सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!
शीर्षक वाचुन तुम्हाला जेवढा बसला तेवढाच धक्का मलाही बसला.नुकतीच ही वेब सिरिज पहाण्यात आली. एका ७-८ वर्षाच्या मुलाने आपल्या वडीलांना विचारु नयेत असे प्रश्न विचारल्यावर वडिल उत्तरं टाळण्या ऐवजी किंवा "देवबाप्पाने आकाशातुन आणुन दिलं" टाईप उत्तरं देण्या ऐवजी, जे खरं असेल ते सांगायचं ठरवतात. ह्याच विषयावर ही मालिका आहे.
आमच्या लहानपणी हे असलं काही वडिलांशी तर सोडाच, आईशी सुद्धा बोलण्याची सोय नव्हती. आईने कधीतरी "पाळी" ह्या विषयावर थोडं सांगितलं होतं. जास्त चर्चा न करता जेव्हा पाळी येईल तेव्हा बघु असाच तिचा प्लान असावा. बाकी सर्व विषयांवर मिळणार्या माहितीचा मुख्य स्त्रोत मोठ्या बहिणी हा होता. तिथुन मुख्यतः अर्धवट, चुकीची नाहीतर वाढीव माहिती मिळाली हे आत्ता कळतंय!
मुलींसाठी मुख्य नियम "आगाऊपणा नको" हा होता. त्यामुळे अशा कोणत्याही विषयावर बोलणे... खरं तर कोणत्याही विषयावर मोठ्यांसमोर मत मांडणे.. हाच फार मोठा आगाऊपणा होता. आजही बायका हे विषय फार उघडपणे बोलत नाहीत. ज्या बोलतात त्या बाय डिफॉल्ट आगाऊ आहेत. अर्थात आता फाट्यावर मारायला जमायला लागल्याने हवं ते बोलुन टाकता येतं. (आमचे प्रेरणास्थान :- म्हात्रे काका! आणि त्यांचा मोलाचा सल्ला!) पण तरी नजरा बदलल्याचं जाणवतंच. चर्चांमध्ये हे विषय बोलणं किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये सूचक चिडवणं हे ठिक आहे. लहान मुलांसमोर मात्र हेच विषय फार अवघडलेपणा आणतात. नक्की कितपत माहिती सांगावी हे ही नेमके कळत नाही. मुलांचा निरागसपणा जपुन ही माहिती देणं सोपं काम नाही. पण उत्तर टाळणं हा ही त्यावर उपाय नाही. मुलं जर कशीही उत्तरं शोधणार आहेत तर ती आपणच देणं सर्वात उत्तम नाही का?!
माझाही मुलगा आता चार वर्षाचा आहे आणि थोडे फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो. नुकतंच एका परिचितांना बाळ झाल्याने सध्याचा भेडसावणारा प्रश्न आहे "बाळं कसं होतं?". शक्यतो खोटं बोलायचं नाही असं आधी ठरवल्याने "आईच्या पोटातुन डॉक्टर ऑपरेशन करुन बाळ काढतात" असं उत्तर दिलं आहे. पण ते बाळ तिथं गेलंच कसं? ह्याचं उत्तर मात्र "बाबांना एक बाळ सापडलं आणि त्यांनी ते आईच्या पोटात ठेवलं" असं दिलंय. ;)
"बाळ परत पोटात कशाला ठेवलं?" हा प्रश्न "तुला गम्मत पाहिजे का एक?" असं सांगुन टोलवण्यात आला =))
ह्या सिरिज मध्ये मात्र वडील आपल्या मुलाच्या प्रश्नांना अगदी शिस्तीत उत्तरं देताना दाखवले आहेत. सुरवातच "मास्टरबेशन" पासुन झालीये. मला खरं तर इतक्या लहान मुलांना हा प्रश्न पडु शकतोच का? असा प्रश्न पडला. जो मुलगा ह्यात काम करत आहे तो मला तरी अजुन खुप लहान वाटला. एपिसोडच्या शेवटी तो काही "फॅक्ट्स" वाचुन दाखवतो. ते पाहुन मात्र असं वाटलं की एकवेळ थोडी फार माहिती देणे ठिक आहे, पण मुलांना इतकं डिट्टेल मध्ये सांगायची गरज आहे का? (उदा: कॉन्डोम फ्लेवर; ह्याबद्दल उघडपणे चर्चा दाखवली नसली तरी मालिकेत काम करता करता अशा अनेक अनावश्यक गोष्टी त्या लहान मुलाच्या कानावर पडल्या असतीलच ना? अशीच काळजी मला टु & हाफ मेन मध्ये काम करणार्या लहान मुलाचीही वाटली होती.)
पण एकंदरीत मालिकेची हाताळणी उत्तम आहे. मुलांना समजेल, रिलेट करता येईल अशा उदाहरणांमधुन गोष्टी समजावल्या आहेत. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने स्क्रिप्ट लिहील्याने की काय, पण विषय एवढा अंगावर येत नाही. आपले प्रिय महाग्रु सचिनजी ह्यांनी सुद्धा चक्क चांगले काम केले आहे.
तुम्हाला ह्या मुद्यांवर मुलांशी बोलायचे असेल पण बोलता येत नसेल तर ही मालिका मुलांना दाखवता येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अशी मालिका आहे हे माहित
आयला, सचिन? (हे आपले म्हाग्रु
अशा मालिकांची आवष्यकता आहेच
.
छान....!
|| श्री ओशो प्रसन्न ||
ओशो म्हणतात....
१+
वासना कधीही तृप्त होऊ शकत
नक्की??
गुलाबजाम खाऊन गुलाबजाम
अश्लील
भन्नाट...!
गुलाबजाम बद्दल हलवाईकडे चौकशी
करा की मग!
भरपूर गुलाबजाम खाल्लेत तर गुलाबजाम खाण्याची वासना मरु शकते.
महत्वाच्या विषयावरील सुयोग्य
चारही इपिसोड पाहिले. आवडले.
बघून मत नोंदवणेत येईल.
+१
+१
मस्त
सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!
वाह ! अजुन पाहिली नाही पण या
कालच 'पिरीयड' या विषयावरचा
+१
चांगली हाताळणी
चांगली मालिका
हो, ही वेब सिरिज आहे. यु
छान आहे..
छान आहे मालिका..
अळीमिळी गुपचिळी
या विषयावर भारतीय मालिका आहे
+१
अवांतर असल्यास क्षमस्व पण १३
काही आंतरराष्ट्रीय संस्थाचे
अशी माहिती इथेच टाकली तर इतर
एखाद डायसी वाक्य सोडता
वेब सिरीज म्हणून ठीक आहे पण
ह्या विषयावर मुलांशी कसं
पुण्यात होतं का हे वर्कशॉप?
हो ....
त्यांचा पत्ता व फोन नंबर इथेच
पालकांनाच गरज आहे हे नक्की.
संकोच
आमच्या ज्ञानात यस्टी म्हामंडळाने मोप भर घातली होती..
ठ्ठो!!!! यष्टीवर जाहिराती
अवांतरः त्या खास फॉन्ट मध्ये
जुन्या एक्सरेच्या फिल्म्स
मस्तच आहे सीरियलची कल्पना!