परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in काथ्याकूट
15 Feb 2017 - 9:46 pm
गाभा: 

बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.

माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.

सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.

आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.

इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.

मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.

पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.

हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.

परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.

प्रतिक्रिया

फेरफटका's picture

20 Feb 2017 - 9:27 pm | फेरफटका

"भारतीय संस्कृती महान, त्यांच्याकडे फक्त पैसा आणि साधन संपत्ती " हा भारतीयांनी करुन घेतलेला गोंडस गैरसमज आहे - अहंकार कुरवळायला बरं पडतं मग !" - बुल्स आय!! हा धागा सुरू झाल्यापासून हेच डोक्यात येत होतं. पु. लं. च्या 'नागपूरकर' सारखं, 'तुम्हाला अस्सल नागपूरी खाक्या दाखवायचा असेल तर तुम्हाला खुद्द नागपूरात राहून चालणार नाही' ह्या धर्तीवर 'सत्य, निर्भयता, प्रामाणिकपणा, कुतूहल' ई. गुणधर्मांनी नटलेली 'भारतीय संस्कृती' जपायची असेल, तर तुम्हाला भारताबाहेर, प्रगत देशात राहून ती अधिक चांगल्या प्रकारे जपता येते.

बाकी पुढच्या पिढीचं काय होईल वगैरे गोष्टींना एकच सांगता येईल, की झाडाची फळं झाडापासून फार लांब पडत नाहीत. त्यामुळे आई-वडील, सद्गुणी, सदाचारी असतील, तर मुलं काही वाईट मार्गानं जात नाहीत. बाकी संस्कृती, मुल्यं ही कालानुरूप बदलणार्या गोष्टी आहेत आणी ते बदलणारच. आपल्या स्वतःच्या आयुष्यात कित्येक गोष्टी आपण बदलत असतो, मग त्या पिढीनुरूप बदलल्या तर आश्चर्य ते काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2017 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ.

+१,००,०००. लाखाची गोष्ट !

"कोणती गोष्ट कोठे किती प्रमाणांत आहे" आणि "हे जग केवळ काळ्या किंवा पांढर्‍या रंगाने बनलेले नसून, एकाच ठिकाणी एकाच जनसमुदायातसुद्धा ते रंग कुटुंब/व्यक्तीपरत्वे (सरसकटीपणा टाळून) कमीजास्त प्रमाणात आस्तित्वात असतात"; ही तथ्ये संस्कृतीच्या गोष्टी आल्या की, सहजपणे विसरल्या जातात आणि "आम्ही विरुद्ध ते" असा सामना सुरू होतो. अगदी "भले उसकी कमीज मेरे कमीज से अधिक सफेद कैसी हो सकती है ।" या तालावर :)

गम्मत म्हणजे "अशी (किंवा कोणतिही) तुलना करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या विश्वासू तथ्यांचा अभ्यास किंवा स्वानुभव" याची किमान गरज आहे हे विसरले जाते... मुद्दा स्प्ष्ट करण्यासाठी जरासे टोकाचे पण त्याच पठडीतले उदाहरण द्यायचे झाले तर... हिंदू/मुस्लीम/ख्रिश्चन धर्मांबद्दल (दुर्)अभिमानाने बोलताना वेद-उपनिषद-पुराणे/कुराण/बायबल यांचे सार समजण्याइतका अभ्यास सोडाच पण वाचनही केलेले नसले तरी हरकत नसते. ;)

निशदे's picture

20 Feb 2017 - 11:40 pm | निशदे

उत्तम प्रतिसाद आहे.
पिरा, तुम्हाला संदेशातून जे सांगितले होते ते जास्त योग्य स्रुजांनी सांगितले आहे.

मराठी_माणूस's picture

21 Feb 2017 - 11:03 am | मराठी_माणूस

त्या देशांनी जे करुन दाखवलंय त्यासाठी प्रचंड प्रमाणात सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागते. आपला देश साफ राहिला पाहिजे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे हे तिथल्या प्रत्येकाला मनापासून वाटलं आणि आज ४ पिढ्या झाल्या तरी ते लोकं ती मुल्यं मनापासून जपतात.

हे इतके सगळे छान छान असेल तर गोंधळुन जायचे काहीच कारण नाही. तरीही निर्णय घ्यायला एव्हढा का त्रास होतो ते समजत नाही.

रेवती's picture

20 Feb 2017 - 9:16 pm | रेवती

आपण त्या ठिकाणी न राहता, तेथील आयुष्य न अनुभवता केवळ कुठल्यातरी स्टडीजवर विसंबून स्वत:च्या लेखनात, प्रतिसादात त्याचे सरसकटीकरण करणं व ज्या मुलांचा व तुमचा काडीमात्र संबंध नाही त्यांच्यावर आरोप करणं यासाठी मला भारतीय पालकांचे सरसकटीकरण करण्याची गरज नाही कारण तसे ते नसतेच. माफी तर तुम्ही मागणे लागू होतेच. पुन्हा असे बोलणे, न बोलणे हा तुमचा हक्क असल्याने तुमच्यावर सोडते. आमच्या मुलांचे तुमच्यावर कसलेही ओझे नसताना व त्यांनी तुमच्यावर कसलेही आरोप न करता तुम्ही बोलावेत हे अजिबात आवडलेले नाही, तो तुमचा अधिकारही नाही.

गवि's picture

20 Feb 2017 - 9:23 pm | गवि

वरील स्रुजा यांच्या प्रतिसादाने आणि तुमच्या या प्रतिसादाने अमेरिकेविषयी माझे असलेले प्रचंड गैरसमज दूर झाले. तिथल्या मूल्यांविषयी का कोण जाणे पण जगभर चुकीचे समज आहेत हे मान्य करावं लागेल.

कोणा एकाला व्यक्तिगत उद्देशून काहीच नव्हतं. दोन्ही बाजूंनी सरसकटीकरण होणं चुकीचंच. तेव्हा पुन्हा एकदा क्षमस्व.

बॅटमॅन's picture

22 Feb 2017 - 11:35 pm | बॅटमॅन

माफी , अधिकार वगैरे वाचून फारच मनोरंजन झाले. जालीय कमेंटींना किती सीरियस घ्यायचे हे नेटावर इतकी वर्षे काढूनही कळत नसावे किंवा कसे, याबद्दल शंका उत्पन्न होते खरी.

ट्रेड मार्क's picture

21 Feb 2017 - 1:08 am | ट्रेड मार्क

तुम्ही अमेरिकेत किती राहिलात ते मला माहित नाही, परंतु बाहेरून बहुतांशी लोकांचा, अगदी माझ्यासकट, असाच गैरसमज असतो की अमेरिकेत अगदी फ्री सेक्स चालतो. नुसता मुलीला इशारा करायचा अवकाश की काम फत्ते झालंच समजा. मी पहिल्यांदा अमेरिकेत आल्यावर काही दिवसांनी टीव्हीवर एक मुलाखत ऐकली ज्यात बऱ्याच माता आपल्या ९-१० वर्षांच्या मुली/ मुलांबद्दल काळजीत असलेल्या दाखवलेल्या होत्या. त्यांना त्यांच्या मुलांसाठी एवढ्या लहान वयात STD वर ट्रीटमेंट घ्यायला लागली होती. ते ऐकून माझा असाच समज झाला होता की इथे फारच वाईट परिस्थिती आहे. पण नंतर इतरांच्या व स्वतःच्या अनुभवांती समजलं की अगदी फ्री सेक्स म्हणजे कोणी पण कधी पण कुठेही इच्छा झाली की चालू होतात असं अजिबात नाहीये. पीअर प्रेशर वगैरे प्रकार सगळीकडेच असतात. पण इथे शाळेत वयात येत असलेल्या मुलामुलींना अगदी डिटेलवार सेक्स एजुकेशन देतात. नकळत्या वयात संबंध आल्याने कुठले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम होतात ते समजावलं जातं.

मी तर म्हणतो की भारतापेक्षा अमेरिकेत बरी परिस्थिती आहे. कारण
- मुलगी कसे कपडे घालते यावर तिचं चारित्र्य ठरवलं जात नाही.
- तसेच तोकडे कपडे घातलेत म्हणून, भारतात जसे अगदी १२-१३ वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे त्या मुलीला वरपासून खालपर्यंत स्कॅन करतात, तसे अमेरिकेत कोणी करत नाही.
- मुलाने विचारूनही मुलीने नाही म्हणल्यावर परत तो मुलगा त्रास देत नाही.
- जरी अगदी पौगंडावस्थेतल्या मुलाचा / मुलीचा संबंध आलाच तरी इथे लोक त्या मुलीला घाण चारित्र्याची म्हणून जगणे अशक्य करत नाहीत.
- अश्या संबंधातून त्या मुलीला जरी गर्भधारणा झालीच तर गर्भ ठेवायचा की नाही हे त्या मुलीच्या इच्छेवर असते. ती मुलगी असे मूल जन्माला घालून नंतर व्यवस्थित वाढवू शकते. कुमारी माता म्हणून समाजात तिला वेगळी वागणूक मिळत नाही.

मुळात सेक्सकडे एखादी लपून छपून करायची घाण गोष्ट म्हणून इथे पाहत नाहीत. पण म्हणून सार्वजनिक जागेत सरसकट सगळे चालते असे नाही. भारतातून नवीन आलेल्याला इथे सांस्कृतिक धक्के बसतात नाही असं नाही. पण म्हणून बडगा दिसतो हे खरं नाही. उलट माझ्या अनुभवावरून मला असं वाटतंय की इथे मुलींपेक्षा मुलं शामळू असतात.

संदीप डांगे's picture

21 Feb 2017 - 4:21 am | संदीप डांगे

बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो नाही हे आधीच कबूल करतो. जे काही समजु शकतं ते तुमच्यासारख्या तिथे प्रत्यक्ष जाऊन आयुष्य जगणार्‍या लोकांकडूनच.

पण आपल्या ह्या प्रतिसादात विसंगती आढळत आहेत.

१. टीव्हीवर एक मुलाखत ऐकली ज्यात बऱ्याच माता आपल्या ९-१० वर्षांच्या मुली/ मुलांबद्दल काळजीत असलेल्या दाखवलेल्या होत्या. त्यांना त्यांच्या मुलांसाठी एवढ्या लहान वयात STD वर ट्रीटमेंट घ्यायला लागली होती. ते ऐकून माझा असाच समज झाला होता की इथे फारच वाईट परिस्थिती आहे.
२. नंतर इतरांच्या व स्वतःच्या अनुभवांती समजलं की अगदी फ्री सेक्स म्हणजे कोणी पण कधी पण कुठेही इच्छा झाली की चालू होतात असं अजिबात नाहीये.

दुसर्‍या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय?
९-१० वर्षांच्या मुला-मुलींना एसटीडीवर ट्रीटमेंट घ्यायला लागणे आणि फ्री-सेक्सची तुमची (स्वरचित) व्याख्या ह्यात तुम्ही जो संबंध लावत आहात तो विषय एक असला तरी कार्यकारणभाव एक नाही. कोणी-पण-कधी-पण-कोठेही- चालू होणे आणि विचारपूर्वक-ठरवून चालू होणे ह्याचा एसटीडीबाधित होण्यावर फरक पडू शकतो का असा मला प्रश्न पडला.

इथे शाळेत वयात येत असलेल्या मुलामुलींना अगदी डिटेलवार सेक्स एजुकेशन देतात. नकळत्या वयात संबंध आल्याने कुठले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम होतात ते समजावलं जातं.

>> असे असूनही टिव्हीवरच्या मुलाखतीत जे दाखवलं जातं तेही होतच आहे ना? की ती मुलाखत एक फिक्शन आहे? मुलाखतीतल्या मुला-मुलींना शिकवलं-समजवलं गेलं नाही?

आता तुम्ही सांगितलेली परिस्थिती बघूया.

मुलगी कसे कपडे घालते यावर तिचं चारित्र्य ठरवलं जात नाही.
>> मग कशावरून ठरते? की ठरतंच नाही?
मी जरा गुगलून पाहिलं 'मुलगी कसे कपडे घालते' ह्यावर अमेरिकनांमध्ये काही विचार असतात की नसतात.

खालील ब्लॉग, लेख, दुवे हे अमेरिकन लोकांचे आहेत, ते म्हणतायत, डिस्कस करतायत ते खरं समजायचं की खोटं?

https://www.bustle.com/articles/83035-7-reasons-to-stop-shaming-women-wh...
http://fashion.allwomenstalk.com/this-is-why-its-time-to-stop-judging-wo...
http://www.popsugar.com/fashion/Judging-Women-Clothes-Campaign-37122437#...
आत्ता तीनच दिलेत.. अनेक दुवे आहेत जालावर. इच्छुकांनी लाभ घ्यावा.


- तसेच तोकडे कपडे घातलेत म्हणून, भारतात जसे अगदी १२-१३ वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे त्या मुलीला वरपासून खालपर्यंत स्कॅन करतात, तसे अमेरिकेत कोणी करत नाही.

>> भारतात तसे करतात, नाकारणार नाहीच कोणी. कारण तोकडे कपडे घालणे शक्यतो बहुसंख्य घरांमध्ये मान्य नसतं. ही आपली (म्हणजे इथेच राहिलेल्या बहुसंख्य भारतीयांची) विचारसरणी आहे. आता वेगळं काही (तोकडे कपडेच नाही, काहीही घातलं तरी) दिसलं की ते न्याहाळलं जातंच. त्याचे कारण आपल्याला शेकडो वर्षांच्या सामाजिक ठेवणीत झालेले फिजिकल (म्हणजे शारिरीक नाही) बदल हे मानसिक बदलापेक्षा तुफान वेगाने झालेले आहेत. अशी स्कॅनिंग होणे अचानक एका रात्रीत जाणार नाही. तुम्हाला आता ते जाणवतं कारण तुम्ही नवीन वेगळी संस्कृती बघितली आहे. (तरी वरच्या लिण्कांमध्ये तीही फार वेगळी नाही असं दिसतंच आहे)

इकडच्यांना आपण काहीतरी चूक करतोय हे जाणवत देखील नाही. स्त्रियांनी प्रचंड संख्येने उंबरा ओलांडून मुक्तपणे फिरणे हे इथल्या पुरुषी वर्चस्वाला अजून पचनी पडलेले नाही, 'उच्छृंखल स्त्रिया अशीच वेषभूषा करतात' अशी विचारसरणी इथे जनमानसात (अगदी स्त्रियांत्+पुरुषांत+शिक्षित इ. सर्वांत) बहुतेक करुन आहेच. हे चित्र बदलत जाणार आहेच. अजून पन्नास-शंभर वर्षाने भारताबद्दल कोणाला वरचे विधान उच्चारायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने ह्या आणि येणार्‍या पिढ्यांना घडवणे होण्यासारखी गोष्ट आहे. ते इथे राहणार्‍यांनाच करायला लागेल. इथून परदेशात कायमस्वरुपी स्थाईक होणारे तिकडून भरमसाठ पैसे पाठवून कसे करतील ह्याबद्दल जरा शंका आहे. 'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं.


- मुलाने विचारूनही मुलीने नाही म्हणल्यावर परत तो मुलगा त्रास देत नाही.

>> असं भारतात होत नाही? नक्की?
इतरांचं माहित नाही पण मी कॉलेजात ९ वर्षे काढलीत (२+३+४) शेकडो प्रेमप्रकरणे पाहिलीत. शेकडो नकारही बघितलेत, पण मुलीने नाही म्हटल्यावर त्रास देणारा मुलगा मला तरी नाही दिसला. पेप्रातल्या ठराविक बातम्यांवरुन भारतीय जनसामान्यांच्या जीवनाचे सरसकटीकरण करण्याचा अधिकार अमेरिकेची भलामण करणार्‍यांनाही नसावा असे वाटते.

- जरी अगदी पौगंडावस्थेतल्या मुलाचा / मुलीचा संबंध आलाच तरी इथे लोक त्या मुलीला घाण चारित्र्याची म्हणून जगणे अशक्य करत नाहीत.

>> खर्‍या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते. मला माहित असलेल्या असे संबंध आलेल्या (व उघडकीस आलेल्या) अनेक मुला-मुलींचे (काही मित्र-मैत्रिणी-शेजारी) जगणे अशक्य झालेले मला तरी निदर्शनास आले नाही. छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे. आई-बाप बरोबर काळजी घेतात. आणि हे अनेकजण वेगवेगळ्या जाती-धर्म-वर्गातले आहेत. वरिल विधान खरेतर इथल्या आईबापांच्या मनातली भीती आहे की "असे होईल, होऊ शकते" म्हणजे असे घडतेच-घडते असे नाही. लोक तेवढ्यापुरती आप-आपसात उपद्रवहीन गॉसिप करतात, जगणे वैगेरे अशक्य करण्याच्या मध्ययुगीन काळात नाही राहत आपण आता. खाप-पंचायत सारखे प्रकार आहेत, नाही असे नाही. पण सरसकटीकरणासाठी त्यांचे उदाहरण पुरेसे नाही. अजून एक बावळट प्रकार बघितला तो म्हणजे कोण्यातरी दूरच्या चुलतबहिणीने प्रेमविवाह केला म्हणून नकार दिला गेला एका मुलीला. तेही कारण बहुतेक शोधून काढलेले असावे आधीच ठरलेला नकार द्यायला.

एक म्हण आहे हिंदीत, 'सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?' तो आपल्याकडे भरपूर आहे. बाकी कोणी काही म्हणत नसतं, काही नसतं.

एक प्रश्नः गेल्या वीसतीस वर्षांत जातीय-आंतरजातीय प्रेमविवाहांची संख्या बरीच वाढली आहे, प्रेमविवाह केलेल्यांच्या बहिण/भावांचे लग्न त्यामुळे होऊच शकले नाही असे प्रकरण बघितले आहे काय कुणी?

- अश्या संबंधातून त्या मुलीला जरी गर्भधारणा झालीच तर गर्भ ठेवायचा की नाही हे त्या मुलीच्या इच्छेवर असते. ती मुलगी असे मूल जन्माला घालून नंतर व्यवस्थित वाढवू शकते. कुमारी माता म्हणून समाजात तिला वेगळी वागणूक मिळत नाही.
>> नक्कीच! अमेरिकेचे ह्याबाबतीत कौतुकच आहे. पण सरकारचे टीन-प्रेग्नंसी कमी करण्यासाठीचे युद्धपातळीवरचे प्रयत्न बघता (सरकारी म्हणजेच अमेरिकननांच्या मतानुसार स्थापित) सरकारला हे प्रकार लवकरात लवकर बंद व्हावेत असे वाटते आहे. भारतीयांसारखे गॉसिप नसतील करत पण ते कुमारी मातांचे मनापासून स्वागत करतात असं म्हणणे घाईचे ठरेल. कुमारी मातांना शैक्षणिक सवलती व इतर सुविधा उत्तम दिल्यात अमेरिकन सरकारने पण त्यास ते समस्याही संबोधत आहेत हे इथे नोंदवावे वाटते. १९९० च्या सुमारास ६० असलेला दर आता २४ च्या आसपास आहे. ह्यात अमेरिकन लोकांनी सेक्सएजुकेशनवर बराच जोर दिल्याने परिणाम झालेला दिसत आहे. मला वाटतं कुमारी मातांचे मनापासून स्वागत करणार्‍या काही आदिवासी जमातीच असतील फक्त जगात. माझ्या ओळखीत वा संपर्कात कुमारी माता प्रकरण आजवर आलेले नाही त्यामुळे भारतातले त्याबाबतचे समाजाचे वर्तन प्रत्यक्ष बघितलेले नाही. कोणी भारतीय सदस्यांनी बघितले असेल (चित्रपटात नव्हे) तर जरुर कळवा.

मुळात सेक्सकडे एखादी लपून छपून करायची घाण गोष्ट म्हणून इथे पाहत नाहीत. पण म्हणून सार्वजनिक जागेत सरसकट सगळे चालते असे नाही. भारतातून नवीन आलेल्याला इथे सांस्कृतिक धक्के बसतात नाही असं नाही. पण म्हणून बडगा दिसतो हे खरं नाही. उलट माझ्या अनुभवावरून मला असं वाटतंय की इथे मुलींपेक्षा मुलं शामळू असतात.

ह्या वाक्यांतून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही. माझ्या मते भारतात आणि अमेरिकेत प्री-मॅरिटल सेक्सुअल अफेअर्स मध्ये 'अन्डिस्क्लोज्ड व डिस्क्लोज्ड' इतकाच काय तो फरक आहे. बाकी 'अंडर द स्किन' जगात सगळी माणसे सारखीच असे वरच कोणीतरी म्हटले आहे. तिकडेही खुलेआम रस्त्यावर सेक्स करत नाहीत, इकडेही नाही. जिथे करायचे तिथे बरोबर करतात. बाकी देश कोणताही असो, मुली शामळू की मुले शामळू ह्याबद्दल वैयक्तिक अनुभव वेगवेगळे असू शकतात. :)

-----------------------

स्त्रियांशी संबंधित गुन्हे व प्रेमविवाहामुळे झालेले गुन्हे हा अतिशय वेगळा विषय आहे त्यामुळे तो या चर्चेत आता तरी गैरलागू असेल हे आधीच नोंदवून ठेवतो.
-------------------------
आयटीत नोकरी-व्यवसाय करायला अमेरिकेत जाणारे भारतीय 'कुमारीमाता समस्येने गांजलेल्या वर्गातील' असतील असे वाटत नाही. मुलींची लग्ने लवकर उरकून टाका असा भुंगा लावणार्‍यात पुण्या-मुंबैची मध्यमवर्गीय लोकं नसतात, तशीही हे लोक अजिबात इतरांच्या फाटक्यात पाय घालत नाहीत, नाकं खूपसत नाहीत. शक्यतो अर्बन-मेट्रो-कॉस्मोपालिटन मेन्टॅलिटी असलेल्या मध्यमवर्गीय पुणे-मुंबैवासी भारतीयांना गावाखेड्यातले-निम्नवर्गीय-गतिगरिब-अशिक्षित समाजातल्या समस्यांचे चटके प्रकर्षाने असहनीय पातळीवर जाणवावेत व त्यांच्या अमेरिकास्थायिक होण्याच्या निर्णयात हेही सामिल असावे हे जरा आश्चर्यजनक वाटले आहे.
--------------------------
सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय.

खैर, धाग्यावरचे वातावरण बरेच तापलंय. काही बोलावं, ते कोणाला रुतावं आणि मग त्याने आपल्याला काहीतरी म्हणावे हा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी वरची कोणतीच वाक्ये कोणी अंगावर घेऊ नका लोकहो. ह्या धाग्यावर अति-वैयक्तिक ते समग्र सामाजिक-राष्ट्रीय ह्या रेंजमध्ये बराच गोंधळ चाललेला आहे. अमेरिकन भारतीय वर्सेस द्राक्षलेस भारतीय असा नेहमीचा चुरशीचा सामना होतोय की काय असे वाटत आहे. देशप्रेम म्हणजे नेमकं काय असतं हा एक नवीनच प्रश्न मला आतापर्यंतच्या चर्चा वाचून पडला आहे.
असो.
----------------------
अवांतरः पैसे पाठवण्यावरुन आठवलं, ज्या कायमस्वरुपी-अमेरिकास्थायिक भारतीयांचे आईवडील अमेरिकेत, मुलंही अमेरिकेत, इकडे कोणंच नाही, ते लोक भारतात पैसे पाठवतात काय, पाठवत असतील तर कोणाला, कशाला? बाकीचे जे पैसे पाठवतात वगैरे आहे ते जीवावर खेळून कमाई करतात मग खास बचत करुन, पोटाला चिमटा काढून खास देशाच्या खजिन्यात दान म्हणून पाठवतात काय? जस्ट रॅन्डम क्वेश्चन्स... 'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून..

स्रुजा's picture

21 Feb 2017 - 5:24 am | स्रुजा

मेरिकन भारतीय वर्सेस द्राक्षलेस भारतीय असा नेहमीचा चुरशीचा सामना होतोय की काय असे वाटत आहे

अहो, असं काही नाही. विषय भरकटत चाललाय हे खरंय. चर्चा करत कशाला बसायच्या यावर उत्तर होतं ते. बाय चॉईस भारतात थांबणारे द्राक्षलेस भारतीय नसतात !

तुम्ही हे जे काही दुवे देताय ना, ते खरे ही असतील नव्हे हे प्रमाण आहेच अमेरिकेत. कुमारी माता ही समस्याच आहे, कुठे ही असा मग तुम्ही. पण टीन प्रेग्नन्सी वेगळी समस्या आहे. त्यात आरोग्य विषयक पण अनेक धोके असतात - आई मुल दोघांना. लग्न न करता सिंगल राहुन मुलं वाढवणार्‍या कॉर्पोरेट बायका पण असतात - तांत्रिक अर्थाने कुमारी माता - पण त्या समस्या नाहीयेत. मुद्दा व्यक्ति च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखण्याचा आहे. दुर्दैवाने , आज ही, आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे.

आधी म्हणलं तसं आपली ती संस्कृती आणि त्यांची ती साधन संपत्ती ही खुप सोयीस्कर विचारधारणा आहे , त्याने अनेक दोषांकडे आपण डोळेझाक करतो.

आमचे सुरुवातीपासून चे प्रतिसाद पाहिले तर भारतात परत येण्याची आम्ही कारणं शोधतोय, आणि ते करताना येणार्‍या प्रश्नांचा अंदाज यावा याचा प्रयत्न चालू आहे. मात्र काही बाबतीत नंतर सरसकटीकरण झालं म्हणुन विषय पुढे "रंगला", बाकी काही नाही.

संदीप डांगे's picture

21 Feb 2017 - 1:43 pm | संदीप डांगे

आमचे सुरुवातीपासून चे प्रतिसाद पाहिले तर भारतात परत येण्याची आम्ही कारणं शोधतोय, आणि ते करताना येणार्‍या प्रश्नांचा अंदाज यावा याचा प्रयत्न चालू आहे.

>>> नक्कीच. तुमच्या प्रयत्नांमागच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाहीच. त्याविषयी माझे वैयक्तिक मत सांगतो. जिथे जमते-आवडते तिथे राहावं-आपल्या राहण्याच्या निर्णयामागचे तेच कारण-मग प्रश्न कसेही कोणतेही उभे राहिले तरी मार्ग-उपाय काढले जातात, कायमस्वरुपी राहावं असे जेव्हा आपण ठरवतो तेव्हाही अनेक तडजोडी केल्या जातातच. मी परदेशात गेलो नाही पण अकोला ते मुंबै नंतर मुंबै ते नाशिक हा लाइफ-ट्रान्सफॉर्मिन्ग प्रकार माझ्याही आयुष्यात घडला. तीनही ठिकाणी डिस्टीन्क्टीवली डिफरंट लाइफस्टाईल-संधी-शिक्षण-समाज असे फरक आहेत. आता मला मुंबईत राहायचे वैयक्तिक आवडत नाही, ती कारणे वैयक्तिक आहेत त्यामुळे अनेक बाबतीत रिस्क घेऊन व काही प्राथमिकता ठरवून मी मुंबै कायमची सोडली. तेव्हा अनेक बाबतीत तडजोडी केल्या आहेतच. शेवटी 'वैयक्तिक प्राथमिकता' महत्त्वाच्या.

ह्या बाबतीत निर्णय घेतांना माझा राज्यपातळीवर अनुभव तर तुमचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव असला तरी अति-वैयक्तिक प्राथमिकतांमध्ये फार फरक नाही असे वाटत आहे. दुसरं असं की आय डोन्ट गेट अटॅच्ड टू थिंग्स, प्लेसेस, पीपल, सिच्युएशन्स. ना मला अकोल्याबाबत नॉस्टेल्जिया आहे ना मुंबैबद्दल चुटपुट, नाशिक मला आज आवडतं-उद्या अजून चांगलं कुठे आयुष्य मिळत असेल तर निर्विकार भावनेने इथूनही निघून जाईल. हा माझ्या स्वभावाचा भाग असल्याने सोपं जातं, अनेकांना ते शक्यच होत नाही हे बघितलं आहे.

---------------

हा एक वेगळा अवांतर विषय आहे. माझा एक नातेवाईक नेव्हीत कुलाबा-मुंबैला आहे, कल्याणला राहतो, रोजच्य प्रवासात दमून जातो, महागाईने पिचला आहे, त्याचा भाऊ एस्टी महामंडळात आहे, पगार खास नाही पण मुंबईच्या महागाईमुळे पुरत नाही. दोघांनाही नाशिकमध्ये बदली करुन आयुष्य आरामात्-सुखात घालवता येईल, इतर छंद जोपासता येतील, हे त्यांनाही १००% पटलेले-आवडलेले आहे, बदल सहज शक्य आहे. पण तो निर्णय घेणे त्यांना जमतच नाही. व त्यासाठी ते अगदी क्षुल्लक, बिनमहत्त्वाची कारणे देत बसतात, काय तर इकडे सगळे नातेवाईक जवळ आहेत, मित्रमंडळी आहेत, अमुक आहे तमुक आहे. जे सर्व रोजच्या दगदगी-महागाईच्या त्रासापुढे किती महत्त्वाचे आहे ते आपण समजू शकतो. पण निर्णय घेण्याची इच्छा नसल्याने ती कारणे त्यांना मोठी वाटत आहेत, असो.

बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो नाही हे आधीच कबूल करतो.

या धाग्यावर प्रतिकूल मत व्यक्त करण्यासाठी, आय मीन, व्यक्त करण्याचा हक्क असण्यासाठी, खुद्द अमेरिकेत राहून अनुभव घेणं आवश्यक आहे. वाचन, आपले वीसतीस जवळचे मित्रमैत्रिणी यांचे अनुभव शून्यवत् आहेत.

या पूर्वअटीमुळे कोणत्याही मताला काहीच अर्थ उरत नाही. जनरल स्टेटमेंट व्यक्तिगत घेतलं जाण्याचा दुर्दैवी प्रकारही दिसतोच आहे.

तेव्हा आता अमेरिकेत न गेलेल्यांनी उगीच मतं आणि सल्ले देऊ नयेत ही जाणीव झालेली आहे. ते मात्र भारतात अधेमधे येत असल्याने दोन्ही बाजूंवर पूर्ण भाष्य करु शकतात.

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 5:40 am | पिलीयन रायडर

मला नाही वाटत असं कुणीही म्हणलंय की अमेरिकेत न गेलेल्यांनी मत देऊच नकात. तुम्ही तुमचे वाचन आणि ऐकीव अनुभव ह्यांच्या बाबतीत एवढे सिन्सिटीव्ह आहात. पण जे पालक इथे राहुन आपल्या मुलांना उत्तम पद्धतीने घडवत आहेत त्यांना तुम्ही "बडगा दिसतो" असे शब्द वापरल्यावर त्यावर कुणी रीअ‍ॅक्ट होऊ नये असं म्हणणं असेल तर अवघडच आहे.

ट्रेड मार्क's picture

22 Feb 2017 - 2:23 am | ट्रेड मार्क

आम्ही भारतात राहत नाही म्हणजे अगदी देशद्रोह केल्यासारखं वाटायला लागलंय. भारतीय संस्कृतीला काळिमा वगैरे फासला आणि अश्या अनिवासी भारतीयांची मुलं पार वाया गेली, या मुली सतत बॉयफ्रेंड बदलतात आणि मुलं ड्रग्स घेतात असं या भारतात राहणाऱ्या भारतीयांना का वाटतं?

त्यामुळे कदाचित प्रतिसादही तुकड्यातुकड्याने असेल.

दुसर्या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय?

खरं खोटं माहित नाही. पण मला तरी असं कुठे दिसलं नाही. एक मुलाखत आहे म्हणून अमेरिकेतल्या सर्वच मुली अश्या आहेत का? हे म्हणजे निर्भया प्रकरणावरून समस्त भारतीय पुरुष बलात्कारी आहेत असं म्हणणं झालं. माझ्या अगदी घरासमोर एक शाळा आहे. पण शाळेची वेळ संपली की काळं कुत्रं पण दिसत नाही. शाळेत रात्रंदिवस दिवे चालू असतात, पोलिसांची गाडी फेऱ्या मारून जाते त्यामुळे लपून काही करणं शक्य नाही. माझी मुलगी टीन एजर आहे. त्यांना शाळेत ५ मिनिटं पण मोकळा वेळ नसतो आणि घरी प्रोजेक्ट्स व इतर अभ्यास एवढा असतो की गोष्टींना वेळच मिळत नाही. आई वडील दोघेही काम करत असतील तर आफ्टरस्कूल क्लासमध्ये मुलं राहतात पण ते रूम्स Supervised CCTV वर असतात, ज्याचे फीड आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर दिसते. हे प्रत्येक शाळेत आहे. आता याची तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा.

'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं.

ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे.

खर्या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते.

म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय?

छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे.

गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो.

'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून.

अशी फारच थोडी उदाहरणं असावीत. ज्यांचे भारतात आता कोणीच नाही ते पैसे पाठवत नसावेत. बादवे, आम्ही पैसे पाठवतो ते दान म्हणून नक्कीच नाही. त्यामुळे कोणाचा असा गैरसमज असेल तर तो मूर्खपणा आहे.

सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय.

उदाहरण देऊन पटकन समजेल बहुतेक - आपण अगदी कितीही मोठं आणि सर्व सोयींनीयुक्त घर जरी घेतलं तरी आपलं बालपण जिथे गेलं असतं ते घर आपल्याला जास्त प्रिय असतं. एवढंच काय ते जुनं घर सोडायचा विचारसुद्धा जसा क्लेशदायक असतो आणि जरी आपण नवीन ठिकाणी राहायला गेलो तरी आपले आईवडील मात्र जुनं घर सोडायला तयार नसतात. आपलं गाव सोडून एखाया शहरात एकदा नवीन घरात काही वर्ष राहिल्यावर परत जेव्हा आपण गावात जातो तेव्हा सगळं कसं बदललेलं दिसतं. आपण सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. अमेरिकेतून परत भारतात येतानाचं तेच फीलिंग आहे. साध्यासाध्या गोष्टींत भांबावून जायला होतं. मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता. प्रचंड ट्रॅफिक, वेड्यावाकड्या जाणाऱ्या गाड्या, हॉर्न्स, नियम तोडणारे लोक, त्यात मॅन्युअल गियर हे बघून भांबावून जायला होतं. ह्या प्रॅक्टिकल समस्या आहेत यात उगाच कोणाकडे बोट दाखवायचा, आरोप करायचा, भारतातल्या लोकांना नावं ठेवायचा किंवा बडेजाव दाखवायचा प्रयत्न नाही.

पण एवढं असूनही आपण भारतीयच राहतो. घरात देव असतात, जमेल तेव्हा देवळात जातो, घरात फोडणीचे वास दरवळत असतात, मित्रमंडळी जमवून कट्टा करतो, गुढीपाडवा, होळी, शिवजयंती, गणपती, दसरा दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्त त्या त्या सणाचे पक्वान्न केले जातात. एवढंच काय अगदी संक्रांतीचे हळदीकुंकू पण केलं जातं. अमेरिकेतल्या इतक्याच भारतातल्या पण बातम्या वाचल्या/ बघितल्या जातात. मराठी/ हिंदी सिरिअल्स नेमाने बघितल्या जातात. एवढ्या की चला हवा येऊ द्या, चूकभूल द्यावी घ्यावी, माझ्या नवऱ्याची बायको, नकटीचं लग्न या सिरिअल्स माझ्या दोन्ही मुली आवडीने बघतात. ISRO ने केलेल्या कामगिरीचं कौतुक आम्हालाही असतं आणि ते इथल्या लोकांना सांगताना अभिमानही वाटतो.

पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका.
कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं.

सुबोध खरे's picture

23 Feb 2017 - 11:08 am | सुबोध खरे

मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता.
हि वस्तुस्थिती आहे. मी भारतातच राहत आहे परंतु आता मला चार चाकी चालवावीशी वाटत नाही याचे कारण रस्त्यावरील प्रचंड वाढलेली रहदारी आणि बेशिस्त माणसे आणि वाहनचालक. पुण्यात ११ वर्षे काढली असली तरीही आता पुण्यात चारचाकी चालवणे हे शस्त्र चालवण्यासारखे झालेले आहे असे वाटते.
ओला किंवा उबेरमध्ये बसणे हे मी जास्त पसंत करतो. घर ते दवाखाना हे अंतर तर मी मोटारसायकलनेच जातो.
मी "एन आर आय" किंवा आर एन आय ( रेसिडेंट नॉन इंडियन-- निवासी अभारतीय) नसल्याने मला कोणी अतिशहाणा किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला म्हणत नाही एवढेच.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 1:10 am | संदीप डांगे

टेराबायटीला टेराबायटीन उत्तर दिलंत, आता माझ्या प्रतिसादाला काळजीपूर्वक वाचावं लागेल... लांबीबद्दल क्षमस्व...

१.खरं खोटं माहित नाही----तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा.
>>
तुम्ही प्रत्येक शाळेत हीच सुरक्षा व्यवस्था आहे असे सांगितलेत... आणि अमेरिकेत प्रत्येक मूल अशाच शाळेत जाते असे गृहित धरतो आहे.. तरी अमेरिकन गवर्नमेण्टची वेबसाईट काय म्हणते...

In 2014, a total of 249,078 babies were born to women aged 15–19 years, for a birth rate of 24.2 per 1,000 women in this age group. This is another historic low for U.S. teens and a drop of 9% from 2013. Birth rates fell 11% for women aged 15–17 years and 7% for women aged 18–19 years. Although reasons for the declines are not clear, more teens may be delaying or reducing sexual activity, and more of the teens who are sexually active may be using birth control than in previous years.

ह्याचा भारतातल्या शाळांसोबत कसा तुलनात्मक अभ्यास करावा त्याबद्दल सांगा...

----------------------------------------------
२. ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे.

>> वस्तुस्थिती सांगितली, धन्यवाद! जगावेगळा शोध लावल्याबद्द्ल अभिनंदन. बरं, आता या मनोवृत्तीत फरक पडायला आपण काय करत आहात? तर परदेशात जाऊन बसलात.. आणि तिथून शेळ्या हाकलत आहात, अमूक आवश्यक, तमूक आवश्यक... कायमस्वरुपी देश सोडून जाणार्‍यांकडून कोरड्या उपदेशांची गरज नाही. काही फरक पडावा असे वाटत असेल तर इथे जमिनीवर उतरुन काम करा, मग बोला.. नाही जमत ना? मग आपल्या सर्वगुणसंपन्न देशात सुखी राहायचं, भारतात बघा हे चुकीचं ते चुकीचं करत मानभावीपणा गरजेचा नाही.

-------------------------------------------

३. म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय?
>> असतं तर असे सरसकट ब्लॅंकेट विधानं केली नसती आपण..

४. गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो.
>> मुद्दा खोडला की चिडून तिसरा पाय काढायचा त्यातला हा प्रकार... तुमच्या वरच्या विधानात जो दिसतोय तो अस्सल भारतीय खोचक-भोचकपणा आहे, हाम्रिकेत जाऊनही गेला नाही तो. तुमचे विधान जगणे अशक्य करतात असे फारफेच्ड होते... ते खोडले तर तुम्ही असा भोचकपणा करत आहात. म्हणजे भारतात काही चांगले घडत असेल तरी त्यात भोकं शोधायचीच हे तुम्ही ठरवूनच ठेवले आहे. तुमच्या भारताबद्दलच्या दिखावू कळवळ्याचा मुखवटा गळून पडतोय की काय?

-----------------------------------------------

५.पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका.

>> तुमचा खरा कळीचा मुद्दा हाच आहे... तुमच्या नातेवाईक मित्रांकडून झालेल्या शेरेबाजीमुळे तुम्ही विचलित झाला आहात आणि भारत-बॅशिंग (प्रत्यक्षात त्या शेरेबाजी करणार्‍यांना चितपट करण्याचा प्रयत्न) करत आहात. तुम्ही त्यांच्या शेरेबाजीला उत्तर म्हणून हे तुलनात्मक लिहित बसताय... नका मनाला लावून घेऊ एवढं.. शेरेबाजी करणार्‍यांची लायकी तेवढीच असते. ते अनिवासी भारतीयांवरच काय तर नवीन गाडी घेतलेल्या समोरच्या शेजार्‍यावरही तशीच शेरेबाजी करतत. अशी लोकं जगभरात असतात. तुम्ही त्यांना महत्त्व देऊन, विचलित होऊन त्यांच्यासारखेच बिहेव करायला लागलात... त्यांच्या शेरेबाजीने व्यथित होऊन तुम्हीच तुम्हाला भा.वि.अ. तुलना करुन माझा अमेरिकेचा निर्णय कसा योग्य हे सतत पटवून देत राहण्याचा मानसिकतेत ढललंय.. म्हणजे कुठेतरी ते बरोबर आहेत असंच तुम्हालाही वाटतंय.. पण तुमचे वेस्टेड इन्टरेस्ट कॉन्फ्लिक्ट होत असल्याने हे अंतर्द्वंव्द तुमच्याच मनात सुरु झालंय.. ती जळाऊ लाकडं मस्त मजेत झोपलीत आणि तुम्ही इथे भेटेल त्याला पटवत बसताय काहीबाही... मी खाली भरत जाधव च्या मुलाखतीबद्दल लिहिलंय ते ध्यानात घ्या.. आगावू सल्ला पण मनापासून प्रामाणिकपणे देतोय, 'जस्ट मूव ऑन'. वैयक्तिक प्राथमिकतेसमोर असल्या चिल्लर लोकांना भाव द्यायचा नाही... आपल्यालाच त्रास होतो. फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे. अनुभवातून जे शिकलोय तेच तुम्हाला सांगतो.

----------------------------------------

६. कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं.
>> कशी गम्मत असते ना, परदेशात गेलेल्या काही भारतीयांना न गेलेल्या भारतीयांपेक्षा आपण लै शाणे झालो असा उगाचच लै दर्प असतो, त्यामुळे आपल्यापेक्षा कोणी अधिकारवाणीने बोलूच शकत नाही असा काहीसा दंभ असतो.

मी मुंबईत आलो, पहिल्या सहा महिने-एक वर्षात जेव्हढी मुंबै मला माहित होती तेवढीही आयुष्य मुंबईत गेलेल्या माझ्या वर्गमित्रांना नव्हती... त्यांची आयुष्य घर ते शाळा-क्लास-स्टेशन-कॉलेज इतकंच मर्यादित होतं, त्यांचे जग तेवढेच-तितक्याच परिघातले, मला हसायला यायचं, लेको अक्खि लैफ मुंबईत राहताय, तुम्हाला एवढं साधं माहित नाही.. असो. कोणी कुठे गेल्याने किंवा घरात बसून असल्याने फार ज्ञान मिळतं किंवा अज्ञानी राहतं असं नसतं, किमान आजच्या जगात तरी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2017 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद चांगला लिहिलाय. लगे रहो...!

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2017 - 2:02 am | पिलीयन रायडर

नाही हो काका. उपमर्द वगैरे काय. तुम्ही हक्कानी लिहीलंत हे महत्वाचं.

तुमच्या नजरेला ह्यातला फोलपणा जाणवत असेल पण आम्हाला जेन्युइनली प्रश्न पडतात, गोंधळ उडतो. मुलं नीट वाढली पाहिजेत - आपण कमी पडायला नको वगैरेही वाटतं. ती आपल्या हातात नाहीत किंवा आपण फक्त ट्र्स्टी वगैरे जाणवायला अजून काही वर्ष जावी लागतील मला तरी. कडेवर गळ्याभोवती हात टाकून झोपणारं लेकरु जोवर घेऊन फिरतेय तोवर काही तसं वाटणार नाही!

शेवटी माणुस अनुभवांमधुन चुकत माकतच शिकत जातो. ज्यांना आयुष्यात नक्की काय हवंय हे अगदी अचूक माहिती असतं, ज्यांचा कधीही गोंधळ वगैरे उडत नाही त्यांचा हेवा वाटतो. ते जमत नाही म्हणून तर सल्ला मागतेय इथे! :)

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2017 - 10:58 am | पिलीयन रायडर

अवांतरः-

आजच एक वेगळीच माहिती मिळाली. मला काही हा नियम माहिती नव्हता. सहज इथे कुणाला उपयोग होईल म्हणुन देऊन ठेवते.

जी मुलं अमेरिकेत जन्मली आहेत, त्यांचे आई वडील जर भारतात परत जाऊन मुलांचे अमेरिकन नागरिकत्व सोडुन देऊन भारतीय पासपोर्ट घेणार असतील, तर त्या मुलांना पुढे जाऊन अमेरिकेन व्हिजा मिळत नाही म्हणे. अमेरिकेत येण्यासाठी मुलांना परत भारतीय पासपोर्ट सरेंडर करुन अमेरिकन पासपोर्ट घ्यावा लागतो. असा नियम कशासाठी बनवला आहे ते माहिती नाही.

https://www.quora.com/If-my-child-was-born-in-the-US-and-has-an-Indian-p...

चित्रगुप्त's picture

20 Feb 2017 - 11:55 am | चित्रगुप्त

वरती पिराताईने जे मुद्दे: धूळ, प्रदूषण, स्वच्छ हवा-पाणी वगैरेंविषयी मांडले आहेत-- म्हणजे ज्या कुणासाठी या गोष्टी महत्वाच्या असतील, त्यांनी त्यासाठी परदेशी रहाणे पसंत केले तर काय चूक आहे वगैरे ..... याच्याशी मी अत्यंत सहमत आहे.
माझे स्वतःचे बालपण पन्नासच्या दशकात इन्दौरमधे गेले. तेंव्हाचे आणि आजचे इन्दौर यात जमीनास्मानाचा फरक आहे. हीच स्थिती भारतात इतरत्र आहे. मी दिल्लीत गेली चाळीस वर्षे राहिलो पण आता नकोसे वाटते. प्रदूषण, धूळ, भेसळ, लाऊडस्पीकर, महागाई, घरोघरी चाललेले टीव्ही, जो तो मोबाईलमधे मग्न, लोकांची बदलेली मनोवृत्ती, जो पहावे तो नाना व्याधींनी ग्रस्त, अपुरा पगार, कामाच्या भलत्या वेळा.. यातून बिघडलेले कौटुंबिक जीवन, लहान मुलांमधे झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा आणि चष्मे, नर्सरीपासूनचे अतिशय महागडे शिक्षण .... आपण कुठे चालले आहोत हेच कळेनासे झालेले आहे.
माझी दोन्ही मुले परदेशात असल्याने दर वर्षी आम्ही तिकडे जात असतो. तिकडे तब्येत उत्तम रहाते, चित्रकला, सुतारकाम, जंगलात फिरणे, संग्रहालये बघणे, उत्तम लायब्रर्‍यात जाणे, वाचन, लेखन, व्यायाम-आहारासंबंधीचे प्रयोग हे सर्व निवांतपणे करता येते. मुलांना भरपूर मराठी आणि अन्य भारतीय मित्रमंडळी लाभलेली आहे. (कालच बावीस मराठी मुलांची क्रिकेट-मॅच झाली) भारतात मिळत होता त्यापेक्षा कितीतरी पट अधिक पैसा भारतात पाठवून कुटुंबियांना, भारताच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करता येते. या सर्वात वाईट काय आहे ?

व्हय रं? कसं करु मग? बघती बघ कशी.
न्हाई रं, दुसरीकडंच बघती ती.
आँ. नीट बघ माझ्याकडंच बघती ती.
हा लका, तुझ्याकडंच बघती ती.
मग.. म्हणत होतो कनाय.
काल तर लै वेळ तुझ्या घरावरुन चकरा मारताना दिसली.
आँ. तरी मला दिसल्यासारखी वाटलीच लका. आता फिक्सच
पण ते नित्यामागं हाय म्हणं
नाय रे. ते येडंय. त्याच्यामागं कोन जाणार?
पण नित्यापेक्षा तू भारी हायेस लका
मग.. म्हणत होतो कनाय.
पण स्कॉलर हाय लका ती
आपण बी करु की अभ्यास, त्यात काय आसतंय
बाप पैसेवालाय लका तिचा
काय नसतंय रं तसलं, होतंय सगळं येवस्थित
पण ती आन तू दिसताव भारी.
मग.. म्हणत होतो कनाय.
पण..जर्रा चाबरी हाय लका ती
व्हय रं? कसं करु मग?
बाप बी डॉन हाय. हानंल कुत्र्यागत
व्हय रं? कसं करु मग?
भिडायचं आपुन
हांगाश्शी. कसं करु मग?
...........
...........
...........
मतं बदलत राहतेत, परिस्थिती बदलत राहती, एकूण काय नाय, बरं असतंय असं बोलत राह्यलेलं. ;)

पैसा's picture

20 Feb 2017 - 7:53 pm | पैसा

=))

मला एक प्रश्न पडलाय. ट्रम्प काका जे काय बोलत आणि करत आहेत ते बघता ज्यांना हामेरिकन नागरिकत्व मिळालेले नाही त्यांचा जाऊ की राहू निर्णय त्यांच्या हातात आहे का ट्रम्प काकाच्या हातात आहे?

सतिश गावडे's picture

20 Feb 2017 - 9:14 pm | सतिश गावडे

=))

पद्माक्षी's picture

21 Feb 2017 - 4:31 pm | पद्माक्षी

ती तर वेगळीच काळजी आहे.
ट्रम्पने खरंच काही घोळ केला तर परत आलेलया लोकांची किती गर्दी होईल इथे, वर आणि रोज किरकिर करत बसणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा अजून एक गैरसमज !

ट्रंप सरसकट सगळ्या परदेशी लोकांना परत पाठवा असे म्हणत नाही... तर बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहत असलेयांना परत पाठवा असे म्हणतोय... आपण बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवा असे म्हणतो त्यापेक्षा हे फार वेगळे नाही.

अश्या लोकांची संख्या १ ते २ कोटीमध्ये आहे आणि इतक्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याइतके मनुष्यबळ संबंधीत सरकारी विभागांकडे सद्या नाही. त्यामुळे, "बेकायदेशीर पणे अमेरिकेत राहणार्‍यांपैकी ज्यांच्यावरचे गुन्हेगारीचे आरोप सिद्ध झाले आहेत अश्यांवर प्राथमिकतेने कारवाई करा" असे त्याचे म्हणणे आहे.

तेव्हा, सिरियातून निर्वासितांचे लोंढे बाहेर पडतात तसे अमेरिकेतून भारतीयांचे लोंढे भारतात येत आहेत/येतील असे मिडियात रंगवले जाणारे अतिशयोक्त चित्र हा विनोदी प्रकार आहे :)

भारत आणि भारतियांची मुख्य चिंता, भविष्यातल्या H1B / L1 (नोकरीसंबंधीच्या ) व्हिसांसंबधी आहे :

अ) व्हिसांची संख्या कमी होईल का ?

आ) व्हिसा मिळणार्‍याला दिल्या जाणार्‍या न्यूनतम वेतनाची सीमा सद्याच्या सालाना $६०,००० वरून वाढून $११०,००० होणार का ?

हे झाल्यास भारतिय कंपन्यांना आपले अमेरिकेतले काम करवून घेण्यासाठी भारतातून स्वस्त मानवसंसाधन अमेरिकेत नेले तर त्यांच्या खर्चात वाढ व फायद्यात घट होईल. अमेरिकन मानवसंसाधन वापरून काम केले तर ते महाग असल्याने त्यामुळेही खर्चात वाढ व फायद्यात घट होईल.

अमेरिकेत आवश्यक तेवढ्या प्रमाणात, हव्या त्या कौशल्याच्या प्रतीचे मानवसंसाधन उपलब्ध नाही, हे पण अमेरिकन सरकार व उद्योगधंद्यांना पुरेपूर माहित आहे. त्यामुळे यासंबंधीचे कायदे/कायदेसुधारणा सहजासहजी पास होण्याजोगे नाही... कमीत कमी वरच्याइतक्या कडक तरतूदींसह पास होणे फार कठीण आहे.

यापैकी काही तरतूदी कमीजास्त प्रमाणात पास झाल्या तरी त्यावर काय उपाय करावे याचा विचार भारतिय व अमेरिकन कंपन्यांत आधीपासूनच सुरू झाले आहेत.

स्रुजा's picture

22 Feb 2017 - 10:33 pm | स्रुजा

अगदी नेमके ! =))

मेडिया काहीही रंगवो, खोचक प्रश्न आणि विधानं करण्याईतकीच जर आपण माहिती गोळा करणार असू तर मेडियाला दोष देण्यात काही अर्थ नाही.

मराठी_माणूस's picture

23 Feb 2017 - 10:44 am | मराठी_माणूस

ह्या बातमीत असे म्हटले आहे की

"अंदाजित आकडेवारीनुसार, अमेरिकेत जवळपास ३ लाख भारतीय अनिवासी वास्तव्यास असून, त्यांच्याकडे वैध दस्तावेज नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही ट्रम्प सरकारच्या आदेशामुळे कारवाईची टांगती तलवार असणार आहे."

http://www.loksatta.com/desh-videsh-news/donald-trump-immigration-plan-i...

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

जे भारतिय (आणि इतर कोणत्याही देशाचे नागरिक) अमेरिकेत बेकायदेशीरपणे (व्हिसा न काढता जाऊन किंवा व्हिसा संपल्यावरही न परतल्यामुळे) तेथे राहत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यात अवैध असे काही नाही... तसे करण्याचा त्या (किंवा कोणत्याही) देशाला हक्क आहेच.

लेखाप्रमाणे, अश्या प्रकारे बेकायदेशीरपणे राहणारे ३ लाख भारतिय अमेरिकेत आहेत. हा अंदाज कसा काढला ते माहित नाही . चर्चेसाठी तो खरा धरला तरी त्यांच्यात आयटी, फिनान्स, कायदा, इत्यादी उच्च वेतन असलेल्या व्यवसायामध्ये काम करणारे लोक नगण्य असावेत, कारण अमेरिकेत भारतिय वंशांच्या लोकांचे कौतुंबिक उत्पन्न (युरोपियन वंशाचे अमेरिकन धरून) इतर कोणत्याही वंशांच्या लोकांपेक्षा अधिक आहे *. कारण, या व्यवसायांतले न्यूनतम पगार न्यूनतम वेतनाच्यापेक्षा वर आहेत आणि अश्या नोकर्‍या करताना बरेच कायदेशीर सोपस्कार करावे लागत असल्याने त्या बेकायदेशीरपणे करणे (असलेच तर) अपवादात्मक असेल. या प्रकारातल्या मंडळीत, अवैध मार्गांनी अमेरिकेत शिरलेले लोक; किंवा पर्यटक / शिक्षण व्हिसावर जाऊन व्हिसा संपण्यागोदर/संपल्यानंतर बेकायदेशीरपणे तेथे काम करत असणारे लोक असावेत. अश्या अवैध प्रकारे तेथे राहणार्‍या लोकांना, त्यातही वर म्हटल्याप्रमाणे प्राथमिकतेने त्यातल्या गुन्हे सिद्ध झालेल्या लोकांना (ज्या प्रकारात भारतियांचा टक्का कमी असा सर्वसाधारण समज आहे) परत पाठवावे असे त्यांचे म्हणणे आहे, म्हणजे बहुतेक भारतिय लोकांचा नंबर बराच नंतर लागण्याची शक्यता आहे. (घुसखोर बांगलादेशियांना परत पाठवा म्हणताना त्यांच्या बाबतीत असा फरक करावा असे कोणी म्हटल्याचे पाहण्यात नाही.)

हे सगळे खरे असले तरीही, मुख्य मुद्दा असा आहे की, अवैध प्रकारे राहणार्‍या लोकांना परत पाठविले तर त्याबाबत तक्रार का असावी ? कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आकड्याबाबतचा मुद्दा गौण आहे, नाही का ?

======================================

* : अमेरिकेतिल कौटुंबिक उत्पन्न :

सरासरी : $५१,९३९

Indian American : $101,591
Taiwanese American : $85,566
Filipino American : $82,389
Australian American : $81,452
Israeli American : $79,736
European American : $77,440
Russian American : $77,349
Greek American : $77,342
Chinese American: $68,672

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/List_of_ethnic_groups_in_the_United_States...

मराठी_माणूस's picture

23 Feb 2017 - 2:42 pm | मराठी_माणूस

हे सगळे खरे असले तरीही, मुख्य मुद्दा असा आहे की, अवैध प्रकारे राहणार्‍या लोकांना परत पाठविले तर त्याबाबत तक्रार का असावी ?

तक्रार नाहीच चर्चेच्या विषया संबंधी बातमी असल्याने लिंक दीली एव्हढेच.

पद्माक्षी's picture

25 Feb 2017 - 7:12 am | पद्माक्षी

सगळ्या प्रतिक्रिया एवढ्या सिरियसली घेऊ नका हो. :)

१. ट्रम्प करायचे तर बरंच काही करू शकतो. मुळात तो राजकारणी नाही आहे. तो सणकी आहे. त्याला चूक काय बरोबर काय याचा काही फरक पडत नाही.
हि आजची बातमी बघा.
http://timesofindia.indiatimes.com/world/us/trump-hits-nativist-buttons-...

२. H १ विसा कमी करणे किंवा H १चे किमान वेतन वाढवणे यात तरी चूक काय आहे. भारताने चिनी मालांवरचा आयात कर दुप्पट/तिप्पट करणे (हे फक्त उदाहरण आहे) आणि ट्रम्पने H १ वालयांचा किमान वेतन वाढवणे यात तत्वतः काय फरक आहे ?

३. तिथे मनुष्यबळ नाहीच हे पूर्णपणे खरे नाही. आपण त्या लोकांचे जॉब घेऊन त्यांना बेकार केले हे सत्य आहे. आता तिथले शिक्षण महाग आहे हे जर याचे कारण असेल तर शिक्षण स्वस्त करायला त्याला किती वेळ लागेल.

४. मुळात तिथले शिक्षण एवढे उत्तम असेल तर हा खालचा मुद्दा सारखा सारखा का येतो काळात नाही :)
"अमेरिकेत आवश्यक तेवढ्या प्रमाणात, हव्या त्या कौशल्याच्या प्रतीचे मानवसंसाधन उपलब्ध नाही, हे पण अमेरिकन सरकार व उद्योगधंद्यांना पुरेपूर माहित आहे."

मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा करुन सांगायचा प्रयत्न करते. कसं असतं ना तिकडे प्रेसिडेंट ला एक ठराविक व्हेटो पॉवर असते - पण ती कशात? कायद्यामध्ये आधीच प्रोव्हिजन असलेल्या गोष्टी कधी अवलंबायच्या यात ! नवीन कायदा बनवायचा असेल तर त्याला ही लायनीपर्मानं च जावं लागतं. मेक्सिकोच्या हद्दीवर भिंत बांधायची प्रोव्हिजन आहेच, इस्लामिक देशातील ( देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक देशातील - इथे इस्लामिक फक्त ताजा संदर्भ आहे) नागरिकांना प्रवेश नाकाराय्ची प्रोव्हिजन पण असतेच - तो त्यासाठी कुठल्याही क्षणी एक्झिक्युटिव ऑर्डर काढू शकतो - पण ज्या क्षणी त्याने ग्रीन कार्ड होल्डर्स ना यात गोवलं - तिथे न्यायव्यवस्था मध्ये पडली. आता या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक ना शत्रु राष्ट्राचे ना धोकादायक. खरं तर नवीन उभारत्या अर्थव्यवस्थेचे, नवीन मैत्रीचे प्रतिनिधी. कायदेशीर तिकडे गेलेले , तेदेखील " तिकडच्या कंपन्यांना गरज पडली" म्हणुन. अशा कायदेशीर कॅटेगरीतील, इथे काम करणार्‍या १० लोकांमध्ये सर्वार्थाने लायक उमेदवार ( व्हिसा असणे, स्किलसेट असणे, तिकडे स्थलांतरीत होण्याजोगी कौटुंबिक परिस्थिती असणे अशा सर्व घटकांवर आधारीत ) जेंव्हा तिकडे जातात तेंव्हा उद्या उठुन "चल सुट" म्हणायची त्यांच्या कायद्यात मुळातच प्रोव्हिजन नाही ! ट्रंप असो नाही तर ब्रह्मदेवाचा बाप.

शिवाय कसं असतं की राजकारण हा येऊन जाऊन सोयीचा भाग ! काल पर्यंत एखाद्याने हुं म्हणलं की थयथयाट करणारे आणि सोयीचं असतं तेंव्ह्या त्याच एखाद्याच्या प्रतिसादावर जाऊन त्याच्या तळ्या उचलणारे लोकं तर इथे सुद्धा जाता येता दिसतात. पिंडी ते ब्रम्हांडी ! आंतरराष्ट्रीय राजकारण करणारी पण माणसंच असतात शेवटी. तेंव्हा ऑस्ट्रेलिया सारख्या जुन्या मित्राची देखील पत्रास न बाळगणार्‍या ट्रंपचं डोकं भरतीयांवरुन पण फिरु शकतंच पण ते त्याला सहजासहजी अमलात आणता येत नाही हा मुद्दा आहे !

ते कधी जा म्हणू शकतात? जर कंपनीची गरज संपली तर ! ती गरज संपलेली नसताना, जेंव्हा इकडे किंवा समृद्ध अमेरिका असा चॉईस असतो ना तेंव्हा खरी चर्चा सुरू होते. द्राक्षं आंबट असलेले कशाला चर्चा करत बसतील , नाही का?

पैसा's picture

21 Feb 2017 - 12:00 am | पैसा

:)

ट्रेड मार्क's picture

21 Feb 2017 - 1:24 am | ट्रेड मार्क

भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या गोष्टी फारच वाढवून सांगतात. त्यामुळे ते वाचून खरी परिस्थिती कळत नाही. शेवटी ट्रम्प सुद्धा एक बिझनेसमन आहे. त्यामुळे पैश्यांची भाषा त्याला बरोब्बर कळते. जर त्याने भारतीयांना त्रास द्यायला सुरुवात केली तर त्याचे अमेरिकेच्या इकोनॉमीवर वाईट परिणाम होतील. मी सध्या राहतो तिथे ५०% तरी भारतीय राहत असतील. त्यामुळे इथे घरांची संख्या वाढली, कार्स चा खप वाढला त्या अनुषंगाने बाकीचे बिझनेस वाढले. जर यातले २५% लोक परत गेले तर काय होईल विचार करा. बरं भारतीय लोक स्किलड आहेत त्यामुळे त्या स्किलचं काम करणारे तेवढे अमेरिकन लोक उपलब्ध तर असायला पाहिजेत.

सध्या ट्रम्पला सपोर्ट मिळतोय तो मुख्यतः सेंट्रल अमेरिकेतल्या राज्यांमधून आहे. जिथे ब्लू कॉलर जॉब करणारे लोक बरेच आहेत. या श्रेणीमध्ये अमेरिकनांना मेक्सिकन लोकांची खूपच स्पर्धा आहे. कारण मेक्सिकन लोक कमी पैश्यात भरपूर काम करून देतात. वर अमेरिकनांसारखे चोचले नसतात. पण बौद्धिक क्षेत्रात मात्र भारतीयांना रिप्लेस करणं बरंच अवघड काम आहे. ट्रम्पने अगदी सुरुवात केली तरी एकतर कंपन्या करू देणार नाहीत आणि अगदी ट्रम्पने केलंच तरी ते सध्या व्हायला बराच वेळ लागेल.

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2017 - 7:05 pm | शब्दबम्बाळ

"भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या गोष्टी फारच वाढवून सांगतात"

का कोणास ठाऊक पण तुमचे भारताबद्दलचे सगळे विचार जनरलाईस वाटतात.
वेस्टर्न मीडिया वार्तांकन कसे करतो बाकीच्या देशांबद्दल हे आपणाला माहित असेलच अशी अपेक्षा आहे.
मीडिया इन जनरल असाच आहे सगळीकडचा! पण तुम्हाला इकडचेच सगळे वाईट दिसतेय असे वाटतंय.

"अमेरिकेत वाईट मुले बाकीच्या मुलांना त्रास देत नाहीत किंवा मग त्यांपासून लांब राहता येत. शाळेत हत्यार आणायचे किंवा गोळीबाराचे प्रकार ही टोकाची उदाहरणे आहेत. (भारतातली सगळीच उदाहरणे मात्र देशपातळीवर "सत्य" असतात का?)
तिकडची मुलं नकार ग्रेसफुली वगैरे स्वीकारतात, अर्थात काही अपवाद असतात! (पण भारतात मात्र अपवाद नसतातच, नाही का? इकडची सगळी इथून तिथून ऍसिड हल्ले करणारी जमात आहे!)"
अजून ढीगभर काहींच्या काही विधान वाटली.

ज्याला जिथे राहायचं त्याने तिथे राहावे स्वतःच्या सोयीनुसार. पण, मी बरोबर निर्णय घेतलाय हे पटवून द्यायला दुसऱ्या ठिकाणच्या सगळ्याच गोष्टी कशा खराब आहेत हे सांगायची गरज का पडावी? खासकरून तिथूनच शिकून सवरून बाहेर पडल्यावर?

उद्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय!

वरती कुणीतरी लिहिलंय की "अमेरिकेतून काम करून आलेल्या लोकांच्या स्किलला सूट होण्यासारखं काम वगैरे मिळू शकत का?"
खरं तर IT मध्ये भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या लोकांकडे असे काहीही महान स्पेशल स्किल नसते! कटू असले तरी सत्य आहे. काही काही वेळा तर टीममधला कोणी सोम्या गोम्या पण जातो. जसे IT मधले इतर भारतीय लोक असतात तसेच हे Onsite अमेरिकेला गेलेले लोक असतात. काही फरक नाही. जर IT मधल्या इतर भारतीय लोकांच्या पातळीचे काम कोण्या शहरात असले तर त्या शहरात "हे" लोक देखील काम करू शकतात. (जबरदस्ती अर्थातच नाही! "इच्छा" असली तरच)

तुम्ही कुठेही राहा पण उगाच त्यासाठी लुटुपुटुची करणे नकोत. मला इथे राहणे आवडते आणि मी इथे राहणारच! असे तुम्ही म्हणू शकताच... अर्थात जोपर्यंत तिकडच्या सरकारला त्यावर आक्षेप नाही तोपर्यंत नाहीतर अडचणीच्या काळात आहेच "मेरा भारत महान!"

कोणाला दुखावण्याचा हेतू नाही पण एकंदरीत बरेच प्रतिसाद भारत कसा वाईट यावर येऊ लागले म्हणून हे लिहिलं आहे.
असेही मिपावर पुण्या-मुंबईच्या बाहेरचे लोक किती आहेत हा प्रश्न आहे त्यामुळे त्या अनुभववावरून एकंदर भारतावर टिप्पणी करणे थोडं कठीण वाटत.
गम्मत म्हणजे आत्ता इथेच कोणी "फक्त पुण्यावर" टीका करा, मग अचानक तिथल्या चांगल्या गोष्टींची लिस्ट मिळेल सध्या पुण्याबाहेर अथवा भारताबाहेर असलेल्या लोकांकडून पण! :)

बाकी अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्ट कसे आहे म्हणायचे? पुण्यासारखे कि त्यापेक्षा उत्तम?? ;)

पुष्करिणी's picture

21 Feb 2017 - 7:09 pm | पुष्करिणी

+ १

आजानुकर्ण's picture

21 Feb 2017 - 7:28 pm | आजानुकर्ण

जब्रा प्रतिसाद.

उद्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय!

हे बाकी आवडलं. ;) अरे राहायचं तर राहा ना भाऊ पण इतकी कारणं कशाला देता!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2017 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

द्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय!

डोळे भरुन आले. =))

अरे राहायचं तर राहा ना भाऊ पण इतकी कारणं कशाला देता!

प्रचंड सहमत.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 7:44 pm | पिलीयन रायडर

"अमेरिकेतून काम करून आलेल्या लोकांच्या स्किलला सूट होण्यासारखं काम वगैरे मिळू शकत का?"

तर ते वाक्य मीच लिहीलं आहे आणि तुम्ही मस्तपैकी विपर्यास करुन वापरलंय. त्यातही पुन्हा जे माझे म्हणणेच नाही त्यावर शालजोडीतलेही मारलेत मला! मस्तच!

तर दादा, डांगेअण्णांचा मुद्दा होता की शांत जीवन आणि स्वच्छ वातावरण शहरात नाही पण गावाकडे मिळू शकतं. पुण्या मुंबईतच राहिलं पाहिजे असं काही नाही. त्याला उत्तर देताना मी म्हणलंय की अमेरिकेत काम करणारी बहुतांश मंडळी आयटी मध्ये आहेत. ह्या स्किलसेटच्या लोकांनी गावाकडे काय करायचं? त्यांच्या नोकर्‍याच शहरांमध्ये आहेत.

आता मी काय म्हणलंय... तुम्ही काय वाचलंय.... तुम्हीच विचार करा!

इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेतच काम करणारे लोक भारीच!" असं लिहीलं असेल तर सांगा. आम्ही जे विचार बाळगतच नाही त्यावर आमची विधाने कोट करुन उगाच सुनावण्याचे कारण कळाले नाही. असू बाबा आम्ही सोम्यागोम्या. पण आम्हाला ते मान्यच आहे ना. "स्वतःला लई शहाणं समजायचं नाही!" वाला सुर तुम्ही का लावताय?

बाकी विपर्यास तर सगळीकडूनच होतोय.. तेव्हा चालु द्या!!

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2017 - 11:13 pm | शब्दबम्बाळ

मला वाटलं होत ट्रेड मार्क भाऊ चिडतील म्हणून दोन दा लिहिलं कि दुखावण्याचा हेतू नाही. तुम्हाला राग आला याच आश्चर्य वाटलं!
आता आपण पाहूया हा विपर्यास वगैरे.
पार्श्वभूमी: २-३ दिवसांनी आज धागा उघडला. बरेच प्रतिसाद आले होते आणि काहींचा टोन वर म्हटल्याप्रमाणे होता. अर्थात, वाचत वाचत पान २ वर आलो,
इथे हा प्रतिसाद होता म्हटलं जे काही लिहायचं ते याच्याच खाली लिहावं आता. प्रत्येकाच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्यापेक्षा! मागच्या पानावर कुठला प्रतिसाद कोणी दिला हे सगळे लक्षात राहणे थोडे अवघड आहे नाही का? ट्रेड मार्क भाऊंच्या प्रतिसादातले काही मुद्दे घेऊन आणि तुमच्या प्रतिसादातले देखील काही मुद्दे घेऊन लिहिला गेला. कोणी लिहिला आहे हे आठवून लिहिणं महत्वाचं वाटलं नाही फार, म्हणून "कोणीतरी" असे लिहिले. इथेच चुकलो बहुतेक! :P

जसे मी ट्रेड मार्क भाऊंच्या मुद्द्यांवर सरळ सरळ मत प्रदर्शन केलं आहे तसाच तुमच्या मुद्द्यांवर देखील करू शकलो असतोच! खास करून तुमचे नाव न घेता "तुम्हाला" शाल जोडीतले मारण्याची काही गरज नाही वाटत मला तरी! तुम्ही ते ओढवून घेताय असे वाटतंय. कसे ते पाहूया...

डांगेंच वाक्य: "वरील मुद्दे मला मुंबई च्या वास्तव्यात जाणवले तेव्हा मी नाशिकला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सॉफ्टवेर इंडस्त्रीतल्या लोकांसाठी इथेही संधी आहेत," (नाशिक हे शहर आहे हे तुम्हाला देखील मान्य आहे. डांगे नाशिक मधल्या IT नोकऱ्या विषयी बोलले)

माझे वाक्य: "जर IT मधल्या इतर भारतीय लोकांच्या पातळीचे काम कोण्या शहरात असले तर त्या शहरात "हे" लोक देखील काम करू शकतात."
"शहर" हे मी प्रतिसादामध्ये नमूद केले आहे कारण रेफेरंस नाशिक चा होता. विपर्यास कोणी केला?

आता मुद्दा दुसरा:
तुमचे वाक्य : "इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेतच काम करणारे लोक भारीच!" असं लिहीलं असेल तर सांगा"
--इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेत काम करणारे लोक निकृष्टच!" असं लिहीलं असेल तर सांगा

तुमचे वाक्य : "आम्ही जे विचार बाळगतच नाही त्यावर आमची विधाने कोट करुन उगाच सुनावण्याचे कारण कळाले नाही. असू बाबा आम्ही सोम्यागोम्या. पण आम्हाला ते मान्यच आहे ना. "स्वतःला लई शहाणं समजायचं नाही!" वाला सुर तुम्ही का लावताय?"
--इथे आम्ही म्हणजे कोण कळले नाही पण तरीही तुम्हाला असे का वाटले कळले नाही.
मी लिहिले होते "काही काही वेळा तर टीममधला कोणी सोम्या गोम्या पण जातो. जसे IT मधले इतर भारतीय लोक असतात तसेच हे Onsite अमेरिकेला गेलेले लोक असतात. काही फरक नाही."

पुन्हा एकदा लिहितो "काही फरक नाही!" या वाक्याचा अर्थ असा होतो कि भारतात IT मध्ये काम करणारे लोक आणि तसेच काम अमेरिकेत जाऊन करणारे लोक यामध्ये काही फरक नाही. मी केवळ अपवाद म्हणून लिहिलेल्या एका वाक्याला तुम्ही स्वतःवर अक्षरशः ओढून घेतलेत! कारण तुम्हालाच ठाऊक!
बाकी IT मधून अमेरिकेला गेलेल्या लोकांनी स्वतःला इतर भारतीयांपेक्षा "लै शहाणं समजू नये" हे मात्र खरंच! :)

पण तरीही अमेरिकेत काम करणाऱ्या "काही" भारतीय लोकांवर टीका झाली कि राग का यावा? जसा भारतावर टीका करण्याचा हक्क आहे तसाच हा देखील असायला हवा ना?

असो, मी न दिलेल्या शालजोडी बद्दल म्हणून इतका मोठा प्रतिसाद द्यावा लागला! नाहीतर बाण अचूक लागला म्हणून खुश झालो नसतो का? :)

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 11:41 pm | पिलीयन रायडर

प्रश्न असाय दादा:- माझं मुळ वाक्य हे कोणत्या संदर्भात आहे? तुम्ही कोणत्या संदर्भात वापरताय?

तुम्ही मला टारगेट करताय.. नाही करताय.. मला फरक पडत नाही. मला माझं वाक्य चुकीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरल्याचा राग आहे. तुम्हाला ते मी लिहीलंय हे लक्षात नव्हतं हे मला का माहिती असेल ना?! बाकी तुम्ही "काही" भारतीयांवर टिका करा किंवा सगळ्याच.. तुम्हाला अमेरिकेत जाणारे लोक हुषार वाटोत वा मुर्ख.. मला काय करायचंय? पण तुम्ही हा मुद्दा आणलाच ह्या जोरावर की मी म्हणतेय "अमेरिकेतल्या लोकांनी काय करावं भारतात येऊन?"

असं ह्या संपुर्ण धाग्यात कुणी म्हणलंच नाहीये! लक्षात येतंय का? तुम्ही जे काही मत व्यक्त केलंय... ते ज्या वाक्यावरुन केलंय... ते वाक्य तसं नाहीचे.. तुम्ही माझं वाक्य, तुमच्या सोयीने उचलताय आणि वर मला विचारताय की मी का ओढवुन घेतेय =))

वीणा३'s picture

20 Feb 2017 - 11:56 pm | वीणा३

संस्कार :
मुलं / मुली बिघडणं - मी माझ्या आयुष्याची तिशी भारतात पार केलेली आहे. नातेवाईक पुणे - नागपूर - कोल्हापूर - नाशिक - कोकण इथे आहेत. सगळ्यांकडून वाया गेलेल्या शेजार पाजारच्या मुलांची भरपूर उदाहरणं ऐकलेली आहेत. माझ्याच नात्यात एकाच घरातला मोठा मुलगा वकील होऊन चांगली प्रॅक्टिस करतोय आणि छोटा मुलगा दारू पिऊन वाया गेलाय.

नात्यात २ मुली वेगळ्या जातीच्या मुलांबरोबर पळून गेल्या आहेत त्यांचे संसार सुखात चालू आहेत. कमीत कमी १० ओळखीच्या मुलीची लग्नाअगोदर अफेयर्स होती, आणि आता संसार सुखात चालू आहेत. त्यातल्या २ जणींचा ऍबॉर्शन झालं होत. त्यांचेही संसार सुखात चालू आहेत.
हे सगळं सांगायचं कारण अस कि तुमचं मुलं भारतात राहून पण बिघडू शकतात, आणि कधी कधी तुम्ही कितीही जागरूक उत्तम पालक असाल तरी नशीब - संगत नावाचा प्रकार असतो. स्वतःच्या ओळखीत आठवून बघा, एकाच घरातली दोन मुलं अतिशय वेगळी असलेलं उदाहरण नक्की आठवेल.

कुठलेही नॉर्मल पालक (मुलाचे / मुलीचे - अमेरिकेतले / भारतातले ) आपल्या मुलांना अडनिड्या वयात सेक्स करू नका असाच सांगतात. फक्त अमेरिकेत त्यांचं वयात येणं समजून घ्यायचा, बोलायचा प्रयत्न करतात. ती पण विचार करू शकतात, त्यांच्या आवडी निवडी असतात हे मान्य करतात. भारतात बरेच पालक खाणं -पिणं, कपडे यांचे भरपूर लाड करतात, स्वतःचे हाल करून मुलांना चांगलं द्यायचा प्रयत्न करतात, फक्त त्यांचे स्वतंत्र विचार, व्यक्तिमत्व मान्य करायची बऱ्याच जणांची तयारी नसते. अगदी कमावणाऱ्या - लग्न झालेल्या मुला -मुलींबाबत पण "तुला काहीही कळत नाही" हे वाक्य बऱ्याच घरामध्ये ऐकू येत.

शिक्षण - स्पर्धा => मुलाला स्पर्धेत ढकलायचा कि निवांत राहू द्यायचा हे भरपूर प्रमाणात पालकांवर अवलंबून असता. अमेरिकेत सुद्द्धा मुलाला १०० वेग-वेगळे क्लास लावणारे बरेच भारतीय माहित आहेत. काही मुलं पण माहित आहेत ज्यांना ह्या क्लास ना जायला आवडता. (गमतीची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या (मुलांना सतत तणावात ठेवणे - मागे लागणे) विरोधात असलेल्या पालकांना सुद्द्धा दंगल अतिशय आवडला. :प )

अमेरिकेत - भारतात राहण्याबद्दल - खरं सांगू, आपल्याला ग्लोबल व्हिलेज मध्ये राहायला लागणार आहे याची मनाशी तयारी करून घ्या. आजोबांची पिढी, ज्या घरात जन्मली त्याच घरात निवर्तली, बाबांची पिढी ज्या शहरात जन्मली त्यातच आयुष्यभर राहिली. आपल्याला ते मिळणं शक्य नाही. आयटी मध्ये तर नाहीच नाही, भारतात सुद्धा शहर बदलत राहणार. जिथे चांगलं काम तिथे आपल घर (विंचवाचे घर) हे मनाशी ठरवलं तर त्रास होणार नाही. पण त्या बदल्यात "हे विश्वाची माझे घर" हि संकल्पना अनुभवायला मिळेल, वेग-वेगळे प्रदेश, माणसं, पद्धती बघायला मिळतील. कुठेही गेलं, कुठलाही रंग, देश असला तरी माणूस सारखाच असतो हे नीट समजेल.

काही लोकांना सतत आपल्याकडे काय नाही त्याबद्दल दुखी आवडतं. भारतात सुद्धा पुणे-मुंबई मध्ये राहणारी लोकं गावासाठी हळहळतात, बंगलोर -चेन्नई मध्ये राहणारी लोक महाराष्ट्र साठी हळहळतात, बाहेर राहून भारतासाठी हळहळतात :P.

देश - देशाबद्दल अभिमान म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय याचा विचार करा. निम्म्याहून जास्त लोक फेसबुकवर पोस्ट टाकण्याव्यतिरिक्त देशासाठी फारसं काही करत नाहीत. ज्यांना देशाबद्दल काही करावंसं वाटत ते कुठूनही करतात, करायचा प्रयत्न करतात. बाकीचे देशाला मेडल मिळालं कि खुश होतात, क्रिकेट मध्ये हरले कि दुख्खी होतात, सर्जिकल स्ट्राईक केली कि खुश होतात, चालू राहतं. तुम्ही भारतबाहेर राहून भारतातल्या लोकांसाठी काम केलंत, किमान इथलं राजकारण - कला -चित्रपट - समाज - चांगल्या वाईट (हो वाईट सुद्धा ) गोष्टी मुलांसमोर बोलत राहिलात तर त्यांना नक्कीच या देशाबद्दल आपुलकी वाटेल.

तो मोठा झाल्यावर भारताविरुद्ध काम करेल का हा फार - फार लांबचा विचार वाटतो, जर तुम्ही "त्याला त्याचे विचार, व्यक्तिमत्व, आवडीनिवडी" आहेत हे मान्य केलात तर बरेच निर्णय सोपे जातील, रादर ते तुमचे निर्णय नाहीत, त्याचे आहेत हे नीट कळेल. सध्यातरी ट्रम्प साहेबाच्या कृपादृष्टीमुळे पुढची ४ वर्ष तरी रोजचा विचार करा :P.

आणि हो, वेग-वेगळे इंडियन पदार्थ करायला शिका, माझा मुलगा इतर गोष्टी बरोबरच फूड-ट्रिप च्या आकर्षणामुळे भारतात यायला उत्सुक असतो. स्वयंपाक करायची कटकट वाटते, पण आपली आणि मुलाची जेवणाची आवड सारखी झाली तर खरंच करायाला खूप मजा येते.
बऱ्याच लोकांना भारताची अतिशय - प्रकर्षाने आठवण येण्यामागे "तिथले आठवणीतले वेग-वेगळे अन्नपदार्थ" हा फार मोठा भाग असतो.

'काय ठरलं मग?' विचारायची वेळ आली का? ;)

ऑन अ सिरियस नोट, चित्रगुप्त काकांचा हा प्रतिसाद फारच आवडला. शेवटी भारतात असो, अमेरिकेत की जगाच्या पाठीवर आणखी कुठे राहायचे असो, तो निर्णय तेव्हाच्या परिस्थितीनुसार आणि प्राधान्यानुसार घेतलेला बरा. एखाद्याचा प्राधान्यक्रम आपल्याला कळेलच असे नाही. पण जिथे राहायचे ठरवले आहे, तिथे मात्र समाधानात राहता आले पाहिजे बुवा. नाहीतर अमेरिकेत राहायचा निर्णय घेतला आणि दर उन्हाळ्यात 'आम्हांला हापूस आंबा खायला मिळत नाही' म्हणून गळे काढून काय उपयोग? तिथे जी इतर पन्नास फळे मिळत आहेत, त्याचा आनंद घ्यावा.

संदीप डांगे's picture

21 Feb 2017 - 10:07 am | संदीप डांगे

+100,
सहमत.
मी सुरुवातीपासून म्हणतोय तो मुद्दा हाच कि कुठे राहायचं हे वैयक्तिक चॉईस आहे, तो स्वतःच्या प्रयोरोटीनुसार असतो. उगाच गिल्ट लपवण्यासाठी अमेरिका किती ग्रेट आणि भारत किती मागास अशी मांडणी करायची अजिबात गरज नसते.
तरी लोक परत तीच कारणे देत असतात.

जिथे राहायचं तिथे बिंदास राहावे, नाही जमले उठून चालू पडावे... जस्टीफिकेशन शोधण्यास जाऊ नये आपल्यालाच त्रास होतो. दोन दिसाची वस्ती, कोठे तरी करावी....

जय जय रघुवीर समर्थ!

अशी कुणी ही मांडणी करत नाहीये. पण काय झालंय की अचानक डीफेन्स सुरु झालाय. गळे काढणं काय आणि काय काय. आता येता जाता आपण शाळेत हस्तलिखितावर काम करत होतो हा जर नॉस्टेल्जिया असेल तर हापुस चे आंबे गळे काढणे कसा काय असू शकतो. एक एक फेज संपते , दुसरी फेज सुरु होते पण जुन्या रम्य आठवणी असतातच.

शिवाय वैयक्तिक प्राधान्य हा मुद्दा सुरुवातीपासून सतत येतोय. मुळात धागा निघाला मुलांच्या शिक्षणावरुन. तो भरकटत अमेरिकेपेक्षा भारत वाईट कसा यावर पोहोचल्याचं काही लोकांचं धन्य मत झालंय. जस्टिफिकेशन देण्याचा काही प्रश्नच नसतो. प्रश्न आहे तो सांगोपांग चर्चेचा.

आणि गिल्ट कसलं? कुणी भारतात राहत असेल कुणी परदेशी? कुठे राहतोय याचा कसला आलाय गिल्ट?

खाली कुणी तरी म्हणतंय की आय टी वाल्याना आपापल्या स्किल चं काम मिळेल का? हा प्रश्न कधीच नव्हता. वर्किंग स्टाईल आपल्याकडची व्यावसायिक नाहीये, पटो नाही तर न पटो. मी भारतात ६ वर्षं काम केलंय, प्रमोशन घेतलंय आणि आता इथे ४ वर्स्।अं काम करते आहे. आपल्याकडे एकुणच बाँड्री इशुज सगळ्यांना असतात, आपण ही त्याचाच एक हिस्स असतो पण बाहेर गेल्यावर काही सवयी बदलतात आणि मग परत आल्यावर जुळेल का हा प्रश्न पडतो. आजानुकर्ण आणि ट्रेड मार्क ने याचं उत्तर वर दिलेलं आहे पण आता चावून चोथा व्हायच्या मार्गावर आलेलं आहे सगळं त्यामुळे आता इथुन पुढे निकोप चर्चा काही शक्य नाही.

खाली खरे काकांनी खुप ऑब्जेक्टीव उत्तर दिलेलं आहे, अशा काही प्रतिसादांमुळे ९०% चर्चा अतिशय निरोगी पद्धतीने झाली .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2017 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिथे राहायचं तिथे बिंदास राहावे, नाही जमले उठून चालू पडावे... जस्टीफिकेशन शोधण्यास जाऊ नये आपल्यालाच त्रास होतो. दोन दिसाची वस्ती, कोठे तरी करावी....

अगदी मन की बाते.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

21 Feb 2017 - 12:02 pm | धर्मराजमुटके

शिक्षणाच्या दर्जावरुन मी थोडासा संभ्रमात आहे ! अमेरीकेतील शिक्षण इथल्यापेक्षा चांगले आहे तर भारतातून शिकून गेलेल्यांना इतक्या प्रचंड प्रमाणात तिकडे नोकर्‍या कशाकाय मिळतात ? त्या अगदी निम्न दर्जाच्या असतात म्हणावे तर अनेक भारतीय मोठमोठया कंपन्यांमधे मोठया पदावर दिसतात. अमेरीकेतले शिक्षण चांगले असेलच, पण मग तिकडे राहिले, तिकडे शिकले तर मग अमुक पगाराचीच नोकरी मिळाली तर करायची असा काही स्टँड असतो काय ?
१. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध आहेत ?
२. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय ?
३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय ?

धर्मराजा, प्रतिसाद आणि शंका आवडल्या. ह्याच शंका मला पण आहेत.

अनुप ढेरे's picture

21 Feb 2017 - 2:10 pm | अनुप ढेरे

तिथल्या शिकलेल्या लोकांना नोकर्‍या न मिळणं ही समस्य नसून पगार कमी मिळणं ही आहे असं ऐकलं आहे काही जवळच्या व्यक्तिंकडून. भारतीय (किंवा इतर पाहुणे) हे कमी पगारात काम करायला तयार होतात आणि त्यामुळे तेच काम नेटिव्हाला करायचं असेल तर कमी पगार घ्यावा लागतो.

सुबोध खरे's picture

21 Feb 2017 - 7:11 pm | सुबोध खरे

शिक्षणाच्या दर्जावरुन मी थोडासा संभ्रमात आहे
मुटके साहेब
मला हि असाच संभ्रम होता जेंव्हा माझ्या मुलाच्या अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळेस.तेंव्हा मी माझ्या मित्राला जो अभियंता आहे व्ही जे टी आय मधून बी इ झाला मुंबई आय आय टी मधून एम टेक झाला आणि अमेरिकेत पी एच डी झाला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलांना आपल्या विषया पेक्षा अधिक जास्त शिकवणे हे "चांगल्या संस्थां"मध्येच होते. अमेरिकेत साधनांची सुबत्ता असल्याने साधारण संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला उच्चं शिक्षणासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध आहे. उदा सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये आपल्याला काँक्रीट च्या चाचणीसाठी जी प्रयोगशाळा लागते त्यासाठी मुंबईत दत्त मेघे कॉलेजात २५ टनाचा ठोकळ्याच्या चाचणी ची सामग्री आहे. व्हीजेटीआय मध्ये ५० ताणाची आणि आय आय टी मध्ये १०० टन. अमेरिकेत सर्रास सगळ्या संस्थांमध्ये १००-१५० टन ठोकळ्याची चाचणी शक्य आहे. भारतात आपल्या पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर काही करायचे असेल तर त्याला विद्यार्थ्याला "कष्ट" करावे लागतात
आपल्या कडे शिक्षण "झापडबंद' आहे यात शंका नाही. माझ्या पुतणीला CAT मध्ये ९९.३ पर्सेन्टाइल आले पण IIM अहमदाबाद बंगलोर आणि लखनौ मधून बोलावणे आले नाही कारण ते दहावी, बारावी आणि अभियांत्रिकीच्या चारही वर्षाचे गुण गृहीत धरूनच मुलांना बोलावतात. म्हणजे तुम्हाला डोळ्याला झापडे लावून १५ व्य वर्षांपासून अभ्यास करणारीच मुले हवीत.
वैद्यकीय शिक्षणात अशीच परिस्थिती आहे हे मी गेली कित्येक वर्षे डोळ्याने पाहत आलो आहे. पुस्तकाबाहेरचे काही शिकण्याचा प्रयत्न केला तर आधी "आहेत ती पुस्तके नीट वाचा" असाच सल्ला दिला जातो.
भारतात केवळ "चांगल्या" संस्थामध्ये चतुरस्त्र शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते हि वस्तुस्थिती आहे.
सुदैवाने हि परिस्थिती बदलत आहे पण हा बदल फार हळू आहे.
तिथे गेलेले बहुसंख्य भारतीय विद्यार्थी हे "मुळात हुशार आणि कष्टाळू" असल्याने ते तिथे "यशस्वी" झाले हि वस्तुस्थिती दुर्लक्ष करून चालणार नाही.त्याच्या शिक्षण संस्थांचा किती भाग होता(यात आय आय टी सारख्या अग्रगण्य संस्था सुद्धा मी गणतो) हा एक संशोधनाच विषय आहे.
माझे हे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाहीत पण त्याला माझा नाईलाज आहे.

सुबोध खरे's picture

21 Feb 2017 - 7:13 pm | सुबोध खरे

माझ्या पुतणीला आय आय एम कलकत्ता, इन्दोर, कोझिकोडे येथून बोलावणे आले. कारण तेथे १० १२ च्या गुणांना तितके जास्त महत्व दिले जात नाही.

पद्माक्षी's picture

23 Feb 2017 - 11:10 pm | पद्माक्षी

जर IIM A आणि IIM B चा हा क्रायटेरिया असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असेल. पण फक्त या भारतीय संस्था आहेत म्हणून सरकटीकरण करणे नक्कीच पटले नाही

ट्रेड मार्क's picture

23 Feb 2017 - 12:49 am | ट्रेड मार्क

मोठ्या पदावर जे दिसतात ते बहुतांशी भारतातल्या IIM, IIT सारख्या संस्थेतून शिकलेले आणि/ किंवा अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले असतात. इकडे शिकलं तर शैक्षणिक कर्ज, बाकी कर्ज यांचे मासिक हप्ते भरणे आणि हे जाऊन महिन्याचा खर्च भागवण्याइतका पगार मिळवणे आवश्यक आहे.

१. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध आहेत ?

नोकऱ्या अगदी दुकानात काम करण्यापासून ते मोठ्या कंपनीतल्या उच्च पदापर्यंत सगळ्या आहेत. बॅंक्स, इन्शुरन्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल्स, मार्केटिंग अँड सेल्स इतकेच काय आयटी मधेही बिझनेस साईडला जॉब्स आहेत. तसेच शिक्षक, पोलीस, सैन्य व इतर सामाजिक क्षेत्रात पण बऱ्याच संधी आहेत.

२. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय?

शेवटी कंपन्या त्यांचा फायदा बघतात त्यामुळे असं प्राधान्य दिलं जात आहेच म्हणूनच भारतीय व इतर देशीय इथे आहेत. भारतासारख्या देशातून आलेला ५-६ वर्ष अनुभव असलेला इंजिनिअर वर्षाला जितका पगार मिळवतो तितक्या पगारात अमेरिकन इंजिनिअर तयार होत नाही. कारण त्याचा शिक्षणावरच भरमसाठ खर्च झालेला असतो. सध्याच्या नियमाप्रमाणे (जो १९९८ साली बनवला) कमीत कमी $ ६०,००० आहे.

३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय?

हे व्हायला बराच वेळ लागेल. मी अमेरिकेत जिथे जिथे काम केलंय तिथे जवळपास ५०-६०% तरी भारतीय व इतर आशियाई देशाचे लोक दिसले. जरी ट्रम्पने वा कोणीही हे सर्व जॉब अमेरिकनांना द्यायचे ठरवले तरी तेवढे अमेरिकन लोक तर उपलब्ध पाहिजेत. आता ब्लू कॉलर जॉब्स जे मेक्सिकन लोकांनी जास्त घेतलेत तिथे पण अमेरिकन पटकन शिरकाव करू शकतात पण कमी पगाराचा प्रश्न आहे.

मनिमौ's picture

21 Feb 2017 - 12:06 pm | मनिमौ

प्रतिसाद खुप म्हणजे खुपच पटला.

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2017 - 3:03 pm | श्रीगुरुजी

एकदा पाण्यात उतरल्यानंतर शरीराचा काही भाग तरी ओला होणारच. पाण्यात उतरल्यानंतर शरीराचा एक कणही ओला होऊन न देणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही देशात वास्तव्यासाठी गेल्यानंतर तिथल्या संस्कृतीचा थोडा तरी परीणाम होणारच. परदेशात वास्तव्य करून स्वतःची किंवा स्वतःच्या देशाची मूळ संस्कृती पूर्णपणे जपून ठेवून परदेशी संस्कृतीचा वारा सुद्धा लागू न देणे पूर्णपणे अशक्य आहे.

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 8:02 pm | पिलीयन रायडर

चर्चा कुठुन कुठे गेली आहे. मिपाच्या स्वभावाला अगदी साजेसं आहे हे. तेव्हा आश्चर्य सुद्धा वाटलं नाही. =))

काही काही लोक आवर्जुन माझ्या सगळ्या धाग्यांवर येतातच आणि धागा चालेल तोवर चर्चा वाचत असतात, त्यांचे नेहमीप्रमाणेच मनापासून आभार!

लोकांनी फार सुंदर प्रतिसाद दिलेत. लोकांचे वेगवेगळे विचार वाचले की आपले विचार कोणत्यातरी पठडीत बांधलेले असतात, त्याच्या साखळ्या तुटल्या सारखं वाटतं. मला हा धागा काढताना हा एक यक्षप्रश्न आहे असं वाटतं होतं. धाग्याच्या १५०+ प्रतिसादानंतर असं वाटतंय की मी कुठेही राहिले तरी आयुष्यात फार काही बिघडणार नाही. पोराचीच मला फार चिंता लागुन राहिली होती. पण आपण आपल्या मुलांचे ट्र्स्टी आहोत वाली फेज यायला मला पुष्कळच वेळ लागणारे तेव्हा तो मुद्दा जरा बाजुला ठेवु. बाकी सगळे मुद्दे उन्नीस बीसच आहेत. सरते शेवटी हे एखाद्याच अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर येऊन थांबेल आणि त्यावर निर्णय होईल असं मला वाटतं. आपला काटा भारताकडेच झुकलेला आहे. पण देखेंगे!

जाता जाता.. मी कुठेही भारतातल्या प्रॉब्लेम्स कडे बोट दाखवलं असेल तर हे ठणकावुन सांगते की तसं करण्याचा मला इतर कोणत्याही भारतीया एवढाच हक्क आहे. उगाच मी अमेरिकेत आहे म्हणुन माझ्या भारताकडे बोट दाखवण्याला कुणी आक्षेप घेणार असेल तर त्याला फाट्यावरच मारण्यात येईल. तेव्हा तसला प्रयत्न करुन वेळ वाया घालवु नका.

धर्मराजमुटके's picture

21 Feb 2017 - 9:30 pm | धर्मराजमुटके

माझं वैयक्तीक मत असं आहे की माणसाचा निर्णय अगोदरच ठरलेला असतो (तुमच्याबद्द्ल नाही बोलत आहे, इन जनरल). फक्त त्या निर्णयाच्या समर्थनार्थ चर्चा घडली की मग मनाला बरे वाटते. शिवाय अशा चर्चा वाचून मत बदलणारे विरळाच.
शेवटी तुम्ही अमेरीकेत राहा किंवा भारतात. आप भला तो जग भला हेच खरे ! त्यामुळे चिंता न करता कोठेही रहा. आजुबाजुला चार चांगली माणसे जोडा जी कधीही तुमच्या कामी येतील. पैसा ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे पण माणसे ऐनवेळी उपयोगी पडतातच.
तेव्हा पुढील आयुष्यास शुभेच्छा !

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 9:37 pm | पिलीयन रायडर

हे मात्र खरं बोल्लात की आप भला तो जग भला! :)

धन्यवाद!!

परदेस आणि भारत हे दोन संपूर्णपणे विभक्त विकल्प आहेत, काही तरी एकच निवडावं लागेल आणि निर्णय घेतांना सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल. जे तिकडे गेले त्यांची भारताशी नाळ तुटते त्यामुळे तुलनात्मक निर्णय होऊ शकत नाही. वन हॅज टू जस्ट फरगेट इंडीया. हेच दि अदर वे आहे, माझे जे मित्र परत आलेत ते कधीही अमेरिकेची आणि भारताची तुलना कोणत्याही लेवलवर करत नाहीत. दे हॅव अ‍ॅक्सेप्टेड इंडीया अ‍ॅज इट इज.

तुम्ही निर्णय आज घ्या की दहा वर्षानी, नो कंपॅरिजन हा एकमेव क्रायटेरीया कामी येईल.

अनिर्णयाचं कारणंच कंपॅरिजन आहे !जेव्हा कंपॅरिजन थांबते तेव्हाच निर्णय होतो.

तुम्हाला निर्णय घ्यायचा असला तर फक्त दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवा : भारत / अमेरिका. इकडे काय मिळेल आणि तिकडे काय आहे असा विचार अनेक काऊंटरवेलींग उपविचारांना जन्म देतो. योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो. जस्ट डिसाइड वन थींग अँड फर्गेट अबाऊट एवरी अदर थींग, दॅटस ऑल ! एकदा निर्णय झाला की पुन्हा फेरविचार नाही आणि मागे वळून बघणं नाही

बॅटमॅन's picture

22 Feb 2017 - 11:43 pm | बॅटमॅन

पाऊस पडला माझ्यामुळं. =))

संजय क्षीरसागर's picture

23 Feb 2017 - 12:44 pm | संजय क्षीरसागर

दोनशे प्रतिसादात १७५६ विचार मांडले गेलेत आणि जेवढे विचार तेवढं कन्फ्युजन. म्हणून तर म्हटलंय `योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो ! ' करु का नको, माझ्या स्वातंत्र्याचं काय, हीच्याशी केलं तर असं होईल, तिच्याशी केलं तर हे लफडं आहे, संगोपनाचं लचांडं कोण गळ्यात घेणार, डिवोर्स घ्यायचा तर पहिल्यापासनं काय खबरदारी घ्यावी, ....असले विचार, त्यातनं चुकूनमाकून कधी विचार पक्का झाला तर वय उलटून गेलेलं असतं, मग तर प्रकरण आणखीच अवघड होऊन बसतं आणि सगळ्याचा बाजा वाजलेला असतो.

बाजीप्रभू's picture

22 Feb 2017 - 7:52 pm | बाजीप्रभू

थांबा इतक्यात संपवू नका विषय.. अजून मी बाकी आहे.
मात्र उद्या लिहीन.

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 8:37 pm | पिलीयन रायडर

=))

लिहा लिहा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळजी करू नका ! इतक्या लवकर या विषयावरचे घमासान थांबेल अशी लक्षणे नाहीत...

बरेच मिपामावळे तुम्ही परतेपर्यंत खिंड लढवत ठेवतील याची खात्री बाळगा !

(हघ्या)

चर्चा विषयावर बरीच मते येताना दिसत आहेत पण त्यातले नेमके हे उचलतोय उदाहरणासाठी... पुन्हा एकदा, ‘भारतीयत्व’ या विषयावर वैयक्तिक मते, पटावीत असा आग्रह नाही, पण विचारासाठी इथे मांडतो.

"आता मुख्य विषय - संस्कृती - आपण आपल्या आई-वडिलाच्या वेळची संस्कृती पाळतो ? माझ्या आजोळी औदुंबराचं, वडाचं झाड होतं. तेव्हा आजोळी वेगळे उत्सव व्हायचे. माझ्या लहानपणी, आई-वडिलांकडे वेगळे उत्सव व्हायचे. त्यांनी आपल्या सोयीनुसार आमच्यावर संस्कार केले."

उंबर नसेल कदाचित, पण आपल्या परसात किंवा जवळच्या पार्क मध्ये एखाद्या पॉपलर-मॅपल च्या वृक्षाशी असे नाते जोडायचा प्रयत्न केला आहे का? अगदी उंबरच हवा असा हट्ट धरून तो संस्कार हरविण्याचे कारण शोधावे की, चिलटांपासून घारींपर्यंत सर्वांना आश्रय देणारे जीवनसाखळीतील अनन्यसाधारण महत्व, वड-पिंपळ-उंबराला देवत्वाच्या जवळ ठेऊन जपण्याचा, निसर्गाशी नाते जोडण्याचा 'संस्कार' इथे देश-काळ परत्वे बदल करून जपण्याचा प्रयत्न करावा... (वरील प्रतिसादकर्त्यास हा प्रश्न नसून केवळ एक उदाहरण आहे)

असा विचार बऱ्याच सणांचे बाबतीत व्हावा, एक उलट उदाहरण - ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका इ ठिकाणी भर उन्हाळ्यात तिळगुळ खाऊनच मकरसंक्रांत पौषात साजरी करणे हे अंधानुकरण आहे, त्याने ‘संस्कृती जपली’ असा विचार करणे कितपत योग्य आहे? निसर्गाशी नाते जोडत सामाजिक व अध्यात्मिक मिती लक्षात घेऊन सणांचे प्रयोजन आहे. कुटुंबाच्या परिघात आपले वर्तन प्रत्येक उत्सवामागचे कारण लक्षात घेत बदलत गेले तर पुढील पिढी 'सणाचे पटणारे स्पष्टीकरण नाही' म्हणून 'पाळायची इच्छा/आवड/गरज नाही' अशी नवीन पिढीची मानसिकता बदलेल. आणि ‘हा बदल आवश्यक आहे’, हि जागृती समाजात येण्यासाठी समाजाभिमुख असणे हे अनिवासी भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या विषयात एक क्रांती आवश्यक आहे आणि ती इथल्या पैलतीरावरूनच सुरु होणार आहे. कारण भारतात राहणारे ज्ञानी असले तरी कृतिहीन आहेत, आणि त्यांना दोष नाही, 'तुम्हाला गरज असेल तर परत या' असे म्हणून ते मोकळे होणार आहेत (थोडे सरसकटीकरण असले तरी विचार लक्षात घ्या). "समृद्धीसाठी स्थलांतर" हा मानवी स्वभाव आहे व गरजही, इतिहासही हेच सांगतो, परंतु ‘मूळ’ टिकवून ठेवण्याची इच्छा असेल तर प्रयत्न अनिवार्य आहेत. कसे ते आपण ठरवायचे...

संस्कृती व दैववादाच्या संबंधाविषयी म्हणाल तर, व्रत-उत्सव-परंपरा इ. प्रतीके केवळ एक माध्यम आहेत. पण आज दुसरे प्रभावी माध्यम नसल्याने असलेल्याचा त्याग करणे योग्य होणार नाही. पण काही नवीन उत्सव जोपर्यंत 'तयार' केले जात नाही, किंवा असलेले सण अधिक डोळसपणे स्वीकारण्याची मनस्थिती तयार होत नाही, किंवा सण-उत्सवाशिवायही सामाजिक उत्साह व बांधिलकी व्यक्त होण्याची सवय लागत नाही तोपर्यंत पारंपरिक सण साजरे करायला काहीच हरकत नाही. सामाजिक बांधिलकीसाठी, ज्या नात्यांची कमी भरून काढायचीये त्यांची खोली वाढविण्यासाठी केवळ सहभाग नव्हे तर माझी हात जोडायलाहि अजिबात ना नाही... तो नमस्कार खूप कोरडा आहे याची जाणीव असली तरीही... परंतु अंध-आस्तिकतेला सतत पाण्यात पाहण्याची, मुर्खात काढण्याची, हट्टी-नास्तिकता मात्र दूर ठेवली पाहिजे. माझ्यासाठी मी अस्तिकतेचा वेगळा अर्थ बनवून घेतला आहे, पूर्वजांनी श्रद्धा-परंपरा बनवल्या कारण त्या काळी कदाचित तो सोपा मार्ग होता. आम्ही त्यात संशोधन (देश-काळ परत्वे बदल) करण्यात कमी पडलो आणि केवळ अंधानुकरण बळावले. निसर्गाशी व समाजाशी परस्पर आदरयुक्त वर्तन हे ज्या कशामुळे साधू शकते ते सर्व उत्सव त्या विचाराचे अधिष्ठान ठेऊन साजरे करण्यास काही हरकत नसावी, त्यात कोणी दैववाद पहिला तरी त्याला सकारात्मक कारणाशिवाय विरोध नको.

शेवटी, संस्कृती केवळ उत्सवातूनच प्रकट होते का? तर नाही, पण परदेशात ते सामाजिक संपर्काचे एक भक्कम कारण असते त्यामुळे माझा त्यावर जास्त भर आहे. त्याशिवाय तुम्ही असे नातेसंबंध निर्माण करून जोपासू शकत असाल तर फारच उत्तम! शेवटी आदर, प्रेम, विश्वास व मर्यादा यांचे पिढीनुसार थोडे बदलणारे परंतु भारतीय म्हणून आपल्याला परिचित असणारे प्रकटीकरण हेच खरे तर बऱ्याच जणांना अपेक्षित असणारे 'संस्कार' या शब्दाचे स्पष्टीकरण असावे असे माझे मत. ते टिकले कि मग बाकीचं सगळं त्यात आपोआप येते. म्हंटले तर सोपे, म्हंटले तर महाकठीण...

माझे प्रतिसाद मुख्य प्रश्नास, 'इथे राहावे कि तिथे' यास फारसे मदतशीर नाहीत. क्षमस्व. परंतु 'इथले' व 'तिथले' असण्याने फरक न पडणाऱ्या काही सामायिक समस्या आहेत त्यावर आहेत. तसेच नव्याने आकार घेत असलेल्या 'आधुनिक आणि वैश्विक भारतीयत्वाच्या' जडणघडणीत आपले प्रत्येकाचे योगदान व दायित्व कसे महत्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी आहेत. विचार पटावेत असा आग्रह नाही, पण हो, भारतात रहा अथवा बाहेर, 'भारतीय' रहा हा आग्रह नक्की!

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 8:36 pm | पिलीयन रायडर

अत्यंत आवडलेला अजुन एक प्रतिसाद! वर वर सणवार करण्यापेक्षा मला त्यामागचा भाव जपायला जास्त आवडेल.

प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा मुलगा देवळात गेला नाही किंवा पुजेला बसला नाही तरी मला काहीच फरक पडत नाही. कारण मी स्वतः हेच प्रश्न विचारत मोठी झाले आणि ह्यातल्या कोणत्याही प्रथांशी फारसं ममत्व मला नाही. मला स्वतःला फक्त त्यातलं माणसांनी एकत्र येणं आवडतं. म्हणुनच की काय पण इथे मी केव्हा गणपती पाहिला तेव्हा ढोल ताशांच्या आवाजाने मी सेकंदात पुण्याशी जोडल्या गेले. मला दुसरी कोणतीही गोष्ट इतक्या चटकन घराची आठवण करुन देऊ शकली नाही.

मी जेव्हा भारतीय संस्कृती हा शब्द वापरतेय तेव्हा तेव्हा तो खरं तर भारतीय लोकांच्या पद्धतींबाबत आहे. माझ्या घरात आजी-आजोबा होते. रहायला - शिकायला भावंड होती. सतत नातेवाईकांची रेलचेल असायची. मला स्वतःला ना आजी आजोबा वृद्धाश्रमात आवडतात ना मुलं पाळणाघरात. प्रत्येक पिढी मागच्या पिढीला सांभाळत जाते. पुढची पिढी हे पहात असते. थोड्या कटकटी झाल्या तरी मला नात्यातला तो आपलेपणा आवडतो. मला अगदी २५ माणसांच्या कुटूंबाची सवय नसली तरी मी न्युक्लिअर फॅमिली करुन फक्त नवरा आणि मुलगा ह्यांच्याच सोबत राहु शकत नाही. पुण्यात शेजार्‍यांचं घरंही आपलंच वाटायचं. अबीर खाली खेळायला गेला एकटा तरी काहीच चिंता नव्हती. पोरं त्याला बरोब्बर वर आणुन सोडायची. आणि कधी कुणी बोलुन दाखवलं नाही पण मी नवरा अमेरिकेत असताना काही महिने एकटीच अबीर सोबत रहात होते तर बाजुच्या वहिनी लक्ष ठेवुन असायच्या की मी व्यवस्थित आहे ना. एकमेकांच्या आयुष्यात लुडबुडत रहाणं हा आपला स्वभाव आहे. कधी कधी तो वैतागवाणा होऊ शकतो पण त्याच स्वभावामुळे आपण अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबुनही राहु शकतो. जेव्हा मी "भारतीयत्व" जपायचं म्हणते तेव्हा मला हे जपायचं असेल बहुदा. जगाच्या पाठीवर कुठेही रहायला मला अजिबात हरकत नाही जर माझ्या आजुबाजुला अशी माणसं असतील.

मिसळ's picture

23 Feb 2017 - 1:05 am | मिसळ

ह्या चर्चेच्या निमित्ताने आलेले समर्पक यांचे समर्पक प्रतिसाद फार सुंदर विचार देऊन गेले. बाकी, बेहेती है..बेहेने दो.

अनुप ढेरे's picture

23 Feb 2017 - 11:38 am | अनुप ढेरे

काय ठरलं म? जायचं का नाही परदेशात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे...

लग्न हा बहुतांशी भावनिक निर्णय असतो
आणि
नोकरीचे/राहण्याचे ठिकाण हा पूर्णपणे काळ-वेळ-परिस्थिती लक्षात घेऊन करायचा भौतिक निर्णय असतो...

त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो.

माणसाने "आपले जीवन आनंदी करणे" हेच पक्के व अंतिम ध्येय ठेवावे (पक्षी : त्या विचाराशीच लग्न करावे) त्याच्याशी प्रतारणा किंवा त्याबाबतीत तडजोड करू नये.

नोकरी-व्यवसायाचे ठिकाण, नोकरी व्यवसायाचे स्वरूप, इत्यादी इतर अनेक गोष्टी, ते पक्के अंतिम ध्येय साधण्यासाठी वापरायची साधने आहेत. साधने स्थळ-काळ-परिस्थितीनुसार बदलता येतात... 'तसे न करणे' व 'केवळ मी पूर्वी निर्णय घेतला होता म्हणून त्याच साधनांत भावनिक गुंतवणूक करून, दु:खी होत असतानाही, त्याच साधनांना हट्टाने चिकटून राहणे' योग्य होणार नाही.

सर्वसाधारणपणे, या जगात कोणताही एक पर्याय १००% समाधानकारक/असमाधानकारक नसतो, तर आपल्या वैयक्तिक समाधानकारक/असमाधानकारक वर्णपटावर, एका काळसाठी, त्याचे कोठेतरी एक स्थान असते. आपल्या निर्णयाच्या वेळेस, आपल्या समाधानाच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या पर्यायाची (साधनाची) निवड करणे आपल्या हातात असते. स्थळ-काळ-परिस्थितीनुसार त्या निवडलेल्या पर्यायाची वर्णपटावरील जागा बदलते, तेव्हा आपल्या समाधानाच्या जास्तीत जवळ जास्त असलेला दुसरा पर्याय निर्माण झाल्यास त्यावेळेस त्याची निवड शहाणपणाची असेल.

“The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitus" (या जगात, बदल ही एकच गोष्ट स्थायी आहे.)

बदलणारा काळ-वेळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे.

या सगळ्या बरोबर हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की "आजच्या आनंदावर विरजण पडेल इतकी पण उद्याची काळजी करू नये." हे सहज सोपे नाही ! पण या जगात सहज सोप्या आणि तरीही उत्तम अश्या किती गोष्टी आहेत ?!

जाता जाता अजून एक सुविचार...

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे...

लोकांचा सल्ला घेण्यात काहीच चूक नाही. पण कोणा दोन माणसांचे विचार, आवड-निवड, ध्येये एकसारखे नसतात, त्यामुळे,

ज्यांच्यावर आपल्या निर्णयाचा प्रभाव पडणार आहे आणि तो आपल्याला महत्वाचा वाटतो, असे सर्व सोडून इतरांच्या बाबतीत, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हेच तत्व सर्वोत्तम असते !

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

वा वा, या धाग्यामध्ये काही मोजके विचार जपून ठेवावे असे आहेत. हा सर्वात पहिल्या क्रमावर येईल ! धन्यवाद म्हात्रे काका...

चतुरंग's picture

23 Feb 2017 - 7:15 pm | चतुरंग

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

डॉ. म्हात्रे, तुमच्या अनुभवाचे सार या एका वाक्यात आमच्यापर्यंत पोचवलेत. थँक्यू!! __/\__

अर्धवटराव's picture

23 Feb 2017 - 7:29 pm | अर्धवटराव

आमच्यासारख्यांना कळेल असं काहि टंकल्याबद्दल धन्यवाद :)
विचार हि एक अद्भूत शक्ती मानवाला मिळाली आहे. सोचनेसे परहेज नहि करना चाहिये. अवीचारी तडकाफडकी निर्णय घेण्यातल्या तत्कालीन सुखापेक्षा सारासार विचार करतान होणारं कन्फ्युजनचं दु:ख कधिही चांगलं... लाँगटर्ममधे ते फायद्याचं असतं.

पिलीयन रायडर's picture

23 Feb 2017 - 8:04 pm | पिलीयन रायडर

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

क्या बात है काका!!!! धागा काढल्याचं सार्थक झालं.

हेच्च मला हवं होतं. आज मला काही गोष्टींची व्हिजिबिलिटीच नाहीये. जे लोक माझ्या पुढे गेलेत त्यांनी आम्हाला सांगावं की तुमचा अनुभव काय होता?

जियो काका! जियो!

(हे मी चेपुवर टाकणारे हो.. आधीच सांगते!)

उपाशी बोका's picture

23 Feb 2017 - 8:20 pm | उपाशी बोका

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

+१०००

ट्रेड मार्क's picture

23 Feb 2017 - 8:32 pm | ट्रेड मार्क

कायम लक्षात ठेवावे असे विचार -

"आजच्या आनंदावर विरजण पडेल इतकी पण उद्याची काळजी करू नये." हे सहज सोपे नाही ! पण या जगात सहज सोप्या आणि तरीही उत्तम अश्या किती गोष्टी आहेत ?!

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

राजाभाऊ's picture

23 Feb 2017 - 9:35 pm | राजाभाऊ

>>एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा.<<

लोचा तिथेच तर आहे, लेखीकेच्या संदर्भात. भारत/अमेरिका यात वैध कोण आणि अवैध कोण हेच ठरत नाहि आहे त्यांचं, म्हणुनंच ना हा सगळा लेखप्रपंच?.. :)

पिलीयन रायडर's picture

23 Feb 2017 - 9:56 pm | पिलीयन रायडर

भारत आणि अमेरिका दोन्ही वैधच आहेत हो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैध = कायदेशीर ! :)

भारतिय नागरिकाने भारतिय कायदे पाळून भारतात राहणे जितके वैध आहे; तितकेच त्याने भारत व इतर एखाद्या देशाच्या सर्व कायदेशीर तरतूदी पाळून, व्हिसा काढून, तेथे जाणे/राहणे/नोकरी करणे/स्थायीक होणे वैध असते.

यामध्ये, एखाद्याने वैयक्तिक निर्णय घेण्यासारखे काही नसते... केवळ सद्य कायदे पाळून कृती करणे अपेक्षित असते.

कारण तो तीन ठिकाणी चुकलेला आहे .

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.

वैध गोष्टींचीच चर्चा चालू आहे तस्मात पहिल्या वाक्याला अर्थ नाही. संधी गमावली असं वाटणं हे निवडलेला पर्याय आनंद देत नाही याचं लक्षण आहे आणि फायनली, खंत वाटणं हे स्वतःला स्वतःच्याच निर्णयामुळे हतबल झालो असं समजल्यामुळे होतं.

"लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे... त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो.

अजिबात नाही. मी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी बोलतोयं आणि लग्नाचा निर्णय हे निर्णयप्रक्रियेतल एक उत्तम उदाहरण म्हणून दिलंय. माझं म्हणणं असंय की पोस्टवर आलेले सत्राशे पन्नास विचार डोक्यात असल्यावर निर्णय असंभव आहे, मग ते विचार कितीही उच्च असोत. प्रत्येक योग्य निर्णय हा विचार प्रक्रिया संपूर्णपणे थांबल्यावरच होतो. मनाच्या तौलनिक अवस्थेत घेतलेला निर्णय म्हणजे मनाच्याच एका बाजूला दाबून, दुसरी वरचढ झालेली असते. दाबलेली बाजू केव्हाही वरचढ होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे संधी गमावल्याची खंत वाटते.

The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitus

यात हेराक्लीटस काही विशेष सांगत नाही. परिस्थिती बदलते म्हणूनच मनाला आधीचा निर्णय अयोग्य होता, संधी गमावली वगैरे सुनवायचा चान्स मिळतो. पण बदललेल्या परिस्थितीत फेरनिर्णय घेण्याची स्थिती आली तरी पुन्हा निर्णय प्रक्रिया सेमच असते ! म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या सत्राशे पन्नास विचारांचा कोलाहल थांबल्याशिवाय योग्य निर्णय होत नाही.

थोडक्यात, तुम्ही निर्णय कशाविषयी घेता हे कायम गौण आहे, तो कसा घेता ते महत्त्वाचंय. मनानं निर्माण केलेले सर्व विकल्प एकदाच निरखून, मनाला संपूर्णपणे बाजूला करुन, जो स्वतःच्या हंचला योग्य वाटतो तो तत्कालीक निर्णय कायम समाधान देतो कारण तो तुम्ही स्वतःच्या जवाबदारीनं घेतलेला असतो. त्या निर्णयाबद्दल मन खंत निर्माण करुच शकत नाही कारण मनाचा (थोडक्यात डेटाचा) उपयोग करुन तुम्ही स्वतःच्या समग्रतेनं तो घेतलेला असतो. परिस्थितीनुरुप फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्हाला खंत वगैरे वाटत नाही कारण घडून गेलेल्या गोष्टींचा उहापोह केवळ कालापव्यय आहे याची तुम्हाला कल्पना असते. तस्मात, नव्या परिस्थितीत तुम्ही मनानं दिलेला नवा डेटा व्हेट करता आणि मग मनाला बाजूला सारुन पुन्हा स्वतःच्या अंतःप्रेरणेनं निर्णय घेता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी काही वेगळे सांगू शकत नाही, तर मग माझी पामराची काय पत्रास ! :) ;)

तुमचा प्रत्येक निर्णय नेहमीच अचल, सार्वकालीक आणि बरोबरसुद्धा असतो असे तुम्ही आतापर्यंतच्या अनेक लेख व प्रतिसादांतून पुरेपूर सिद्ध केलेले आहेच ! तेव्हा माझा वरचा प्रतिसाद तुम्हाला लागू होत नाही.

मी व इथले अनेक जण मर्त्य मानवच आहेत आणि नेहमीच अचल, सार्वकालीक आणि बरोबर असलेले निर्णय घेऊ शकत नाहीत असा माझा समज आहे. माझा प्रतिसाद केवळ अश्या लोकांसाठीच होता.

मी तर माझे जागा/देश/व्यवसाय याबद्दलचे अनेक निर्णय बदलत्या परिस्थितीप्रमाणे अनेकदा बदलेले आहेत. मोठ्या कालांतराने काय परिस्थिती/पर्याय/संधी निर्माण होतील याचे ज्ञान आजच होण्याइतका प्रगल्भ भविष्यवेत्ता मी नाही. तसेच, परिस्थितीत झालेल्या बदलाने पूर्वीचा निर्णय काही कालाने मला समाधानकारक वाटला नाही किंवा अगदी एखादा निर्णय चुकला असे ध्यानात आले तर ते स्विकारायला मला काहीच कमीपणा वाटत नाही. किंबहुना, ते सत्य न स्विकारून हट्टीपणे अचल राहण्यात काहीतरी मोठा घोळ आहे असे माझे मत आहे. त्यामुळे, परिस्थितीतील बदलांवर लक्ष ठेऊन, त्याप्रमाणे विचार करून, मी माझे जागा/देश/व्यवसायाचे पर्याय अनेकदा बदलले आहेत आणि तसे केल्याबद्दल मी समाधानीही आहे.

वर म्हटल्याप्रमाणेच...

बदलणारी काळ-स्थळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे.

...हे एक सबळ शास्त्रीय सत्य आहे आणि त्यावर माझा अचल विश्वास आहे ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

उगाचच आपली, एक धोक्याची सूचना...

"एखाद्या रुग्णामध्ये सुरू केलेले औषध अपेक्षित परिणाम साधत नाही"
किंवा
"नवीन तपासणींच्या आधारावर जुने औषध बदलून नवीन औषध सुरू केल्यास अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त चांगला परिणाम साधला जाईल"
किंवा
"नवीन संशोधनामुळे पूर्वीपेक्षा जास्त परिणामकारक औषध आता उपलब्ध झाले आहे"

...असे नजरेस येऊनही, "पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात.

संजय क्षीरसागर's picture

24 Feb 2017 - 10:59 am | संजय क्षीरसागर

मुळात निर्णय कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही. हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात. तो बहुमतानं घेतलेला निर्णय नसून एकमतानं घेतलेला निर्णय असतो. या निर्णयाची कारणमिमांसा होत नाही त्यामुळे मन हुकलेली संधी, खंत असे विषयच काढू शकत नाही. असा निर्णय कायम आनंददायी असतो कारण तो तुम्ही घेतलेला असतो आणि त्याची जवाबदारी पेलायला तुम्ही राजी असता.

भविष्यात नव्या परिस्थितीनुसार फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्ही कोणतीही खंत करत बसत नाही कारण परिस्थितीबदलामुळे तो घ्यावा लागतो आहे याची तुम्हाला जाणीव असते. पहिला निर्णय साफ चुकला तरी अंतःप्रेरणेनं निर्णय घेणारा खंत करत नाही कारण घडलेल्या घटनेची उस्तवार करण्यात फक्त वर्तमानात कालापव्यय होते याची त्याला पूर्ण कल्पना असते. तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो !

पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात.

हे विधान, वरचा प्रतिसाद वाचल्यावर गैरलागू आहे असं लक्षात येईल. आणि सगळी चर्चा मूळ निर्णयावर चालू आहे, फेरनिर्णयावर नाही हे देखिल कळेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा.

तो आधुनिक शास्त्रांवर आधारीत असला तर मात्र माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

******

आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.

हे "मनाचा कंप्युटरसारखा उपयोग करणे" पण तो "कंप्लीटली शटडाऊन करून मगच त्याचा वापर करणे" (!!!) आणि "वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबवून निर्णय घेणे"...

हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे.

******

"हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात." ???!!!

याला साध्या मराठीत "अशास्त्रीय निर्णयप्रक्रिया" म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे "प्रोस आणि कॉन्स" पडताळून त्यांचा तर्कशास्त्राच्या पायावर विचार करून निर्णय घ्यावा, अशी सर्वमान्य शास्त्रिय पद्धत आहे. अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते, पण केवळ एकमेव इनपुट नसते, त्या हंचला आधार देणारे काहीतरी पुरावे असावे, असा शास्त्रिय दंडक आहे. विनापुरावा हंचला फारतर "unknown-unknown factor" असे समजून त्याच्यासाठी धोकप्रबंधक उपायांचा ('रिस्क मॅनेजमेंट' उर्फ तसे घडलेच तर, त्यापासून होणारा धोका टाळणार्‍या आणि/किंवा त्या परिस्थितीचा फायदा घेणार्‍या उपायांचा) विचार करून ठेवावा असे समजतात.

******

तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो !

१. एकदा निर्णय घेतल्यावर इतर सगळे विसरून त्या निर्णयाप्रमाणेच पुढे चालावे असे तुम्हीच म्हटले आहे. मग, "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" हे आपल्या सतत सजगपणे निरिक्षण न करता कसे साधेल बरे ?!

२. नवीन निर्णय घेताना "कंप्लीटली शटडाऊन केलेल्या मनाच्या कंप्युटरमध्ये" हे नवीन फॅक्टर्स कसे इनपुट करणार ?

३. तुम्हीच म्हणता की "निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात" आणि त्याबरोबरच म्हणताहात की "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" !

"नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्‍या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?!

******

असो. तुमची आणि माझी वैचारीक पद्धती वेगळी आहे हे पुरेसे सिद्ध झाले आहेच. तुम्हाला तुमची विचारपरंपरा कायम ठेवण्याचा लोकशाही हक्क आहेच ! मात्र, एकमेकाला समांतर जाण्यार्‍या व एकमेकाला कधीच न भेटणार्‍या स्तरांवर चर्चा चालू ठेवण्यात काही हशिल आहे का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे.

पण त्याबाबत माझे मत माझ्याकडे आणि तुमचे तुमच्याकडे ठेवून "लेट अस अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ?

संजय क्षीरसागर's picture

24 Feb 2017 - 11:51 pm | संजय क्षीरसागर

मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा.

मग हा प्रतिसाद जरी तुमच्या प्रतिसादाला लिंक केला असला तरी तो तुमच्यासाठी नाही असं समजा. (यात कोणताही उपहास नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.)

हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे.

डोक्यात अनंत विचार असतांना घेतलेला निर्णय (प्रोस अँड कॉन्स अ‍ॅनालिसिस) नेहमी द्वंद्वातून निर्माण झालेला असतो. अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला ध्यानप्रक्रिया (मेडिटेशन) समजावून घ्यावी लागेल. तो प्रयत्न मी मनावरच्या लेखमालेतून करत होतो (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा) पण अशा विषयांसाठी हा फोरम नाही हे लक्षात आल्यावर लिहीणं बंद केलं. तरीही मूळ मुद्दा उरतोच : मानसिकप्रक्रिया थांबल्याशिवाय एकात्म निर्णय होत नाही. त्यामुळे सोडून दिलेल्या विकल्पांच्या बाबतीत संधी हुकली आणि खंत वाटली हे प्रश्न निर्माण होतात.

अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते

हंच हा कधीही इनपुट नसतो. तो मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे अस्तित्वानं दिलेला कौल असतो.

नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्‍या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?!

जीवन कॅलिडोस्कोपिक आहे त्यामुळे फॅक्टर्स बदलत राहाणारच. ते पूर्वी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा परिणाम करु शकतात. जगाच्या अंतापर्यंत टिकणारा निर्णय हा विपर्यास आहे. फेरनिर्णयाच्या वेळी सुद्धा त्या समयी असलेले फॅक्टर्स व्हेट करुन पुन्हा अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला काहीच अडचण नसते.

लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे.

लग्न काय, देशाची निवड काय, की दोन बॉल आणि आठ रन्स या सिचुएशनमधे बोलरला पडलेला पेच काय, मूळ प्रश्न `संभ्रमात निर्णय कसा घ्यावा' हा आहे. आणि त्याला हंच हे एकमेव उत्तर आहे !

लेट अस अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ?

पहिला भाग कायम मान्य आहे कारण हंच काय असतो याची तुम्हाला कल्पना दिसत नाही आणि मानसिक उहापोहातून निर्णय घेण्याची प्रक्रिया मी केव्हाच सोडून दिली आहे. बाकी धाग्याचं काश्मिर वगैरे करण्याचा माझा उद्देश कधीही नसतो, फक्त माझा प्रतिसाद दुनियेपेक्षा वेगळा असतो हे नक्की.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 12:15 am | संदीप डांगे

तुमचे म्हणणे पटते, कारण जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तो आपण इम्पल्सिव घेतलेला असतो. कितीही वाटले की आपण सगळा विचार, प्रोसेस, प्रोज-कॉन बघून घेतला आहे तरी तो इम्पल्सिव असतो.. मूळात मन एकिकडे झुकलेलं असतं त्यासंदर्भातले प्रोज आणि जिकडे विरोधी आहे तिकडचे कॉन्स जास्त गोळा करतं... त्यामुळे अगदी दहा वर्षं विचार केला तरी ज्या क्षणी निर्णय होतो तो इम्पल्सिव डिसिजन असतो...

वरील विधाना ला अनेक मर्यादा आहेत. जसे की वाईट की चांगली, अयोग्य की योग्य, वैध की अवैध, लाभकारक की नुकसानकारक असे दोन पर्याय असतात तेव्हा हा निर्णय इम्पल्सिव नसतो, तो ऑब्वियस असतो. पण जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो.. अनेकांना हे पटणार नाही पण विचार करुन बघा... आयुष्यात आपण आजवर घेतलेले निर्णय तसेच्या तसे यशस्वी झालेले आहेत काय?

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 12:40 am | संजय क्षीरसागर

जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो..

सांप्रत चर्चा ही पहिल्या सिच्युएशन मधे मोडते !

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 11:16 pm | सतिश गावडे

जो भविष्याचा विचार करतो तोच संभाव्य धोके विचारात घेतो. त्यालाच धोका नियोजनाची गरज भासते.

जो या क्षणी, वर्तमानात जगत असतो तो धोक्यांचा विचार करत नाही. तो आताचा क्षण बे० आणि स्व० पणे जगत असतो.

प्रतिसाद योग्य आहे ! वर्तमान कायम बिनधोक आहे कारण तो काल किंवा घटनेनं विस्कळीत होत नाही. अर्थात, हा `वर्तमान' काय आहे ते कळल्याशिवाय प्राप्त परिस्थितीची बेशर्त स्वीकृती करत स्वच्छंद जगणं शक्य नाही हे सुद्धा तितकंच खरं.

अर्धवटराव's picture

25 Feb 2017 - 12:59 am | अर्धवटराव

हे सगळं चर्वीतचर्वण "शांत चित्ताने निर्णय घेणे/थंड डोक्याने विचार करुन निर्णय घेणे" याबद्दल सुरु आहे काय? तसं असेल तर हा कॉमनसेन्सचा भाग झाला. तुमच्यासारखच यात आध्यात्म वगैरे कुठुन आलं हे मलाही कळत नाहि ;). शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे. त्यामुळे मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच.
सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे.

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 9:01 am | संजय क्षीरसागर

शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे.

मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही.

मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच.

मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही.

सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे.

अध्यात्म हा बुरखा आहे ? ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे. फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.

अर्धवटराव's picture

25 Feb 2017 - 1:03 pm | अर्धवटराव

मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही.

विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे.

मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही.

विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात. अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.

अध्यात्म हा बुरखा आहे

"मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे" असं म्हणणे आणि "आध्यात्म हा बुरखा आहे" असं म्हणणं यात मुलभूत फरक आहे. तो तुम्हाला खरच कळला नाहि का? साधं मराठीत लिहीलं आहे.

ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे.

सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स.

फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.

तुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 1:35 pm | संजय क्षीरसागर

विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे.

विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं?

अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं.

अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते.

जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.

मागच्या प्रतिसादात तुम्ही असा ज्योक मारला होता शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे ! आता म्हणतायं जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. म्हणजे तुम्ही मनाच्या सुप्त अवस्थेत (झोपेत) स्वेच्छेनं विचार करु शकता का ? झोपेत जागृत होत असलेल्या मनाच्या प्रेरणेला स्वप्न म्हणतात. जागृत अवस्थेत आणि मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे आपल्याला जी उमगते ती अंतःप्रेरणा असते.

मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे...ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे....
सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स.

अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही.

फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.

अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.

अर्धवटराव's picture

25 Feb 2017 - 10:38 pm | अर्धवटराव

विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं?

विचार मनाव्यतिरीक्त कुठेच नसतात. विचार थांबल्यानंतर मन पुर्वी जिथे होतं तिथेच असतं. ते कुठे जात-येत नाहि. तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे.

अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते.

शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होतात. सदर चर्चा मानसशास्त्राच्या दृष्टीने चालली आहे. पण "विचार" मनात तयार होतात आणि "अंतःप्रेरणा" मेंदुत तयार होते असा काहि तुमचा गोंधळ झालेला दिसतोय. असो.

अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही.

बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि.

शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही.

तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ?

अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.

मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो.

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 11:34 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे.

शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होतात

तुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते.

बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि.

अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे.

तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ?

ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही.

मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो.

अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 11:45 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला इतकी माहिती आहे (असा तुमचा गैरसमज असला तरी) अंतःप्रेरणेवर एक धागा काढा. तिथे मस्त चर्चा होईल. आणि आता मला धागा काढायला सांगून माघार घेऊ नका. कारण तुमच्या दृष्टीनं अंतःप्रेरणा हा `साधा आणि सरळ फिनॉमिना' आहे ..

अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.

अर्धवटराव's picture

26 Feb 2017 - 1:36 am | अर्धवटराव

तुम्हाला इतकी माहिती आहे (असा तुमचा गैरसमज असला तरी) अंतःप्रेरणेवर एक धागा काढा.

आपल्या माहितीचं प्रदर्शन म्हणुन नाहि, पण आपल्याला काय पटलं/समजलं यावर प्रकटन म्हणुन धागा नक्की काढता येईल.

तिथे मस्त चर्चा होईल.

मुद्द्यांवर चर्चा झाली तर खरच छान होईल. त्याऐवजी विरोधी मत असणार्‍याला "गोंधळ, फंडा चुकणे, ज्योक मारणे, कळणं अशक्य आहे, अभ्यास नाहि, भ्रमात आहे" वगैरे उपाधींनी नावाजणार असलात... तरी मस्त चर्चा होईल पण हाति काहि लागणार नाहि.

आणि आता मला धागा काढायला सांगून माघार घेऊ नका.

मी तुम्हाला धागा काढायला सांगायचा काय संबंध ? आणि जर कुणी असं म्हटलच तर ते माघार घेणं आहे असं तुम्हाला का वाटतं ? असो.

कारण तुमच्या दृष्टीनं अंतःप्रेरणा हा `साधा आणि सरळ फिनॉमिना' आहे ..

विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात.
मानसशास्त्र दृष्टीने हा सरळ साधा फिनॉमिनॉन मी आधीच टंकला आहे कि. असो.

अर्धवटराव's picture

26 Feb 2017 - 1:17 am | अर्धवटराव

तुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते.

मेंदु आणि मन यातला जो फरक तोच जाणिव आणि मन यातला फरक. शरीरशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जाणिव, सायकोलॉजी अंगाने विचार केला तर मन. तो केवळ बघायचा दृष्टीकोन आहे. जाणिव आणि मन अशा परस्पर भिन्न्/इंडीपेण्डट्/पॅरलल यंत्रणा नाहित.

अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे.

मनाला शटडाऊन वगैरे करण्याचा गप्पा मारणारा मनाच्याखोलीविषयी, मनाच्या स्कोपविषयी अनभिज्ञ आहे. मनाचा फार संकुचीत अर्थ घेतोय तो.

ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही.

मानसशास्त्राला अभ्यात्माच्या नावाने खपवणार्‍याकडुन आणखी काय अपेक्षा असणार.

अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.

विचार संपले कि मन संपलं इतपतच तुमचा मनाचा अभ्यास आहे. त्यापलिकडच्या मानसशास्त्रालाच तुम्ही अध्यात्म मानता. हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे. असो.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 9:42 am | संजय क्षीरसागर

म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल पण इथे अंतःप्रेरणेवरची चर्चा इतर प्रतिसादात हरवून जाईल. आता तुम्ही याविषयावर धागा काढाच. तिथे मग कुणाला कितपत माहिती आहे ते स्पष्ट होईल. आणि हंचसारख्या तुमच्या दृष्टीनं `सरळ आणि साध्या' परिमाणाची सदस्यांना ओळख होईल.

शिवाय तुमची ही काय ग्रेट थिओरी आहे

विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात.

तेही कळेल. अर्थात, तुम्ही पोस्ट लिहीण्यापूर्वीच, उपरोल्लेखित फंडा संपूर्ण चुकीचा आहे हे नमूद करतो.

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
धन्यवाद डॉक्टरसाहेब!

सुबोध खरे's picture

23 Feb 2017 - 6:52 pm | सुबोध खरे

आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
+१००

उपाशी बोका's picture

23 Feb 2017 - 10:02 pm | उपाशी बोका

तुम्ही काय करावे, काय करू नये, हे मी तरी सांगू शकत नाही. पण माझा अनुभव सांगतो. लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

मुळात "भारतीय" म्हणजे काय, याच्याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. केवळ भारतात जन्मलो, म्हणून मी भारतीय असे मलातरी वाटते. भारतात वाढलो, तिथल्या गोष्टींची मला सवय आहे, तिथे (जवळजवळ फुकटात) शिक्षण झाले त्याबद्दल आदर आहे, तिथले जेवण मला आवडते वगैरे वगैरे. पण खरं सांगायचं तर मी इतर कुठेही जन्मलो असतो (अमेरिका असो वा पनामा), तर माझ्या जन्मभूमीबद्दल आणि कर्मभूमीबद्दल मला असेच वाटले असते, याबद्दल मलातरी शंका नाही. मी बरेच वर्षे हॉस्टेलवर राहिलो (आई-वडील आणि नातेवाईकांपासून दूर), कामानिमित्त बरेच वर्षे फिरतीचा प्रवास असे, त्यामुळे "आपल्या" लोकांबद्दल फारशी ओढ नाही. जे सोबत आहेत, तेच मित्र आणी तेच नातेवाईक अशी वृत्ती झाली. कदाचित त्यामुळेच भारत हा "सोईस्कर देश" इतपतच प्रेम वाटते, पण पराकोटीचा अभिमान वगैरे काही वाटत नाही. तसेच, अमेरिकेलाच काही सोनं लागलं आहे, असे पण वाटत नाही. उद्या गरज पडली किंवा आवडले तर स्कँडेनेवियन देशात राहायची तयारी आहे आणि साउथ अमेरिकेत एखाद्या भारताहून गरीब देशाची पण तयारी आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान मानायची तयारी असली आणि नावडत्या परिस्थितीतून मार्ग काढायची तयारी असली की त्रास होत नाही. मी या मताचा आहे.

शिक्षण झाल्यावर मी भारतात नोकरी केली. सरकारने माझ्यावर इतका पैसा खर्च केला, सगळेच जर परदेशात गेले तर कसं काय होणार वगैरे विचार तेव्हा मनात होते. रग्गड पैसे मिळत होते, भारताबाहेर जायची गरजच न्हवती. हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले. कामानिमित्त चपराशापासून ते आय.ए.एस.पर्यंत सगळ्यांना पैसे चारून झाले. एकसे एक दिव्य अश्या बॉसबरोबर काम करून झाले, खिशात पैसे असूनही रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत म्हणून "जुगाड" केले, "चलता है" म्हणणार्‍या सप्लायर्सचे लाड पुरवून घेतले. ( मी भारतातल्या इंफ्रास्ट्रक्चरबद्दल काही म्हणत नाहीये. भारतात राहाणार्‍यांनी धूळ आणि गर्दीबद्दल कितीही नावे ठेवली तरी इतरांनी जराही काही म्हणले की आवडत नाही, असा अनुभव आहे आणि त्यामुळे मी बोलतही नाही.) मग मनात विचार आला, की आज मी तरुण आहे, लग्न झालेलं नाही, पण हे असं किती दिवस चालणार? आपल्याला आयुष्यभर हे जमणार आहे का? आवडणार आहे का? मग मी भारताबाहेर पडण्याचा विचार केला. अमेरिकाच पाहिजे असं काही नाही, आधी ऑस्ट्रेलियाला प्रयत्न केला. सिंगापूर, मिडल ईस्ट, कॅनडा यांची पण तयारी होती. नोकरी इतक्या भरभक्कम पगाराची होती की दुसरे कुणी ऑफरच द्यायचे नाही.पण शेवटी बॉसला कंटाळून ३५% कमी पगारावर दुसरीकडे गेलो आणि मग तिथून परदेशात.

माझे काही मित्र अमेरिकेतून परत भारतात परत गेले आहेत. एकाने ६ वर्षात भरपूर पैसे कमवले आणि तो पुण्यात ४२ व्या वर्षी रिटायर झाला. अजून एक जण असाच पैसे कमवून आता मुंबईत नोकरी करतो, पण स्वतःच्या नियमानुसार. सकाळी ११ ते ८ अशी वेळ आहे, तर नेमक्या त्याच वेळात काम करतो. शनिवार-रविवार फक्त फॅमिलीसाठी. सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे. माझ्या मुलीने सांगितले की तिला अ‍ॅकेडमीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली पण तिला जायचे नाही, कारण तिथे फक्त अभ्यास आहे, तिचे आवडते पेंटिंग हा विषय नाही. मी म्हणालो, जायचे नसेल तर जाऊ नको. आम्ही घरी मराठी टीव्ही बघतो, भारतीय जेवण बनवतो, पण का? तर ते सहज जमते आणि सवय आहे म्हणून. "भारतीयत्व" जपण्यासाठी इथे कित्येक आई-वडील बळंबळं मुलांना टेंपलमध्ये नेतात, भारतीय कपडे घालायला लावतात, भारतीय जेवणच खायचे ही सक्ती करतात. अरे कशाला? मराठी शिकण्याऐवजी स्पॅनिश किंवा चायनीज (मँडॅरिन) शिकवा ना त्यांना. समरमध्ये अट्टाहासाने भारतातच जायचे त्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या देशात सर्वांनी जा, असे माझे मत आहे. मुलांसाठी पुरेसे पैसे कमवले की त्यांना त्यांच्या मनासारखे शिकवता पण येईल, बरेच भारतीय-वंशाचे पालक, त्यांच्या मुलांना डॉक्टरच बनले पाहिजेस असे सांगतात, तसे तरी करावे लागणार नाही. शेवटी काय, प्रत्येक जण त्याच्या नशीबाने जगतो, योग्य दिशा दाखवणे इतकेच आपण करू शकतो.

थोडक्यात काय? फ्लेक्सिबल राहा. जिथे संधी मिळेल तिथे जा. आणि एकदा निर्णय घेतला की त्याबद्दल दु:ख करू नका कारण "त्या परिस्थितीत" तुम्ही "त्या वेळी योग्य" असा निर्णय घेतलेला असतो. कमी पैशाने त्रास जरूर होतो, पण उत्पन्न $७५,००० असले की आयुष्यातला आनंद फारसा वाढत नाही. मॅस्लोच्या पिरॅमिडप्रमाणे, एकदा बेसिक गरजा भागल्या की मग तुम्ही तुमचा जीवनातला आनंद (Self-actualization) कुठे शोधायचा ते ठरवा. तेच खरे समाधानी जीवन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

ट्रेड मार्क's picture

24 Feb 2017 - 12:26 am | ट्रेड मार्क

मस्त प्रतिसाद

राघवेंद्र's picture

24 Feb 2017 - 1:34 am | राघवेंद्र

उपाशी बोका, समर्पक आणि एक्का काका यांच्या प्रतिसादामुळे आमच्या जहाज कुठल्या दिशेकडे न्यायचे यालाच खूप मदत होत आहे.

पिरातैला धागा काढल्याबद्दल पुन्हा धन्यवाद !!!!

शब्दबम्बाळ's picture

24 Feb 2017 - 2:15 pm | शब्दबम्बाळ

हा प्रतिसाद पूर्णतः पटला! तो वरती आरक्षणाचा नाही पटला.. पण तो वेगळा मुद्दा आहे...

"सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे"
हेच मी माझ्या एका प्रतिसादात म्हणत होतो कि उत्तम आर्थिक स्थैर्य असेल तर काहीही करण्याचे स्वातंत्र्य राहाते. मग मुलांनाही त्यांचे कलागुण जोपासण्याची संधी मिळू शकते.
आपल्याला आयुष्यात उत्तम पैसे-नाव वगैरे कमवायचे असतील आणि तशी संधी कुठे (म्हणजे जगात कुठेही) मिळत असेल तर तेथे जाण्याचा निर्णय घेणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे!
मला वाटत नाही त्यात इथे किंवा तिथे राहणाऱ्या कोणाला काहीच अडचण असावी. साधी सोप्पी गोष्ट आहे पण त्यात भारतीयत्व, संस्कृती अशा जड जड गोष्टी आल्या कि गोंधळ होतो. तसा सामान्य माणसाचा होणे हे हि साहजिकच आहे.

पण मग काही लोक उगाच अमेरिकेत कसे "सगळंच" भारी आहे आणि भारतात कशी बोंबाबोंब आहे इतकेच लिहणार असतील तर त्याला उत्तर देखील तसेच येणार.
ट्रेंड मार्क भाऊ परत परत लिहीत आहेत कि बाहेरच्या देशात राहणार्यांना भारतात राहणारे लोक का हिणवत आहेत? भाऊ, फक्त तुमच्याच प्रतिसादाला तश्या प्रतिक्रिया आल्यात! बाकी बरीच चांगली चर्चा देखील झालीये... मग असे का झाले हा विचार जरा तुम्हीच करून बघा...

बाकी, भारत आणि भारतीय म्हणजे नक्की काय हे प्रश्न कॅप्टनच्या धाग्यावर मी काही वर्षांपूर्वी विचारले होते त्या धाग्याची लिंक देतो खाली.
दुवा

आज ती 'श्रीनिवास कुचिभोतला' च्या हत्येची बातमी वाचली आणि वाईट वाटले.
हे क्वचित होणारे हल्ले असतील पण सगळ्यांनी काळजी घ्या...

ट्रेड मार्क's picture

24 Feb 2017 - 3:17 am | ट्रेड मार्क

आपल्या सोयीनुसार स्थलांतर करण्यात काय चूक आहे? खरं तर प्रत्येक माणूस स्थलांतर करतच असतो, काही जण गावातून शहरात राहायला येतात तर काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर ज्यांना शक्य असेल ते दुसऱ्या देशात राहतात.

पण दुसऱ्या देशात राहणाऱ्यांना का हिणवलं जातं काय माहित. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायच्या आधी, गेल्यावर तुलना तर सगळेच जण करतात. एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहण्याचा निर्णय घेण्याआधी आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी, तिथे रहात असलेल्या ओळखीच्या लोकांशी चर्चा करतो. हेच पिराताई करत आहेत आणि त्यांना प्रतिसाद देताना दोन ठिकाणांची तुलना होणे अपरिहार्य आहे. त्यात एक ठिकाण १००% वाईट आणि दुसरं १००% चांगलं असं कोणाचंच म्हणणं नाहीये कारण तसं असूच शकत नाही. भारत काही बाबतीत ग्रेट आहे पण काही बाबतीत मागास आहेच त्याचप्रमाणे अमेरिका पण काही बाबतीत मागास आहेच. उगाच एखाद्या ठराविक गोष्टीला एक प्रतिसाद दिला म्हणजे तेच १००% सगळीकडे लागू होत नाही. वर कोणीतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल विचारलंय, तर न्यू यॉर्क सारख्या शहरात वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. पण बाकीच्या मध्यम शहरांत व कमी लोकवस्तीच्या ठिकाणी बोंब आहे. त्याविषयी चर्चा असेल तर ही गोष्ट पण निघेलच. पण मग रस्ते व महामार्ग, ट्रॅफिक सेन्स, प्रदूषण यांची पण तुलना होईल.

आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये. आम्ही इतर देशांत राहून फार काही ग्रेट काम करतोय किंवा आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ असे म्हणत नाही किंवा तशी आमची समजूतही नाही. आम्ही ज्या देशात राहतो तिथले प्रॉब्लेम्स पण आम्ही बोलतोच. माझा मेडिकल इन्शुरन्सच्या अनुभवाचा हा धागा वाचा. इथली ही व्यवस्था कशी गंडलेली आहे हे सांगितलं आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि जिथे सुधारणेची गरज आहे तिथे काय सुधारणा हवीये हे सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग तो कुठलाही देश असो!

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 9:40 am | अनुप ढेरे

कोणीही कोणाला हिणवत नाहीये. असेलच तर तुम्हीच हिणवताय भारतीय माध्यमं अमुक तमुक, भारतातली हपिसं अशी तशी वगैरे करून. स्थलांतर चूक आहे अस्सं कोणीही म्हणत नाहीये. तुम्हालाच का असं वाटतय की लोक तुमच्यावर टीका करतायत?

आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये.

वैयक्तिक प्रश्नावर जाहीर धागा काढला आहे. मत येणारच लोकांची. उगाच का तणतण करायची?

आजानुकर्ण's picture

24 Feb 2017 - 9:56 am | आजानुकर्ण

=))

हा हा.

- अऩुपरावांचा फ्यॅन

आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये.

तुम्हाला पटवून द्यायची गरज नाहीये हे दहावेळा का पटवून देताय ब्वॉ.

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 3:42 pm | संदीप डांगे

ती नवीन बांगड्या घेतलेल्या स्त्रीची कहाणी आठवली... तिच्या नव्या बांगड्यांकडे लक्ष जात नाही कोणाचे तर अपरोक्षपणे खुणावून खुणावून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.

आपल्या सोयीनुसार स्थलांतर करण्यात काय चूक आहे? खरं तर प्रत्येक माणूस स्थलांतर करतच असतो, काही जण गावातून शहरात राहायला येतात तर काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर ज्यांना शक्य असेल ते दुसऱ्या देशात राहतात.
>> बरोबरच आहे.. काहीच चुकीचे नाही ह्यात.. मी स्वतः अकोला सोडून मुंबईला आलो, आणि माझ्या दहावीच्या वर्गातले ६० पैकी चाळीस मुलं अकोल्यात परतलेलीच नाहीत, परतणारही नाहीत. पण ह्यापैकी माझ्यासकट कोणाच्याही मनात अकोल्यात आम्हाला संधीच नाही, ते कसे मागासलेलं आहे, (मुंबै-पुण्याच्या तुलनेत) बेशिस्त, आळशी लोक आहेत असे विचार आलेले नाहीत. खूप प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच आहे, जिथे संधी उत्तम मिळाल्या तिकडे गेले, सिम्पल!. इकडे संधीच नाहीत, आणि शंभर समस्या आहेत म्हणून करवादत दुसरीकडे गेले नाहीत... अ‍ॅप्रोचमध्ये फरक आहे. बघा, विचार करुन.

पण दुसऱ्या देशात राहणाऱ्यांना का हिणवलं जातं काय माहित. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायच्या आधी, गेल्यावर तुलना तर सगळेच जण करतात.

>> करावी की तुलना, नाही कोण म्हणतंय.. आणि दुसर्‍या देशात राहणार्‍यांना कोणीही हिणवत नाहीये, गैरसमज नको. दुसर्‍या देशात जाऊन भारताबद्दल करवादनार्‍यांना उत्तर दिले जात आहे.

एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहण्याचा निर्णय घेण्याआधी आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी, तिथे रहात असलेल्या ओळखीच्या लोकांशी चर्चा करतो. हेच पिराताई करत आहेत आणि त्यांना प्रतिसाद देताना दोन ठिकाणांची तुलना होणे अपरिहार्य आहे.
>> ती त्यांची वैयक्तिक समस्या आहे, तशीच इतर कोणालाही जाणवत असेल ह्या दॄष्टीने धागा काढला आहे व त्यावर त्याच्याशी संबंधीत योग्य प्रतिसादही आले आहेत.

त्यात एक ठिकाण १००% वाईट आणि दुसरं १००% चांगलं असं कोणाचंच म्हणणं नाहीये कारण तसं असूच शकत नाही. भारत काही बाबतीत ग्रेट आहे पण काही बाबतीत मागास आहेच त्याचप्रमाणे अमेरिका पण काही बाबतीत मागास आहेच. उगाच एखाद्या ठराविक गोष्टीला एक प्रतिसाद दिला म्हणजे तेच १००% सगळीकडे लागू होत नाही.
>> एखादं ठिकाण हे वैयक्तिक बाबतीत वाईट की चांगलं असं असतं. दोष ठिकाणांत नाही तर त्याकडे बघणार्‍याच्या मनोवृत्तीत असतो. वैयक्तिक समस्यांवर तेवढ्याच परिघातून चर्चा करत असतांना समग्र भारत वा समग्र अमेरिका मध्ये आणायची काहीच गरज नसते. पिराताइंचा प्रश्न हा भारत विरुद्ध अमेरिका आहे हे मला व्यक्तिश: वाटत नाहीये. ज्यांना वाटतोय त्यांनीच भा.वि.अ. अशा भूमिकेतून उत्तरे दिली आहेत.

वर कोणीतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल विचारलंय, तर न्यू यॉर्क सारख्या शहरात वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. पण बाकीच्या मध्यम शहरांत व कमी लोकवस्तीच्या ठिकाणी बोंब आहे. त्याविषयी चर्चा असेल तर ही गोष्ट पण निघेलच. पण मग रस्ते व महामार्ग, ट्रॅफिक सेन्स, प्रदूषण यांची पण तुलना होईल.
>> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो.

आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये. आम्ही इतर देशांत राहून फार काही ग्रेट काम करतोय किंवा आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ असे म्हणत नाही किंवा तशी आमची समजूतही नाही.
>> हेच ते नविन बांगड्या नाचवून दाखवणे... नोबडी केअर्स बंधो! रिअली नोबडी केअर्स. तुम्ही इथे राहता का तिथे राहता.. जिथे राह्याचे तिथे राहा.. तुमच्या स्वतःशिवाय इतर कुणालाही काही फरक पडत नाही. पण जेव्हा अशा समस्या चर्चेला घ्याला तेव्हा भारताबद्दल बोलतांना तारतम्य असलेलं बरं असतं. स्वतःच समजून घ्यायचं की आपण बाहेरच्या देशात राहतो तर देशी लोक आपल्यावर जळतात, मग त्या जळकुट्यांना उच्चनैतिक भाषेत आपली भूमिका सांगायची.. रिअली नोबडी केअर्स. इथे भरत जाधवच्या मुलाखतीतले एक वाक्य आठवले, तसे ते माझ्या नेहमीच आठवणीत असते, आपल्या विचारांवर चेक राहायला.

भरत चाळीतून, तशा परिस्थितीतून वर आला, नामवंत झाला. तेव्हा त्याचे चाळीतले काही मित्र त्याला टाळायला लागले. त्याचे कारण त्याला समजले ते असे की ते मित्र असे समजत होते, की आता हा भरत मोठा, श्रीमंत, नामवंत झाला आता आपल्यासारख्या भणंगांना का भाव देइल, का मित्र मानेल, कसा काय पुर्वीसारखा वागेल. त्यावर भरतचे म्हणणे असे की त्यांची स्वतःची जशी मनोवृत्ती होती, तसाच ते विचार करत होते, भरत त्या जुन्या मित्रांबद्दल काय विचार करतो हे त्यांनी भरतला विचारलेच नाही. "ते भरत सारखे मोठे झाले असते तर त्यांनी सामान्य मित्रांसोबत जसे वागले असते तेच भरत करतोय" असं त्यांनी त्यांचे वाटून घेतलं. स्वतःच्या सुप्तविरोधी मनोवृत्तीला समोरच्या विरोधकावर लादून तो तसाच विचार करतो वागतो असे मानणे चुकीचेच.

आम्ही ज्या देशात राहतो तिथले प्रॉब्लेम्स पण आम्ही बोलतोच. माझा मेडिकल इन्शुरन्सच्या अनुभवाचा हा धागा वाचा. इथली ही व्यवस्था कशी गंडलेली आहे हे सांगितलं आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि जिथे सुधारणेची गरज आहे तिथे काय सुधारणा हवीये हे सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग तो कुठलाही देश असो!
>> बोलता तर बरं आहे की! त्या धाग्यावर कुणीतरी येऊन "इतके प्रॉब्लेम आहेत तरी काय त्या अमेरिकेला राहता, त्यापेक्षा बघा आमचा भारतच बरा!" अशा अर्थाचे काही बोललंय काय, तसं नसेल तर "अ‍ॅप्रोच" काय अस्तो हे लक्षात येईल.

"जिथे सुधारणेची गरज आहे तिथे आम्ही बोलतो तर काय वाईट" हा अनडिफिटेबल डिफेन्सीव स्टान्स आहे. सुधारणेचा चान्स आहे तिथे आम्ही बोलतो हे त्याच समस्यांना कंटाळून इथून जाणार्‍यांनी बोलणे विसंगत आहे. सुधारणेचा चान्स आहे तर तुम्ही त्यात काय भूमिका बजावता आहात हा प्रश्न येणारच. इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधे मी जर शिस्तीत गपगुमान गाडी चालवत असेल तरी मला आज अधिकार आहे की मी सुधारणा करत आहे म्हणण्याचा.. तो अधिकार बेशिस्त वाहतुकीला कंटाळून कायमचे परदेशी स्थाइक होणार्‍याला नाही. हे स्पष्ट असलेले बरे. अमेरिकेने त्यांची देशांतर्गत वाहतूक कशी ठेवावी याबद्दल इथल्या भारतीयांना बोलायचा अधिकार नाही तसेच तिथल्यांनाही इथे बोलायचा अधिकार नाही प्राप्त होत.

बाकी, टेराबायटी म्हणून हिणवलेल्या माझ्या प्रतिसादाला आलेल्या तुमच्या प्रतिसादाला जरा वेळाने उत्तर देतो.. तिथेही आपण असेच "आ बैल मुझे मार" करुन ठेवले आहे..

मिपा काय आणि मुपि काय, काही फरक नाही. हमेरिकेवर धागा आला कि कल्ला झालाच.

बा म्हाराजा रवळनाथा आम्ही मिपाकर गाऱ्हाण घालतो. ज्यांची इच्छा असलं त्यांना हमेरिकेला जावक मिळू दे रे.
जी काय त्यांची मनोकामना आसा ती पूर्ण कर. ह्या लेकरांचा कल्याण कर.

मलाबी हमेरिकेला जाऊन दे... तुका अशा १०० धाग्यांचा निवद देईन रं बा.... ता ध्यानात ठिव रे म्हाराजा ...

वेशीवरचा म्हसोबा's picture

24 Feb 2017 - 10:36 am | वेशीवरचा म्हसोबा

हा लेख सल्ला मागण्यासाठी लिहीण्यासाठी लिहीला असेल असे वाटत नाही. "मी २ वर्ष अमेरिकेत राहत आहे हे सांगणे" इतकेच या लेखाचा सुप्त उद्देश असावा असे वाटते. लेखातील वर्णनावरुन लेखिका आपल्या नवर्‍यासोबत डीपेंडंट व्हिजावर अमेरीकेला गेली असावी असावी असा कयास आहे. तसं असेल तर ग्रीन कार्ड बहोत दूर हैं.

हे आपलं उगाचच स्वतःभोवती आरती ओवाळणं वाटत आहे.

पिलीयन रायडर's picture

24 Feb 2017 - 10:54 am | पिलीयन रायडर

तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल चालु आहे आणि अजुन माझा डिपेंडंट व्हिजा निघत नाही म्हणजे काय... जीव भांड्यात पडला हो!

डिपेंडंट व्हिजा, तो ही गेल्या २४ तासात अ‍ॅक्टीव्ह झालेल्या आयडीने काढणे.. सगळं कसं अगदी पद्धतीने चालु आहे. और आंदो!! माझा अप्रतिम टाईमपास होतोय ह्या धाग्याने.

- (डिपेडंट व्हिजावासी, नवर्‍याच्या जीवावर आयतं गिळणारी, हिरवा माज असलेली आणि टोटली कामधाम नसलेली) पिरा!

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2017 - 11:04 am | धर्मराजमुटके

तुम्ही काहि प्रतिसाद इन्गोर केले तर होणारा त्रास कमी होईल असा आपुलकीचा सल्ला !
:)

पिलीयन रायडर's picture

24 Feb 2017 - 11:14 am | पिलीयन रायडर

नाही हो!! त्रास बिस अजिबात नाही!! माझा प्रश्न केव्हाच मागे पडलाय. हा धागा त्याबद्दल उरलेलाच नाही आणि मलाही त्याबद्दल ठेवायचा नव्हताच. मिपावर खुप आहेत माझ्या सारखे, ह्या मनस्थितीत अडकलेले. ज्याला दिशा दाखवतील असे लोकही इथेच आहेत. आणि ती चर्चा चालुच आहे. मला तिच्याशी मतलब. मी मतं मांडणारी मिपाकर आहे, पिंका टाकत फिरणारी नाही.

बाकी हे डिपेंडंट व्हिजा वगैरे म्हणाल तर खरंच आहे की ते! सध्या मी नवर्‍याच्या जीवावर इथे आलेय हे सत्यच आहे. आणि अगदी मनसोक्त ऐशही करतेय. असं आयुष्य मिळायलाही नशिब लागतं!! त्यामुळे लोकांची का जळते हे ही समजु शकते मी. =))

तुमच्या मनापासून दिलेल्या सल्ल्यासाठी आभार!

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2017 - 11:19 am | धर्मराजमुटके

ते ही खरेच म्हणा ! द मोअर यु गेट पर्सनल, द मोअर यु गेट युनिव्हर्सल.
:) :)

अभ्या..'s picture

24 Feb 2017 - 11:14 am | अभ्या..

त्रास ?
कसला? कुणाला?
;)

वेशीवरचा म्हसोबा's picture

24 Feb 2017 - 11:35 am | वेशीवरचा म्हसोबा

एनी पब्लिक शीट्टी इज गुड पब्लिक शीट्टी. ये दिल मांगे मोर आणि लांडोर. म्हणून तर त्या म्हणत आहेत "और आंदो!!".

अगं बाई, पलिकडच्या वेशीवरचे म्हसोबा का तुम्ही? ईष्टाईल ओळखीची आहे आमच्या ;) काय म्हणताय? कसं चाललंय?

विशुमित's picture

24 Feb 2017 - 11:09 am | विशुमित

<<<<तो ही गेल्या २४ तासात अ‍ॅक्टीव्ह झालेल्या आयडीने काढणे>>>
-- मिपावर हा प्रकार काय आहे? जुन्या आयडींची मत्तेदारी आहे का?
मला तरी हा उद्धटपणा वाटतो. इथे सर्व मिपा सभासद सन्मानीय आहेत.

पिलीयन रायडर's picture

24 Feb 2017 - 11:14 am | पिलीयन रायडर

बरं! =))

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2017 - 11:01 am | धर्मराजमुटके

वर कोणीतरी आरक्षण ह्या एकाच कारणासाठी भारत देश सोडून परदेशात वास्तव्य केले पाहिजे असे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आरक्षण का दिले आहे याच्यावर जालावर भरपूर चर्चा झालेली आहे. मत तपासण्याची इच्छा असलेल्याने त्या जरुर वाचाव्यात.
मात्र अमेरीकेत जाणवणारा एक मोठा धोका इथे कोणत्याही प्रतिसादात आला नाही व तो म्हणजे वंशवादी हल्ले. कालच एका भारतीयाची कँसस शहरात गोळ्या घालून हत्या झाली. असे प्रसंग अमेरीका आणि कॅनडा येथे अधूनमधून घडत असतात. अर्थात त्यात चुक कोणाची यावर पाहिजे तितक्या चर्चा होऊ शकतात. मात्र गोर्‍या लोकांना कोण आशियायी, कोण पाकीस्तानी कोण भारतीय, कोण शिख कोण मुसलमान असे भेद ओळखता येत नाही हे वारंवार स्पष्ट झाले आहे. गोरी चमडी ग्रेट हा विचार फक्त आपल्याच नव्हे तर बहुसंख्य गोर्‍यांच्या मनातही अजून टिकून आहे आणि कितीही उच्च प्रकारचे शिक्षण घेतले तरी त्यात बदल होईलच असे नाही. मात्र ही उदाहरणे संख्येने थोडीसीच असली तरी बहुसंख्य जनता मनमिळाऊ देखील आहे हे ही नाकारता येत नाही. मात्र वाईट प्रसंग आपल्यावरच गुदरला तर टक्केवारीच्या गणितामुळे आपल्या मनाचे समाधान होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे ! अर्थात असे वाईट प्रसंग भारतात तुमच्या वाट्याला येणार नाही याचीही खात्री नाही देता येत आजकाल !

दुसरा मुद्दा असा की बहुतांश परकीय देशाचे नागरीक अमेरीकेत गेले की घेट्टोमधेच राहतात त्यामुळे ते स्थानिक संस्कृतीशी किती प्रमाणात मिसळून असतात हे ही तपासणे गरजेचे आहे. अर्थात जीवाची सुरक्षितता हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे त्यात काही गैर आहे असे अजिबात नाही पण मग संस्कृती संस्कृती असे किती दिवस ओरडत फिरायचे ते आपापल्या मनाला विचारणे गरजेचे आहे.

सबब कोठेही रहा, सुरक्षित रहा आणि माणसे जोडून रहा.
सिर सलामत तो पगडी पचास

हा प्रतिसाद कोणाला हतोत्साहित करण्यासाठी नाही. (तेव्हढी माझी लायकी देखील नाही म्हणा !) तसेच मी कधीही परदेशी राहिलेलो नाही त्यामुळे माझी माहिती केवळ ऐकीव आहे मात्र त्या माहितीचे शवविच्छेदन मी माझ्या मगदुराप्रमाणे करीत आहे याची कृपया नोंद घ्यावी.
:)

विशुमित's picture

24 Feb 2017 - 11:25 am | विशुमित

अगदी हेच लिहण्यासाठी घेणार होतो... आताच वंशवादाची बातमी वाचली आणि मन खरंच हादरलं.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-shot-dead-at-a-bar-in-ka...

मी मागे कुटुंबासहित गावाकडून हडपसर (पुणे) येथे राहायला आलो होतो. जेमतेम ३-४ दिवसच झाले असतील येऊन, गाडी पार्किंग वरून तेथील स्थानिक मुलाशी माझी अगदी तुरळक शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात चूक त्याचीच होती पण म्हणतो कसा इथे राहायचं असेल तर गपगुमान राहायचं नाहीतर चालतं व्हायचं इथल्या एरिया तुन. हे ऐकून मी हबकलोच. (हे जर तो माझ्या गावात म्हणाला असता तर आमची भावकी काठ्या कुराडी घेऊनच धावल्या असत्या)

मी पुढच्या आठवड्यात तिथलं वास्तव्य बदललं. सर सलामत तर पगडी पचास.

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 11:50 am | मराठी_माणूस

"अपनी गली मे कुत्ता शेर" हे खरे असले तरी एक फरक असा आहे की "आमचा देश सोडुन जा" हे म्हणु शकेल का ?

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 12:43 pm | संदीप डांगे

दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही...

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 12:47 pm | सतिश गावडे

जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे असते तर झाली असती का? :)

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 12:56 pm | संदीप डांगे

तरीही नाही...

वंशभेदावर आधारित भांडणे आणि जागा-हक्कांवरुन होणारी भांडणे यात मूलभूत फरक आहे.

अमेरिकन गोर्‍याने भारतीय मुलाला गोळी घालणे, मारहाण करणे ही ती घटना आहे. माझ्या देशातून चालता हो असे कोण्या अमेरिकननाने कोणा युरोपियनास म्हटले आहे काय हे शोधावे लागेल... तसे काही घडलेले असेल तर माझे विचार बदलून घेइन...

"बाहेरचे येऊन आमचे हक्क खातात" असे जेव्हा अमेरिकन बोलतात तेव्हा त्यात काळे किती असतात आणि 'बाहेरचे' ह्या त्यांच्या संज्ञेत युरोपियन्/ऑस्ट्रेलियन्/गोरे असतात काय ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मला मिळाले तर हवे आहे.

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 1:35 pm | सतिश गावडे

मुद्दा समजला. अशा घटनांमागे वंशश्रेष्ठत्वाचाही मुद्दा असू शकतो हे नव्याने कळले. धन्यवाद. :)

संजय क्षीरसागर's picture

24 Feb 2017 - 1:44 pm | संजय क्षीरसागर

क्रमांक १७५७ !

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 2:47 pm | सतिश गावडे

होय. हा नविनच मुद्दा आहे. पटकन आता एखादं छानसं गुलाबी रंगातील वाक्य असलेला परिच्छेद लिहून हा मुद्दा कसा चुकीचा आहे ते लिहा पाहू.

हा मुद्दा कसा चुकीचा आहे ?

मुद्दा बरोबरचे. पण असले १९५७ मुद्दे इथल्या सदस्यांनी मांडलेत त्यामुळेच तर गोंधळ वाढतोयं. आणि इतक्या गोंधळात निर्णय कसा घ्यावा हे मी सांगतोयं !

शब्दबम्बाळ's picture

24 Feb 2017 - 3:09 pm | शब्दबम्बाळ

एक प्रश्न!
सदस्यांनी जर १९५७ मुद्दे मांडले असतील तर "मुद्दा क्र. १७५७" हा नवीन कसा काय असू शकतो?? ;)
कुछ तो गडबड है!!

संजय क्षीरसागर's picture

24 Feb 2017 - 3:23 pm | संजय क्षीरसागर

आता हा वांशिकहत्येचा १९५७ !

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 2:57 pm | मराठी_माणूस

........गोरे असतात काय

खुप चांगला प्रश्न आहे. वंशभेदा वरचा प्रश्न आला की एक हमखास उत्तर ऐकायला येते "आम्हाला तर असा अनुभव कधीच आला नाही , उलट........".
तुमच्या अगदी जवळचा माणूस असेल तरच खर्‍या गोष्टी समजु शकतात.

विशुमित's picture

24 Feb 2017 - 3:10 pm | विशुमित

<<<वंशभेदावर आधारित भांडणे आणि जागा-हक्कांवरुन होणारी भांडणे यात मूलभूत फरक आहे.>>>
-- सहमत आहे.

माझे उदाहरण "माझ्या देशातून चालते व्हा" फक्त यासाठीच होता.

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 11:43 pm | संदीप डांगे

तुमचे उदाहरण, हे "माझ्या देशातून चालते व्हा" ह्या साठी धरता येणार नाही. ते "माझ्या देशात आहेस ते माझ्या हुकूमाप्रमाणे, आश्रित म्हणून गप ऐकायचं" ह्या प्रकारात येतं.. इथे आधीच तिथे राहत अस्लेली व्यक्ती प्रस्तुत जागेला आपले वर्चस्व असलेली जागा समजत असते, त्या क्षेत्रात नवीन येणार्‍यांनी आपल्या "आधीपासून राहत असल्याने येणार्‍या कथित श्रेष्ठते"समोर मान तुकवली पाहिजे, आपली सत्ता मान्य केली पाहिजे अशी आदीम प्रेरणा असते. त्यामुळेच इथे राहायचं असेल तर नीट राहायचं, (नाहीतर माझ्याशी गाठ आहे, मी इथला सत्ताधारी आहे, तुला त्रास होईल अशा अर्थाने, -तुला हुस्कून लावील- अशा अर्थाने नाही) असे म्हटले जाते. त्याची इच्छा जरी असेल तरी तो तुम्हाला हुस्कवून लावू शकत नाही हे त्याला पक्के माहित आहे, काही झालं तरी मला ह्या नवीन माणसासोबत राहायचेच आहे हे त्याने स्विकारलेले असते. फक्त राहतांना माझ्या आधीच्या जीवनशैलीत याच्यामुळे येणारा बदल त्याला सहन होत नाही, तेवढा तो दूर करु इच्छितो..

हा फरक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर अशी दादागीरी, वर्चस्व दाखवणार्‍यांसोबत दिलखुलास मैत्री करावी.... त्याला उगाच येताजाता मान द्यावा, हाय हॅलो करावे, कसे काय अनौपचारिक बोलावे, मैत्री वाढवावी... महिनाभरात तो तुमची दुसर्‍या मित्राला आपला "जिगरी दोस्त" म्हणून ओळख करुन देईल... पण हेच वंशभेद मानणार्‍या शेजार्‍यासोबत घडेल काय याबद्दल अंदाज करावा...

माझ्या देशातून चालते व्हा म्हणजे आम्हाला तुमची गरज नाही, तुम्ही इथे राहावे अशी आमची इच्छा नाही, तुम्ही आश्रित बनून येता आणि आमच्या डोक्यावर बसता हे आम्हाला पटत नाही, तुमच्यामुळे आमची आयुष्य वाईट झाली आहेत, त्यास्तव तुम्ही इथून नष्ट होणेच श्रेयस्कर... माझ्या देशातुन चालते व्हा म्हणतो तेव्हा खरेतर माझ्या देशातून नष्ट व्हा असे मला म्हणायचे असते... मला तुमच्या भल्याचा कोणताच विचार नकोय.. मी फक्त माझाच विचार करणार कारण हा देश माझ्यासारख्या लोकांसाठी आहे, तुमच्यासारख्या (काळ्या, मिडल-इस्टर्न, आशियाई, आफ्रिकी, भिकमंग्या देशातून आलेल्या, आमच्यासारखे न दिसणार्‍या) लोकांसाठी नाहीये... आम्हाला अशा लोकांसोबत राहायची सवय नाही, इच्छा तर अजिबात नाही. मजबूरीत करुन घेणारही नाही...

मराठी_माणूस's picture

25 Feb 2017 - 2:10 pm | मराठी_माणूस

शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या देशातून चालते व्हा" याचा अर्थ व्यवस्थीत उलगडुन दाखवला आहे. पण जो काही अर्थ काढला आहे तो अतिशय अपमानास्पद आहे.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 2:17 pm | संदीप डांगे

नाही समजले? माझे काही चुकले का?

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 1:48 pm | वरुण मोहिते

असलं सर सलामत वैग्रे प्रतिसाद अपेक्षित नव्हते :::)))जहाँ रहो बिनधास्त रहो

विशुमित's picture

24 Feb 2017 - 2:57 pm | विशुमित

हा प्रतिसाद मला उद्देशून असेल तर मी त्यामध्ये "मी कुटुंबासहित" असा उल्लेख केला आहे, त्यामुळे असा रिस्पॉन्स दिला.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 2:08 pm | वरुण मोहिते

मुळात वैयक्तिक प्रश्नावर धागा असला कि अनेक वेगवेगळे प्रतिसाद येणार . त्यामुळे असा प्रतिसाद दिलाच कसा, असं कोण बोलंच कसं ,एखादा बोला तर आताच आलेला आयडी आहे ,हे सगळं बोलणं व्यर्थ आहे .कारण धागा आपण काढत असतो.
आणि स्पष्टीकरण कशाला शिक्षण विचारलं त्यावर बोली कि लोकं. बाकी मुद्दे गैरलागू . त्यामुळे हवा कशी छान नाही, धूळ आहे वैग्रे,तर अत्यंत गैरलागू .
काही फरक नसतो प्रत्येक माणसाला आपला देश आवडतो हे अंतिम सत्य आहे
जगात कुठलाही माणूस असो . त्यासाठी फार काही सुविचार वैग्रे वाचण्याची गरज नाही .
आज त्याच पगारावर समान वेतन असताना आपण भूतान ला गेला असतात का ? तिथेही हवा स्वच्छ आहे ,शांत देश आहे ,लाच द्यावी नाही लागत .त्यामुळे मनी मॅटर्स. साधा अप्रोच . सगळं ओके. कशाला विचार करायचा इतका .

अभिदेश's picture

24 Feb 2017 - 11:17 pm | अभिदेश

भूतान असेल तर मग हे सगळं कसं काय म्हणता येणार ...

विशुमित's picture

25 Feb 2017 - 12:54 pm | विशुमित

तशी शुद्ध हवा तर आमच्या वाडीमध्ये पण आहे. पण इथे कोणी येत नाही राहायला.

शाळापण अगदी हवेशीर, मुलाला जसे शिकायचे आहे तसे शिकून देणारी, पण इथे कोणी येत नाही राहायला.

३-४ जराश्या गाई नीट सांभाळल्या तर CA च्या पगाराला पण ऐकणार नाही पण इथे कोणी येत नाही राहायला.

सण सूद तर चालूच असतात वर्षभर पण इथे कोणी येत नाही राहायला.

७-८ खोल्या भले मोठं अंगण पण इथे कोणी येत नाही राहायला.

पेरणी करणे, लागवड करणे, खुरपणी करणे आणि पाणी देणे एवढे कामे केली की निवांतच वेळ छंद का काय जोपासण्यासाठी पण इथे कोणी येत नाही राहायला. (आता म्हणू नका आमच्याकडे शेती नाही म्हणून, अहो कोट कोट देऊन फ्लॅट घेण्या पेक्षा ४-५ एकर शेती घेऊन बघा लय मज्जाय शेतीत)

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 1:05 pm | संदीप डांगे

खरे आहे हो! नाशकातल्या आयटीमध्ये अनेक संधी आहेत, पगारही आहेत मग लोक का येत नाहीत इथे? तर हैदराबाद-बेन्गलोर-पुण्या-मुंबईसारखे ग्लॅमर नै म्हणून... मोठ्या कंपन्या येत नाहीत कारण मोठ्या पदावर नोकरी करणारं पब्लिक येणार नाही म्हणून... छोट्या पदावरचे पब्लिक येत नाही कारण मोठ्या कंपन्याच नाहीत म्हणून... असं सगळं त्रांगडं आहे... काय की खरं बोललं तर राग येतो लोकांना, पण सत्य तर हेच आहे. ग्लॅमर नाही म्हणून.. गावाकडे जायचं नसतं. ग्लॅमर आहे तिथे धूळ, प्रदूषण, ट्रॅफिकची कारणं.. बाकी पैसा कमवायचा तर हजार मार्ग आहेत. हुशार लोकांना संधींची कमतरता कुठेच नसते. पण एकूण बहुसंख्य भारतीयांचे जे सायकॉलॉजिकल कन्डिशनिंग झाले आहेत ते बघता ही चाकोरी सोडणे परदेशी जाण्यापेक्षा जास्त कठिण आहे...

अप्पा जोगळेकर's picture

2 Mar 2017 - 1:11 pm | अप्पा जोगळेकर

काहीच्या काहीच. जर मला नाशकात नोकरी मिळाली असती तर मी पुण्याऐवजी नाशिकमधे घर घेतले असते.
जिथे संधी मिळते तिथे लोक जातात. खूप लोक आले की मग ग्लॅमर वगैरे येते.

पण एकूण बहुसंख्य भारतीयांचे जे सायकॉलॉजिकल कन्डिशनिंग झाले आहेत ते बघता ही चाकोरी सोडणे परदेशी जाण्यापेक्षा जास्त कठिण आहे...
हे काय असच जनरलायझेशन का ?

अर्धवटराव's picture

25 Feb 2017 - 1:11 pm | अर्धवटराव

गावाकडील जीवन फक्त नाटक-सिनेमात गोग्गोड दिसतं, बाकि तिथे जीव हैराण व्हायचे चान्सेस जास्त असच सांगतात आमचे परिचीत. तुम्ही म्हणता तसं खरच असेल तर हा मार्ग नक्कीच एक्स्प्लोर करायला लागेल.

विशुमित's picture

25 Feb 2017 - 3:46 pm | विशुमित

तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे अनुभव कशाला घेताय स्वतः घेऊन बघा मज्जा येईल.

जे तुम्हाला पाहिजे ना ते सगळे मिळू शकते गावाकडे. पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या गाईचे दूध, स्वतः उगवलेली सेंद्रिय भाजी- पाला, रानमेवा, स्वच्छता, मनोरंजन, सणवार, जीवा-भावाची माणसे, छंद जोपासायला आणि कुटुंबासाठी वेळ, भरपूर जागा, मस्त पोहायला विहिरी, गप्पा टप्पा, राजकारण, समाजकारण, वाचन, मद्यशाला आणि जोडीला स्मार्ट फोन्स आहेतच की.

पण तरी ही इथे कोणी येत नाही राहायला. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना देखील आपण त्या बाहेरच्या देशात शोधतो.

(मला नेहमी आमटे कुटुंबाचा कुतुहूल वाटतं जंगलात राहून जागतिक कीर्तीची माणसे घडली)

अप्पा जोगळेकर's picture

2 Mar 2017 - 1:12 pm | अप्पा जोगळेकर

पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या गाईचे दूध, स्वतः उगवलेली सेंद्रिय भाजी- पाला, रानमेवा, स्वच्छता, मनोरंजन, सणवार, जीवा-भावाची माणसे, छंद जोपासायला आणि कुटुंबासाठी वेळ, भरपूर जागा, मस्त पोहायला विहिरी, गप्पा टप्पा, राजकारण, समाजकारण, वाचन, मद्यशाला आणि जोडीला स्मार्ट फोन्स आहेतच की.
हॅ हॅ हॅ. हे सगळे शहरात पण मिळते.

मी कुठे म्हणालो शहरात हे मिळत नाही ते ?