बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
वाचने
119589
प्रतिक्रिया
340
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थात !
In reply to पाऊस पडला माझ्यामुळं. =)) by बॅटमॅन
थांबा!!
In reply to चर्चा कुठुन कुठे गेली आहे. by पिलीयन रायडर
=)) लिहा लिहा!
In reply to थांबा!! by बाजीप्रभू
काळजी करू नका ! इतक्या लवकर
In reply to थांबा!! by बाजीप्रभू
माझ्या वहीतून अजून थोडे...
अत्यंत आवडलेला अजुन एक
In reply to माझ्या वहीतून अजून थोडे... by समर्पक
समर्पक
काय ठरलं म? जायचं का नाही
"लग्न करणे" आणि "देश/परदेशात
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
क्या बात है!!
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
+१०००
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
+१०००
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
>>एखादी आवडणारी वैध गोष्ट
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
भारत आणि अमेरिका दोन्ही वैधच
In reply to >>एखादी आवडणारी वैध गोष्ट by राजाभाऊ
वैध = कायदेशीर ! :)
In reply to >>एखादी आवडणारी वैध गोष्ट by राजाभाऊ
हा विचार म्हणून थोर दिसला तरी निर्णय घेण्यासाठी निरुपयोगी आहे
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.वैध गोष्टींचीच चर्चा चालू आहे तस्मात पहिल्या वाक्याला अर्थ नाही. संधी गमावली असं वाटणं हे निवडलेला पर्याय आनंद देत नाही याचं लक्षण आहे आणि फायनली, खंत वाटणं हे स्वतःला स्वतःच्याच निर्णयामुळे हतबल झालो असं समजल्यामुळे होतं."लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे... त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो.अजिबात नाही. मी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी बोलतोयं आणि लग्नाचा निर्णय हे निर्णयप्रक्रियेतल एक उत्तम उदाहरण म्हणून दिलंय. माझं म्हणणं असंय की पोस्टवर आलेले सत्राशे पन्नास विचार डोक्यात असल्यावर निर्णय असंभव आहे, मग ते विचार कितीही उच्च असोत. प्रत्येक योग्य निर्णय हा विचार प्रक्रिया संपूर्णपणे थांबल्यावरच होतो. मनाच्या तौलनिक अवस्थेत घेतलेला निर्णय म्हणजे मनाच्याच एका बाजूला दाबून, दुसरी वरचढ झालेली असते. दाबलेली बाजू केव्हाही वरचढ होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे संधी गमावल्याची खंत वाटते.The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitusयात हेराक्लीटस काही विशेष सांगत नाही. परिस्थिती बदलते म्हणूनच मनाला आधीचा निर्णय अयोग्य होता, संधी गमावली वगैरे सुनवायचा चान्स मिळतो. पण बदललेल्या परिस्थितीत फेरनिर्णय घेण्याची स्थिती आली तरी पुन्हा निर्णय प्रक्रिया सेमच असते ! म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या सत्राशे पन्नास विचारांचा कोलाहल थांबल्याशिवाय योग्य निर्णय होत नाही. थोडक्यात, तुम्ही निर्णय कशाविषयी घेता हे कायम गौण आहे, तो कसा घेता ते महत्त्वाचंय. मनानं निर्माण केलेले सर्व विकल्प एकदाच निरखून, मनाला संपूर्णपणे बाजूला करुन, जो स्वतःच्या हंचला योग्य वाटतो तो तत्कालीक निर्णय कायम समाधान देतो कारण तो तुम्ही स्वतःच्या जवाबदारीनं घेतलेला असतो. त्या निर्णयाबद्दल मन खंत निर्माण करुच शकत नाही कारण मनाचा (थोडक्यात डेटाचा) उपयोग करुन तुम्ही स्वतःच्या समग्रतेनं तो घेतलेला असतो. परिस्थितीनुरुप फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्हाला खंत वगैरे वाटत नाही कारण घडून गेलेल्या गोष्टींचा उहापोह केवळ कालापव्यय आहे याची तुम्हाला कल्पना असते. तस्मात, नव्या परिस्थितीत तुम्ही मनानं दिलेला नवा डेटा व्हेट करता आणि मग मनाला बाजूला सारुन पुन्हा स्वतःच्या अंतःप्रेरणेनं निर्णय घेता.हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी
In reply to हा विचार म्हणून थोर दिसला तरी निर्णय घेण्यासाठी निरुपयोगी आहे by संजय क्षीरसागर
बदलणारी काळ-स्थळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे....हे एक सबळ शास्त्रीय सत्य आहे आणि त्यावर माझा अचल विश्वास आहे ! :)उगाचच आपली, एक धोक्याची सूचना
In reply to हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
फ्लेक्सिबिलीटीचा विषय नंतर येईल
In reply to उगाचच आपली, एक धोक्याची सूचना by डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात.हे विधान, वरचा प्रतिसाद वाचल्यावर गैरलागू आहे असं लक्षात येईल. आणि सगळी चर्चा मूळ निर्णयावर चालू आहे, फेरनिर्णयावर नाही हे देखिल कळेल.मला अध्यात्मात गती नाही.
In reply to फ्लेक्सिबिलीटीचा विषय नंतर येईल by संजय क्षीरसागर
आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.हे "मनाचा कंप्युटरसारखा उपयोग करणे" पण तो "कंप्लीटली शटडाऊन करून मगच त्याचा वापर करणे" (!!!) आणि "वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबवून निर्णय घेणे"... हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे. ******"हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात."???!!! याला साध्या मराठीत "अशास्त्रीय निर्णयप्रक्रिया" म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे "प्रोस आणि कॉन्स" पडताळून त्यांचा तर्कशास्त्राच्या पायावर विचार करून निर्णय घ्यावा, अशी सर्वमान्य शास्त्रिय पद्धत आहे. अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते, पण केवळ एकमेव इनपुट नसते, त्या हंचला आधार देणारे काहीतरी पुरावे असावे, असा शास्त्रिय दंडक आहे. विनापुरावा हंचला फारतर "unknown-unknown factor" असे समजून त्याच्यासाठी धोकप्रबंधक उपायांचा ('रिस्क मॅनेजमेंट' उर्फ तसे घडलेच तर, त्यापासून होणारा धोका टाळणार्या आणि/किंवा त्या परिस्थितीचा फायदा घेणार्या उपायांचा) विचार करून ठेवावा असे समजतात. ******तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो !१. एकदा निर्णय घेतल्यावर इतर सगळे विसरून त्या निर्णयाप्रमाणेच पुढे चालावे असे तुम्हीच म्हटले आहे. मग, "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" हे आपल्या सतत सजगपणे निरिक्षण न करता कसे साधेल बरे ?! २. नवीन निर्णय घेताना "कंप्लीटली शटडाऊन केलेल्या मनाच्या कंप्युटरमध्ये" हे नवीन फॅक्टर्स कसे इनपुट करणार ? ३. तुम्हीच म्हणता की "निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात" आणि त्याबरोबरच म्हणताहात की "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" ! "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?! ****** असो. तुमची आणि माझी वैचारीक पद्धती वेगळी आहे हे पुरेसे सिद्ध झाले आहेच. तुम्हाला तुमची विचारपरंपरा कायम ठेवण्याचा लोकशाही हक्क आहेच ! मात्र, एकमेकाला समांतर जाण्यार्या व एकमेकाला कधीच न भेटणार्या स्तरांवर चर्चा चालू ठेवण्यात काही हशिल आहे का ?"लग्न आणि देशाची निवड"
In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
अंतःप्रेरणा !
In reply to "लग्न आणि देशाची निवड" by डॉ सुहास म्हात्रे
मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा.मग हा प्रतिसाद जरी तुमच्या प्रतिसादाला लिंक केला असला तरी तो तुमच्यासाठी नाही असं समजा. (यात कोणताही उपहास नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.)हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे.डोक्यात अनंत विचार असतांना घेतलेला निर्णय (प्रोस अँड कॉन्स अॅनालिसिस) नेहमी द्वंद्वातून निर्माण झालेला असतो. अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला ध्यानप्रक्रिया (मेडिटेशन) समजावून घ्यावी लागेल. तो प्रयत्न मी मनावरच्या लेखमालेतून करत होतो (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा) पण अशा विषयांसाठी हा फोरम नाही हे लक्षात आल्यावर लिहीणं बंद केलं. तरीही मूळ मुद्दा उरतोच : मानसिकप्रक्रिया थांबल्याशिवाय एकात्म निर्णय होत नाही. त्यामुळे सोडून दिलेल्या विकल्पांच्या बाबतीत संधी हुकली आणि खंत वाटली हे प्रश्न निर्माण होतात.अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकतेहंच हा कधीही इनपुट नसतो. तो मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे अस्तित्वानं दिलेला कौल असतो.नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?!जीवन कॅलिडोस्कोपिक आहे त्यामुळे फॅक्टर्स बदलत राहाणारच. ते पूर्वी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा परिणाम करु शकतात. जगाच्या अंतापर्यंत टिकणारा निर्णय हा विपर्यास आहे. फेरनिर्णयाच्या वेळी सुद्धा त्या समयी असलेले फॅक्टर्स व्हेट करुन पुन्हा अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला काहीच अडचण नसते.लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे.लग्न काय, देशाची निवड काय, की दोन बॉल आणि आठ रन्स या सिचुएशनमधे बोलरला पडलेला पेच काय, मूळ प्रश्न `संभ्रमात निर्णय कसा घ्यावा' हा आहे. आणि त्याला हंच हे एकमेव उत्तर आहे !लेट अस अॅग्री टू डिसअॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ?पहिला भाग कायम मान्य आहे कारण हंच काय असतो याची तुम्हाला कल्पना दिसत नाही आणि मानसिक उहापोहातून निर्णय घेण्याची प्रक्रिया मी केव्हाच सोडून दिली आहे. बाकी धाग्याचं काश्मिर वगैरे करण्याचा माझा उद्देश कधीही नसतो, फक्त माझा प्रतिसाद दुनियेपेक्षा वेगळा असतो हे नक्की.ऑल डिसिजन्स आर इम्पल्सिव...
In reply to अंतःप्रेरणा ! by संजय क्षीरसागर
येस!
In reply to ऑल डिसिजन्स आर इम्पल्सिव... by संदीप डांगे
जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो..सांप्रत चर्चा ही पहिल्या सिच्युएशन मधे मोडते !जो भविष्याचा विचार करतो तोच
In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
नव्या शब्दांच्या खास वापरासाठी दिला असला तरी
In reply to जो भविष्याचा विचार करतो तोच by सतिश गावडे
दादासाहेब...
In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
फंडातच गोंधळ आहे !
In reply to दादासाहेब... by अर्धवटराव
शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे.मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही.मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच.मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही.सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे.अध्यात्म हा बुरखा आहे ? ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे. फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.बरं
In reply to फंडातच गोंधळ आहे ! by संजय क्षीरसागर
पुन्हा तोच घोळ !
In reply to बरं by अर्धवटराव
विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे.विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं?अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं.अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते.जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.मागच्या प्रतिसादात तुम्ही असा ज्योक मारला होताशांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे !आता म्हणतायंजागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं.म्हणजे तुम्ही मनाच्या सुप्त अवस्थेत (झोपेत) स्वेच्छेनं विचार करु शकता का ? झोपेत जागृत होत असलेल्या मनाच्या प्रेरणेला स्वप्न म्हणतात. जागृत अवस्थेत आणि मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे आपल्याला जी उमगते ती अंतःप्रेरणा असते.मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे...ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे.... सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स.अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही.फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.पुढे...
In reply to पुन्हा तोच घोळ ! by संजय क्षीरसागर
.
In reply to पुढे... by अर्धवटराव
तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे.शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होताततुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते.बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि.अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे.तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ?ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही.मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो.अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.बाय द वे
In reply to . by संजय क्षीरसागर
अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.बघतो.
In reply to बाय द वे by संजय क्षीरसागर
बरं
In reply to . by संजय क्षीरसागर
जाऊं द्या !
In reply to बरं by अर्धवटराव
विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात.तेही कळेल. अर्थात, तुम्ही पोस्ट लिहीण्यापूर्वीच, उपरोल्लेखित फंडा संपूर्ण चुकीचा आहे हे नमूद करतो.एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
आयुष्याच्या शेवटी आपल्याला
In reply to एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी by रेवती
माझा अनुभव
+१००
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
+१०००
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
+१००० धन्यवाद !!!!
In reply to +१००० by ट्रेड मार्क
हा प्रतिसाद पूर्णतः पटला! तो
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
स्थलांतर
उगाच तणतण
In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क
=))
In reply to उगाच तणतण by अनुप ढेरे
ती नवीन बांगड्या घेतलेल्या
In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क
मिपा आणि मुपि, काही फरक नाही. हमेरिकेवर धागा आला कि कल्ला झालाच.
हा लेख सल्ला मागण्यासाठी
तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल
In reply to हा लेख सल्ला मागण्यासाठी by वेशीवरचा म्हसोबा
तुम्ही
In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर
नाही हो!! त्रास बिस अजिबात
In reply to तुम्ही by धर्मराजमुटके
माझा प्रश्न केव्हाच मागे पडलाय.
In reply to नाही हो!! त्रास बिस अजिबात by पिलीयन रायडर
त्रास ? कसला? कुणाला? ;)
In reply to तुम्ही by धर्मराजमुटके
बरोबर...
In reply to त्रास ? कसला? कुणाला? ;) by अभ्या..
अगं बाई, पलिकडच्या वेशीवरचे
In reply to बरोबर... by वेशीवरचा म्हसोबा
<<<<तो ही गेल्या २४ तासात अ
In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर
बरं! =))
In reply to <<<<तो ही गेल्या २४ तासात अ by विशुमित
वर कोणीतरी
सर...
In reply to वर कोणीतरी by धर्मराजमुटके
"अपनी गली मे कुत्ता शेर" हे
In reply to सर... by विशुमित
दोन घटनांची तुलना होऊ शकत
In reply to सर... by विशुमित
जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे
In reply to दोन घटनांची तुलना होऊ शकत by संदीप डांगे
तरीही नाही...
In reply to जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे by सतिश गावडे
मुद्दा समजला. अशा घटनांमागे
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
नवाच मुद्दा !
In reply to मुद्दा समजला. अशा घटनांमागे by सतिश गावडे