Skip to main content

बंद पडलं..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/06/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif करून अता, त्याला मी उठवनार पुन्हा थांबे पर्यंत , मग बुंगाट सुटवनार http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif

वाचने 22978
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

=)) काव्यरस- आगोबा, टका उवाच...=))=))=))

काव्यरस तांब्या भरून वरती फसफसतोय अगदी ! बाकी, 'आगोबा' आणि 'टका-उवाच' यांना काव्यरसात स्थाण मिळालेले पाहून अंह झाल्या गेले आहे.

In reply to by प्रचेतस

डोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??

In reply to by चौकटराजा

बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??
तसे असेल तर भावविश्वही पुढे सरकायला हर्कत नसावी =))

In reply to by टवाळ कार्टा

वा"सरां"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास !! ते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यात येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून). खुलाश्या नाखु अगोबागावकर

तरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं, ती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती. मस्त हो गुर्जी !!

=))

एका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे... असो, गुर्जी वेल्काम ब्याक! (लायनीतला) Sandy

माई मोड ऑन, काहीतरी कानावर आदळले. बघु कोण ते ? 1 अगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास ? खरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

वासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना.. तांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.

गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की. बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग हे गुर्हालात ग तांब्याsss हरवला ख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल बंद पडलंsssग बंद पडलंsssग चारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना डिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही बंद पडलंsssग बंद पडलंsssग सोडलया माळावर, पर येतंया फिरुन काही करना, बसतय काड्याsss चघलून गोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं काढली डायरी, पर दाव्याला ते आडल बंद पडलंsssग बंद पडलंsssग कस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू? कैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू??? दुत्त दुत्त! हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार हे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग

In reply to by जव्हेरगंज

ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

कुण्या एकेकाळचं, गुर्जींचं सैराटमय प्रतिभेचे हे वासरू .... cow

=))