बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
वाचने
119589
प्रतिक्रिया
340
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय. हा नविनच मुद्दा आहे.
In reply to नवाच मुद्दा ! by संजय क्षीरसागर
तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले !
In reply to होय. हा नविनच मुद्दा आहे. by सतिश गावडे
हा मुद्दा कसा चुकीचा आहे ?मुद्दा बरोबरचे. पण असले १९५७ मुद्दे इथल्या सदस्यांनी मांडलेत त्यामुळेच तर गोंधळ वाढतोयं. आणि इतक्या गोंधळात निर्णय कसा घ्यावा हे मी सांगतोयं !एक प्रश्न!
In reply to तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले ! by संजय क्षीरसागर
आधीच १७५६ झाले होते
In reply to एक प्रश्न! by शब्दबम्बाळ
........गोरे असतात काय
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
डांगे जी..
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
तुमचे उदाहरण, हे "माझ्या
In reply to डांगे जी.. by विशुमित
शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या
In reply to तुमचे उदाहरण, हे "माझ्या by संदीप डांगे
नाही समजले? माझे काही चुकले
In reply to शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या by मराठी_माणूस
काय राव
In reply to सर... by विशुमित
सर सलामत...
In reply to काय राव by वरुण मोहिते
बरीच चर्चा झाली
योग्य प्रतिसाद...
In reply to बरीच चर्चा झाली by वरुण मोहिते
तशी शुद्ध हवा तर आमच्या
In reply to योग्य प्रतिसाद... by अभिदेश
खरे आहे हो! नाशकातल्या
In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित
काहीच्या काहीच. जर मला नाशकात
In reply to खरे आहे हो! नाशकातल्या by संदीप डांगे
हे खरं आहे का?
In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित
तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे
In reply to हे खरं आहे का? by अर्धवटराव
पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या
In reply to तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे by विशुमित
मी कुठे म्हणालो शहरात हे मिळत
In reply to पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या by अप्पा जोगळेकर
३-४ जरश्या गाई नीट सांभाळल्या
In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित
तुम्ही ३-४ गाईचा हिशोब शब्दशः
In reply to ३-४ जरश्या गाई नीट सांभाळल्या by अभिजीत अवलिया
माझ्या माहितीप्रमाणे आणी
In reply to तुम्ही ३-४ गाईचा हिशोब शब्दशः by विशुमित
तुम्ही ३-४ गाईंचा शब्दशः अर्थ
In reply to माझ्या माहितीप्रमाणे आणी by अभिजीत अवलिया
लसीकरणाला कसा काय खर्च येतो..
In reply to तुम्ही ३-४ गाईंचा शब्दशः अर्थ by विशुमित
माझे मामा (पश्चिम
In reply to तुम्ही ३-४ गाईंचा शब्दशः अर्थ by विशुमित
३-४ गाई मुळे लय स्पष्टीकरण द्यावा लागलं...
In reply to माझे मामा (पश्चिम by अभिजीत अवलिया
माझ्या डोळ्या देखत माझ्या
In reply to ३-४ गाई मुळे लय स्पष्टीकरण द्यावा लागलं... by विशुमित
सहमत,
In reply to माझ्या डोळ्या देखत माझ्या by विशुमित
असे गवळी पाहिले आहेत उणे १०
In reply to सहमत, by अभ्या..
दूध व्यवसायाच्या मालकांना पण
In reply to सहमत, by अभ्या..
व्य.नि.केलाय तुम्हाला. लवकरच
In reply to ३-४ गाई मुळे लय स्पष्टीकरण द्यावा लागलं... by विशुमित
एक गाय दिवसाला ३५ लिटर देते
In reply to तुम्ही ३-४ गाईचा हिशोब शब्दशः by विशुमित
गावडे सर...
In reply to एक गाय दिवसाला ३५ लिटर देते by सतिश गावडे
दुधाचा धंदा करणे म्हणजे बारा
In reply to गावडे सर... by विशुमित
दूध धंदा जखडून ठेवतो हे १००%
In reply to दुधाचा धंदा करणे म्हणजे बारा by सुबोध खरे
गावडे सर आणि अभिजित जी चुकीच्या माहिती साठी क्षमस्व..!!
In reply to गावडे सर... by विशुमित
काही हरकत नाही. आपल्याकडून
In reply to गावडे सर आणि अभिजित जी चुकीच्या माहिती साठी क्षमस्व..!! by विशुमित
आपल्याकडून काही चुकीची माहिती
In reply to काही हरकत नाही. आपल्याकडून by अभिजीत अवलिया
श्रम प्रतिष्ठा नाही ना आपल्या
In reply to आपल्याकडून काही चुकीची माहिती by सुबोध खरे
ठराविक आणि संकरित हा हिशोब आहे .
आजकाल सत्कार करणे बंद झालंय मिपावर...
जर्सी गाई किती दुध देतात???!!
भारतातच राहायच्ये ह्या
In reply to जर्सी गाई किती दुध देतात???!! by पिलीयन रायडर
बायोगॅस अतिशय बंडल प्रकार आहे
In reply to भारतातच राहायच्ये ह्या by संदीप डांगे
जर्सी गाई किती दुध देतात???!!
In reply to जर्सी गाई किती दुध देतात???!! by पिलीयन रायडर
जर्सी गाई किती दुध देतात???!!जर्सी गाई त्यांच्यावर अध्यात्माचा प्रयोग "केल्यास" किंवा "न केल्यास" किती किती दुध देतात???!! असा हा प्रश्न हवा. तरच प्रकल्पाबद्दल निर्णय घेण्यासाठी बंद काँप्युटरमध्ये टाकायला पुरेसे प्रोस आणि कॉन्स मिळतील. ;) :)पिराताईचा धागा म्हणजे'एकशेदोन
३०० प्रतिसादात बरेच कव्हर केले आहे
In reply to पिराताईचा धागा म्हणजे'एकशेदोन by संदीप डांगे
.
In reply to ३०० प्रतिसादात बरेच कव्हर केले आहे by अनन्त अवधुत
९. विशेष कार्यक्रमः माझे (तेच
In reply to . by संजय क्षीरसागर
माझा स्प्पेशल "लव्हगुरु"
In reply to ९. विशेष कार्यक्रमः माझे (तेच by संदीप डांगे
ओकेज !
In reply to ९. विशेष कार्यक्रमः माझे (तेच by संदीप डांगे
नाहि
In reply to ओकेज ! by संजय क्षीरसागर
चार चौघात मातृभाषेत न
पिरा ताई, तुमचे मूळ म्हणणे
आता राहु दे. तुम्हाला असंच
In reply to पिरा ताई, तुमचे मूळ म्हणणे by फेदरवेट साहेब
Shevti charchetun nishkarsh
अमेरिकन शिक्षणपद्धतीचे लेखात
लॉल :D मजा आली.
धागा उपसोन वर काढी, तो येक ...