कुलदिपक

विप्लव's picture
विप्लव in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 6:04 pm

" नाही ग आई, ते तसे नाहीत. त्यांच माझ्यावर खुप प्रेम आहे. त्यांनी मला वचन दिलयं लग्नाच." मेघा कळवळून सांगत होती. रडून रडून तिचे टपोरे डोळे सुजले होते. पार्वतीच्या डोळ्यात मात्र अजुनही आग भडकत होती. 'काय केल हे पोरीनं?' मनातच चरफडत होती.
----------*****---------****--------

पार्वतीला गावात सर्वजण पारुमावशी म्हणुन ओळखत असत. पार्वतीचा नवरा भिकाजी अट्टल दारुबाज आणि जुगारी. तसा कष्ट ही करायचा पण मिळवलेले सर्व पैसे नशा करण्यात आणि जुगार खेळण्यात उडवायचा. पार्वति काहि घरामध्ये परटिणीच काम करुन घर चालवायची. पदरात दोन पोर होती मेघा आणि तिच्या पाठचा मंगेश. एक दिवस दारुच्या अतिरेकाने भिकाजचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले आणि एेन तारुण्यातच पार्वतीला सोडून तो देवाघरी गेला. आता देवाने त्याला घरात घेतले की नाही हा वेगळा प्रश्न आहे.

नवरा गेला तेव्हा मेघा दोन सव्वा दोन वर्षाची असेल आणि मंगेश सात महिन्याचा. दोन्ही पोरांना कवटाळून पार्वती रडरड रडली. पण तिला परिस्थितीची जाणिव होती. आता रडत बसण्यात काही अर्थ नाही. दोन सोन्यासारखी पोरं हेच आता आपल विश्व असं स्वतःला समजाऊ लागली. तिने परत काम पकडने सुरु केले पण मंगेशच काय तो तर अजुन लहान आहे. त्याला कुणाच्या भरवश्यावर सोडून जाणार होती ती बापडी.

"पारु अाग कशाला येवढी काळजी कराल्यास मी हाय की खमकी माझ्या दोन नातवास्नी सांभाळाया. नायतर तुझ्या भाव भावजयीला नकुच हाय मी त्यांच्या संसारात. तुला मदत बी हुईल अन मला समाधान ही मिळलं."
मग तिच्या आईने दोन पोरांची जबाबदारी स्विकारली.

तिची दोन पाखर हळुहळु वाढत होती. तिने त्यांना शिकवायच ठरवल. पण पैश्याच काय? चार घरची धुणी धुवून कसबस पोट भरत होतं.

मग शेजारच्या हेमलता कडे जाऊन ती शिवण काम शिकू लागली. तिची पोर शिकायला लागली. मंगेश आणि मेघा दोन्ही हुशार निघाली.

त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांच्याच शाळेतील गोखले गुरूजींनीदोघांच्या शिक्षणाची जबाबदारी स्स्विकारायच ठरवलं.
"कोणी आहे का घरात." आवाजा सरशी ८ वर्षाची मेघा धावत बाहेर आली तिच्या पाठोपाठ मंगेश अन पार्वती. गुरुजींना पाहुन पार्वतीने नमस्कार म्हणत फाटक घोंगड अंथरल. दोन्ही पोरं गुरुजींना पाहुन बावरली होती. पार्वतीलाही कळेना गुरुजी अचानक इकडे कसे काय आलेत. पोरांनी काय आगाऊपणा तर केला नसेल ना.
पोरांच्याकडे पाहत तिने धिर करुन गुरुजींना विचारल " काय झालं वं गुरुजी. हिकड कस काय आज नव्ह म्हंजी पोरांनी काय आगावपणा केलाया काय. कायरे पोरांनो काय केलायसा बर्याबोल्यान सांगा नाहितर माझ्याशी गाठ हाय." झाल आधिच गुरुजींना बघुन पोर टरकलेली तशात पारेवतीचा हा सुर पाहून रडायलाच लागली.

" अरे पोरांनो रडू नका शांत व्हा घाबरु नका. अग पार्वती मी पोरांची तक्रार करायला नाही आलो, तर एक विनंती घेऊन आलोय."

'विनंती आता ही काय भानगड' पार्वती बुचकळ्यात पडली.

गोखले गुरुजी बोलू लागले. "हे बग पोरी मला वा मुल ना बाळ. खुप प्रयत्न केले पण त्याच्याच मनात नाही तर काय उपयोग. म्हणुन मी व माझ्या पत्निने ठरवल अहे की मेघा, मंगेश सारख्या गरिब व होतकरु पोरांच्या शिकषणाची जबाबदारी उचलायची म्हणजे मुल नाही म्हणुन कोमेजलेल्या आमच्या मनाला सुख मिळेल. नाही म्हणू नको पोरी."

पार्वतीला काय बोलावे सुचेना. पन्नाशीच्या आसपास असणारे गुरुजी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याकडे विणवणी करतानातिला भरुन आलं. ती नाही होय करच संकोचत तयार झाली.

पोरांची हुशारी आणि कौतुक पाहुन धन्य झाली. तिला वाटल चला आता चार दिवस तरी सुखाचे मिळतील. पण नियतीला कदाचित तिचं सुख रुचलं नसावं.

मंगेश दहा वर्षाचा असताना डेंग्युची लागण होऊन हे जग सोडून गेला.
पारुमावशीच काळिज चर्र झाल. आपल्या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलाचा मृतदेह पाहुन पार्वतीने हंबरडा फोडला.

पोराच्या मृत्युच्या धक्यातुन तिने कसबस सावरत पोरीला मोठ्ठी केल. मेघा १० वी आणि १२ वी उत्तम मार्काने पास झाली.

"पार्वती अग पोरगी एवढ्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अग तिच्या भवितव्याचा विचार कर. तिला डॉक्टर किंवा ईंजिनीयर करु आपण. अग मी आणि माझी सौ आहोत ना." गोखले गुरुजी पार्वतीला कळवळून सांगत होते.

पण पार्वती म्हणाली " अवो गुरूजी तुम्ही हुतासा म्हणुन म्या पोरीला इथवर शिकवू शकले. पर बास आता तुम्ही बी रिटार झालाईसा तुमच्या म्हातारपणाची काठी वडून मला नरकात बी जागा मिळायची नाही. त्या परिस हिला कुठतरी नोकरी लागत्या काय बगा कसली बी चालल."

मेघा आतून दोघांच संभाषण ऐकत होती. ती बाहेर येत म्हणाली " आई, गुरुजी मला डि. एड ला प्रवेश घ्यायच आहे. मला शिक्षिका बनुन गुरुजींसारख सेवेच व्रत घ्यायच आहे. गुरुजींनी मला घडवल. आता मी माझ्यासारख्या मुलांना घडवणार. त्यासाठी मी डि. एड. चा प्रवेश अर्ज सुद्धा आणला आहे आणि पैशाची तर तु चिंताच करु नको आई. सरकारतर्फे ओबीसी सवलत मिळतेय म्हणजे आपल्या समाजातील मुलिंची फी माफ असते गं. तसेच रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्यास कर्मवीर आण्णांची कमवा व शिका ही योजना लाभदायक आहे. मला खात्री आहे की मला तिथे प्रवेश नक्की मिळेल."

मेघाच्या डोळ्यात चमकणारा आत्मविश्वास, तिचा दृढनिश्चय पाहुन पार्वती आणि गोखले गुरुजींच्या कडा पाणावल्या....

(क्रमशः)

------ विप्लव.

कथालेख

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

8 Aug 2016 - 7:04 pm | लालगरूड

आवडले . पुलेशु :-)

विप्लव's picture

8 Aug 2016 - 7:20 pm | विप्लव

धन्यवाद

अमितदादा's picture

8 Aug 2016 - 10:06 pm | अमितदादा

पुभाप्र...

पैसा's picture

8 Aug 2016 - 11:13 pm | पैसा

पुढचा भाग येऊ दे.

नाखु's picture

9 Aug 2016 - 10:00 am | नाखु

या महिन्यात दोन-तीन चांगले लेखक मिपावर आले आहेत..

चांगल्या पावसाचा असाही परिणाम काय?

आनन्दा's picture

9 Aug 2016 - 10:13 am | आनन्दा

हो.. असणारच.
फक्त हे आता पावसाळ्यातल्या भूछत्रासारखे पुढे हरवून जाऊ नयेत एव्हढीच इच्छा.

ह. घ्या.

किसन शिंदे's picture

9 Aug 2016 - 11:02 am | किसन शिंदे

आवडली

अमितदादा, पैसा, नाखु, लालगरूड, किसनशिंदे सर्वांचे आभार
न हो बरका आनंदा तस नाही होणार भूछत्रासारख

सिरुसेरि's picture

9 Aug 2016 - 4:11 pm | सिरुसेरि

पुभाशु

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2016 - 5:18 pm | ज्योति अळवणी

सुरवात आवडली.... पुढची गोष्ट वाचताना सुरवातीचा reference मनात राहतो आहे. त्यामुळे उत्सुकता वाढते. एकूण कथा देखील मस्त

सूड's picture

9 Aug 2016 - 6:26 pm | सूड

वाचतोय.

सूड's picture

9 Aug 2016 - 6:26 pm | सूड

वाचतोय.

पद्मावति's picture

9 Aug 2016 - 6:37 pm | पद्मावति

वाचतेय. मस्त.
पु.भा.प्र.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 6:54 pm | मुक्त विहारि

ओके

सगळे भाग टाकले की मग वाचतो.

विवेकपटाईत's picture

9 Aug 2016 - 7:23 pm | विवेकपटाईत

गोष्ट आवडली.

संदीप डांगे's picture

9 Aug 2016 - 10:28 pm | संदीप डांगे

नवीन लेखकांना पावसाळी भूछत्राची उपमा देणे खफवर ही आवडले नाही आणि इथेही,

एकनाथ जाधव's picture

10 Aug 2016 - 3:34 pm | एकनाथ जाधव

छान सुरुवात.