्री! तुमच्या मर्यादित वाचनात/अनुभवात या प्रथांचा निषेध करणारे नास्तिक आले नसतील. अभ्यास वाढवा. नेहमीसारखी अर्धवट माहितीवर छातीठोक विधानं (वैश्विक सत्य असल्याच्या थाटात) करू नका.

In reply to by सर टोबी

....आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.
लहान मुलांच्या ही मानसशास्त्रज्ञांना विचारा एकाला एक दुसर्‍याला दुसरी ट्रीटमेंट दिली असे वाटले की मुले नाराज होतात. मोठे अधिक संयम दाखवतात पण स्वाभाविक प्रतिक्रीया बदलत नसतात. त्यामुळे पुरोगाम्यांनी एकास एक आणि दुसर्‍यास दुसरा नियम लावत नाही आहोत या बद्दल अत्यंत सजग असले पाहीजे पण असे प्रत्यक्षात होताना दिसत नाही तेव्हाचे आक्षेप वार्‍यावरही सोडता येत नाहीत. सुंता आणि एफजीएम या प्रथा, केंसेट बीफोर अटेनींग अ‍ॅडल्टहूड आणि अघोरी नाही असे कसे म्हणता येते मला कल्पना नाही. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी विशीष्ट देवशी केलेल्या प्राण्यांच्या कत्तली नमेक्या कोणत्या प्रकारात मोडतात ? ख्रिशन ननच्या विवाहाधीकारांचे आणि ख्रिश्चन स्त्रीयांच्या घटशोटाच्या अधिकाराचे काय ?
काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.
हे मान्य आहे असे अघोरी प्रकार थांबवण्यात आस्तीकांनी पुरोगामी संत परंपरेचा आदर्श पुढे ठेऊन पुढाकार घेतला पाहीजे .
....यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.
यना बेसिकली इथपर्यंत मर्यादीत नाहीत, हि गोज अ लिटल बियाँड . कि जिथे वैचारीक विवादाला जागा निर्माण होतात.
....संक्रांतीमुळे होणारे अपघात
हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .
.....फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण
एकत्रित आणि थोडे फटाके उडवून सहकार्य करण्यास हरकत नाही. बेसिकली याचा आस्तीकतेपेक्षा उत्सवी आनंदाशी संबंध अधिक असावा. उत्सव हे आस्तीकतेच्या पलिकडे जाऊन चार भिंतीत न कोडता येणारी सार्वजनिक नैसर्गीक अभिव्यक्ती असते. म्हणून उत्सवांवर हाता बाहेर जाऊ लागल्यास मर्यादीत बंधने ठिक पण सरकसट बंधने घालणे प्रशस्त आणि समर्थनीय ठरत नाही.
...होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी,
लोकसंख्या वाढल्यामुळे प्रमाण पाण्याने लवकर धुतले जातील अशा नॉन ट्क्झीक आणि नैसर्गीक रंगाना प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्यास हरकत नाही. पण आनंद साजरा करणार्‍या उत्सवांची समाजास गरज असते. अर्थात म्हैस झुंजी बैलगाडी शर्यत अशा प्र्कारातही प्राण्यांना कमी इजा होईल ख्रिसमस मध्ये लाईटचा अपव्याय कमी होईल असा पुरोगामी पणा आस्तीकांनी दाखवण्यास हरकत नसावी. पण कुणी पुरोगामी तुम्हाला पुरेसे सहकार्य करुनही उत्सव साजरा करण्यास निर्लज्ज वगैरे म्हणत असतील आणि त्यांच्या प्रमाणे तुम्हालाही त्यांनी मर्यादा ओलांडल्याचा संताप आला त्यांच्या निर्ढावलेपणाचा राग आला तर तो घटनात्मक पद्धतींनी अभिव्यक्त करण्यास मुळीच हरकत नाही.

In reply to by माहितगार

....संक्रांतीमुळे होणारे अपघात हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले . हे बहुतेक हलवा टोचल्यामुळे होणारे मृत्यु किंवा तिळगुळाचा लाडू घशात अडकून श्वास गुदमरल्यामुळे होणारे मृत्यु याच्याशी संबंधित असावे. तसेच तिळगुळ व हलवा करताना इंधनाची होणारी प्रचंड नासाडी याचाही संबंध असावा.

In reply to by श्रीगुरुजी

...संक्रांतीमुळे होणारे अपघात संक्रांतीला पतंगाची काटाकाटी खेळली जाते. मांज्यामुळे अनेक पक्षी,दुचाकीस्वार जखमी होतात, काहींचा मृत्यू होतो. पतंग उडवताना मुलं इमारतीवरून पडतात, वगैरे,वगैरे....

In reply to by मार्मिक गोडसे

ओह ओके असा संदर्भ आहे तर , ते मांजावगैरेच प्रॉब्लेम्स आहेत - माम्जाच्या आयातीवर तसेच उत्पादन आणि विक्रीवर बंधने घालण्यास हरकत नाही. मध्यमवर्गीयात अलिकडे पुण्यात तरी माझ्या पहाण्यात हा खेळ फारसा नाही . शहरात गरीब मुलांना खेळण्यास मैदाने नाहीत . त्यांच्या खिशाला परवडणारा खेळ त्यांच्यासाठी जागा आणि साधने पुरवून घेतला गेला पाहीजे. सामान्यांच्या खिशाला परवडनार्‍या खेळाला हात घातला तर राजकार णी त्यांच्या बाजूने बोलतील आस्तीक असोत वा नास्तीक लोकशाहीत लोकांच्या योग्य बाजूचाही विचार करावा लागतो. एनी वे बाकी याचा आस्तीकतेशी नास्तिकतेशी संबंध काय असतो ?

In reply to by सर टोबी

>>>>> आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. संताप येत नाही हाच तर मुळ प्रॉब्लम आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर ज्यांच्यात तुम्हाला बदल होऊन हवा आहे त्यांच्या बद्दल ते कितीही चुकीचे असले तरी उपमर्द करणार्‍या भाषेने माणसे तथाकथित विवेक वाद्यांच्या जवळ येतील कि दुरावतील यात विवेकाचे तत्वज्ञान नेमके काय म्हणते ?

In reply to by सर टोबी

यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.
कत्तलखान्यात मशिन्स वापरून रोज करोडो प्राणी मारणे अघोरी आहे का नाही?

In reply to by सर टोबी

आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.
देव नाही असं म्हणायचं आणि अल्ला नाही असं म्हणायचं नाही हा काही बुद्धिप्रामाण्यवाद नाही. नेमका हाच प्रश्न विचारणे विवेकवाद वा बुद्धीप्रामाण्यवाद कशामुळं नाही म्हणे? ===================== इस्लाम जगात सर्वात अघोरी आणि मागास धर्म असावा. भारतात जगातले दोन नंबरचे सर्वाधिक मुसलमान आहेत. मग नेमकं नास्तिक वि. (त्यामानानं बरे) हिंदू असेच लेख हे नतद्रष्ट, मूर्ख, डरपोक नि दांभिक नास्तिक का पाडत असतात म्हणे? झाडून १००% लेख असेच्च असतात. अस्तिक हिंदू + नास्तिक हिंदू + नास्तिक मुसलमान + लिबरल अस्तिक मुसलमान विरुद्ध कट्टर धर्मांध (अतिरेकी, गजवा ए हिंद, हलाला, तीन तलाक, बुरखा, जिहाद) असं द्वंद्व हवं. ===================== अगदी कोणत्याही गाढवाला कळेल कि "हिंदूंच्या देवाला" शिव्या घालण्याआधी "मुसलमानांच्या कुप्रथांना" शिव्या घालणं अधिक इष्ट आहे. अगोदरच आपला देश मागासलेला आहे. मग आपल्या मुसलमानांनी किमान हिंदूंइतकं तरी प्रगत जगू नये कि काय? ========================== नास्तिकांतही हिंदू नास्तिक, मुस्लिम नास्तिक आणि धर्महिन नास्तिक असे प्रकार केले जातात कि काय? पुरोगामी धर्महिन नास्तिकांना मूळात भारतीय मुस्लिमांबद्दल आपुलकी नाही. कितीही नास्तिक बनायचं नाटक केलं तरी धार्मिक द्वेष जात नाही. बिच्चार्‍या मुसलमानांचं नशीबच वाईट.

In reply to by सर टोबी

खर आहे!! मागच्या सन्क्रान्ति मध्ये मि तिळगुळा वरुन घसरुन पडलो आणि मग माझी बाय पास झाली! अश्या ५००००० केसेस झाल्या म्हणे त्या वर्षी....

नास्तिक कुणालाच नको असतात
कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म ! मुळातच भारतीय धर्मातील टोटल ९ तत्वज्ञानांपैकी ३ स्पष्ट नास्तिक अर्थात वेदांचे प्रामाण्य नाकारणारी आणि उरलेल्या ६ पैकी ५ निरीश्वरवादी अर्थात ईश्वर असे काहीतरी सुपर नॅचरल असते हे मत नाकारणारी ! केवळ अद्वैत ईश्वराचे अस्तित्व मानते पण तेही तो ईश्वर तुच आहेस हे प्रतिपादन करते ! अर्थात भारतीय तवज्ञानांना प्रामुख्याने हिंदु दर्शनांना आजच्या नास्तिकतेचे जी की खर्‍या अर्थाने निरीश्वरवाद आहे तिचे वावडे नाही ! पण अभ्यास करायचाच नसेल अन फक्त अभिनिवेश असेल की कचकुन लेख पाडता येतात तेही काल्पनिक कथा रचुन =)))) मला अमुक जण भेटला अन त्याने तमुक प्रश्न विचारले अन मी त्याला लसुण उत्तरे दिली अन त्याने मला फुटाणा प्रत्युत्तर दिले वगैरे वगैरे ! ही संपुर्ण नास्तिक चळवळ फळवळ अर्धवट आणि ऐकीव माहीतीतुन उभारलेली आहे ! कारण जसे अब्राहमिक धर्मात जसे एक देव , त्याचा कोण तरी प्रचारक , कोणता तरी ग्रंथ आहे तसे हे काहीच घोळ आपल्या कडे नाहीये ! आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ? लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३ ॥ देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥ तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥ असो किति वेळा तेच तेच दळण दळायचे ?? आमचे मित्र म्हणतात तसे मिसळपाव चे आस्तिकनास्तिकपाव झाले आहे , आता तुम्ही तर्री वाढवत असाल तर आम्हाला एक्स्ट्रा सेव फरसाण प्लेट आणि पाव मागवावाच लागणार ! पोटभरे पर्यंत मागवु , नंतर टाकुन देवु =) नको सांडू अन्न नको सेवू वन । चिंती नारायण सर्व भोगी ।। मातेचिये खांदी बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ।। नको गुंफो भोगी नको पडो त्यागी । लावुनी सरें अंगी देवाचिया ।। तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा । उपदेश वेगळा उरला नाही ।।

In reply to by प्रसाद गोडबोले

आमचे मित्र म्हणतात तसे मिसळपाव चे आस्तिकनास्तिकपाव झाले आहे , आता तुम्ही तर्री वाढवत असाल तर आम्हाला एक्स्ट्रा सेव फरसाण प्लेट आणि पाव मागवावाच लागणार ! पोटभरे पर्यंत मागवु , नंतर टाकुन देवु =)

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>> कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म ! जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट लोकांकडे दुर्लक्ष करा...! खाली पाहून चालणार्‍या मेंढ्याच्या कळपाला फक्त सांभाळा. जीव लावा. >>>> आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ? काहीही समजून सांगू नका. आपण आपल्या भजनात आपला वेळ घालवावा, आपल्याला जे पटतं ते करावं. असे प्रामाणिकपणे सुचवतो. आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर निसट्या बाजू दाखवू नका म्हणताय पण "आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;) " इथे नास्तीकांनाही असा सल्ला देता येऊ शकतो नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरोगामी भूमिकांच्या मंचांसाठी उणीव यूक्त कमकुवत आधार वापरले जाण्यात नेमका विवेक कुठे असतो ? उणीव यूक्त कमकुवत आधारांचे समर्थन व्हावे अशी भूमिका कशी काय बाळगली जाते ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खाली पाहून चालणार्‍या मेंढ्याच्या कळपाला फक्त सांभाळा. जीव लावा.
परत मेंढ्या =)) अहो सर, हेच सांगतोय , मेंढ्या मेढपाळ हे सारे अब्राहमिक धर्मातले संदर्भ आहेत , आपल्याकडे ह्यातले काहीच लागु पडत नाही ! आपल्या कडे उध्दरेत आत्मना आत्मानम !!
काहीही समजून सांगू नका. आपण आपल्या भजनात आपला वेळ घालवावा, आपल्याला जे पटतं ते करावं. असे प्रामाणिकपणे सुचवतो. आपण नास्तिक लोकांच्या लफर्‍यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;)
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥ समजुन सांगायची ईच्छाच नाहीये सर ! पण मिपावर वारंवार हे बावळट लोकं खुस्पट काढत आहेत हे स्पष्टपणे दिसले आहे ! कोणत्याही आस्तिकाने मिपावर सत्यनारायण पुजा घाला , ह्यांव व्रत करा अन त्यांव पुजा करा , अन असली चळवळ अन तसली चळवळ चे समर्थन केल्याचे लेख अनेक वर्षात दिसले नाहीयेत ( फार पुर्वी कोणीतरी कोकिळाव्रत कि काय लेख पाडला होता त्यावर काय खिल्ली उडवलेली सर्वांनी ते ही आठवले . ख्याक.) मी वर म्हणल्याप्रमाणे नास्तिक लोकं तर्री वाढवत असतील तर आम्हाला सेवफरसाणा आणि एक्स्ट्रा पाव वाढवायला मजाच येईल , पोट भरलं की आम्ही टाकुन जाऊ =)))) आस्तिकलोक तुम्हाला कोणालाही आस्त्किक व्हायची सक्ती करत नाहीयेत , मी कशाला तुम्हाला आस्तिक व्हायची सक्ती करु ? हा प्रतिसाद वाचला नाहीये का ?? https://www.misalpav.com/comment/979007#comment-979007 परत एकदा क्वोट करतो >>> बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ - मार्कस ऑरेलियस सीझर श्रध्दा सबलीकरण समिती

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनी अंतरमन ग्वाही ।। सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।।

In reply to by प्रसाद गोडबोले

संत तुकाराम म्हणतात माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥ आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥ घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥ दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥ यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल: ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ... तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ. बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे असो ( हा प्रतिसाद चुकुन दुसर्‍या धाग्यावर प्रकाशित झालेला आहे संपादकांना विनंती तो रीपीट प्रतिसाद काढुन टाकावा तो याच धाग्यासाठी होता. )

In reply to by मारवा

सदर गोष्टीचा नास्तिक चळवळीशी काय संबंध ?

तुमच्या मते तुकारामांना शरीरधर्मांचे ज्ञान नव्हते म्हणुन त्यांच्या इतर साहित्याची महती कमी होते काय ? आधीच विषय काय की म्हणे नास्तिकता चळवळ वगैरे कमकुवत आहेत त्यात अजुन हे Whataboutism करुन त्याचे डायल्युशन टाळा जमलं तर ! तुर्तास फक्त नास्तिकता ह्या विषयावर बोलु , तुम्हाला चक्रधर स्वामी प्रिय असतील तर त्यांची नास्तिकतेविषयी काय मते होती ते लिहा पाहु , अगदी विनम्रपणे कबुल करतो कि आमचे चक्रधर स्वामी विषयीचे ज्ञान शून्य आहे , तुम्ही काही सांगितलेत तर आमच्या ज्ञानात भरच पडेल ! बाकी संतांची ह्युमन बायलोजी ची परिक्षा नंतर घ्या सविस्तरपणे!

In reply to by प्रसाद गोडबोले

वाल्मिकी रामायणात जाबाली आणि श्रीरामामधील आस्तिकमत, नास्तिकमताविषयीचा संवाद मूळातून वाचण्यासारखाच आहे. जाबाली नास्तिकमताचा उपदेश करुन रामास अयोध्येस चल म्हणतो तर श्रीराम आस्तिकमताचा पुरस्कार करुन अयोध्येस येण्यास नकार देतो. रामाने केलेले नास्तिकमताचे खंडन मात्र केविलवाणे वाटते. यथा हि चोरः स तथा हि बुद्ध स्तथागतं नास्तिकमत्र विद्धि । तस्माद्धि यः शङ्क्यतमः प्रजानांन नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात् ।। याप्रमाणे चोर दण्डनीय असतो त्या प्रकारेच बौद्धमतावलंबीही दंडनीय आहेत. तथागत आणि नास्तिकही तसेच. म्हणून प्रजेच्या कल्याणासाठी नास्तिकास शक्य झाल्यास चोराप्रमाणे दण्ड दिला जावा. शिवाय त्या नास्तिकाशीविद्वानाने कधीही वार्तालाप करु नये

In reply to by प्रचेतस

ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली) , निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या. आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?

In reply to by प्रचेतस

ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली) , निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या. आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?

In reply to by पगला गजोधर

साधारणतः त्याच काळात व त्यानंतर इस. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत त्यात भर पडत राहिली असावी.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद, शिवाय बंगाल मधे सेकंड ओल्डेस्ट कॉपी ५-६ व्या शतकातील सापडली अशी बातमी आहे जुनी एका न्युज पेप्रात...

In reply to by प्रसाद गोडबोले

संत तुकाराम म्हणतात माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥ आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥ घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥ दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥ यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल: ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ... तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ. बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे असो

In reply to by मारवा

दादुस्, मधल्या ४०० वर्षात मुसलमानी आक्रमणामुळे बरीच सामाजिक उलथापालथ झाली होती. जिथे जिथे आक्रमणाची तीव्रता जास्त होती तिथे स्त्रियांवर जास्त बंधने येत गेली. तसे तर महाभारत काळात स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होते आणि वैदिक काळात त्याहून जास्त होते.

ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय ते ईश्वर ईश्वर!जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा. कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................ तुम्हाला विज्ञानाची शपथ घेउन सांगतो कि या श्रद्धा, ईश्वर, भावना या तद्दन फालतू गोष्टी आपल्या बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.ही मानसिक गुलामगिरी आहे. ही चक्क बौद्धीक दिवाळखोरी आहे.वेळीच सावध व्हा अन्यथा विनाश अटळ आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपण केव्हाच पाटी बदलली आहे. घाबरु नका, देव तुमचे भले करेल. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by शशिकांत ओक

हल्ली मी कृष्णधवल द्वैतात अडकलेल्यांना जरा ग्रे एरिया दाखवतो. त्यामुळे त्यांना तसे वाटते.वरची प्रतिक्रिया अर्थातच उपहासाने लिहिली आहे. कोणतही टोक गाठणे हे संतुलित करण्यासाठी.

बाकी कै असो, इतक्या निसटत्या बाजू लावून धरणारे मिपासहस्रार्जुन माहीतगारजी आणि त्यांचे प्रतिसाद वाचणारे लोक्स ह्यांचे जाहीर कौतुक याटिकानी करु इच्छितो. जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा जय विकीमराठी

In reply to by अभ्या..

तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा इथे पर्यंतच !तिकडे दुसरा जय केला आहे, बाकी अनेक आभार

नास्तिक चळवळीबद्द्ल काही तरी लिहावे. ... नास्तिक चळवळ पुढे कशी जाईल वगैरे. बाकी, आपण सर्वांनी अतिशय शांत चित्ताने चर्चेत सहभाग नोंदवला आहे, भाषाही व्यवस्थित आहे. बाकी, चर्चा चालू ठेवा. मोबाईलवरुन अधेमधे वाचत राहीन. उद्या सायंकाळी लिहायला हजर होईनच. मुखमस्तीति वक्तव्यं न तालुपतनात् भयम् ! जिव्हायाच्छेदनं नास्ति. अर्थात. जिभेला भोक नाही, त्यामुळे त्याला कुलुप घालण्याचे भय नाही. आणि तोंड आहे म्हणून काय हवे ते बोलायचे, लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर व्यक्तीशः आदर आहे, पण पुरोआमी भूमिका तकलादू असतात बर्‍याचदा आपल्यालाही लागू पडणारी वाक्ये आणि पद्धती वापरण्याबद्दल साशंक आहे . इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये.

In reply to by माहितगार

आपापल्या भूमिका आपल्या प्रतिसादाबद्दल नेहमीच आदर आहे, आपण व्यक्तिगत काहीही घेऊ नका. मी कुठे काही बोललो असेल तर ते जनरल असतं. मला उगा डायरीतलं एक वाक्य इथे खरडायचं होतं आणि ते माझ्या स्वतःसाठीच बोललो. त्याचा इथल्या कोणत्याच प्रतिसादाशी संबंध नै ये हो. >>> इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये. काय वापरायचं ते वापरा. :) झोपू का आता..... ?? पाहू का आयपीएल थोडा वेळ ? का अजूनही नाराजच आहात ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाराज बिराज कै नै हो, पुरोगामी लोकांनी आपल्या भूमिकांची बांधणी कमकुवत नसलेल्या अधिक चांगल्या आधारावर करावी वाटते म्हणून विरुद्ध बाजूने ख्हरडतो. वेगळ्या पुरोगीमी मित्रासाठी आज लेख लिहिण्यासाठी आजचा वेळ राखला होता तो तुमच्या लेखाच्या प्रतिसादांसाठी खर्च केला, आयपीएल अगदी अवश्य चालू द्यात .

लोकहो, आपण भारतासारख्या असहिष्णू देशात राहतो म्हणून हि आस्तिक / नास्तिक / अज्ञेयवादी इ. चर्चा तरी करता येते. जरा शेजारी जाऊन सांगा बघू ... हॅट देव बिव (म्हणजे त्यांच्या भाषेतला) काही नसतो बर्र्र्र का... इथे तो (त कॅपिटल) आहे कि नाही या विषयावर आपण भांडू शकतो हि त्याचीच कृपा, दुसरे काय? रच्याकने सेंचुरी झाली वाटतं.

नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा वाटते. ज्याची त्याची आस्तिकता-नास्तिकता त्याने आपल्यापुरतीच जपावी. कुणाचे प्रबोधन करायला जाऊ नये किंवा कुणाला हिणवायला जाउ नये. जो तो सूज्ञ आहेच. आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे. प्राडॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला.

In reply to by प्रचेतस

आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.
+१ खरतर आस्तिक वा नास्तिक ही केवळ सोयीसाठी केलेली विभागणी आहे. हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम बँड आहे. या मनाच्या अवस्था आहेत. मेंदुतील रासायनिक बदलांमुळे आस्तिकता वा नास्तिकता यांची आक्रमकता वाढत वा कमी होत जाते. असो हे टोकाचे नास्तिक किंवा अस्तिक ईश्वरनिंदा किंवा स्तुती याची पातळी कमी जास्त झाली की तुम्ही तिकडे शिफ्ट झालात असा आरोप करु लागतात.

In reply to by प्रचेतस

पहिल्या तीन ओळीतला प्रतिसाद चर्चेच्या अनुषंगाने आलेला आहे. नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल. नास्तिकता काही अभिमानाची गोष्ट नाही, ती एक सजग प्रवृत्ती आहे. सांगितल्याशिवाय लोकांना पटत नाही, नास्तिक चळवळीचा प्रयत्न तसा असावा. नास्तिकता कोणाला हिणवायला जात नाही, लोकांचे आणि स्वतःचे प्रबोधनासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारला आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपल्याला नाही पटलं आपणास अलिप्त राहता येते. >>>>>>डॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला आपणाकडून इतका बाळबोध वाक्याची अपेक्षा नव्हती. नास्तिक चळवळ सुरु आहे त्यांचे असे असे कार्यक्रम होतात आपल्याकडे नास्तिकतेचा एक मोठा प्रवाह आहे, त्याबद्दल धागा होता. यापूर्वी अशा चळवळीवर धागा आला असेल तर तो माझ्या पाहण्यात नाही. राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत. कधी विडंबनेच आली, कधी स्त्रीया विरुद्ध पुरुष असे विषय, कधी नुसत्या कविता, कधी कोनाडे तर कधी.. असो. अशा विषयांची लाट मिपावर राहीली आहे, तेव्हा आपण मिपाला मिपाके हालपर छोड दो, मिपाला बदलण्याचा प्रयत्न करु नका असा एक सल्ला देईन. आणि चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल गळ्यात पुठ्ठ्याचे बोर्ड बांधून आम्ही नाशिककर आम्ही नास्तिक असे म्हणत रामकुंडाच्या पार्श्वभूमीवर मिरवणे हे मुद्दामून श्रद्वावंतांना खिजवण्यासारखे वाटते. एकीकडे ते म्हणतात आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही आणि त्याच वेळी गळ्यात बोर्ड बांधून मिरवतात हे पंथ करण्यासारखे वाटत नाही का? राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत म्हणून तेच ते विषय परत चघळण्यात गंमत नाही, होतं काय आस्तिक नास्तिक असं काही लिहिल्या गेलं की आस्तिकांच्या झुंडी नास्तिकांच्या अंगावर धावून येतात (नास्तिक लोक संख्येने मिपावर खूप कमी आहेत म्हणून तसं लिहिलं), निसटत्या बाजू मांडणार्‍यांना देखील आवेश येतो मग चांगले धागे उगा मागे पडून चर्चेची पातळी गढूळ होत जाते, ह्या धाग्यावर अजून तसं झालं नाही कदाचित काही आयडी अजूनही येथे न आल्यामुळेही असं झालं असावं. चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा. =)) धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

ज्याची त्याची आस्तिकता-नास्तिकता त्याने आपल्यापुरतीच जपावी. कुणाचे प्रबोधन करायला जाऊ नये किंवा कुणाला हिणवायला जाउ नये. जो तो सूज्ञ आहेच. आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.
बाडिस.. आस्तिक नास्तिक पाव ® स्पा.