सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

!!...'मानवी भूकंप'...!!

Primary tabs

बटाटा चिवडा's picture
बटाटा चिवडा in जे न देखे रवी...
5 Feb 2017 - 1:58 am

गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची
दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची...

असा काही झाला होता तिच्या मनावर आघात
'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात...

भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर
राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'...

प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका
एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का..

त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती
मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती..

मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले..
अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले..

मानवी भूकंपामुळे जरी झाली होती तिच्या मनाची काहिली
संघर्ष करत मनाच्या नव्या उमेदीने ती जीवनात पुन्हा उभी राहिली..

स्वत:च मनाचे करुनी पुनर्वसन, घेतला पुन:श्च एकदा जीवनाने वेग
तरीही अजून ठळकपणे दिसते सावरलेल्या मनावरची ती प्रत्येक भेग ....!!!

-आपला बटाटा चिवडा..!! __/\__

बिभत्सकरुणकविताप्रेमकाव्यजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

5 Feb 2017 - 6:18 pm | जव्हेरगंज

चांगली कविता!

बटाटा चिवडा's picture

5 Feb 2017 - 8:56 pm | बटाटा चिवडा

धन्यवाद जव्हेरगंज