शुभ दसरा
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =))
शुभशकुनांच्या पावलांनी
किरण सोनेरी येती घरा
अवगुण अंतरीचे मिटवूनी
करू सत्याचा विजय साजरा
दारी सजवू मांगल्याचे तोरण
दुःखक्लेशास न मिळो थारा
विवेकबुद्धीने करून आचरण
लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा
नवविचारांचे जमवूनी सखेसोबती
पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा
जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती
स्वप्न यशाचे तरच येईल आकारा
असल्या कविता जरा लौकर टाकत जा
+१११११११११
+२२२२२२२२
छान.
धन्यवाद अभ्या आणि यशोतै =))
अग्गोबाई!
हो हो सहजच ग तै =)) ;)
खूपच छान झाली आहे कविता..
छान,
धन्यवाद ट का, क मा आणि नीमो :
छान कविता