जीवन सत्व बी १२ आणि त्याची उणीव

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
24 Jun 2011 - 5:59 pm

आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपारिक स्वयंपाक- ह्यानी, हल्ली बऱ्याच व्यक्तींना जीवन सत्व बी १२ च्या डेफिश्यन्सी चा त्रास होतो. ह्या डेफिश्यन्सी ची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धड धड्ण, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळी भाजी आमटी भात- असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया.

आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्यानी त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्त पेशींचे प्रमाण कमी करते. परिणामाने बी १२ डेफिश्यन्सी अनिमिया किंवा पर्नीशिय्स अनिमिया होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त, बी १२ आपल्या त्वचा, केस, रक्तपेशी, मज्जातंतू आणि बाकी स्वास्थ्यासाठी पण गरजेचे असते.

बी १२ जीवनसत्वाची उणीव एवढी सहजासहजी कशी होऊ शकते? सर्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व विद्राव्य असल्यामुळे, रोज शरीरातले अतिरिक्त बी १२ मूत्र मार्गे काढून टाकले जाते. म्हणून रोज आपल्या आहारात हे जीवन सत्व असणे गरजेचे असते. दुसरं कारण म्हणजे, बी १२ जीवनसत्वाचे स्त्रोत. हे जीवनसत्व आपल्याल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस/ चिकन, अंडी आणि सी फूड (मासे) ह्यातून मिळतं. म्हणून मांसाहारी मंडळींना ह्याची डेफिश्यन्सी सहज होत नाही. शाकाहारी आहारात जर दूध, दही, तक ह्याचे प्रमाण खूप कमी असेल तर बी १२ ची उणीव होऊ शकते. आणि जे विगन आहार( मांस/अंडी/दूध असे कुठलेच पदार्थ नाही) घेतात त्यांना तर फोर्टिफायीड पीठ किंवा विटामिन सप्लीमेन्ट ची गरज असते. शिवाय, ज्यांना सिलीयेक डिसीज किंवा क्रोह्न्स डिसीज झालेला असतो त्यांच्यात पण बी १२ ची उणीव आढळते.

आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात जीवन सत्व बी १२ साठवून ठेवलेले असते. पण जेव्हा दीर्घ काळ, आहारातून हे जीवनसत्व मिळत नाही, तेव्हा त्याच्या डेफिश्यन्सी ची लक्षणं दिसायला लागतात. ह्यावर उपचार म्हणजे बी १२ जीवनसत्वाची इंजेक्शन घ्यावी लागतात. पण एकदा ही इंजेक्शन घेतली म्हणजे काम झालं- असं नसतं. हा उपचार झाल्यानंतर, रोज कमीतकमी २ ग्लास दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. म्हणजे पुन्हा अशी उणीव उदभवत नाही.

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2011 - 6:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लेख खरच माहीतीपूर्ण!! धन्यवाद!!

अवांतरः
बापरे!!

रोज कमीतकमी २ ग्लास दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं

नंतर हे करण्यापेक्षा आधिच रोज कोंबडी मारणे बरे!! ;)

गवि's picture

24 Jun 2011 - 6:13 pm | गवि

वेळोवेळी कोंबड्या,मटण,वजडी,अंडी,मासे असे सर्वकाही चापूनही बी ट्वेल्व डेफ़िशियन्सीने अस्मादिकांचा देहांत होण्याइतपत खराब स्थिती आली आहे.

चिरोटा's picture

24 Jun 2011 - 6:24 pm | चिरोटा

माहितीपूर्ण लेख.
बदाम्,मनुका,अक्रोड ह्यात बी१२ असते का?

वेळोवेळी कोंबड्या,मटण,वजडी,अंडी,मासे असे सर्वकाही चापूनही ....

नुसत्या मांसाहाराने 'वाट' लागत नाही. त्याबरोबर जो मसाला,मिरची,तेल इत्यादि..पोटात जातो त्याने जास्त 'घात' होतो.

नुसत्या मांसाहाराने 'वाट' लागत नाही. त्याबरोबर जो मसाला,मिरची,तेल इत्यादि..पोटात जातो त्याने जास्त 'घात' होतो.

असेल.. पण माझा रोख वेगळाच होता.. मी उल्लेख केलेले सर्व पदार्थ बी १२ चे आगर समजले जातात. ते चापूनही .. तरीही डेफिशियन्सी झाली. असो..
काहीतरी शरीरदोषच म्हणायचा.

बाकी ड्रायफ्रुट नट्स मधे बी व्हिटॅमिन नसावे. ते फक्त प्राणिजन्य पदार्थांतूनच मिळते... आणि हे बी१२ इतके जीवनावश्यक आहे की ते न मिळाल्यास प्राणघातक ठरते. एवढ्यानेच मनुष्य हा नैसर्गिक शाकाहारी प्राणी नाही हे सिद्ध होते.

प्युअर व्हेगन्स ही कृत्रिम आहारपद्धती आहे, नैसर्गिक नव्हे हे सिद्ध होते.

नितिन थत्ते's picture

15 Nov 2011 - 4:45 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

सूड's picture

24 Jun 2011 - 6:35 pm | सूड

दुपारीच एक वाटी दही, ग्लासभर ताक आणि आता संध्याकाळी बोर्नव्हिटा प्यायलो हे फार बरं झालं असं वाटतंय.
सकाळी वाटीभर साय खाल्ली ती वेगळीच !! ;)

आनंदयात्री's picture

25 Jun 2011 - 5:32 am | आनंदयात्री

>>सकाळी वाटीभर साय खाल्ली ती वेगळीच !! Wink

हलकटा .... सांगतोस कशाला रे !!
हाय .. साय खायला तरसलो :( :(

(डिसक्लेमरः सदर प्रतिसादातून लेखकाचा तो अमरिक्केत असल्याचे प्रदर्शन करण्याचा मानस नाही तरी विसा संपत आलेल्या लोकांनी मनाला फार लाउन घेउ नये.)

साहेब वाटीभर साय ....
म्हणजे आपणही माझ्याप्रमाणे गुटगुटीत असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ?

साय साखर टाकून कि नुसती ?

सूड's picture

28 Jun 2011 - 7:16 pm | सूड

अर्थात साखर घालून !! गुटगुटीतपणाचं म्हणाल तर सुदृढ बालक स्पर्धेत पारितोषिक मिळेल की काय असं वाटण्याआधी जीभेला आवर घातला आहे. साय खाणं म्हणाल तर चालतं अधूनमधून. ;)

रेवती's picture

25 Jun 2011 - 4:33 am | रेवती

हम्म......
चांगली माहिती.

सन्जोप राव's picture

25 Jun 2011 - 5:53 am | सन्जोप राव

चांगली माहिती.
काही लोक सरसकट (डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय) बी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेताना दिसतात. उदाहरणार्थ हे उत्पादन पहा. त्याचबरोबर मल्टीव्हिटॅमिन, फिश ऑईल, कॅल्शियम असल्या कायकाय गोळ्या घेत असतात. प्रश्न असा आहे की यातल्या कशाकशाची शरीराला गरज असते? गरज नसताना व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या गोळ्या घेणे अपायकारकच नाही का?

शैलेन्द्र's picture

27 Jun 2011 - 12:32 pm | शैलेन्द्र

शक्यतो कोणतीही फुड सप्लीमेंट घ्यावी लागेल अशी वेळच येवु देवु नये.. चौरस आहारातुन सगळे घटक आपोआप मिळतात, व शरीरही रेडीमेड काही मिळत नसल्याने निट काम करत राहते, परंतु, जर खाण्या/ पिण्याची( ;) ) आबाळ होत असेल तर काही दिवस तरी शरीराला मदत म्हणुन सुप्राडाइन व कॅल्सीयम सँडोझ रोज एखादी गोळी घ्यावी.
पण हा आणीबाणीचा उपाय झाला..

याच्या भोगातुन गेलेलो आहे, ५ दिवस मंगेशकर दवाखान्याची सेवा ? घेउन आलेलो आहे, तेंव्हा पासुन चातुर्मास सोडले तर इतर वर्षभर आठवड्यात ४ तरी अंडी खातो, आणि दुधाचे पदार्थ तर आहेतच, बासुंदी ऑषध म्हणुन प्यावी लागणे हे भाग्याचे लक्षण नाही का ? असो,

अमितातै माहितीसाठी अतिशय धन्यवाद.

अमिता, महत्वाचा विषय घेतला तुम्ही. माझ्या माहीती प्रमाणे शाकाहारी आहार, प्रोसेस्ड फूड आणि अती स्वच्छता (over hygiene) ही ब१२ डेफ़िशियन्सी ची मुख्य कारणे आहेत. एका ठीकाणी मला अशीही माहीती मिळाली कि अती फळे खाल्ल्या (मुख्यतः जीवनसत्व क vitamin C overdose) मुळेही ब१२ च्या शोषणास बाधा निर्माण होते.
माझा अनुभव याबाबतीत सांगायचा तर, मला स्वतः ला ब१२ डेफ़िशियन्सी होती. आणि काही प्रमाणात अजूनही आहे. वर सांगितलेल्या लक्शणांशिवाय काही प्रमाणात डिप्रेशनही अनुभवास आले होते. पातळी खूप खाली आली तेव्हा इंजेक्शन्स घेतली होती मी काही दिवस. नंतर काही दिवस गोळ्या. आता नियमीत (आठवड्यातून दोनदा ते तीनदा) मांसाहार ही करतो. त्यामुळे बराच फरक पडला आहे. माझ्या माहीती प्रमाणे, दूध व दूग्धजन्य पदार्थां मध्ये खूप कमी प्रमाणात ब१२ असते आणि त्याचे शोषण ही खूप कमी प्रमाणात होते. अजून एक महत्वाची गोष्ट, ब१२ चे उत्तम शोषण होण्यासाठी आहारात पुरेसे फोलीक अ‍ॅसिड ही आवश्यक असते.
ब१२ मज्जातंतू प्रणाली(nervous & memory system ) निरोगी ठेवण्यास महत्वाची भूमि़का बजावते तसेच ते इतर जीवनसत्व आणि प्रथिनांच्या शोषणासही मदत करते.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2011 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा

म्हणजे आता आंम्हाला (फक्त) शाक-आहारा बद्दल गांभीर्यानी विचार करावा लागणार...अस दिसतय...

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2011 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा

म्हणजे आता आंम्हाला (फक्त) शाक-आहारा बद्दल गांभीर्यानी विचार करावा लागणार...अस दिसतय...

वेताळ's picture

26 Jun 2011 - 6:05 pm | वेताळ

बी १२ पुरेसे मिळु शकेल अशी मी आशा करतो.

मन१'s picture

15 Nov 2011 - 4:14 pm | मन१

नवीन मिपाकरांना ठाउक झाली तर उत्तमच.

नितिन थत्ते's picture

15 Nov 2011 - 4:42 pm | नितिन थत्ते

लेखात बी१२ जीवनसत्त्वाचे जे स्रोत सांगितले आहेत ते पाहता शाकाहारी व्यक्तींना हे जीवनसत्त्व दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतूनच मिळू शकते. असे असेल तर लेखाच्या सुरुवातीचे "आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपारिक स्वयंपाक- ह्यानी, हल्ली बऱ्याच व्यक्तींना जीवन सत्व बी १२ च्या डेफिश्यन्सी चा त्रास होतो". हे वाक्य अनावश्यक वाटते.

लेखातच पुढे लिहिलेले "बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळी भाजी आमटी भात- असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ ची उणीव होऊ शकते." हे वाक्यही वरील वाक्याला छेद देते.

'परकीय हात' किंवा 'संघाचा हात' म्हणावा तसे 'आधुनिक खाद्य सवयी' या सगळ्या आजारांसाठी कारणीभूत असल्याचे बिनधास्त ठोकून द्यावे असे वाटते.

किशोरअहिरे's picture

15 Nov 2011 - 5:38 pm | किशोरअहिरे

अमिता.. अत्यंत ऊपयुक्त माहिती दिली आहे..
अगदी रिसेंटली माझ्या आईचा बी-१२ प्रमाण चेक केले.. काऊंट ६८ आला आहे.. तर स्टँडर्ड २४० ईतका हवा असतो..
डॉक्टरांनी ह्यावर ऊपाय म्हणुन methylcobal ची ६ ईंजेक्श्न ६ आठवड्यासाठी दिली आहेत..
आणी त्याच बरोबर अंडी(विषेशत: पिवळा एग यॉक) तो खावा असे सांगितले आहे..
आम्ही प्युअर व्हेज असल्याने अंडी ला टाळाटाळ झाली पण शेवटी औषध म्हणुन घेत आहे..
तसेच माझ्या माहीती प्रमाणे दही/दुध मधे बी-१२ चे प्रमाण फार कमी असते..
त्या पेक्षा ताक मधे बी-१२ सगळ्यात जास्त कंस्युमेबल फॉर्म मधे ऊपलब्ध होते..
तेंव्हा बी-१२ डीफीशींयसी असलेल्या लोकांना दही/दुध पेक्षा ताक्/अंडी आणी मासे असे पदार्थ सुचवले जातात..

आणी हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे बी व्हिटॅमीन च्या डीफिशीयंसी मुळे पोट साफ न होणे (परिणामत : मुळव्याध?)
आणी तोंड येणे असे आजार होतात..

अवास्तव:
ज्या लोकांना नॉन व्हेज चालते त्यांना बी-१२ चा सगळ्यात ऊत्तम स्त्रोत्र म्हणजे खेकडा.. आणी रेडमीट आहे
तसेच मटण मधे बी व्हिटॅमीन चे प्रमाण बर्यापैकी असते.. पण जर फ्रेश खाल्ले तरच असे ऐकीवात आहे ..
जाणकारांनी प्रकाश टाकावा

गवि's picture

15 Nov 2011 - 5:41 pm | गवि

लिव्हर.

उपयुक्त लेख वर आल्याने बरे वाटले.
शाकाहारी आहे असे समजताच माझ्या डागदरांनी बी १२ घेण्यास सांगितले.