I Love You

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 6:56 am

" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . "

" अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . "

" अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . "

" चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला मानलं . "

" अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . "

" ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत "

" तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . "

" ए बस झालं हा तुझं . "

" अरे त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं . अरे इथं चालय काय आणि तू करतोय काय . चला रे . " सगळ्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना निघत होत्या . पण राहुल स्वतःतच मग्न होता त्याच्या डोक्यात दुसरच काहीतरी चाललं असावं असं .
============================================================

" माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग . मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत . इतके दिवस मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही सांगता आलं ग . आज सांगतोय I Love You... !!! I Love You Swati....!!! I Love You.... !!!!

" का थांबलास इतके दिवस ? माझे कान आतुरले होते हे ऐकण्यासाठी . I Love You too...!!" तिच्या डोळ्यात आभाळ दाटून आलं होत आणि ती त्याच्या डोळ्यात खोल बुडत चालली होती .

इतक्यात " यो... राहुल, तू तर कमालच केलीस राव आम्हा सगळ्यांपेक्षा भारी केलस. आजचा winner तू आहेस . The Best of the Best . "

" अरे याला कुणी तरी सांगा नको तिथं इंग्रजी झाडत असत . "

सगळे जमा झाले होते तिथं आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचं होत . सगळा गोंधळ गोंगाट चालला होता .

तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत न्हवते . तिला काय करावं ते सुचत न्हवत . राहुलला मित्रांनी खांद्यावर घेतलं . त्याला काहीतरी बोलायचं होत पण कुणी त्याच ऐकतच न्हवत . शेवटी न राहवून तो ओरडला, " थांबा मी नाहीये आजचा winner आणि मी खोट बोलून तिला फसवलही नाही . मला गेले कित्तेक दिवस तिला हे सांगायचं होत पण न्हवत जमत . आज खूप प्रयत्न करून हे बोलू शकलो . पण नंतर तर तुम्ही माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी टाकायला निघाला . माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर I Love You Swati आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग . मला या जगात दुसरं काही नको आहे मला फक्त तू हवी आहे . तुझी साथ हवी आहे . देशील ना मला साथ . तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू तसेच होते सोबत तिच्या ओठावर हसूही होत . त्याने आपला हात पुढे केला . देशील ना मला साथ तिनेही हात पुढे करून त्याच्या हातात दिला आणि मानेने हलकेच होकार दिला . त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं तीही आवेगाने त्याला बिलगली . सर्वानी एकच गलका केला .

आजचा 1st April ' April Fool ' नाही तर ' Cool ' ठरला होता ...

कथाविचारलेख

प्रतिक्रिया

अमोल काम्बले's picture

1 Apr 2017 - 12:04 pm | अमोल काम्बले

छान. असे अनुभव खुप आले आमच्या तारुन्यात पण आपण राहुलच्या एवजि मित्र मडळात असायचो.

पैसा's picture

1 Apr 2017 - 12:07 pm | पैसा

गोग्गोड कथा! मस्त वाटली.

अनाहूत's picture

2 Apr 2017 - 7:43 pm | अनाहूत

..