पेरणा अर्थातच
तूम्ही
भकार,
मकार, गकाराने
सुरु होणारे शब्द उच्चारत
माझ्या एक
सणकन कानफाटीत मारता,
तेव्हा
मी तुमचे
राकट् हात
लालसर डोळे
पहात राहतो.
तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा?
तुम्ही माझे मनगट
कचकन पिरगळून
पाठीत दणका घालता,
पितृभाषा कि काय
तिच्यातच जीव जातो बघा,
बापाचा माल आहे का? म्हटल्याशिवाय
वाक्य सुध्दा पूर्ण होत नाही....
प्रगतिपुस्तक हातात धरुन
तूम्ही रात्रीच्या
शांतप्रहरी
भकार, मकार,
गकाराने सुरु होणारे
शब्द उच्चारत
माझ्या सात पिढ्यांचा उध्दार करत
त्यावर एकदांची सही करता
आणि मी पुढच्या परिक्षेपर्यंत सुटतो...
शिव्यापुत्र
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
10209
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे
=))
अगगगगा! _/\_
माउली रॉक्स अगेन न अगेन.
+11
In reply to माउली रॉक्स अगेन न अगेन. by अभ्या..
आरारारा!
=)) हे आणखी खास आहे.
मेलो राव हासून हासून! आसलं
मस्त फर्मास कविता
लय भारी!!!
मस्त जमलेय...
मला क्षमा करा....
In reply to मस्त जमलेय... by शिव कन्या
पैजारबुवा
In reply to मला क्षमा करा.... by ज्ञानोबाचे पैजार
=))
अर्रर्र
=))=))=))
अबाबाबा......
मस्त
खासच!! शिव्यापुत्र साठी