बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते.
एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते. महंमदाच्या कार्टून प्रकरणाची ही मराठी आवृत्ती वाटते आणि असले प्रकार आजिबात होऊ नयेत असे वाटते. अशाने नस्ते पायंडे पडतील. उद्या काँग्रेसच्या राजघराण्याचा कुणी मेला आणि त्याच्या बंदच्या वेळेस कुणी असेच मत व्यक्त केले तर त्यालाही तुरुंगात टाकतील. ह्या निसरड्या उतारावरुन घसरत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ह्याचा समूळ उच्छेद व्हाव हीच इच्छा.
असले आततायी कृत्य करणार्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही रेम्याडोक्या माथेफिरू तरूणांनी त्या स्त्रीच्या काकाच्या हॉस्पिटलवर हल्ला करून नासधूस केली. हे आणखी पुढे!
http://ibnlive.in.com/news/antithackeray-fb-post-nine-arrested-for-vanda...
इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या थोर चिरंजीवांनी मोठे झाड पडले की बारीकसारीक झुडुपे त्याखाली चिरडली जाणारच असे "मार्मिक" "स्पष्टीकरण" दिले होते तसे इथे होऊ नये ही आशा.
प्रतिक्रिया
20 Nov 2012 - 1:42 pm | कलंत्री
पोलिसांना कधी कसे ते वागावे हे समजत नसावे. अश्या छोट्याश्या विरोधीप्रतिक्रियांना लगेचच काहीतरी कलमेलावुन अटक करणे हे योग्य नव्हे.
दुसरीबाजू म्हणजे अक्षरशा लाखो लोक भावनाशिल असताना अशी प्रतिक्रिया कदाचित अनेक अनर्थांना आमंत्रण देवु शकेल इतका पोक्त विचार या तरुणीं नी ठेवायला हवा होता. अटकेमूळे पुढचा अनर्थ टळला असे समजायला हरकत नसावी.
20 Nov 2012 - 1:59 pm | आनन्दा
त्यांना अटक केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत याचाही विचार व्हावा.
20 Nov 2012 - 4:00 pm | अविनाश पांढरकर
+१
सहमत आहे.
20 Nov 2012 - 2:09 pm | कपिलमुनी
तुम्हाला त्या तरूणींनी नक्की काय पोस्ट टाकली ते माहीत आहे का ?
असेल तर कृपया सांगावे ( व्य नि चालेल) ..कारण परीस्थितीनुसार वागाव ...
आपल्याला हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे ..वाट्टेल ते बोलण्याचे नाही ...अशा बोलण्याने समोरचा दुखावु नये याची काळजी घ्यावी ..
आणि साराचार विचारबुद्धी वापरावी ..
तुम्हाला एखादे पुस्तक विकत घेउन रद्दी म्हणून जाळण्याचे स्वातंत्र्य आहे ...पण म्हणून धर्मग्रंथ सार्वजनिक रीत्या जाळलात तर त्याचे परीणाम हे होणारच !!
20 Nov 2012 - 2:44 pm | सुजित पवार
..
20 Nov 2012 - 5:59 pm | श्री गावसेना प्रमुख
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,त्यांच्या भाषेत ठाकरे ह्यांच्यासारखे रोजच मरतात म्हणुन बंद का? पाळावा.असली बिडोंक भाषा वापरावी का,काश्मिरात लष्कराकडुन एखादा मेला तर हे काय करतात
ठाकरे हे लोकांवर नव्हे लोकांच्या ।हृदयावर राज्य करणारे नेते होते.
20 Nov 2012 - 2:56 pm | तिमा
त्या मुली लहान आहेत हे लक्षांत घेऊन त्यांना केवळ समज देऊन सोडून देणे हे उचित ठरले असते. आता त्या धडा शिकल्या असतीलच, या देशांत कसे वागावे याचा!
20 Nov 2012 - 5:09 pm | सावकार स्वप्निल
पण त्या मुलिंचे वर्तन चुकिचे असेल अणि त्यातुन काही विपरीत घडन्याची शक्यता असेन म्हणुन अशी कारवाई झाली
असेन. मुलिंने थोडेसे जबाबदारीने वागायला ह्वे होते.
29 Nov 2012 - 10:30 pm | विकास
'फेसबुक'फेम शाहीन महाराष्ट्र सोडणार
या बातमीत म्हणल्याप्रमाणे, "आम्हाला आता शांतता हवी आहे, स्थैर्य हवंय. त्यामुळे काही वर्षं तरी आम्ही गुजरातला राहण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती स्वतः शाहीननंच दिली आहे. "
याचा अर्थ शाहीनला महाराष्ट्रापेक्षा गुजराथ जास्त सुरक्षित वाटते असा होत असावा. ;)
20 Nov 2012 - 3:06 pm | बाळ सप्रे
The woman had posted -
"Respect is earned, not given and definitely not forced. Today Mumbai shuts down due to fear and not due to respect".
अटक/ तोडफोड करणार्यांनी ते सिद्ध करुन दाखवले !!
20 Nov 2012 - 3:53 pm | मैत्र
यात धार्मिक तेढ / हेतूपुरस्सर द्वेषमूलक लिखाण इत्यादी कुठे दिसलं नाही...
हे वैयक्तिक मत आहे. त्यासाठी थेट मोठी कलमं लावून ताबडतोब अटक?
"आपल्याला हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे ..वाट्टेल ते बोलण्याचे नाही ...अशा बोलण्याने समोरचा दुखावु नये याची काळजी घ्यावी .. आणि साराचार विचारबुद्धी वापरावी .." -- यातला कुठला भाग त्यांच्या विधानात आहे?
बाळ सप्रेंनी लिहिल्याप्रमाणे जर त्यांचे विधान चुकीचे किंवा दुखावणारे होते तर ते तिथल्या स्थानिक शाखेने सिद्ध करून टाकले. त्यामुळे ते दुर्दैवाने आता चुकिचे ठरत नाही.
शिवसेनेने बंद पुकारला नव्हता आणि तसं जाहीरही केलं होतं. मग लगेच काकाच्या दवाखान्याची तोडफोड वगैरे..
जो संयम आणि समज (maturity) प्रमुख नेत्यांनी दाखवली त्याची अपेक्षा प्रत्येक स्थानिक पातळीवर अर्थात नाही..
जर ही अटक समर्थनीय असेल तर ndtv / ibn /bbc/ nyt इत्यादी सर्व ठिकाणच्या लेखांमध्ये जे थेट उल्लेख आहेत त्याबद्दल या सगळ्यांवर मोठे मोठे खटले भरावे लागतील.
एका वाईट घटनेला तिसरंच वळण...
20 Nov 2012 - 4:08 pm | खबो जाप
“People like Thackeray are born and die daily and one should not observe a bandh for that. Respect is earned, not given and definitely not forced. Today Mumbai shuts down due to fear and not due to respect.”
http://www.firstpost.com/tech/bal-thackeray-post-on-fb-girl-apologises-f...
20 Nov 2012 - 4:11 pm | बॅटमॅन
सर्व जमेस धरूनसुद्धा माझे आधीचे म्हणणे कायमच आहे. विशेषतः
"Today Mumbai shuts down due to fear and not due to respect.” हे तर फेसबुकावर कैक प्रत्यक्षदर्शींनीसुद्धा लिहिलेले पाहिले आहे.
20 Nov 2012 - 4:23 pm | मैत्र
http://www.ndtv.com/article/cities/facebook-arrests-9-arrested-for-vanda...
इथे दोन वाक्ये आहेत. पहिले वाक्य नाही... ते असल्यास त्या मुलींनी केलेले विधान अनाठायी होते.
अर्थात तरीही त्यासाठी तडकफडकी अटक करणे गरजेचे होते की नाही ते कायदेपंडित किंवा आ.रा. यांच्यासारखे अनुभवी लोकच सांगू शकतील.
20 Nov 2012 - 4:31 pm | बॅटमॅन
अवांतरः त्या बातमीत लिहिलंय की बाळासाहेबांच्या अंत्यविधीला २ लाख लोक होते आणि इतर ठिकाणी वाचलंय की २० लाख, खरा आकडा कुठला म्हणायचा?
20 Nov 2012 - 5:10 pm | खबो जाप
http://timesofindia.indiatimes.com/india/Bal-Thackerays-funeral-part-of-...
20 Nov 2012 - 6:06 pm | बॅटमॅन
धन्यवाद.
20 Nov 2012 - 3:08 pm | अविनाशकुलकर्णी
सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या अटकेप्रकरणी न्यायमूर्ती काटजू ह्यांनी निषेध व्यक्त केला,
मात्र आपली प्रसारमाध्यम अर्ध सत्य सांगत आहेत. त्या मुलीने नुसता बंद ला विरोध केला नाही तर बाळासाहेबांच्या विरुद्ध वाईट लिहिले. व सध्याचा परिस्थितीत अश्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होणे शक्य होते कारण समाजात दुष्ट शक्ती अश्या संधीचा फायदा घेण्यात टपल्या असतात. ही प्रसार माध्यमे एक गोष्ट लपवून ठेवत आहेत की ह्या मुलींना कोर्टाने १४ दिवसाची शिक्षा सुनावली होती. तेव्हा कोर्टाला सुद्धा तुम्ही न्याय शिकवणार का ?
पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे.
facebook.............
20 Nov 2012 - 4:19 pm | निनाद मुक्काम प...
अहो अविनाश काका ही माझी पोस्ट आहे माझ्यामते सर्वप्रथम मी फेसबुक वर ह्या विषयावर मराठीत लिहिले व लगेच माझ्या ब्लॉग वर एक पोस्ट
. व कोर्टाने तिला १४ दिवसांची शिक्षा सुनावली ह्या बातमीचा हा आधार आहे.
20 Nov 2012 - 8:51 pm | आजानुकर्ण
न्यायमूर्ती काट़जू यांनी मुस्लीम मुलीच्या अटकेप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. यावरुन शाहीन आणि रेणु या दोन्ही मुली मुस्लिम असल्याचे दिसते. श्रीनिवासन हे आडनावही मुसलमानांमध्ये आहे ही नवी माहिती मिळाली. समाजातील दुष्ट शक्तींना अटकाव करण्यासाठी दवाखान्यावर हल्ला करणाऱ्या टोळक्याऐवजी या मुलींना अटक करणे हा योग्य निर्णय पोलिसांनी घेतला.
20 Nov 2012 - 3:10 pm | अविनाशकुलकर्णी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर कथित अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 21 वर्षीय तरुणीला आणि या मजकुराला ‘लाइक’ची पसंतीदर्शक खूण करणा-या तिच्या मैत्रिणीला ठाणे जिल्ह्यातील पालघर पोलिसांनी रविवारी अटक केली. नंतर या दोघींना जामिनावर सोडण्यात आले.
फेसबुकच्या वॉलवर मजकूर टाकणा-या तरुणीचे नाव शाहीन फारूक धाडा असून तिची मैत्रीण रितू श्रीनिवासन (20) हिने मजकुराला ‘लाइक’ केले होते. या मजकुराबाबत शिवसैनिक व ठाकरेप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. असे मत व्यक्त करून शाहीन व रितूू यांच्याकडून समाजात द्वेषभावना पसरवली जात असल्याची तक्रार पालघरचे शिवसेना शहरप्रमुख भूषण संख्ये यांनी पोलिसांत दिली होती. तसेच संतप्त शिवसैनिकांच्या जमावाने शाहीनच्या काकांच्या रुग्णालयाची नासधूस केली. त्यामुळे पोलिसांनी शाहीनविरुद्ध कलम 505 (2) नुसार दोन समाजांत द्वेषभावना निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवल्याची माहिती तिचे वकील सुधीर गुप्ता यांनी दिली.
20 Nov 2012 - 3:12 pm | मालोजीराव
अशी पोस्ट टाकून अल्पावधीत फेसबुक वर प्रसिद्धी मिळवायची हाच हेतू असावा...
आपण एका संवेदनशील गोष्टीवर भाष्य करतोय हे माहित असून सुद्धा अशी कमेंट टाकणे म्हणजे हा खोडसाळपणा होता...
हि अमेरिका नाही जिथे राष्ट्राध्यक्षाला 'You Suck' अथवा मधले बोट दाखवणे शक्य आहे.हा भारत आहे जिथे आपल्या आयडॉल ला लोक देवासारखं मानतात !
सुमारे ४५० राजेशाही संस्थाने मिळून हा देश तयार झाला होता...त्यामुळे राजाचं राजंपण आजपण उद्यापण हि गोष्ट लक्षात ठेवावी...
आणि ती मुलगी लहान शिक्षा भोगून बाहेर आली हे तिचं नशीब !
20 Nov 2012 - 5:16 pm | सावकार स्वप्निल
+१
20 Nov 2012 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे
काही काळानंतर यावर तारतम्याने चर्चा होउ शकेल. समूह मानसिकता हा खरच गुंतागुंतीचा विषय आहे.
20 Nov 2012 - 3:40 pm | बॅटमॅन
तद्दन येडझवेपणा आहे सगळा. ठाकरेच काय, अन्य कुणा नेत्याबद्दल कोणी कधी असे काही बोलले आणि तेव्हा जरी असे काही घडले तरी मी झाल्या घटनेचा निषेधच करतो. आधीच शिवसेनेची इमेज अशी खतरनाक आहे, त्यात परत इमेजचे खच्चीकरण करू देण्याने माकडांच्या हातात आयतेच कोलीत मिळते आहे हे त्या अडाण**ना कसे नै समजले याचेच वाईट वाटते. आणि राहता राहिली त्या मुलीने संयम दाखविण्याची गोष्ट, हे म्हणजे बलात्कार होऊ नयेत म्हणून बुरखा घालून फिरावे असे म्हणण्यासारखेच आहे
बाकी भारतीयांच्या आपल्या नेत्यांबद्दलच्या भावनाबंबाळपणाबद्दल जितकी नाके मुरडावी तितकी कमीच आहेत. हे म्हणजे आपण अजून संस्थानी मानसिकतेतून बाहेर आलो नसल्याचेच द्योतक आहे.
20 Nov 2012 - 8:04 pm | लॉरी टांगटूंगकर
परवाच इथे दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्याची चर्चा आठवली,
विलासराव देशमुख यांच्या मृत्युनंतर झालेली चर्चा आठवते आहे,तो धागा शोधला पण दिसत नाहीये
20 Nov 2012 - 3:55 pm | निनाद मुक्काम प...
सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या अटकेप्रकरणी न्यायमूर्ती काटजू ह्यांनी निषेध व्यक्त केला,
मात्र आपली प्रसारमाध्यम अर्ध सत्य सांगत आहेत. त्या मुलीने नुसता बंद ला विरोध केला नाही तर बाळासाहेबांच्या विरुद्ध वाईट लिहिले. व सध्याचा परिस्थितीत अश्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होणे शक्य होते कारण समाजात दुष्ट शक्ती अश्या संधीचा फायदा घेण्यात टपल्या असतात
. ही प्रसार माध्यमे एक गोष्ट लपवून ठेवत आहेत की ह्या मुलींना कोर्टाने १४ दिवसाची शिक्षा सुनावली होती. तेव्हा कोर्टाला सुद्धा तुम्ही न्याय शिकवणार का ?
आज समजा मुंबई हल्ल्यानंतर कसाब च्या बाजूने एखाद्याने पोस्ट लिहिले म्हणजे अगदी सोबर भाषेत तर न्यायमूर्ती काटजू ह्यांच्या नुसार तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग ठरेल पण ह्या पोस्ट मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल त्याचे काय ?
पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे.
20 Nov 2012 - 4:05 pm | खबो जाप
त्या मुलीने लिहिलेली original पोस्ट अशी आहे.
“People like Thackeray are born and die daily and one should not observe a bandh for that. Respect is earned, not given and definitely not forced. Today Mumbai shuts down due to fear and not due to respect.”
इतका मोठा माणूस / नेता आपल्याला सोडून गेला असताना अशी आक्कल पाजळणे (व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली ) कितपत समर्थनीय आहे ?
हा म्हणजे सवंग प्रसिद्धी चा प्रकार आहे.......
http://www.firstpost.com/tech/bal-thackeray-post-on-fb-girl-apologises-f...
20 Nov 2012 - 4:12 pm | गवि
जी पोस्ट त्या मुलीने लिहीली ती पोस्ट निंदनीय असेल, बेदरकार असेल, अज्ञानपूर्ण असेल, माजोरडी असेल, आदरशून्य, बदतमीज, तर्कदुष्ट, मूर्ख, दुरित, समयोचित नसलेली, बालिश, औचित्यहीन, अशिष्ट यापैकी किंवा अन्य काहीही काहीही असेल.
पण कायद्याने अटक करण्यासारखी आहे का??
हा मुख्य मुद्दा आहे.
20 Nov 2012 - 4:19 pm | बॅटमॅन
या प्रश्नाचे खरे उत्तर "नाही" असे आहे, पण ते देववत नसल्याने टँजेन्शिअल बोलताहेत सर्वजण.
21 Nov 2012 - 2:07 am | आबा
सहमत
20 Nov 2012 - 4:55 pm | ५० फक्त
कायद्याचं माहित नाही, पण पोलिसांनी अटक करण्याजोगी निश्चित आहे. ब-याच वेळा एखाद्या गोष्टीत कायदा नक्की काय म्हणतो हे पोलिसांना माहित नसते किंवा समजत नाही, तेंव्हा ते त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला समजेल अशा कलमांखाली एखाद्याला अटक करतात, त्यावेळची परिस्थिती चिघळू नये यासाठी घेतलेली ती काळजी असते, जी बहुधा या वेळी होती.
नंतर कोर्टात रागावुन घेउन, म्हणजे कोर्टाने समज देउन (किंवा ताशेरे ओढुन झाल्यावर) किंवा कायद्याच्या तज्ञाचा सल्ला घेउन किंवा परिस्थितीनुसार केस कोर्टात उभी होताना कलमं बदलली जातात / जाउ शकतात.
20 Nov 2012 - 8:51 pm | मराठे
जर कोणीतरी तक्रार केली असेल तर पोलिसांना काहीतरी कारवाई करावीच लागते हे खरं असेल, तर त्यांना फक्त वॉर्निंग देता आली अस्ती. आता प्रकार प्रसारमाध्यमांमुळे जास्तच चिघळला आहे. त्यात त्यांच 'बाई' आणि 'मुस्लीम' असणं आणखीनच भर टाकतेय. त्या मुलींपेक्षाही फार भयंकर गोष्टी इतर ठिकाणीही लिहिलेल्या आहेत (संदर्भासाठी सिएनेन किंवा ट्विटर बघा) त्यांच्यावर का नाही कारवाई केली? अर्थात त्यांनी जे लिहिलं आहे त्यात अगदीच तथ्य नाही (विषेशतः आदर वि. भिती संदर्भात) असं नाही.
20 Nov 2012 - 4:30 pm | आनन्दा
ज्याच्या अंत्यविधीला १५ ते २० लाख लोक येतात, त्या माणसाच्या थोरत्वाबद्दल अशी व्यक्तिगत टिप्पणी करणे, ही जाणीवपूर्वक एखद्या समूहाच्या भावना दुखावणे आहे.
आणि हा नक्कीच दखलपात्र गुन्हा असावा.
ज्याअर्थी असीम त्रिवेदी वर गुन्हा दाखल होऊ शकतो त्याअर्थी हिच्यावर देखील झाला पाहिजे.
20 Nov 2012 - 4:43 pm | चिरोटा
फेसबूकावरची टिपण्णी अनावश्यक वाटते. प्रश्न अटकेबरोबर पोलिसांच्या सिलेक्टिव्ह तत्परतेबद्दलही आहे. उद्या कुठल्या दुसर्या राजकिय पक्षाचा मोठा पुढारी गेला, आणि अशीच टिपण्णी कुणा शिवसैनिकाने केली तर काय करायचे? शिवसेना भवनवर/कोहिनूर टेक्निकलवर/राजमुद्रा हॉटेलवर हल्ला ? पोलिस शिवसैनिकाला अटक करतील? हल्लेखोरांना सोडतील?
20 Nov 2012 - 4:52 pm | स्पा
चिरोटा साहेब.. ज्याच्या कडे पावर आहे तोच जेत्ता .
बाकी कायदा बियदा गेला चुलीत
20 Nov 2012 - 5:24 pm | खटासि खट
असीम त्रिवेदीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या वेळी केस वेगळी होती का ?
20 Nov 2012 - 6:01 pm | हिटलर
माझ्या मते पोलिसांनी योग्य तीच कारवाई केली. लाखो लोक शोकाकुल होते, अशा नाजूक परिस्थितीत शाहीन ने केलेल वक्तव्य म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.
"Respect is earned, not given and definitely not forced.
अंत्यदर्शन घेण्यासाठी जो २० लाखांचा जनसागर आलेला ते देखील कोणी जोर जबरदस्ती करून आणलेले का?
Today Mumbai shuts down due to fear and not due to respect".
बाळासाहेबांनी मराठी आणि हिंदुत्वासाठी जे काही कार्य केल ते अतुल्य आहे. मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं. अन्याय सहन करू नका मेलो तरी बेहत्तर पण गांडूची औलाद म्हणून जगू नका हि शिकवण दिली. काहीही असो हा बंद ते नक्कीच deserve करत होते.
शाहीन ला अटक केली याचा निषेध करणारे आणि लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे कॉंग्रेस चे नेते जेव्हा असीम त्रिवेदीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली तेव्हा का मुग गिळून बसले होते?
महाराष्ट्रात रहायच असेल तर आमची संस्कृती आणि भावनांचा आदर करावाच लागेल. When you are in Rome do as the Romans do.
20 Nov 2012 - 6:19 pm | बाळ सप्रे
शाहीन ला अटक केली याचा निषेध करणारे असीम त्रिवेदीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली तेव्हा मुग गिळून बसले होते हा तुमचा जावईशोधच आहे !!
आणि प्रश्न २० लाखांच्या जनसागराच्या उस्फूर्ततेबद्दल नाहि आहे.. टिप्पणीच्या योग्यतेबद्दलही विशेष नाही .. प्रश्न ही टिप्पणी अटकयोग्य आहे का असा आहे..
अशाच "नाजूक" भावनावाल्यांनी जी कृती केलीय त्या कृतीच्या योग्य अयोग्यतेचा मुद्दा आहे !!
20 Nov 2012 - 7:21 pm | श्री गावसेना प्रमुख
अशाच "नाजूक" भावनावाल्यांनी जी कृती केलीय त्या कृतीच्या योग्य अयोग्यतेचा मुद्दा आहे !!
बर ठीक आहे यावर तुमच म्हणन काय आहे,ते सांगता का?
20 Nov 2012 - 9:41 pm | अप्पा जोगळेकर
सामना मधे २५ लाख लिहिले आहे. माझा एक शिवसैनिक मित्र म्हणाला ७० लाख.
मी विचारले की 'तुला कसे कळले?' तर तो म्हणाला. मी स्वतः शिवाजी पार्कला होतो. पाहूनच कळले.
इतर काही ठिकाणी १५ ते ५० च्या दरम्यान विविध आकडे होते.
मी टीव्हीवर गर्दी पाहिली. माझ्या मते हा आकडा १ कोटी असावा.पाहूनच कळले.
20 Nov 2012 - 6:51 pm | आनन्दा
Katju defends arrested cartoonist Aseem Trivedi
"PCI chief Katju condemns attack"
20 Nov 2012 - 6:52 pm | आजानुकर्ण
शिवसेनेच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केले असतानाही गुंडप्रवृत्तीच्या सैनिकांचा दवाखान्यावर हल्ला. मुलींना अटक व सुटका. इतपत चर्चाप्रस्ताव ठीक होता.
मात्र या प्रकरणाच्या चर्चेतही मुहम्मदाचे कार्टून आणि शिखांचे शिरकाण आलेले पाहून आनंद वाटला. तरी बरे उद्धव-राज-आदित्य वि. सोनिया-राजीव-राहूल-प्रियांका हेही अपेक्षित होते. तेवढे राहिले. असो राऊत यांचे 'मार्मिक' स्पष्टीकरण आले आहे. शिवसेनेने अटकेचे समर्थन केले आहे.
http://www.ndtv.com/article/india/facebook-arrest-row-we-support-police-...
20 Nov 2012 - 7:39 pm | मी-सौरभ
मूर्खांचा बाजार आहे हा सगळा....
20 Nov 2012 - 7:44 pm | निनाद मुक्काम प...
ज्या दिवशी साहेबांची अंत्ययात्रा होती त्या दिवशी माझ्या एका मित्राने त्यांच्या भागात एक मुस्लीम बेकारी उघडी असल्याचे सांगितले, म्हणून काही ती फोडल्या नाही गेली.
मुंबई १०० टक्के जर बंद नसेल तर किरकोळ तोडफोडीच्या घटना त्या दिवशी अजिबात घडल्या नाहीत.
ह्या मुली बाबत ही वेगळी घटना होती. तिने जी भाषा वापरली ह्यावर अशीच कारवाई योग्य होती.
ह्यापुढे देशात जेव्हा संवेदनशील परिस्थिती उत्पन्न होईल. तेव्हा सोशल मिडिया लिहितांना विशेष तारतम्य बाळगले पाहिजे. यासाठी भारतात कायदा अजून केला पाहिजे.
सरकारने विशेष लक्ष द्यावे. व ह्याची जाणीव जनतेला झाली पाहिजे.
उद्या दहशतवादी फेक प्रोफाईल उघडून जाणीवपूर्वक समाजात गोंधळ निर्माण करू शकतात.
20 Nov 2012 - 8:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>उद्या दहशतवादी फेक प्रोफाईल उघडून जाणीवपूर्वक समाजात गोंधळ निर्माण करू शकतात.
मग तर ही कारवाई Counter Productive आहे.
खरा उपाय आपण इतके अतिसंवेदनशील न राहणे हा नाही का ?
मग उघडू देत त्यांना ५०० फेक प्रोफ़ाईल्स आणि लिहु दे काहीही.
20 Nov 2012 - 9:33 pm | अप्पा जोगळेकर
सामना मध्ये 'पादरे पावटे' या नावाने एक सदर प्रसिद्ध होते. याशिवाय, 'वेडझवे','गांडू, 'अक्करमाशे' असले शब्द सामनाच्या संपादकीय लिखाणात पैशाला पासरीभर सापडतील. तेंव्हा सरकारने विशेष लक्ष दिले तर शिवसेनेलाच त्रास होईल.
21 Nov 2012 - 2:10 am | आबा
:)
21 Nov 2012 - 9:41 am | स्पा
+१
20 Nov 2012 - 7:51 pm | विकास
:-)
20 Nov 2012 - 8:14 pm | कपिलमुनी
त्याबद्दल काय म्हणना आहे ??
20 Nov 2012 - 8:33 pm | विकास
त्या पोरींनी लिहिला ते चुक कि बरोबर त्याबद्दल काय म्हणना आहे ??
तिचे लिहीणे चूक का बरोबर हे "relative" आहे. मी असे ठाकरे अथवा इतर कुणाबद्दलही लिहीले नसते. पण येथे मुद्दा आहे ते कायद्यानुसार आक्षेपार्ह होते का तसेच त्याहुनही अधिक व्यक्तीस्वातंत्र्याचा आहे. अर्थात हे व्यक्तीस्वातंत्र्य समान असावे इतकेच मी अधिक म्हणेन. म्हणजे सेनाप्रमुखांबद्दल लिहीले तर व्यक्तीस्वातंत्र्य आणि उद्या असेच कोणी केले तर ते आक्षेपार्ह असे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत बरोबर का चूक, असल्या कुठल्याच चिल्लर लिखाणाने काही फरक,पडणार नाही आणि कुणाला पडू नये, इतके प्रौढत्व असावे.
20 Nov 2012 - 8:57 pm | आजानुकर्ण
म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असेच ना?
20 Nov 2012 - 8:48 pm | मदनबाण
'फेसबुकप्रकरणी कारवाई बाऴबोधपणाची'
20 Nov 2012 - 9:06 pm | Nile
बाळासाहेब जाणार हे कळलं होतंच. ते काही अकस्मात जाण्याच्या वयाचेही नव्हते. त्यामुळे ते गेल्या गेल्या दंगा करणे किंवा आपल्या (कोणत्याही) मतांचे प्रदर्शन तातडीने करणार्यांबद्दल गंमत वाटते. म्हणजे दंगा करणारे, त्यांचे चाहते किंवा टिका करणारे ते जाण्याची वाटच पाहत थांबले होते का? नक्की भावनेचा उद्रेक की शक्तीप्रदर्शनाची संधी? असो.
फेसबुक इ. वर काहीतरी लिहलं म्हणून अटक करणं हास्यास्पद आहे. आपल्याकडे इतकं पोलीसबळ आहे हे माहिते नव्हतं.
20 Nov 2012 - 9:28 pm | पुण्याचे वटवाघूळ
फेसबुकवरील पोस्टमुळे त्या मुलींना अटक केली गेली हे धक्कादायक आहे आणि तितकेच निषेधार्हही आहे.
पण एक गोष्ट समजत नाही. हजारो-लाखो-कोटी लोक फेसबुकवर काहीतरी स्टेटस अपडेट करत असतात ती सगळी पोस्ट वाचणारे कोणी असते का?पालघरसारख्या लहान ठिकाणी कोणी लिहिलेली पोस्ट इतरांना कशी समजली?
20 Nov 2012 - 9:31 pm | आजानुकर्ण
कदाचित त्या मुलीच्या फेसबुकीय मित्रमंडळीपैंकी कोणीतरी ही बातमी शाखाप्रमुखापर्यंत पोचवली असावी. त्या मुलीला काही कारणास्तव धडा शिकवणे वगैरे हेतू त्यात असू शकतो. कॉलेजात काहीही घडू शकते.
20 Nov 2012 - 9:32 pm | विकास
म्हणूनच आधी म्हणले की यात स्थानिक पूर्ववैमनस्य / त्या मुलीच्या काकाच्या इस्पितळाची जागा वगैरे काही भानगडी पण आहेत का? जर २००० च्या जमावाला राडाच करायचा होता (अथवा तसा कुणाला तरी तो करून घेयचा होता) तर तो त्या मुलीच्या काकाच्या हॉस्पिटलवर का? असे अनेक प्रश्न पडतात... यात अर्थात राड्याचे समर्थन नाही.
20 Nov 2012 - 9:30 pm | खान
लोक साप सोडून भुई धोपटत आहेत. फेसबुकवर स्टॅटस लाईक करणे यासाठी कोणाला अटक होऊ शकते का, एवढाच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर 'अजिबात नाही' एवढंच आहे. मात्र हे मान्य करायची इच्छा नसलेले लोक कैच्याकै फाटे फोडत आहेत.
एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी कोणी तुरूंगात जायला लागलं तर आपली 'लोकशाही' नॉर्थ कोरियातल्या हुकुमशाहीपेक्षा भयानक होत चालली आहे, असं म्हणायला लागेल.
20 Nov 2012 - 9:34 pm | अप्पा जोगळेकर
त्या मुलीचे नाव 'शाहीन' होते हे शिवसैनिकांना राग येण्याचे मुख्य कारण असावे.
20 Nov 2012 - 10:13 pm | मदनबाण
मध्यंतरी चिदंबरम यांच्या मुलाला ट्वीट करण्यावरुन देखील एका व्यक्तीला पकडण्यात आले होते.
Arrest over tweet against Chidambaram's son propels 'mango man' Ravi Srinivasan into limelight
20 Nov 2012 - 10:16 pm | आजानुकर्ण
हे निषेधार्ह आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या मुलाच्या काकाच्या घरावर किंवा दवाखान्यावर दगडफेक व हल्ला केला असल्यास तोही निषेधार्ह.
20 Nov 2012 - 10:50 pm | विकास
माहिती तंत्रज्ञान खात्यासंदर्भातील "आय टी अॅक्ट अमेंडमेंट २००८ - सेक्शन ६६ ए" अनुसार:
Any person who sends, by means of a computer resource or a communication device,—
ऑफेन्सिव्ह म्हणजे काय हे ह्या संदर्भात पूर्णपणे संदिग्ध आहे. म्हणूनच तो कायदा कधिही वापराल जाऊ शकतो. पालघर प्रसंगात ठाकर्यांचे नाव असल्याने वापरला गेला. असिम त्रिवेदीच्या बाबतीत, चिदंबरम आणि सोनीयाजींच्या जावयाचे नाव आले म्हणून रवी श्रीनिवासन विरुद्ध आणि ममता बॅनर्जींबद्दल लिहीले म्हणून पश्चिम बंगाल मधील एका प्राध्यापकाविरोधात हा काय्दा वापरला गेला.
त्यामुळे प्रस्थापित कायद्यानुसार पोलीसांची चूक वाटत नाही. पण घटनेतल्या व्यक्तीस्वातंत्र्यास मान देऊन हा कायदा बदलायला हवा असे मात्र नक्की वाटते.
20 Nov 2012 - 11:07 pm | श्रीरंग_जोशी
या पोस्टपेक्षा कितीतरी आक्षेपार्ह पोस्ट्स लोक जालावर लिहितात. पण कुणीच पोलिसांकडे तक्रार करत नाही म्हणून पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. काही वेळा त्या साईटवर उपलब्ध असलेल्या पर्यायांनुसार काही संवेदनशील लोक त्या साईटच्या अॅडमीनकडे तक्रार करतात अन बरेचदा अशा पोस्ट अप्रकाशित केल्या जातात.
या कायदा फारसा जुना नाही अन काळानुसार त्यात योग्य त्या सुधारणा होतीलच हा विश्वास वाटतो.
बाकी मुळ धाग्यात व आपल्या प्रतिसादांमध्ये सदर घटना भाईंदरमध्ये घडल्याचे लिहिले आहे पण प्रत्यक्षात तर ती पालघरमध्ये घडली आहे.
20 Nov 2012 - 11:17 pm | आशु जोग
हुप्प्या साहेब
जरा कान इकडे करा. म्हणजे सांगतो माझं म्हणणं.
इथे काही लिहीलं तर अनर्थ होइल.
या धाग्यावरच्या प्रतिसादकारांनाही उद्या उचललं तर.
20 Nov 2012 - 11:24 pm | शिल्पा ब
प्रत्यक्षात ठाकरे यांनी मराठी माणसाला मुंबईत जगवलं आहे. मराठी मुंबईकरांसाठी ठाकरे नेहमीच आदरणीय आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने उस्फुर्त बंद पाळला गेला तर त्यात नवल नाही. त्या मुलीने जे लिहिले ते मुर्खपणाचंच आहे पण अटक करण्यासारखं काही नाही. हा केवळ वैयक्तिक वैमनस्याचा प्रकार वाटतो.
बाकी शिवसेना वि. काँग्रेस वगैरे नेहमीचंच.
21 Nov 2012 - 12:20 am | आशु जोग
आपल्या देशात खरीखुरी आणिबाणीही लागू झाली होती.
त्याचे समर्थक कोण कोण होते याचा जाणकारांनी अभ्यास करावा !
ज्यांना जाणून घ्यायचे असेल त्यांनी कान इकडे करावा .
पब्लिकली ते सांगता येणार नाही. लोक्सच्या भावना दुखावतील.
21 Nov 2012 - 12:53 am | टिल्लू
त्या मुलीने सांगीतले की तिला अटक झालेली नाही. पोलिसांनी फक्त पोलिस-स्टेशन मधे नेउन, मफिनामा लिहायला सांगितला, ज्याला तिने नकार दिला.
(साभार: युटूब टिवी९ चित्रफित.)
तरी सगळीकडे अटक झाली म्हणून का छापत आहेत.
ज्या मुलीला कोसो दुर असणार्या अणि कधिही न भेटेलेल्या/पाहिलेल्या "गाझा पट्टी" वासियांबद्दल येवढा कळवळा आहे (साभार तिचे फेबु.)
तर आम्हाला ठाकर्यांविषयी आदर असेल तर येवढा जळ्फळाट का?
अर्थात तीला कोणाचा कळवळा असावा याबद्द्ल काही म्हणने नाही, पण प्रवॄत्तीची चांगली असावी माणसाची.
अशावेळी भान ठेवुन असावे/वागावे.
जर तिला खरच अटक झाली असेल, तर पोलिसांची कॄती असमर्थनीय आहे.
टिपः मी शिवसैनिक नाही, कधीही नव्हतो.
21 Nov 2012 - 1:20 am | टिल्लू
शिवसैनिकांचा तिव्र निषेध.
21 Nov 2012 - 9:06 am | श्री गावसेना प्रमुख
तुमच्या निषेधाच्या गुंडाळ्या करुन मुख्यमंत्र्याकडे द्या पाठवुन.
21 Nov 2012 - 9:24 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत त्या काटजू नावाच्या तथाकथित विचारवंत माणसाने केले आहे त्याप्रमाणे. जर कोणाला समाजहीतापेक्षा एखाद्याची अभिव्यक्ती इतकी महत्वाची वाटत असेल तर त्याला सरळ फाट्यावर मारले जावे. आणि असल्या आचरट असंवेदनशील व्यक्तीच्या अभिव्यक्तीची चिंता करण्याची काही गरज आहे असेही वाटत नाही. पोलिसांनी तसे केले असेल तर पोलिसांचे अभिनंदन करायला पाहीजे. :)
21 Nov 2012 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख
काटजु च्या अगोदर त्या जागेवर कोनीही नव्हते काय?
तो म्हणतो की तुम्ही कारवाइ नाही केलि तर तुम्ही राज्य चालविण्यास असमर्थ आहात् असे मी समजेन,उद्या तुझ्याबद्दल लिहीले तर तु काय करशिल म्हणाव.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे उचलली जिभ लावली टाळ्याला असे नव्हे.
21 Nov 2012 - 3:23 pm | मालोजीराव
.
21 Nov 2012 - 2:37 am | आजानुकर्ण
गालबोट हा साधारणपणे 'एखाद्या चांगल्या गोष्टीला लागलेली नजर' यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. प्रस्तुत घटनेच्या संदर्भात हा शब्दप्रयोग श्री. हुप्प्या यांना का करावासा वाटला हे समजले नाही.
21 Nov 2012 - 1:10 pm | गवि
"(हिंसाचाराचं) गालबोट नको" हाच शब्दप्रयोग मा. बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या आजारात आणि मृत्यूप्रसंगाबाबतही टीव्ही चॅनेल्स आणि अनेक वक्त्यांकडून वापरला जात होता, तेव्हाही हाच प्रश्न पडला होता. त्यावेळी तो फार महत्वाचा नव्हता आणि कोणाला विचारणार आणि काय करणार, हेही होतंच.. मराठीतले शब्दप्रयोग, वाक्प्रचार चुकीच्या संदर्भात वापरणं हे इतकं कॉमन झालं आहे की ते कधीकधी जाणवतही नाही.
.. शांतता राखण्याचं "आव्हान"..
.. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन"
.
इत्यादि..
..
21 Nov 2012 - 8:31 am | प्रशु
फेसबुक वर अश्या गोष्टी लिहिणार्या लोकांवर दुर्लक्ष केलेला बरं, माझा एक बिहारी मित्र पऊ ह्याच आशयाचे स्टेट्स टाकत होत. एक दोन वेळेस त्यास सांगुन पाहिले पण त्याने तेच सुरु ठेवला. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही इ. बद्द्ल बोलत होत. मी सर्ळ त्याला माझ्या मित्रयादी तुन काढुन टाकले.
गम्मत अशी कि त्याला व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही च्या बिहार, उ. प्र. मध्ये होणार्या गळचेपी बद्द्ल कधी फेसबुक वर लिहावे वाट्ले नाही.
21 Nov 2012 - 1:36 pm | चिगो
चालू द्या..
21 Nov 2012 - 2:10 pm | अनामिका
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर
ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात, पण जग चालूच असते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मृत्यूनंतर दोन मिनिटांची शांतता पाळली गेली, त्यांच्याच बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग सक्तीने बंद पाळावा का?’ काहीशी तशीच पण अस्पष्ट प्रतिक्रिया आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनीही ट्विटर माध्यमातून व्यक्त केली होती. पण त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. मात्र पालघरच्या त्या मुलीच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्याने तक्रार नोंदवली आणि तिच्यासह तिच्याशी जाहीर सहमती व्यक्त करणार्या दुसर्या एका मुलीला पोलिसानी अटक केली. नंतर त्या मुलीच्या काकांच्या पालघरमधल्या इस्पितळावर जमावाने हल्ला केला व मोडतोड केली. त्या मुलीने आपली प्रतिक्रिया पुसून टाकली होती. मग सोमवारी वाहिन्यांवर त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावर मोठमोठे विद्वान चर्चा करत होते. पोलिस, शिवसैनिकांचा धुडगुस व त्या मुलीचे स्वातंत्र्य अशा विषयावर आपापले शहाणपण मिरवण्याची अहमहमिका चालू होती. मात्र आपण काय बोलतो त्याचे भान त्या चर्चेमध्ये सहभागी होणार्या किती लोकांना होते; याचीच शंका आहे. फ़ेसबुकला सोशल मीडिया म्हणतात, अविष्कार स्वातंत्र्य हे दुसर्याला बाधा आणण्यासाठी नसते, प्रसंग काय होता. भगतसिंग वगैरे स्वातंत्रासाठी बलिदान करणारे होते. इत्यादी गोष्टी या शहाण्यांना माहिती तरी आहेत काय, याचीच शंका आली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीने ती प्रतिक्रिया लिहिली, ती प्रतिक्रिया तरी यातल्या कोणी वाचली होती काय याचीही शंका आहे. शिवाय स्वातंत्र्य देताना वा घेताना तो आगीशी खेळ असतो याचीही जाणिव कुठे दिसली नाही.
एक मुद्दा पहिला घेऊ. फ़ेसबुक वा अन्य इंटरनेटचे जे माध्यम आहे, त्याला सोशल मीडिया म्हणतात. त्यात सोशल याचा अर्थ सामाजिक असा होतो; याबद्दल तरी वाद होण्याचे कारण नाही. आणि म्हणूनच जे काही सामाजिक असते; त्याचा वैयक्तीक हेतूने व सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणण्यासाठी वापरणे सामाजिक म्हणता येणार नाही, हेसुद्धा मान्य करावेच लागेल. ज्यामुळे सामाजिक शांतता व सौहार्दाला बाधा येऊ शकते वा आणली जाते; अशा कुठल्याही कृतीला असामाजिक म्हणतात, याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही. इथे समाज म्हणजे मोठी लोकसंख्या असा अर्थ होतो. संपुर्ण समाज वा देशाची संपुर्ण लोकसंख्या, असाच त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे त्याच लोकसंख्येतील एखादी व्यक्ती, मोठ्या लोकसंख्येला विचलित करणारे कुठलेही कृत्य करणार असेल वा करत असेल; तर त्याची ती कृती असमाजिक ठरते. मग तो बॉम्बस्फ़ोट असो, हिंसाचार असो किंवा हिंसाचाराला प्रवृत्त करणारे शब्द वा आवाहन असो. या मुलीने जे माध्यम वापरले ते फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यम आहे, त्याचा वापर तिने कोणत्या सामाजिक हितासाठी केला आहे काय? ज्या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यावर पंचविस लाख लोक उतरले आहेत व त्यांच्या भावना कमालीच्या हळव्या आहेत, त्यांचे मन विचलित करणारी प्रतिक्रिया त्या वेळी व्यक्त करणे समाजहिताचे कृत्य होते काय? आणि असे लिहिण्यासाठी सामाजिक माध्यम वापरणे, हीच मुळात समाजविघातक कृती नाही काय? आपल्या प्रतिक्रिया व मते आपल्यासाठी माह्त्वाची आहेत, पण त्याचा जाहिर उच्चार केल्याने, कुणाच्या भावना दुखावणार असतील व त्याचे प्रक्षुब्ध प्रतिसाद उमटू शकतात, हे माहिती असेल, तर ते बोलण्या व व्यक्त करण्याचा हेतू शुद्ध रहात नाही. मग ती व्यक्तीगत प्रतिक्रिया रहात नाही तर डिवचण्याचा मामला होऊन जातो.
एक उदाहरण घेऊ. ती मुलगी बंदच्या विरोधात लिहिते आहे काय? ती सक्तीच्या बंदच्या विरोधात बोलते आहे काय? एकूणच वाहिन्यांच्या व माध्यमांच्या चर्चेतला सूर असा होता, की तिच्या बंदविषयक मताची गळचे्पी करण्यात आली व त्यासाठीच पोलिसांनी तिला विनातपास अटक करून गजाआड ढकलले, असे भासवले जात होते. पण ती माध्यमांची शुद्ध बदमाशी होती. त्या मुलीने जे काही लिहिले ते संपुर्ण सांगितले जात नव्हते. तिच्या प्रतिक्रियेतून लोकभावना दुखावण्याचा मुद्दाम केलेला प्रयास व हेतू लपवला जात होता. तिने सक्तीच्या बंद विरोधात भूमिका मांडली असती वा प्रतिक्रिया दिली असती, तर नक्कीच इतके तीव्र पडसाद उमटले नसते. पण त्या मुलीची प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहे. बंदमुळे आपल्या अडचणी वाढल्या वा त्रास झाला; याबद्दल तिची तक्रार अजिबात नाही. तिला त्याबद्दल तक्रारच करायची नाही. तिला कोणाच्या तरी भावना दुखावण्यातच रस होता आणि तेच तिच्या संपु्र्ण प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून येते. जे काही तिने लिहिले आहे, त्या शब्दाचे अर्थ तिला कळत नसावेत किंवा जाणीवपुर्वक तिने जा गुन्हा केलेला आहे. आपण जे शब्द लिहितो आहे, त्यातून समाजात प्रक्षोभ निर्माण होईल, हे तिला कळत नसले तर ती मुलगी सोशल मीडियाचा वापर करण्यास अपात्र आहे आणि म्हणुनच ते माध्यम वापरण्याचा मर्यादाभंग तिने केलेला आहे. म्हणूनच चर्चा करताना तिचे सर्व शब्द वा फ़ेसबुकवरील पोस्ट; माध्यमे लपवित होती. त्यातला प्रक्षोभक भाग लपवून सगळी चर्चा चालली होती.
ती आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी एक कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली आहे, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय? बाकी सगळ्या गोष्टी व मुद्दे बाजूला ठेवून केवळ तिच्याच बाबतीत असा भावनिक प्रसंग आला; तर तिची प्रतिक्रिया काय असेल, त्याचा चर्चेत पाल्हाळ लावणार्यापैकी एकाने तरी विचार केला काय?
शनिवार रविवारी मुंबईची जी परिस्थिती होती, त्यात किमान पंचविस तीस लाख लोकांना आपल्याच घरातील, कुटुंबातील कोणी आप्तस्वकीय प्रियजनाचा मृत्यू झाल्याची भावना होती. मुंबई बाहेर अनेक गावात शहरात वस्त्यांमध्ये तीच शोकाकूल भावना होती. हे त्या मुलीला कळत नसेल, तर तिला फ़ेसबुक वगैरे माध्यम वापरण्याची मुभाच असता कामा नये. कारण ज्यातून लोकांच्या संपर्कात रहावे, अशी सुविधा देण्यात आली आहे, त्याचाच वापर त्या मुलीने इतरांच्या भावना दुखावण्यासाठी व त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी हेतूपुरस्सर केला आहे. तिची प्रतिक्रिया एकाच मैत्रीणीला आवडली आणि तिच्या प्रोफ़ाईलवर फ़ारसे मित्र नाहीत असा दावा दिशाभूल करणारा आहे. कारण फ़ेसबुकवर तुम्ही जे लिहिता, ते अब्जावधी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचते करण्याची क्षमता आहे. म्हणूनच विनाविलंब त्याबद्दल पोलिसात तक्रार होऊ शकली. ज्यांनी तक्रार केली ते तिच्या मित्रयादीमध्ये नव्हते, तरीही त्यांच्यापर्यंत ती प्रतिक्रिया पोहोचली व त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. म्हणजेच एकालाच आवडले हा बचाव फ़सवा आहे. मुद्दा आहे, तो अविष्कार स्वातंत्र्याचा नसून दुसर्याच्या भावना दुखावण्यासाठी वा त्यातून समाज स्वास्थ्य विघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायची मुभा असावी काय, असा मुद्दा आहे. ज्यांना साधन वापरण्याची अक्कल वा भान नाही त्यांच्या हाती अशी साधने द्यावीत काय, हा मुद्दा आहे. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल वाजवून सत्य लपवण्याचे कारण नाही. कुठल्याही गुन्ह्याचा तपास व दोषपात्र ठरवण्याची प्रक्रिया हेतू तपासून होत असते. या मुलीचा हेतू गुन्हा करण्याचा होता काय? ( क्रमश:)
-भाऊ तोरसेकर
http://bhautorsekar.blogspot.in/2012/11/blog-post_20.html
21 Nov 2012 - 2:31 pm | आनन्दा
+१
21 Nov 2012 - 10:25 pm | अप्पा जोगळेकर
शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर ठीक आहे. तोडफोड का केली याचे उत्तर आहे काय? तो गुन्हाच नाही असे म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी. कालच्या सामना मध्ये संजय राऊतने बाळासाहेबांची तुलना शिवाजी राजांशी केली आहे. एक मराठी माणूस म्हणून मला स्वतःला हे अतिशय वेदनादायक वाटले. आजच्या एकाही राजकारणी माणसाची शिवाजी महाराजांशी तुलना करणे ही मला महाराजांची अवहेलना वाटते.
आता मी एक सामान्य माणूस म्हणून काय करावे? माझ्याकडे झुंड नाही त्यामुळे मी सामनाचे ऑफिस फोडू शकत नाही. पोलिसांकडे तक्रार करावी तर मलाच आत टाकतील ही भीती आणि आंतरजालावर काही लिहावे तर शिवसैनिक झोडतील ही भीती. आपणच मार्गदर्शन करावे.
- घाबरलेला
शिवसैनिकांचे शिवप्रेम मरुन गेले असे समजावे काय?
22 Nov 2012 - 10:21 am | श्री गावसेना प्रमुख
अप्पा साहेब जाउ द्या,तुलना केली ना त्यांचा अवतार होते असे तर नाही ना बोलले
त्यांच्या साठी बाळासाहेब दैवतच होते,भावनेच्या भरात होउन जाते,जयललीता समोर नाही का त्यांचे मंत्री लोटांगन घालतात.
21 Nov 2012 - 2:11 pm | इरसाल
. शांतता राखण्याचं "आव्हान"..
.. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन"
गवि हे उलटे झालेय.
आवाहन म्हणजे विनंती
आव्हान म्हणजे मराठीत चॅलेंज चॅलेंज
21 Nov 2012 - 2:29 pm | गणपा
आरं येड्या गविने हल्लीची माध्यमे काय 'गुण' उधळतात त्याचा दाखला दिला आहे. :)
सरपटी बॉलवर विकेट फेकलीस गड्या तू. ;)
21 Nov 2012 - 2:39 pm | गवि
धन्यवाद..
एक बारीक बदल.. "हल्लीची" नव्हे.. माझ्या ऐकण्यात येणारी माध्यमं अगदी आठवतात तेव्हापासून कमीजास्त फरकाने.
"पूर्वी" माध्यमात काय शब्दप्रयोग होत होते हे न ऐकल्याने त्याची माहिती नाही. त्यामुळे पूर्वी योग्य रचना व्हायची याला काही आधार नाही. मुळात "हल्ली" हा बद्धकोष्ठी शब्द मला नापसंत आहे म्हणून इतकं स्पष्टीकरण.
बाकी सर्व बरोबर. :)
21 Nov 2012 - 3:13 pm | इरसाल
ये नो बाल पक्कडके मेर्को केलने दो ना तोडा .
21 Nov 2012 - 2:35 pm | मी_आहे_ना
अहो त्यांनी उपरोधिक उदाहरणे दिलियेत.
21 Nov 2012 - 2:40 pm | अनामिका
21 Nov 2012 - 5:11 pm | स्पा
अहो अनामिका तै
त्ये वागल्यांच ब्येन्न " सर्वपक्षीय मार" खाऊन देखील बघा कस दिमाखात उभ है
21 Nov 2012 - 10:33 pm | अप्पा जोगळेकर
निखिल वागळे म्हणजे पार्श्वभागामध्ये मिरचीचा ठेचा भरलेले वटवाघूळ आहे असे विधान शिवसेनेच्या कुठल्यातरी नेत्याने केल्याचे स्पष्टपणे आठवते आहे. अर्थात ही फार जुनी गोष्ट असल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही. अर्थात ते शिवसेनेच्या नेत्याने केले होते त्यामुळे ते बरोबरच असणार असे मानले पाहिजे.
21 Nov 2012 - 5:22 pm | हिटलर
+१
21 Nov 2012 - 10:24 pm | आशु जोग
सूर्याची पिल्ले..?
21 Nov 2012 - 10:24 pm | आशु जोग
सूर्याची पिल्ले..?
याला काय म्हणावे
28 Nov 2012 - 8:19 pm | विकास
विषय एका अर्थी तोच असल्याने नवीन चर्चा चालू करण्या ऐवजी येथेच देत आहे...
राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, एकाला अटक
28 Nov 2012 - 11:36 pm | खटासि खट
असीम सरोदे (पुन्हा असीम) सांगत होते कि भाषा शिवराळ असल्याने अटक समर्थनीय आहे. कायदेतज्ञ असल्याने विश्वास ठेवण्यास हरकत नसावी.
असीम त्रिवेदीच्या बाबत ज्या मानकांचा सन्मान करायचा त्यांच्याबाबत हीन अभिरूचीपूर्ण चित्रे जाणिवपूर्वक प्रदर्शित केली असं म्हणता येईल. त्या वेळी असीम त्रिवेदीचं वय २४ असल्याने बच्चा है, जाने दो असा सूर सर्वत्र होता. भारतीय राज्यघटना, संसद आणि मानचिन्हे याबद्दल कुणाच्याही कुठल्याही भावना दुखावण्याचा प्रश्न नसल्याने कारवाई मागे घेण्यात आली होती पण त्रिवेदींनी जामीन नाकारल्याने अटक झाली.
बाकि भारत या देशात बुद्धीजीवी आणि भाव(ना)जीवी असे दोन वर्ग असल्याने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सध्या गरज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
28 Nov 2012 - 11:43 pm | निनाद मुक्काम प...
फेसबुक प्रकरणावरून झालेला वाद ,अटक , अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खच्चीकरण अश्या सर्व मुद्यांवर माझे मत
सोशल मिडिया सगळ्यासाठी नवीन आहे आता ह्या संस्कृतीला कुठे पालवी फुटली आहे.
त्यांचे संकेत , अलिखित नियम काय असावेत हे अजून ठरले नाही आहे तर ठरत आहे.
अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्याने समाजातील प्रत्येकाला दिले आहे ह्याचा अर्थ असा नाही की वर्षोवर्ष मनात साठवलेली खदखद ,त्रागा ह्या जागतिक व्यासपीठावर कुठेही ,कसाही ,कोणावरही काढावा ,
वड्याचे तेल वांग्यावर काढू नये असे मला वाटते.
भारतात जेथे भावनेचे राजकारण करणे ही नेहमीची बात आहे. जेथे प्रत्येक समजा कोणासाठी ,कोणत्यातरी मुद्यावर ,व्यक्तीसाठी प्रचंड संवेदन शील आहे.
भारतीयांचे अर्थ शास्त्रानुसार वर्गीकरण म्हणजे कनिष्ठ , मध्यम ,उच्च वर्गीय असे केले तरी ह्या स्तराला देखील जातीचे , धर्माचे , अस्तर लावलेले असते.
तेव्हा व्यक्त व्हा ,पण संयमित पणे
30 Nov 2012 - 5:38 pm | अनामिका
फेसबुक प्रकरणामुळे जन्माची अद्दल घडलेली अतिशाहाणी शाहिन दाढा शांतता हवी म्हणुन गुजराथमधे स्थालंतरीत होते आहे असे समजले ..चला अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींचे भाजपा शासित गुजराथ हे राज्य वास्तव्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी शासित महाराष्ट्राच्या तुलनेत योग्य असल्याची जाहिरात विनामोबदला केल्याबद्दल शाहिन दाढाचे आभार..