✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!

प
पिलीयन रायडर यांनी
Wed, 08/10/2016 - 21:32  ·  लेख
लेख
शीर्षक वाचुन तुम्हाला जेवढा बसला तेवढाच धक्का मलाही बसला.नुकतीच ही वेब सिरिज पहाण्यात आली. एका ७-८ वर्षाच्या मुलाने आपल्या वडीलांना विचारु नयेत असे प्रश्न विचारल्यावर वडिल उत्तरं टाळण्या ऐवजी किंवा "देवबाप्पाने आकाशातुन आणुन दिलं" टाईप उत्तरं देण्या ऐवजी, जे खरं असेल ते सांगायचं ठरवतात. ह्याच विषयावर ही मालिका आहे. आमच्या लहानपणी हे असलं काही वडिलांशी तर सोडाच, आईशी सुद्धा बोलण्याची सोय नव्हती. आईने कधीतरी "पाळी" ह्या विषयावर थोडं सांगितलं होतं. जास्त चर्चा न करता जेव्हा पाळी येईल तेव्हा बघु असाच तिचा प्लान असावा. बाकी सर्व विषयांवर मिळणार्‍या माहितीचा मुख्य स्त्रोत मोठ्या बहिणी हा होता. तिथुन मुख्यतः अर्धवट, चुकीची नाहीतर वाढीव माहिती मिळाली हे आत्ता कळतंय! मुलींसाठी मुख्य नियम "आगाऊपणा नको" हा होता. त्यामुळे अशा कोणत्याही विषयावर बोलणे... खरं तर कोणत्याही विषयावर मोठ्यांसमोर मत मांडणे.. हाच फार मोठा आगाऊपणा होता. आजही बायका हे विषय फार उघडपणे बोलत नाहीत. ज्या बोलतात त्या बाय डिफॉल्ट आगाऊ आहेत. अर्थात आता फाट्यावर मारायला जमायला लागल्याने हवं ते बोलुन टाकता येतं. (आमचे प्रेरणास्थान :- म्हात्रे काका! आणि त्यांचा मोलाचा सल्ला!) पण तरी नजरा बदलल्याचं जाणवतंच. चर्चांमध्ये हे विषय बोलणं किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये सूचक चिडवणं हे ठिक आहे. लहान मुलांसमोर मात्र हेच विषय फार अवघडलेपणा आणतात. नक्की कितपत माहिती सांगावी हे ही नेमके कळत नाही. मुलांचा निरागसपणा जपुन ही माहिती देणं सोपं काम नाही. पण उत्तर टाळणं हा ही त्यावर उपाय नाही. मुलं जर कशीही उत्तरं शोधणार आहेत तर ती आपणच देणं सर्वात उत्तम नाही का?! माझाही मुलगा आता चार वर्षाचा आहे आणि थोडे फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो. नुकतंच एका परिचितांना बाळ झाल्याने सध्याचा भेडसावणारा प्रश्न आहे "बाळं कसं होतं?". शक्यतो खोटं बोलायचं नाही असं आधी ठरवल्याने "आईच्या पोटातुन डॉक्टर ऑपरेशन करुन बाळ काढतात" असं उत्तर दिलं आहे. पण ते बाळ तिथं गेलंच कसं? ह्याचं उत्तर मात्र "बाबांना एक बाळ सापडलं आणि त्यांनी ते आईच्या पोटात ठेवलं" असं दिलंय. ;) "बाळ परत पोटात कशाला ठेवलं?" हा प्रश्न "तुला गम्मत पाहिजे का एक?" असं सांगुन टोलवण्यात आला =)) ह्या सिरिज मध्ये मात्र वडील आपल्या मुलाच्या प्रश्नांना अगदी शिस्तीत उत्तरं देताना दाखवले आहेत. सुरवातच "मास्टरबेशन" पासुन झालीये. मला खरं तर इतक्या लहान मुलांना हा प्रश्न पडु शकतोच का? असा प्रश्न पडला. जो मुलगा ह्यात काम करत आहे तो मला तरी अजुन खुप लहान वाटला. एपिसोडच्या शेवटी तो काही "फॅक्ट्स" वाचुन दाखवतो. ते पाहुन मात्र असं वाटलं की एकवेळ थोडी फार माहिती देणे ठिक आहे, पण मुलांना इतकं डिट्टेल मध्ये सांगायची गरज आहे का? (उदा: कॉन्डोम फ्लेवर; ह्याबद्दल उघडपणे चर्चा दाखवली नसली तरी मालिकेत काम करता करता अशा अनेक अनावश्यक गोष्टी त्या लहान मुलाच्या कानावर पडल्या असतीलच ना? अशीच काळजी मला टु & हाफ मेन मध्ये काम करणार्‍या लहान मुलाचीही वाटली होती.) पण एकंदरीत मालिकेची हाताळणी उत्तम आहे. मुलांना समजेल, रिलेट करता येईल अशा उदाहरणांमधुन गोष्टी समजावल्या आहेत. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने स्क्रिप्ट लिहील्याने की काय, पण विषय एवढा अंगावर येत नाही. आपले प्रिय महाग्रु सचिनजी ह्यांनी सुद्धा चक्क चांगले काम केले आहे. तुम्हाला ह्या मुद्यांवर मुलांशी बोलायचे असेल पण बोलता येत नसेल तर ही मालिका मुलांना दाखवता येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
19312 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

असो

संन्यस्त खड्ग
Sat, 08/13/2016 - 12:41 नवीन
अजून इथे संस्कृतीरक्षक अन सौंस्क्रूतीभक्षक यांची लढाई सुरु झालेली नसल्याचे पाहून महदाश्चर्य वाटले ...
  • Log in or register to post comments

तुम्ही म्यान केलं आहे ना

उडन खटोला
Sat, 08/13/2016 - 12:59 नवीन
तुम्ही म्यान केलं आहे ना तुमचं खड्ग? कशाला काढताय बाहेर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संन्यस्त खड्ग

सॉलीड!

Nitin Palkar
Sat, 08/13/2016 - 21:42 नवीन
सॉलीड प्रश्न.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

त्याला कंपू माहात्म्य म्हणतात

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/13/2016 - 13:50 नवीन
त्याला कंपू माहात्म्य म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संन्यस्त खड्ग

खिक्क

झपाटलेला फिलॉसॉफर
Sat, 08/13/2016 - 13:07 नवीन
आता आम्ही आलौय की इथं आता मज्जा बघाच नुस्ती हौन जावद्या धुमशान सुरु
  • Log in or register to post comments

आयसेफ

vcdatrange
Sat, 08/13/2016 - 19:30 नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=com.chaitracreations.isafe हे एक चांगलं अँप आहे, चार ते नऊ वर्षे वयोगटासाठी ' सेफ टच, अनसेफ टच शिकविण्यासाठी
  • Log in or register to post comments

सेक्स सन्वाद

Nitin Palkar
Sat, 08/13/2016 - 21:24 नवीन
पिलीयन रायडर धन्यवाद! या मालिकेची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान माहिती..वाखु साठवला आहे.

अमितदादा
Sat, 08/13/2016 - 23:09 नवीन
छान माहिती..वाखु साठवला आहे.
  • Log in or register to post comments

ही वेबसीरिज आहे हे चांगलं आहे

बोका-ए-आझम
Mon, 08/15/2016 - 00:09 नवीन
कारण आपल्या देशात, जिथे mannequins ना झाकून ठेवा कारण त्यामुळे पुरुषांच्या भावना उद्दीपित होऊन बलात्कार होतात - असले दिव्य शोध लावणारे लोक आहेत, तिथे एखाद्या चॅनेलने असला कार्यक्रम दाखवणे आणि मग फॅमिलीवाल्या लोकांनी त्यावर मोर्चा काढणे असले प्रकार झाले असते. शिवाय नेटवर असल्यामुळे ३-४ वर्षांनीपण ही मालिका मुलाला दाखवता येईल. धन्यवाद पिरातै!
  • Log in or register to post comments

माझ्यामते ११+ हा ऑडियन्स

आनन्दा
Mon, 08/15/2016 - 10:46 नवीन
माझ्यामते ११+ हा ऑडियन्स बरोबर आहे यासाठी. अयोग्य वेळी अशी संवेदनशील माहिती त्याच्या हातात येऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

उत्तम

आनंदयात्री
Mon, 08/15/2016 - 03:59 नवीन
उत्तम माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!

जयन्त बा शिम्पि
Tue, 08/16/2016 - 07:33 नवीन
अधिक माहितीसाठी खालील साईट्वर पहावे . १९६६ मध्येच हा व्हिडीयो प्रकाशित झाला आह. कदाचित यातुन प्रेरणा मिळाल्यामुळे ही मालिका तयार कण्यात आली असावी. https://archive.org/details/parent_to_child_about_sex
  • Log in or register to post comments

हे बघुन अजुन एक आठवलं..

पिलीयन रायडर
Tue, 08/16/2016 - 07:56 नवीन
हे बघुन अजुन एक आठवलं.. Disney ची पिरियड्सवरची फिल्म.. ही सुद्धा खुप जुनी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा