Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95930
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

http://www.misalpav.com/comment/929102#comment-929102 ची प्रतिक्रिया इथे देत आहे.
शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल.
हेच तर आपले (समाजाचे) दुर्दैव. काही नागरिकांना थोडादेखील स्वाभिमान नाही कि कोणा खासदाराने सामान्य नागरिकाला मारहाण केल्यांनतर सुद्धा त्याने माफी मागावी कि नाही हे सांगता येत नाही!
या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेत
कुठे आहेत बरे? ctrl + f "youtube" nothing found! तुम्ही मला वृत्त माध्यमातले सोर्स देता का जरा?
अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दल
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय? तुम्हाला वाटते "मूर्ख" म्हणणे आक्षेपार्ह आहे. मला नाही वाटत आक्षेपार्ह. तुम्हाला वाटते कि मी धन्यवाद. ऐकून बरे वाटले. असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटले

In reply to by अत्रे

तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय? काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).

In reply to by अत्रे

तुम्ही माझ्या प्रतिसादासादाचा उल्लेख करुन लिहिले आहे की "काही नागरिकांना थोडा सुद्धा स्वाभिमान नाही", हा असा वैयक्तिक हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? संपादक मंडळी काय करत आहेत? आणि गलिच्छ भाषेचे तुम्ही बिनदिक्कत समर्थन करताय. अशी भाषा तुम्हालाच लखलाख होवो. तुमच्या लेखी व्हिडिओ फक्त youtube वरच असतात काय. वरच्या एका प्रतिसादात zeenews ची लिंक दिली आहे ती तुम्ही पाहिली नाही काय? तुमच्या सोयीसाठी एक लिंक खाली देतो आहे. http://zeenews.india.com/marathi/news/video/mobile-footage-of-the-air-i… शिवाय तुम्ही सरळसरळ तुमचे मुळचे म्हणने फिरवत आहात. वरच्या तुमच्या प्रतिसादात तुम्ही स्पष्ट म्हटले की, "आणि लोन्ली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात त्यांची म्हटले होते कि "याला निवडून द्यावे लागले" - वाचून मला वाटले कि हे ही तिकडचेच असतील. आणि मला "हे पुन्हा निवडून येणार नाहीत" हे ऐकून आनंद झाला होता - नुसतं "मूर्ख" वाचून नाही." आता मला सांगा त्या गलिच्छ भाषेला तुमचे समर्थन नसताना तुम्हाला का आणि कसा आनंद झाला? शिवाय वरच्या प्रतिसादांमधे हे अतिशय स्पष्ट झाले आहे की तुम्हाला प्रस्तुत संसद सदस्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि मतदारसंघ, लोकसंपर्क वगैरेबाबत अजिबात माहिती नाही. मग तुम्हाला त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि चप्पल मारण्याव्यतिरिक्त कर्तृत्व काय विचारण्याचा अधिकार कुठुन मिळाला? मुळ मुद्दा आक्षेपार्ह भाषेचा होता, आणि तुमच्या म्हणण्यानुसार संबंधित गलिच्छ भाषा तुम्हाला चुकीची वाटत नाही. तरी कृपया चर्चा ही विषय सोडुन स्वाभिमान वगैरे वैयक्तिक बाबींवर नेऊ नये. असे झाल्यास साहजिकच आम्हाला तुमच्याशी चर्चा करण्यात अजिबात रस असणार नाही. बाकी मिपाकर सुज्ञ आहेतच.

In reply to by शार्दुल_हातोळकर

माननीय महोदय, हे सगळे अधिकार मला घटनेने दिले आहेत. बाकी मलाही तुमच्याशी चर्चा करण्यात रस नाही. जय महाराष्ट्र :)

टी. सी ना मारणारे ह्यांच्यावर रेल्वेबंदी झालीये का? सहज आठवलं म्हणून . समर्थन कुणाचेही करण्याचा हेतू नाही हे वरच बोलतोय मला फक्त जो सात्विक संताप उसळला आहे हे पाहून आश्चर्य वाटत आहे .

In reply to by वरुण मोहिते

हिटलर आणि जोसेफ मेंगेलला शिक्षा झाली नाही म्हणून कसाब किंवा जक्कल सुतारच्या शिक्षेवर पण प्रश्न आहेत का?

बोलल्यावर चटकन मा. अमित शहांचे नाव आठवले पण आम्ही कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही ना हाच प्रॉब्लेम आहे. झालं तर झालं निषेध पण करतो पण मा. परिचारक यांचा पण एकेरी उल्लेख नाही करत . खूप नावं आठवत आहेत आता काय करावे बरे ??

एअर इंडियाने रवी गायकवाडांनी नव्याने काढलेले तिकिट रद्द केले आहे. एअर इंडियाचे खमकेपणा दाखविल्याबद्दल अभिनंदन. असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना असेच वठणीवर आणले पाहिजे. समजतात काय लेकाचे स्वतःला.

In reply to by गॅरी ट्रुमन

नो फ्लाय मागे घेतला होता का? नसेल घेतला तर तिकीट रद्द केलं म्हणजे काय विशेष केलं, याची बातमी का व्हावी? जर विमान कंपनी खरी आहे तर कुठल्याही परिस्थितीत नो फ्लाय मागे घेता कामा नये, नाही का? बाकी असला खमकेपणा दाखवण्यासोबतच चांगली सेवा देण्याची बुद्दी विमान कंपन्यांना देरे महाराजा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

नो फ्लाय मागे घेतला होता का?
नो फ्लाय मागे घेतला नसला तरी तो मागे घेतला जाणार अशा बातम्या होत्या.
नसेल घेतला तर तिकीट रद्द केलं म्हणजे काय विशेष केलं, याची बातमी का व्हावी?
नो फ्लाय मागे घेतला जाणार अशा बातम्या आल्याच्या पार्श्वभूमीवर परत गायकवाडांनी एअर इंडियाचेच तिकिट काढायचा प्रयत्न केला. त्यांचे तिकिट रद्द केले गेले नसते तर मग "बघा एअर इंडियाला कसे झुकायला लावले" वगैरे बढाया पेंग्विनसेना समर्थकांनी मारल्याच असत्या. तसेच "नो फ्लाय" यादीमध्ये नाव समाविष्ट करूनही परत तिकिट काढायला गेले याचा अर्थ गायकवाडांना स्वाभिमान नाही किंवा आपले तिकिट मान्य केले जाऊन नंतर बढाया मारायला मिळतील हा फाजील आत्मविश्वास या दोन सोडून तिसरा मला तरी काढता येत नाही. जर गायकवाडांना स्वाभिमान नसेल तर असेच लोक पुढे भविष्यात महाराष्ट्राचा ताठ कणा, मराठी बाणा वगैरे गोष्टींविषयी बोलायला लागले तर त्यापेक्षा विजय मल्ल्याने दारूबंदीवर दिलेले प्रवचन अधिक विश्वासार्ह वाटेल. आणि फाजील आत्मविश्वास असेल तर मात्र त्यांना चपराक दिली हे फारच उत्तम झाले. या एका घटनेमुळे आयुष्यभरासाठीचा नो फ्लाय ही शिक्षा पण जास्त होईल हे मान्य. तरीही काही काळापुरता-- ६ महिने/१ वर्ष वगैरे नो फ्लाय त्यांच्यावर टाकायलाच हवा. जर त्यांनी माफी मागून ती बंदी उठवावी अशी मागणी केली तर हे प्रकरण अधिक न ताणता बंद करायला हरकत नसावी. पण काहीही झाले तरी गायकवाडांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. काहीही झाले तरी असल्या मुजोर लोकप्रतिनिधींपुढे कुठली सरकारी संस्था झुकली असे चित्र उभे राहता कामा नये. असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.

In reply to by गॅरी ट्रुमन

ओके. मला तर खरंच उत्सुकता लागून राहिली आहे की इथून पुढच्या कुठल्या कुठल्या पक्षाच्या कोणत्या कोणत्या लोकांवर कशीकशी बंदी आणली जातेय ती :). तिकिट काढायला गेले होते आणि दुसऱ्यांदा तिकीट कॅन्सल झालं याचं काही अधिकृत कंफर्मेशन कोणाला सापडलं तर टाकावं इथे. बाकी ते विजय मल्ल्या, फाजील आत्मविश्वास वगैरे शुद्ध आकस आणि द्वेष प्रकारात टाकावं वाटलं. जर नो फ्लाय उठवला तर त्याच्यावरील खासदारांची किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांची प्रतिक्रिया म्हणजे बढाया, आणि दोन दिवसांचा का होईना बॅन लावून दाखवला कि नाही, दोनदा तिकीट कॅन्सल करून दाखवले कि नाही याला बढाया म्हणणार नाही का? बाकी, काहीही झालं तर खासदारांना शिक्षा मिळायलाच हवी यावर आपलं एकमत (अर्थात गुन्हा कोणता हे कोर्ट ठरवेल)! याव्यतिरिक्त, संसद सदस्याला धक्काबुक्की करून, "मा....त" सारख्या शिव्या देणाऱ्याला, याला आत घेऊन याचं तोंड फोडू कोणालाच कळणार नाही असे म्हणणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना काहीही झाले तरी शिक्षा व्हायलाच हवी. आणि खासदारांनी याबाबतीत (बॅन आणि धक्काबुक्की) कायदेशीर कारवाई करावीच अशी अपेक्षा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ते विजय मल्ल्या, फाजील आत्मविश्वास वगैरे शुद्ध आकस आणि द्वेष प्रकारात टाकावं वाटलं.
ओक्के.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आता सामान्य जनतेला कोणी वेठीस धरले नाही म्हणजे मिळवली. नाही तर रास्ता रोको , रेल रोको इ इ करुन लोकांचे जगणे अवघड केले जाइल....

In reply to by गॅरी ट्रुमन

एअर इंडियाचे खमकेपणा दाखविल्याबद्दल अभिनंदन.
ज्या सदस्यांना एअर इंडिया ची कृती योग्य वाटत असेल ते खालील वेबसाइट वर जाऊन Appreciation चा फीडबॅक फॉर्म भरू शकतात. http://www.airindia.in/feedback-form.htm जनतेचे समर्थन त्यांना आहे हे त्यांना कळाले म्हणजे इथूनपुढे ही असाच खमके पणा दाखवत राहतील आणि गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना वठणीवर आणतील. एअर इंडियाच्या डायरेक्टर चे अभिनंदन करायचे असल्यास त्यांचा ई-मेल आयडी इथे मिळेल http://www.airindia.in/Images/pdf/RTI-Manual-8-new.pdf

In reply to by अत्रे

तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ सेवेबद्दल हि लिहिता येईल का? कारण पूर्वी जितक्या वेळेस तक्रार केली आहे त्याची पोच पावती सुद्धा देण्याची एअर इंडियाने तसदी घेतलेली नाही. गिगाबायटी प्रतिसाद लिहिता येतील. मुजोर उडपी कर्मचारी, भिकार स्वच्छता. सुमार जेवण, चालत नसलेल्या वातानुकूलन यंत्रणा, बेपर्वा बेदरकार आणि संवेदनशील जमिनीवरील कर्मचारी इ इ. हा धाग्याचा विषय नसल्याने अगोदर लिहिले नव्हते आणि अधिकही लिहीत नाही.

In reply to by सुबोध खरे

तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ सेवेबद्दल हि लिहिता येईल का?
नक्की लिहिता येईल! आणि तसे करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर सोशल मीडिया आहेच आपल्याकडे. झक मारत प्रतिसाद द्यावा लागेल मग त्यांना. एकदा दिल्लीहून येताना यांनी उगाच लेट केला होता एवढा एकच माझा पर्सनल वाईट अनुभव आहे. पण यांचे तिकीट प्रायव्हेट एअरलाईनपेक्षा स्वस्त असते आणि चेकिन लगेज ची लिमिट पण जास्त असते (ज्या रूट ने मी प्रवास करतो त्या रूट वर).

खूप नावं आठवत आहेत आता काय करावे बरे ?? सोप्पं आहे. 'मा'. चा ,जनसामान्यांच्या मनांत असलेला अर्थ घ्यावा आणि खुश व्हावे.

मारहाण झालेला कर्मचारी मराठी असता तर? म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० वर्षाच्या मराठी कर्मचार्याला दिल्लीत चपलेने बडवले' अशी बातमी असती तर वर 'एयर इन्डियाची सेवा लय वाईट' म्हणणार्या लोकांची काय प्रतिक्रिया असती ? असा ह्यांचा सवाल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब कधीकधी तुम्ही अगदी नेमके प्रश्न विचारता. मानले तुम्हाला. असे काही खरोखर घडले असते तर एअर इंडियाची ढिसाळ सेवा वगैरे मुद्दे गेले असते तेल लावत आणि मराठी बाणा उफाळून आला असता या सगळ्यांचा. सामनामध्ये अग्रलेख आले असते-- या बिहारी खासदाराचे पोट फाडून कोथळा बाहेर काढला पाहिजे, बोटे तोडली पाहिजेत इत्यादी इत्यादी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्याची बातमी नाही आली कुठे.... सगळा टी आर पी ह्यांच मानमियांनी खाल्ला , बरोबर बोलतोय ना माई मी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ज्याची मते स्पष्ट असतात त्याला "असे नेमके प्रश्न, तसे नेमके प्रश्न" असलं काही नसतं हो माई. मराठी कर्मचारी असता तर काय वाट्टेल तशी सेवा द्यायचा आणि वागण्याचा अधिकार मिळाला असता काय? तसेच खासदारालाही मुजोरगिरी करायचा अधिकार मिळालेला नसतो. बाकी या प्रकरणात शिवसेना आणणं, मग सरसकटीकरण करून शिवसेनेवर यथेच्छ टीका करून घेणं जसं अजेंडायुक्त पोळी भाजून घेणे आहे तसेच मराठी वि. बिहारी आणणेही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० वर्षाच्या मराठी कर्मचार्याला दिल्लीत चपलेने बडवले' अशी बातमी असती तर वर 'एयर इन्डियाची सेवा लय वाईट' म्हणणार्या लोकांची काय प्रतिक्रिया असती ? असा ह्यांचा सवाल. चांगला प्रश्न आहे. याच धर्तीवर जेंव्हा योगी आदित्यनाथांनी दंगे केले, घडवुन आणले, मारहाण केली - मग त्यांच्यावर बंदि का नाहि? त्यांना तर अँगर मॅनेज्मेंटच्या कोर्सची जास्त गरज आहे. असले प्रश्न तुमच्या "ह्यांना" का आणि कसे पडले नाहि, हा प्रश्न मला पडलेला आहे... :)

In reply to by राजाभाऊ

पुन्हा तेच. त्यांनी तसे केले मग आम्ही केले तर काय प्रॉब्लेम आहे असेच ना? खासदाराने विमान कंपनीच्या कर्मचार्याला चपलेने (२५ वेळा) मारणे व त्याचे उघडपणे समर्थन करणे निंदनीय आहे हे मान्य आहे की नाही?एयर ईंडियाची सेवा फार खास नाही पण कर्मचार्याला चपलेने मारावे ईतकी वाईट नक्कीच नसावी. मुंबईतील रस्त्यांवर असंख्य खड्डे असतात. त्याबद्दल सेनेच्या नगरसेवकांना चपलेने लोकांनी हाणले तर चालणार का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"तुमची विमानसेवा खराब आहे, थांबा तुम्हाला झोडपून काढतो चपलेने" असेच होते ना ते, होय ना माई?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खासदाराने विमान कंपनीच्या कर्मचार्याला चपलेने (२५ वेळा) मारणे व त्याचे उघडपणे समर्थन करणे निंदनीय आहे हे मान्य आहे की नाही?
हे मान्यच नाही हे दिसतं आहे.
मुंबईतील रस्त्यांवर असंख्य खड्डे असतात. त्याबद्दल सेनेच्या नगरसेवकांना चपलेने लोकांनी हाणले तर चालणार का?
हा हा हा! मस्तं प्रश्न! पण उत्तर "इतर शहरातलं काय" असं येईल.

In reply to by अनुप ढेरे

तुम्हाला हवे ते अर्थ काढण्यास मोकळीक आहेच! नीट वाचून प्रतिक्रिया देत चला हा आणखी एक फुकटचा सल्ला!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पुन्हा तेच काय? दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ शोधण्याआधी प्रत्येकाने आपल्या डोळ्यातलं मुसळ बघावं - हा मुद्दा होता माझा. समजायला एव्हढा कठीणहि नव्हता, पण ते असो. आणि खड्ड्यांच्या बाबतीतंच का, जनतेच्या तोंडाला चुना लावणार्या, चुनावी जुमला करणार्यांनाहि चपलांनी हाणा - शनिवार्वाड्यावर सात सवाश्णिंकडुन तुमची खणा-नारळांनी ओटि भरण्याची व्यवस्था करु...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई साहेब हाच जर खासदार अनुसूचित जातीचा असता तर मायावती पासून केजरीवाल पर्यंत आणि ममता दीदी पासून सीताराम येचुरींपर्यंत सर्वानी मागास्वर्गीयांवर अन्याय म्हणून टाहो फोडला असता. किंवा हाच खासदार जर मुसलमान असता तर एम आय एम च्या ओवैसी पासून मुलायम सिंह पर्यंत सर्वानी अल्पसंख्यांकांवर अन्याय म्हणून रडणं कढणं सुरु केलं असतं. प्रत्येक जण आपले पूर्वग्रह मनात धरून या प्रश्न कडे पाहत आहे हे सिद्ध होत आहे. मला एकच मुद्दा मांडायचा आहे कि या खासदारांना दोषी ठरवून त्यांच्यावर उड्डाण बंदी एकतर्फी आणण्याचा एअर इंडिया (सरकारी विमान कंपनी) ला कायदेशीर अधिकार आहे का? यात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे असे वाटते. दोष सिद्ध न होता त्याला शिक्षा दिली जात आहे. मला शिवसेना किंवा त्यांच्या एक घाव दोन तुकडे या विचारसरणी बद्दल अजिबात प्रेम नाही कि मी त्यांचा समर्थक हि नाही. ( खासदार कोणत्या पक्षाचा आहे हा माझ्या दृष्टीने मुद्दा गौण आहे) त्याने केलेले कृत्य ही असमर्थनीय आहे आणि त्याबद्दल त्याची रीतसर चौकशी होऊन त्याला शिक्षाही झाली पाहिजे यातही शंका नाही. पण त्याच्यावर अनिश्चित कालीन उड्डाण बंदी घालणे हे कोणत्या कायद्याच्या तत्वात बसते? याचीच एक पुरवणी म्हणून एक प्रश्न मनात आला. सरकारी रुग्णालयात एखादा eczema एक्झिमा चा रुग्ण डॉक्टरना मारहाण करत असेल तर त्याला उपचार देण्यास रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला अमर्यादित काळासाठी बंदी करता येईल का? एक्झिमा हा अतिशय जुनाट सहज बरा न होणार त्वचारोग असून त्याने माणसाच्या जीवाला धोका नसतो आणि त्याला तातडीच्या उपचारांची गरज नसते. सरकारी रुग्णालय आणि सरकारी विमान कंपनी आहेत दोन्ही स्थिती आपत्कालीन नाहीत हे गृहीत धरा. याचा सध्या झालेल्या डॉक्टरांच्या संपाशी संबंध नाही. ( उगाच ते धुणे इथे धुवू नये. सगळेच डॉक्टर हरामखोर आहेत असे आपण सध्या धरून चालू) मूळ मुद्दा "मूलभूत हक्क आणि कायदा" याबद्दल आहे.

In reply to by सुबोध खरे

सॉरी , तुमचा प्रश्न मला उद्देशून नाही आणि मला यातला कायदा हि माहित नाही पण एअर इंडिया चे डायरेक्टर काय म्हणाले हे मी इथे वाचले
Air India and the member airlines of the Federation of Indian Airlines (FIA) that includes IndiGo, Jet Airways, SpiceJet and Go Air, condemn the assault on an Air India staff member by a passenger who happens to be a Member of Parliament on March 23, 2017. The airlines demand that strict action be taken against the Member of Parliament by law enforcement agencies. We believe that an assault on any one of our employees is an assault on all of us and on ordinary law abiding citizens of our country who work hard to earn a living. Air India and FIA member airlines have decided to ban this Member of Parliament from flying on all our flights with immediate effect. We believe that exemplary action should be taken in such incidents to protect employee morale and public safety. In the interest of the safety and security of our colleagues and other customers we also propose the promulgation of a "no fly" list which shall include the names of all unruly passengers. Such customers are not welcome on our carriers and we seek the support of the Government and security agencies to enforce such a "no fly" list.
मला असे वाटते कि हि जी FIA (http://www.fiaindia.in/) आहे, तिला नो - फ्लाय लिस्ट चे अधिकार असावेत. आणि अजून पर्यंत नसतील तर मग प्रकरण कोर्टात जाईल आणि मग कोर्ट काय सांगेल त्याची वाट बघावी लागेल.

In reply to by अत्रे

असेच अधिकार सरकारी रुग्णालयांनी जर सरकारकडे मागितले तर चालेल काय? (मारामारी करणाऱ्या माणसाचा आधार क्रमांक घेऊन यापुढे त्याला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार घेता येणार नाहीत) मी खाजगी विमान कंपन्या किंवा खाजगी रुग्णालये याबद्दल बोलत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती बद्दल हि बोलत नाही हे " कृपया" लक्षात घ्यावे हे मला वाटते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

In reply to by सुबोध खरे

असेच अधिकार सरकारी रुग्णालयांनी जर सरकारकडे मागितले तर चालेल काय?
अत्यावशक सेवेसाठी सोडून इतर सेवेसाठी (जसे तुम्ही उदाहरण दिले एक्झिमाचे) असे डिसक्लेमर लावून सरकारी रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकांना बॅन करण्यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. पण हा निर्णय घेण्याएवढी एवढी एकजूट त्यांच्यात हवी. मी वाचलं होता कि इथून पुढे काही रुग्णालयात फक्त दोन नातेवाईक रुग्णासोबत जाऊ शकतील. त्या टाईपचे नियम मला वाटतं लावता येतील. कारण रुग्ण बिचारा डॉक्टरांना का मारेल? मारलं तर त्याचे नातेवाईक/ समर्थकच मारतील (नेता वगैरे असेल तर) . अशावेळी योग्य ती सुरक्षा पुरवली तर अशा मारहाण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त होईल. उडणाऱ्या विमानात कोणी गोंधळ घालत असेल (किंवा अशा गोधळाची पार्श्वभूमी त्याला असेल) तर परिस्थिती सोपी नसते. बाकी लोकांच्या जीवाचा ही प्रश्न असतो. विमानात गोळी पण चालवता येत नाही, विमानच खाली पडेल.
हे मला वाटते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.
असेल. पण ट्रेडऑफ बघा ना.

In reply to by अत्रे

विमानात एखादा गैरवर्तन करत असेल तर त्याला "त्या" वेळेस विमानातून उतरवण्याचे अधिकार (इतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या साठी) विमान कंपन्यांना दिलेले आहेत. पण म्हणून अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला विमानाचे तिकीटच नाकारणे हे बरोबर नाही असेच वाटते.

In reply to by सुबोध खरे

अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला विमानाचे तिकीटच नाकारणे हे बरोबर नाही असेच वाटते
सहमत. बादवे नो फ्लाय लिस्ट ची सुरुवात अमेरिकेत झाली असे वाचले. त्यावरही बऱ्याच केसेस सुरु आहेत . https://en.wikipedia.org/wiki/No_Fly_List#Lawsuits

In reply to by सुबोध खरे

आहेच हे उल्लंघन मूलभूत अधिकारांचे. रादर माझ्यासाठी हा विमान कंपन्यांच्या उद्दामपणाचा पुरावा आहे. यापेक्षा गलिच्छ प्रकार कर्मचाऱ्यांची चूक नसताना घडलेले आहेत विमानात. काय दिवे लावले तेव्हा? आताच बारा तो सात्विक संताप येतो? गायकवाडांवर तर गुन्हा दाखल आहेच, पण या कर्मचाऱ्यांबद्दल कोण बोलणार? संसद सदस्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ करणाऱ्या आणि वरून आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार?
असे खरेच झाले असेल - तर
Law will take its own course
:D ;)

In reply to by अत्रे

आता कसं बोललात बगा! अगदी हेच फक्त दोन्ही बाजूंसाठी लागू होतं! उठ कि लाव बॅन असं नसतं, मोगलाई नाहीये ही!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना जमत असेल तर बॅन काढून दाखवावा (त्यासाठी शुभेच्छा). फक्त लोकांकडून सहानुभूतीची अपेक्षा करू नये.

In reply to by अत्रे

ते तर ते करतच आहेत हो, संसदेत हक्कभंगावर चर्चा चालू आहेच (अर्थात हक्कभंग फेटाळलाच जाणार आहे). आणि सहानुभूतीचं म्हणाल तर खासदार काय, कर्मचारी काय कोणीच सहानुभूती मागताना दिसले नाहीत. जशी तुम्हाला गायकवाडांना सहानुभूती द्यावी वाटत नाही तशी काही लोकांना विमान कंपनीला द्यावी वाटत नाही. प्रकरणाला दुसरी बाजू असू शकते हे मान्यच नसेल तर मग काय बोलणार?

In reply to by सुबोध खरे

मला एकच मुद्दा मांडायचा आहे कि या खासदारांना दोषी ठरवून त्यांच्यावर उड्डाण बंदी एकतर्फी आणण्याचा एअर इंडिया (सरकारी विमान कंपनी) ला कायदेशीर अधिकार आहे का? यात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे असे वाटते.
विमानात गोंधळ करणे, मारामारी करणे, इतर प्रवाशांना धोका होईल असे वर्तन करणार्‍या प्रवाशांना बंदी करण्याचे अधिकार विमान कंपन्यांकडे आहेत. २-३ दिवसांपूर्वीच याबद्दल एके ठिकाणी वाचले होते. ती लिंक परत मिळाली तर देईन.
दोष सिद्ध न होता त्याला शिक्षा दिली जात आहे.
आपल्या कृत्याची त्याने स्वतःच जाहीर कबुली दिली आहे. त्यावर विसंबूनच बंदी घातलेली आहे. समजा त्याने कर्मचार्‍याला मारहाण केली नसेल व विमानातून ढकलायचा प्रयत्न केला नसेल तर त्याने तसे कॅमेर्‍यापुढे येऊन जाहीररित्या सांगावे. शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीने तो फुशारक्या मारायला गेल्या आणि त्याच फुशारक्या आता अंगलट आल्या आहेत. आता मी तसे केले नाही हे सांगायला पण त्याच्याकडे तोंड नाही.

या खासदारांच्या वागणुकीवरही चर्चा व्हावी. इथे नेमका कसला बॅन लावता येईल बरे? दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पुढे भाजपला खड्ड्यात घालायची तयारी चालू आहे का? https://youtu.be/s4YCVk1g418 वरून हे त्यांचे स्पष्टीकरणही पाहावे - https://youtu.be/gICrRHYx5BI http://m.navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/manoj-tiwar…

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तो कार्यक्रम बसविलेल्या सीसीटीव्हींच्या उद्घाटनाचा होता असं दिसतंय. अशा प्रसंगी मनोज तिवारींना गाणे गाण्याचा आग्रह करणे हे औचित्याला धरून नव्हते. त्याचप्रमाणे मनोज तिवारींनी कडक शब्दात त्या महिला शिक्षिकेला सुनावणेही पूर्णपणे अयोग्य होते. सौम्य शब्दात शिक्षिकेची मागणी नाकारता आली असती. तिवारींनी महिलांशी व सर्वांशीच उद्धटपणे न बोलता नम्रपणे बोलावे अशी समज त्यांना भाजपने द्यावी.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा एक मनोज तिवारी हे एक कलाकार आहेत, खासदार असतानाही त्यांनी गाण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. मुद्दा दोन, आधीच शाळेत ठरलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेखेनुसार, सूत्रसंचलन करणाऱ्या या शिक्षिकेने गाणं म्हणण्याचा आग्रह नाही विनंती केली. यावर खासदार साहेबांनी त्या महिलेची चारचौघात अक्षरशः तमीज काढली आणि स्टेजवरून हाकलून काढले. बरोबर आहे, त्या महिलेला इतक्या लोकांसमोर असं अपमानित करून स्टेजवरून खाली उतरवणे, तिच्यावर कारवाई करण्याचा जणू आदेशच देणं, आणि वरून माध्यमांनी असा अपमान करणं योग्य आहे का विचारल्यावर, त्या महिलेने काय आत्महत्या केली का? असे विचाराने हे सर्व "शिव्या देऊन अरेरावीने बोलणाऱ्याला दोन थप्पड लागवण्यापेक्षा" सौम्य असल्याने पक्षाने समज देण्यावर भागू शकते (रच्याकने अशी समज सेनेने गायकवाडांना दिली होती आणि कारणे दाखवा नोटीसही बजावली होती). गेलाबाजार सर्व शाळांनी या खासदारांना शाळेत यायची बंदी घ्यालायला हवी होती :)

असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना असेच वठणीवर आणले पाहिजे. समजतात काय लेकाचे स्वतःला.
मुजोर लोकप्रतिनिधींची तशी टक्केवारी काढायला गेली तर ती जास्त भाजप मध्येच आढळेल. पण भाजपने मिडिया वगैरे सगळं हायजॅक केलं असल्याने ते दाखवत नसतात. उगाच निरीक्षण करीत होतो,ते हिंदी चॅनेलवाले किती तिरस्काराने गायकवाड प्रकरणाची बातमी प्रेझेंट करत होते,हरामखोर लेकाचे आहेत सगळे.तो योगी तिकडे कायतरी गोमाता,मानसरोवर,इ.थेरं करत बसला आहे,त्याचे ह्यांना फार कौतुक.

Why the Shiv Sena won't say sorry २०१४ चा लेख आहे पण अजूनही तेवढाच लागू होतो.
In this case, the MPs' anger was provoked at a range of grievances that might turn out to be legitimate, though the person on whom they vent their anger could hardly be held responsible for them. But through the years, their anger has been provoked by anything, from Muslims/Dalits demanding their rights or merely asserting themselves, to officials refusing favours, to a railway station being painted green. For Shiv Sainiks see themselves as Maharashtra's first citizens, and also as inheritors of Shivaji's legacy. For them, Shivaji is a symbol of Marathi Hindu pride, of independence from a perpetually hostile Delhi. Thus, being treated as nobodies in Delhi's Maharashtra Sadan, and that too by a non-Marathi official (Resident Commissioner Bipin Mallick), was the ultimate insult. It had to be avenged by the 'mards', as the Saamna editorial described them.
बाकी या पूर्ण प्रकरणात सामना मधे जी "स्मशानशांतता" आहे ती बघून थोडे चांगले वाटते. नशीब तिथे तरी समर्थन केले नाही.

In reply to by अत्रे

एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच म्हणतोय कि या प्रकरणात ते खासदार, कर्मचारी आणि घडलेला प्रकार हे काहीच महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे ते "शिवसेना" :):).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

याबाबद्दल मी इथे मत व्यक्त केलं होतं http://www.misalpav.com/comment/929102#comment-929102 थोडक्यात माझ्यासारख्या शांतताप्रिय नागरिकांसाठी हा दुग्धशर्करा योग्य आहे :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :) पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे. यावर चिंतन त्यांनीच करावे, म्हणजे थोड्या अजून निवडणूक जिंकतील. जाऊदे.

In reply to by अत्रे

ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :) वेगळा कसा, धागाच पक्षसापेक्ष अन खुनशीपणाने काढलाय की. पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे. कशाच्या तुलनेत कमीय? स्व. बाळासाहेबांच्या काळात अन नंतर अशी का? का इतर पक्षाच्या तुलनेत? ते टोटल तुमचे वैयक्तिक मत झाले. रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय? यावर चिंतन त्यांनीच करावे, ऑ.. म्हणजे थोड्या अजून निवडणुका जिंकतील. जाऊदे. आता काय एक राष्ट्रपतीची इलेक्शन सोडली तर दुसरी काय नाय दृष्टीपथात. मध्यावधी वगैरे झाली तर बघतील त्यांचे ते. अन धागा काढायच्याच आधी जाऊ दे म्हणून सोडायचे असते हो. इतकी पूर्वग्रहदूषित धुळवड आटपल्यावर कीती ती घाण असा आव कशाला?

In reply to by अभ्या..

रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?
फेसबुक लाईक्स मधून तरी मोजता येईल असे वाटते. या प्रकरणावर आलेल्या बातम्या आणि त्यावरच्या देशभरातून आलेल्या लाइक्स, प्रतिक्रिया बघून रिस्पेक्ट बद्दल निष्कर्ष काढता येईल .
धागाच खुनशीपणाने काढलाय की.
सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)

In reply to by अत्रे

फेसबुक लाईक्स मधून तरी मोजता येईल असे वाटते ==> फेसबुकवर विसंबून राहण्यापेक्षा तुम्ही एकदा उस्मानाबादला जाऊन या. तिथे जाऊन एक दिवस लाक्षणिक उपोषण वगैरे केले तरी चालेल. जीवाला आनंद वाटेल.

In reply to by अत्रे

सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)
अरारारारा, अहो ते स्वतःचे नाव पत्ता देऊन लिहून छापणारे पब्लिक आहेत हो. काय झाले गेले तर निस्तरायची धमक आहे त्यांची. कशाला उगा न झेपणारे आदर्श घेताहात?

In reply to by अभ्या..

हे मात्र बरोबर बोललात. इंटरनेट anonimity मुळे माझ्यासारख्या नागरिकांना फायदाच झालेला आहे. जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते. सध्या तरी मी यांचा तात्पुरता माज उतरलेला पाहून संतुष्ट आहे. मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.

In reply to by अत्रे

जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते. ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात. असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.

In reply to by अभ्या..

मग डायरी ठेवा ना.
कशाला. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे ना मला! फुकट कशाला घालवू ते. आणि इतरांना व्यक्त होताना बघून जे व्यक्त झाले नाहीत त्यांनाही हुरूप येईल.

In reply to by अत्रे

मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या. २००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षात सर्वसाधारणपणे कीती गुंड कार्यकर्ते अन त्यांच्यावर एफायार असल्यावर त्याला गुंडांची फौज म्हणायची पध्दत आहे? आगी लावणे अन कोट्यावधींचे नुकसान करण्याच्या घटनांबद्दल ते काम पक्षाच्या गुंडानीच केले, ह्यात चिडलेले जनमानस वगैरे काही नव्हते असे आपणास म्हणायचे आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

आनंद दिघे गेले, का गेले त्याबद्दल अनेक सुरस कथा ऐकल्या आहेत. मला नक्की आठवत नाही पण बहुधा शिशिर शिंदेंच्या गाडीशी टक्कर झाली होती. एकवेळ डॉक्टर बद्दल राग पण समजू शकतो पण जनक्षोभ असेल तरी काहीही संबंध नसलेल्या रुग्णांना त्रास देणे हा तर सरळ रानटीपणाच.

In reply to by श्रीगुरुजी

अहो माझा नाही हा युक्तीवाद. आठवत नसेल तर ताण द्या बरं जरा. कुठे झाला होता बरं असा जनक्षोभ? ठाण्यापेक्षा बराच मोठा होता हो तो.