बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
वाचने
119589
प्रतिक्रिया
340
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एक कळत नाही की ह्यातलं
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत
In reply to धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग by संदीप डांगे
वैयक्तिक निर्णयामागे वैयक्तिक
In reply to गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत by पिलीयन रायडर
मला एक कळत नाही की ह्यातलं
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by पिलीयन रायडर
नेमके.
In reply to मला एक कळत नाही की ह्यातलं by गवि
बरोबर..
In reply to नेमके. by मराठी_माणूस
मुलगी अपत्य असली की काही
In reply to कुडन्ट अॅग्री मोअर. by गवि
१. स्वतःच्या बारातेरा
In reply to मुलगी अपत्य असली की काही by रेवती
या ज्या स्टडीज असतात ना ते "
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
बुल्स आय!
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
+१,००,०००. लाखाची गोष्ट !
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ.+१,००,०००. लाखाची गोष्ट ! "कोणती गोष्ट कोठे किती प्रमाणांत आहे" आणि "हे जग केवळ काळ्या किंवा पांढर्या रंगाने बनलेले नसून, एकाच ठिकाणी एकाच जनसमुदायातसुद्धा ते रंग कुटुंब/व्यक्तीपरत्वे (सरसकटीपणा टाळून) कमीजास्त प्रमाणात आस्तित्वात असतात"; ही तथ्ये संस्कृतीच्या गोष्टी आल्या की, सहजपणे विसरल्या जातात आणि "आम्ही विरुद्ध ते" असा सामना सुरू होतो. अगदी "भले उसकी कमीज मेरे कमीज से अधिक सफेद कैसी हो सकती है ।" या तालावर :) गम्मत म्हणजे "अशी (किंवा कोणतिही) तुलना करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या विश्वासू तथ्यांचा अभ्यास किंवा स्वानुभव" याची किमान गरज आहे हे विसरले जाते... मुद्दा स्प्ष्ट करण्यासाठी जरासे टोकाचे पण त्याच पठडीतले उदाहरण द्यायचे झाले तर... हिंदू/मुस्लीम/ख्रिश्चन धर्मांबद्दल (दुर्)अभिमानाने बोलताना वेद-उपनिषद-पुराणे/कुराण/बायबल यांचे सार समजण्याइतका अभ्यास सोडाच पण वाचनही केलेले नसले तरी हरकत नसते. ;)उत्तम प्रतिसाद आहे.
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
त्या देशांनी जे करुन दाखवलंय
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
आपण त्या ठिकाणी न राहता,
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
वरील स्रुजा यांच्या
In reply to आपण त्या ठिकाणी न राहता, by रेवती
माफी , अधिकार वगैरे वाचून
In reply to आपण त्या ठिकाणी न राहता, by रेवती
अमेरिकेतील मुले मुली
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो
In reply to अमेरिकेतील मुले मुली by ट्रेड मार्क
मेरिकन भारतीय वर्सेस
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
आमचे सुरुवातीपासून चे
In reply to मेरिकन भारतीय वर्सेस by स्रुजा
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
मला नाही वाटत असं कुणीही
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by गवि
+१
In reply to मला नाही वाटत असं कुणीही by पिलीयन रायडर
टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
दुसर्या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय?खरं खोटं माहित नाही. पण मला तरी असं कुठे दिसलं नाही. एक मुलाखत आहे म्हणून अमेरिकेतल्या सर्वच मुली अश्या आहेत का? हे म्हणजे निर्भया प्रकरणावरून समस्त भारतीय पुरुष बलात्कारी आहेत असं म्हणणं झालं. माझ्या अगदी घरासमोर एक शाळा आहे. पण शाळेची वेळ संपली की काळं कुत्रं पण दिसत नाही. शाळेत रात्रंदिवस दिवे चालू असतात, पोलिसांची गाडी फेऱ्या मारून जाते त्यामुळे लपून काही करणं शक्य नाही. माझी मुलगी टीन एजर आहे. त्यांना शाळेत ५ मिनिटं पण मोकळा वेळ नसतो आणि घरी प्रोजेक्ट्स व इतर अभ्यास एवढा असतो की गोष्टींना वेळच मिळत नाही. आई वडील दोघेही काम करत असतील तर आफ्टरस्कूल क्लासमध्ये मुलं राहतात पण ते रूम्स Supervised CCTV वर असतात, ज्याचे फीड आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर दिसते. हे प्रत्येक शाळेत आहे. आता याची तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा.'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं.ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे.खर्या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते.म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय?छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे.गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो.'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून.अशी फारच थोडी उदाहरणं असावीत. ज्यांचे भारतात आता कोणीच नाही ते पैसे पाठवत नसावेत. बादवे, आम्ही पैसे पाठवतो ते दान म्हणून नक्कीच नाही. त्यामुळे कोणाचा असा गैरसमज असेल तर तो मूर्खपणा आहे.सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय.उदाहरण देऊन पटकन समजेल बहुतेक - आपण अगदी कितीही मोठं आणि सर्व सोयींनीयुक्त घर जरी घेतलं तरी आपलं बालपण जिथे गेलं असतं ते घर आपल्याला जास्त प्रिय असतं. एवढंच काय ते जुनं घर सोडायचा विचारसुद्धा जसा क्लेशदायक असतो आणि जरी आपण नवीन ठिकाणी राहायला गेलो तरी आपले आईवडील मात्र जुनं घर सोडायला तयार नसतात. आपलं गाव सोडून एखाया शहरात एकदा नवीन घरात काही वर्ष राहिल्यावर परत जेव्हा आपण गावात जातो तेव्हा सगळं कसं बदललेलं दिसतं. आपण सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. अमेरिकेतून परत भारतात येतानाचं तेच फीलिंग आहे. साध्यासाध्या गोष्टींत भांबावून जायला होतं. मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता. प्रचंड ट्रॅफिक, वेड्यावाकड्या जाणाऱ्या गाड्या, हॉर्न्स, नियम तोडणारे लोक, त्यात मॅन्युअल गियर हे बघून भांबावून जायला होतं. ह्या प्रॅक्टिकल समस्या आहेत यात उगाच कोणाकडे बोट दाखवायचा, आरोप करायचा, भारतातल्या लोकांना नावं ठेवायचा किंवा बडेजाव दाखवायचा प्रयत्न नाही. पण एवढं असूनही आपण भारतीयच राहतो. घरात देव असतात, जमेल तेव्हा देवळात जातो, घरात फोडणीचे वास दरवळत असतात, मित्रमंडळी जमवून कट्टा करतो, गुढीपाडवा, होळी, शिवजयंती, गणपती, दसरा दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्त त्या त्या सणाचे पक्वान्न केले जातात. एवढंच काय अगदी संक्रांतीचे हळदीकुंकू पण केलं जातं. अमेरिकेतल्या इतक्याच भारतातल्या पण बातम्या वाचल्या/ बघितल्या जातात. मराठी/ हिंदी सिरिअल्स नेमाने बघितल्या जातात. एवढ्या की चला हवा येऊ द्या, चूकभूल द्यावी घ्यावी, माझ्या नवऱ्याची बायको, नकटीचं लग्न या सिरिअल्स माझ्या दोन्ही मुली आवडीने बघतात. ISRO ने केलेल्या कामगिरीचं कौतुक आम्हालाही असतं आणि ते इथल्या लोकांना सांगताना अभिमानही वाटतो. पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका. कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं.मी बरेच वर्ष भारतात २ व ४
In reply to टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला by ट्रेड मार्क
टेराबायटीला टेराबायटीन उत्तर
In reply to टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला by ट्रेड मार्क
संदीपसेठ...
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
नाही हो काका. उपमर्द वगैरे
In reply to हम्म by विटेकर
अवांतरः-
अमेरिका - भारत वगैरे.
व्हय रं? कसं करु मग? बघती बघ
=))
In reply to व्हय रं? कसं करु मग? बघती बघ by अभ्या..
=))
In reply to =)) by पैसा
होय.
In reply to =)) by सतिश गावडे
हा अजून एक गैरसमज !
In reply to होय. by पद्माक्षी
अगदी नेमके ! =))
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
ह्या बातमीत असे म्हटले आहे
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
जे भारतिय (आणि इतर कोणत्याही
In reply to ह्या बातमीत असे म्हटले आहे by मराठी_माणूस
हे सगळे खरे असले तरीही, मुख्य
In reply to जे भारतिय (आणि इतर कोणत्याही by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा
In reply to =)) by पैसा
:)
In reply to मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा by स्रुजा
+१
In reply to मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा by स्रुजा
"भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या
In reply to +१ by ट्रेड मार्क
+ १
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
हहपोदु
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
हहपुवा.
In reply to हहपोदु by आजानुकर्ण
"अमेरिकेतून काम करून आलेल्या
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
अरेच्चा! :D
In reply to "अमेरिकेतून काम करून आलेल्या by पिलीयन रायडर
प्रश्न असाय दादा:- माझं मुळ
In reply to अरेच्चा! :D by शब्दबम्बाळ
संस्कार :
'काय ठरलं मग?' विचारायची वेळ
+100,
In reply to 'काय ठरलं मग?' विचारायची वेळ by रुपी
अशी कुणी ही मांडणी करत नाहीये
In reply to +100, by संदीप डांगे
नै तर काय....
In reply to +100, by संदीप डांगे
मी थोडासा संभ्रमात आहे !
धर्मराजा, प्रतिसाद आणि शंका
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
तिथल्या शिकलेल्या लोकांना
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
शिक्षणाच्या दर्जावरुन मी
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
माझ्या पुतणीला आय आय एम
In reply to शिक्षणाच्या दर्जावरुन मी by सुबोध खरे
सॉरी पण विचार पटले नाहीत
In reply to शिक्षणाच्या दर्जावरुन मी by सुबोध खरे
धर्मराज
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
१. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्या उपलब्ध आहेत ?नोकऱ्या अगदी दुकानात काम करण्यापासून ते मोठ्या कंपनीतल्या उच्च पदापर्यंत सगळ्या आहेत. बॅंक्स, इन्शुरन्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल्स, मार्केटिंग अँड सेल्स इतकेच काय आयटी मधेही बिझनेस साईडला जॉब्स आहेत. तसेच शिक्षक, पोलीस, सैन्य व इतर सामाजिक क्षेत्रात पण बऱ्याच संधी आहेत.२. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय?शेवटी कंपन्या त्यांचा फायदा बघतात त्यामुळे असं प्राधान्य दिलं जात आहेच म्हणूनच भारतीय व इतर देशीय इथे आहेत. भारतासारख्या देशातून आलेला ५-६ वर्ष अनुभव असलेला इंजिनिअर वर्षाला जितका पगार मिळवतो तितक्या पगारात अमेरिकन इंजिनिअर तयार होत नाही. कारण त्याचा शिक्षणावरच भरमसाठ खर्च झालेला असतो. सध्याच्या नियमाप्रमाणे (जो १९९८ साली बनवला) कमीत कमी $ ६०,००० आहे.३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय?हे व्हायला बराच वेळ लागेल. मी अमेरिकेत जिथे जिथे काम केलंय तिथे जवळपास ५०-६०% तरी भारतीय व इतर आशियाई देशाचे लोक दिसले. जरी ट्रम्पने वा कोणीही हे सर्व जॉब अमेरिकनांना द्यायचे ठरवले तरी तेवढे अमेरिकन लोक तर उपलब्ध पाहिजेत. आता ब्लू कॉलर जॉब्स जे मेक्सिकन लोकांनी जास्त घेतलेत तिथे पण अमेरिकन पटकन शिरकाव करू शकतात पण कमी पगाराचा प्रश्न आहे.डांगे अण्णा
एकदा पाण्यात उतरल्यानंतर
चर्चा कुठुन कुठे गेली आहे.
चर्चा तर होणारच !
In reply to चर्चा कुठुन कुठे गेली आहे. by पिलीयन रायडर
हे मात्र खरं बोल्लात की आप
In reply to चर्चा तर होणारच ! by धर्मराजमुटके
दोनशे प्रतिसाद झाले पण शेवटी मी डे वनला सांगितलेलंच कामी येईल !
In reply to हे मात्र खरं बोल्लात की आप by पिलीयन रायडर
पाऊस पडला माझ्यामुळं. =))
In reply to दोनशे प्रतिसाद झाले पण शेवटी मी डे वनला सांगितलेलंच कामी येईल ! by संजय क्षीरसागर