ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
30 Apr 2017 - 2:10 am

ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!

मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!

आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!

काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 6:21 pm | संजय क्षीरसागर

कल्पना, लयीची जाण आणि शब्द योजना आवडली

पैसा's picture

30 Apr 2017 - 7:53 pm | पैसा

छान!

यशोधरा's picture

1 May 2017 - 6:30 am | यशोधरा

ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

वा!

कोबरा ह्या शब्दाचा अर्थ काय?

प्राची अश्विनी's picture

1 May 2017 - 7:36 am | प्राची अश्विनी

मी इंग्रजी Cobra समजले.:)
गझल सुरेखच!

पद्मावति's picture

1 May 2017 - 7:02 pm | पद्मावति

मस्तच.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 8:09 pm | अत्रुप्त आत्मा

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!

कातिल... मार डाला!

सत्यजित...'s picture

2 May 2017 - 12:56 am | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

यशोधरा's picture

2 May 2017 - 6:38 am | यशोधरा

कोबराचा अर्थ सांगा की.

सत्यजित...'s picture

2 May 2017 - 7:44 am | सत्यजित...

वर प्राचींनी सांगितलेला!

यशोधरा's picture

2 May 2017 - 7:51 am | यशोधरा

ते खटकले मग.

सत्यजित...'s picture

2 May 2017 - 8:28 am | सत्यजित...

आपल्या मताचा आदर आहे,पण कारण कळू शकले तर ते माझ्या एकूणच लेखनासाठी दिशा दर्शवू शकेल,असे वाटते!

कोबरा असा शब्द आहे का? किंग कोब्रा/ कोब्रा हे इंग्लिश भाषेतील शब्द आहेत माझ्या माहितीप्रमाणे.
तुम्हांला नागिणीसारखा/ नागसारखा केशकलाप वगैरे म्हणायचे असेल हे समजले पण त्यासाठी 'कोबरा' हा नसलेला शब्द योजणे पटत नाही.
चुभू.

राघव's picture

2 May 2017 - 9:53 am | राघव

सहमत.

हेच म्हणायचे आहे. त्या एका शब्दामुळे कवितेला उणेपण येते असे वाटते. बाकीच्या ओळींतील सुअंदर सहजता हरवते, अर्थात हे वै. मत.
बाकी कविता, प्रतिमा उत्कट, सुरेख.

समाधान राऊत's picture

2 May 2017 - 9:23 am | समाधान राऊत

वाचुन झाल्यावर अर्धा तास तरी काहीच सुचत नाही. कसल्या उपमा देतोस जबरा, आशिक लोक्स देशोधडीला लागु लागलेत

आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा

काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 2:45 am | सत्यजित...

राऊत सर,वैयक्तीक अनुभवावरुन सांगतो,(राज की बात!)जेंव्हा काहीच सुचत नाही,तेंव्हा सुचते ती कविता!घ्या लेखणी हाती!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

राघव's picture

2 May 2017 - 9:50 am | राघव

ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

- ही ओळ खास आवडली!

चांदणे संदीप's picture

2 May 2017 - 10:59 am | चांदणे संदीप

ओंजळीने मी जसा झाकून घेतो चेहरा
का कसा ठावूक नाही लाल होतो गोबरा!

सोडल्या झिंज्यांतूनी हिसकुनी घेतो केवढा
अन जटांचा जीवघेणा पीळ तुटतो, तो बरा!

मी पुरा घायाळ होतो तो जसा डोकावतो
केवढा राकट आहे, (तिचा) भाऊराया साजिरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटतो सारखा
खोचतो मोकळ्या शर्टाला होऊन मी घाबरा!

काय सांगू केवढा दणकून असतो मार तो
ती जरी मामाची पोरगी अन मी त्यांचा सोयरा!

— सँडीभीत(भीत आहे!)

शार्दुल_हातोळकर's picture

3 May 2017 - 10:25 pm | शार्दुल_हातोळकर
मितान's picture

4 May 2017 - 12:13 am | मितान

ते दुसऱ्या चरणात झिंज्यांतून नेमकं काय हिसकून घेता म्हणे :))

शार्दुल_हातोळकर's picture

3 May 2017 - 10:27 pm | शार्दुल_हातोळकर

काय सॉलिड विडंबन आहे!!

काय सांगू केवढा दणकून असतो मार तो
ती जरी मामाची पोरगी अन मी त्यांचा सोयरा!

अगागागा....

मूळ गझलही छानच.... पुर्वी माबोवर सत्यजीतभाऊंना पोचपावती दिली आहेच....

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 2:22 am | सत्यजित...

अतिशय मनसोक्त दाद दिलेली आहे आपण!
पुन्हा एकदा,आभार आपले!

वेल्लाभट's picture

2 May 2017 - 12:06 pm | वेल्लाभट

सत्यजित भाऊ,

लव्हली ! एक नंबर रचना. तुमच्या कवितांचा फ्यान आहे मी. सुरेख लय, एक से एक रुपकं, आणि जबरदस्त भाव असा त्रिवेणी संगम तुमच्या रचनेत बघायला मिळतो.

ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

या ओळीसाठी स्टँडिंग ओवेशन म्हणजे एकदम ! हासिल-ए-ग़ज़ल !

कोबरा बद्दल काहींना आक्षेप असू शकतो. मलाही तितकासा तो शब्द 'या' रचनेत रुचला नाही. त्याचा वापर कल्पक केलायत, पण बाकी कविता इतकी अलंकारिक असताना मधेच हा शब्द रसभंग करतोय. म्हणून फक्त तो आवडला नाही. बाकी एक नंबर.

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 3:23 am | सत्यजित...

अपूर्वजी,
आपला प्रतिसाद वाचून भाराऊन गेलो खरेच!
प्रशंसा कुणाला आवडत नाही? आपण जी मनमुराद दाद दिलीत,त्याबद्दल मी आपला ऋणी आहेच,पण प्रतिसादाच्या शेवटी,न आवडलेला भागही नमूद करतानाचा आपला समजावणीचा सूर,कोण अल्हादक आहे!कदाचित त्यानेच अधिक भारावून गेलो! मनापासून खूप-खूप धन्यवाद!

मितान's picture

2 May 2017 - 12:24 pm | मितान

सुंदर !
रखरखीचे रान सारे अन उन्हाळा हा खरा
पण मिपा च्या वाळवंटी गार वाहे हा झरा !

:प

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 3:30 am | सत्यजित...

प्रतिसादांच्या पावसात,आपला हा छंदबद्ध काव्यमय प्रतिसाद,म्हणजे मृद्गंधाची दरवळ वाटून गेला!
मनःपूर्वक धन्यवाद!

सत्यजित...'s picture

2 May 2017 - 10:08 pm | सत्यजित...

सर्वप्रथम,आपण सर्वांनी अगदी भरभरुन दाद दिली,त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अनेकानेक धन्यवाद!

'कोबरा' हा प्रतिमावाचक शब्द योजताना,मीही तो एक प्रयोग म्हणूनच वापरुन पाहिला होता!त्यावर सर्वप्रथम यशोधरा यांनी,व नंतर राघव,वेल्लाभट यांनी व्यक्त केल्याप्रमाणे मते अपेक्षित होती!त्यांच्या स्पष्ट मतांबद्दल आभार,तसेच रसभंग जाणवल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो!

कृपया सदर शेर असा वाचून पहावा...

'मोकळ्या केसांतुनी बहरुन येतो केवडा
गुंतुनी श्वासांत,भिनतो..गंध अल्लड बावरा!'

आपला स्नेहाभिलाषी,
—सत्यजित

रुपी's picture

3 May 2017 - 5:45 am | रुपी

हे छान आहे.
तुमच्याही मनासारखं असेल तर सा.सं. कडून बदलून घेऊ शकता.

कदाचित त्यामुळेच आधी ही कविता वाचली तेव्हा तुमच्या बाकी कवितांइतकी आवडली नव्हती.

आज पुन्हा नीट वाचली. खरंच शेवट तर खूपच सुंदर आहे!

यशोधरा's picture

3 May 2017 - 12:42 pm | यशोधरा

वा!

सस्नेह's picture

3 May 2017 - 12:32 pm | सस्नेह

सुन्दर कविता !!

बरखा's picture

3 May 2017 - 1:04 pm | बरखा

कविता आवडली.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2017 - 3:46 pm | प्रसाद गोडबोले

कोब्रा ?

आर यु किड्डींग मी ?

बेक्कर हसु आले राव ह्या शब्दावर =))

वा वा! मस्तच गजल!
एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :)
आमचा नजराणा....

ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा!

मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा
अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा?

आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते
केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा!

काय सांगू केवढी असते भयानक भेट ती?
ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा!

-चतुरंग

शार्दुल_हातोळकर's picture

3 May 2017 - 10:36 pm | शार्दुल_हातोळकर

क्या बात है चतुरंगभाऊ..... :-)

केवढी ही कल्पनाशक्ती.... मान गये बॉस !!

मितान's picture

4 May 2017 - 12:11 am | मितान

=)) :)) तेरडा ????? =))

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 1:50 am | सत्यजित...

>>>एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले!>>>वाव्वा...क्या बात है! अशी कोटी करता यावी,हा मिश्किलपणाही मुळातच असावा लागतो!

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 1:01 am | सत्यजित...

रुपी,यशोधरा,स्नेहांकिता,बरखा आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

सत्यजित...'s picture

4 May 2017 - 1:43 am | सत्यजित...

प्रथमतः,आपणांस माझी रचना विडंबन करावे इतक्या योग्यतेची वाटल्याबद्दल अनेक धन्यवाद!चतुरंगजी आपण मूळ रचनेस दादही दिलीत,त्याबद्दल आपले आभार!

सोबतच विडंबनकार मंडळींना एक विनंती करतो...
विडंबन कुठल्याही,कुणाच्याही रचनेचे असले तरी ती एक स्वतंत्र रचना आहे,स्वतंत्र अभिव्यक्ती आहे,कला आहे!तेंव्हा या रचना स्वतंत्र धाग्यांत प्रकाशीत केल्या जाव्या असे वाटते,जेणेकरुन केवळ विडंबने वाचण्याचा छंद असणाऱ्या रसिकांनाही त्या सहजपणे उपलब्ध होतील,तसेच मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल!

मिपाकरांना अजून एक विनंती आहे...कृपया आपण सर्वांनीच,मला केवळ 'सत्यजित' असे एकेरी संबोधलेत तर,मला ते अधिक आवडेल!

—आपला स्नेहाभिलाषी
सत्यजित

संजय क्षीरसागर's picture

4 May 2017 - 2:44 am | संजय क्षीरसागर

मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल!

संदीप आणि चतुरंगजींनी डायरेक्ट धाग्यावर केलेली विडंबनं रंगाचा बेरंग करुन गेली. सदर प्रतिभा सेपरेट उमटल्या असत्या तर बरं झालं असतं कारण या निमित्तानं ज्यांना कवितेचा मूड वगैरे काही कळत नाही ते सुद्धा विडंबनांची तळी उचलतात.

अर्थात, मिपावर ही अनर्थकारी परंपरा पूर्वापार आहे आणि प्रशासनाच्या जोपर्यंत ही किमान गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत चांगल्या रचनांचा विचका होऊन कवी नाऊमेद होत राहाणार.

इथे चांगल्या कविता याव्या अशी इच्छा असेल तर प्रशासनाला किमान चांगल्या रचना आणि सुमार रचना यात तारतम्य करता यायला हवं. एक वेळ सुमार रचनांवर तिथल्या तिथे केलेली विडंबनं हास्यरस निर्माण करु शकतात पण चांगल्या रचनांचा रसभंग झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय कवी हतोत्साह होऊन नवी किंवा अती तरल रचना इथे टाकेल की नाही हा मुद्दा आहेच.

अर्थात, प्रशासन जर उदार धोरण ठेवून सगळे सदस्य एकसमान ( :) ) तद्वत सब कवी बाराटक्के ही पॉलिसी राबवणार असेल तर बोलायलाच नको.

शक्यतो मी स्वतंत्रच धागा टाकतो परंतु यावेळी कंटाळा केला त्याबद्दल दिलगीर आहे.
साहित्यसंपादकांना विनंती आहे की माझे विडंबन आणि त्यावरील प्रतिसाद येथून काढावेत आणि स्वतंत्र धागा टाकतोय त्यावर हलवावेत.

(दिलगीर)रंगा

संजय क्षीरसागर's picture

4 May 2017 - 10:53 am | संजय क्षीरसागर

या कवितेच्या निमीत्तानं तरी मिपावरची, चांगल्या रचनांचा मूड बिघडवण्याची अनर्थकारी प्रथा संपेल अशी आशा करु. तुमच्यासारख्या अपवादात्मक केसेस सोडल्या तर हे तारतम्य प्रशासनालाच करावे लागणार आहे. माझ्या मते (एका कवीच्या दृष्टीनं), अशी डायरेक्ट विडंबनं म्हणजे कवितेचा अपमान आहे.

अद्द्या's picture

4 May 2017 - 10:49 am | अद्द्या

कवितेतलं काही कळत नाही .. पण तरी मस्तच .. आवडली वाचायला :)

सत्यजित...'s picture

10 May 2017 - 9:08 am | सत्यजित...

धन्यवाद!