Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप-लेले on Sun, 03/05/2017 - 13:15
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सुंदरी उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे बरा वैमानिकही

Submitted by एस on Sun, 03/05/2017 - 15:55

Permalink

छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.

छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 03/05/2017 - 15:57

Permalink

छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.

छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 03/05/2017 - 16:03

Permalink

हे बहुदा उलट हवं !

विमान असते धावत जेव्हां, वाटे बरा वैमानिकही उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे हवी हवाई सुंदरी
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप-लेले on Sun, 03/05/2017 - 17:47

In reply to हे बहुदा उलट हवं ! by संजय क्षीरसागर

Permalink

खुलासा

विनोदाने म्हणत असाल तर ठीक आहे. वैमानिकाकडे विमानाचा कंट्रोल असतो. या अर्थी तसं लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sun, 03/05/2017 - 23:02

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप-लेले on Mon, 03/27/2017 - 18:22

Permalink

धन्यवाद

आज पाहिल्या काही प्रकतीक्रीया. सर्वांचे आभार :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2067 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com