नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे
निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा
अतिरेक करू नये
नेमका कोणता कायदा ?
सर,
धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक
बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची
मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं
लोकांना त्यांची हवी ती उपासना
ओके. संविधानाने
राज्यकारभारावर कुठल्याही
कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे
४ बायका, तोंडी ३ सेकंदात
देश आधी धर्म नंतर
मला वाटतं...
थोडक्यात काय तर आम्ही धर्म
निसटत्या बाजू १
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ऑब्जेक्शन मीलॉर्ड.
निसटत्या बाजू २
सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न
चांगला उपक्रम
सण साजरे करण्या बद्दल काय मत
सण साजरे करण्या बद्दल काय मत
मला वाटतं...!
मी काय म्हणतो गरबा नृत्यात
दिलिप भावा, देश ही कल्पना
' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर
......"भारत माझा देश आहे.
......"भारत माझा देश आहे.
भारत माझा देश आहे।
@यानावाला
छान प्रतिसाद
जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध
तस नव्हं
नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
जबरी LLRC
हे वाक्य फारच विनोदी आहे
नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते.वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे. नास्तिकता = आधुनिकता म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. असो.अस्तिकता = सनातन ता ?
बाकी चालू द्या
काही हजार वर्षांपासून
हम्म...!
बैठक
मस्त मस्त. छान चळवळ आहे,
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे
मस्त प्रतिसाद.
पंथ?
निसटत्या बाजू ३
२९५ ए मध्ये भारतीय कायदा