शुभ दसरा

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
11 Oct 2016 - 1:07 pm

विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =))

शुभशकुनांच्या पावलांनी
किरण सोनेरी येती घरा
अवगुण अंतरीचे मिटवूनी
करू सत्याचा विजय साजरा

दारी सजवू मांगल्याचे तोरण
दुःखक्लेशास न मिळो थारा
विवेकबुद्धीने करून आचरण
लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा

नवविचारांचे जमवूनी सखेसोबती
पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा
जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती
स्वप्न यशाचे तरच येईल आकारा

कविता

प्रतिक्रिया

असल्या कविता जरा लौकर टाकत जा हो. व्हाटसपवर, बॅनरावर टाकायला बर्‍या वाटतात. ;)
येनीवे, फक्कड जमलीय. सॉलीडे.

टवाळ कार्टा's picture

11 Oct 2016 - 1:29 pm | टवाळ कार्टा

+१११११११११

सतिश गावडे's picture

11 Oct 2016 - 9:45 pm | सतिश गावडे

+२२२२२२२२

यशोधरा's picture

11 Oct 2016 - 1:14 pm | यशोधरा

छान.

रातराणी's picture

11 Oct 2016 - 1:21 pm | रातराणी

धन्यवाद अभ्या आणि यशोतै =))
यावेळी उशीर झाला, नेक्स्ट टाइम ;)

यशोधरा's picture

11 Oct 2016 - 1:57 pm | यशोधरा

दसऱ्याला इतकं का हसू येतंय म्हणे?
सहजच ना? ;)

रातराणी's picture

11 Oct 2016 - 8:12 pm | रातराणी

हो हो सहजच ग तै =)) ;)

कवि मानव's picture

11 Oct 2016 - 1:52 pm | कवि मानव

खूपच छान झाली आहे कविता...दसऱ्याचे पूर्ण वर्णन अगदी छान !!

तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.

नीलमोहर's picture

11 Oct 2016 - 2:49 pm | नीलमोहर

सुंदर समयोचित कविता,

रातराणी's picture

11 Oct 2016 - 8:19 pm | रातराणी

धन्यवाद ट का, क मा आणि नीमो :)

प्रचेतस's picture

11 Oct 2016 - 8:42 pm | प्रचेतस

छान कविता