अत्तर श — शिव कन्या, Tue, 09/12/2017 - 01:10 कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या प्रतिक्रिया द्या 2909 वाचन 💬 प्रतिसाद (3) सुरेख! शांताबाईंची पैठणी प्राची अश्विनी Tue, 09/12/2017 - 09:23 नवीन सुरेख! शांताबाईंची पैठणी आठवली. वा! सुरेख कविता! एस Wed, 09/13/2017 - 00:09 नवीन अत्तराचं आपलं बरं असतं बंद दाराआड कपाटाच्या कुठल्याश्या खणात भरजरी शालूला नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून मंदपणे दरवळत राहतं जुन्या आठवणींच्या रम्य जगात हरवून जावं तसं त्याला ना घडीचा सोस ना उन्हपावसाचा मारा ना धुण्याचा सासुरवास नाजूक कळीसारखं कोमेजतं लग्गेच . . . . . अत्तरही कापडासारखं टिकतं, तर? छान सिरुसेरि गुरुवार, 09/14/2017 - 18:34 नवीन कविता आणी प्रतिसाद ..दोन्हीही मस्त .
वा! सुरेख कविता! एस Wed, 09/13/2017 - 00:09 नवीन अत्तराचं आपलं बरं असतं बंद दाराआड कपाटाच्या कुठल्याश्या खणात भरजरी शालूला नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून मंदपणे दरवळत राहतं जुन्या आठवणींच्या रम्य जगात हरवून जावं तसं त्याला ना घडीचा सोस ना उन्हपावसाचा मारा ना धुण्याचा सासुरवास नाजूक कळीसारखं कोमेजतं लग्गेच . . . . . अत्तरही कापडासारखं टिकतं, तर?
सुरेख! शांताबाईंची पैठणी
वा! सुरेख कविता!
छान