Skip to main content

व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/05/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया) यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा. मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे. दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? . . . . आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न * वैद्यकीय आणि आहारशास्त्र १.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात. १.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे. १.२.१) गाईचे दूध घेणार्‍यांनी किती सेवन करावे १.२.२) म्हशीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे १.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे १.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे १.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे १.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे १.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ? १.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ? १.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे. १.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ? २) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते ३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे. ४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे) ५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ? ६) बर्‍याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्‍यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ? ७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ? ८) रक्तस्त्राव होणार्‍या/ रक्तदान करणार्‍या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ? ९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा १०) या दुसर्‍या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे. ११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते? . . . . *जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे. १) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ? २) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ? ३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते ४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ? ५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे. . . . . . सुचतील तसे अजून प्रश्न अ‍ॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे. . . . अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार. * बी १२ इतर मिपा धागे * कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन * https://www.misalpav.com/node/18374 *

वाचने 195072
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

एका ठराविक पातळीपेक्षा बी १२ कमी असेल म्हणजे त्याची मात्रा फारशी नसेल तर ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक नाही. १५० मिलित १.२ म्यायक्रोग्राम बी १२ असणारे कोणते दूध उपलब्ध आहे असा मा. डॉ. खरे , रेडिओलोजिस्ट , आर्मी रिटायर्ड कर्नल याना माझाही प्रश्न आहे.

बरीच माहिती मिळत आहे. पण आधीच्या एका चर्चेत या बी१२ च्या तपासण्या कराव्या का याबद्दल मिपावरच्या डॉक्टर लोकांची मते प्रतिकूल होती. त्यापेक्षा शंका असेल तर काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्याव्यात असे तेव्हा मत असलेले आठवते.

मोगा खान व्हिटॅमिअन्सचा सर्वात स्वस्त व मस्त पर्याय आहे.... व्हिटॅमिन कॅप्सूल. महिन्याला दहा वीस जरी खाल्ल्या तरी ते आहाराला पूरक होइइल जेवणखाण न करताच कॅप्सूल खा असा सल्ला मी दिलेला नाही. आपला आहार सुधारुनही जर शंका वाटत असेल तर फ्यामिली डॉक्टरच्या सहाय्याने सप्लिमेंट घ्याव्यात. ( व्हिटॅमिनचा सी चा स्वस्त सोर्स सांगा असा ओरलला प्रश्न विचारतात. उत्तर : बाजारातल्या गोळ्या ) योग्य अर्थ काढण्यास मिपाकर समर्थ आहेत व्हिटॅमिनच्या गोळ्या / कॅप्सूला आहाराला पूरक म्हणून घ्या. डॉक्टराना विचारुन घ्या, असेही मी नंतर लिहिले आहे. ( तो प्रश्न फक्त व्हॉट ईज द चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी असा असतो. याचा अर्थ पेशंटला लिंबू, पेरु खायचे बंद करुन गोळ्या चघळा , असे सांगणे अपेक्षित नाही. कदाचित, तुम्ही कॉलेजात असताना लिंबू पेरु स्वस्त असतील, नंतरच्या काळात गोळ्या स्वस्त झाल्या असतील, त्यामुळे विनाकारण वाद घालण्यासारखे यात काही नाही. आज कॉलेजात कदाचित अजुन काहीतरी वेगळेच सांगितले जात असेल. ) १. तंबाखु खा असे कुणी सांगणार नाही. २. चुना क्ञाल्शियमचा स्त्रोत म्हणुन वापरता येतो... चार लोकाना साधारण एक डाळीइतका चुना वरणा आमटीत घालता येतो. http://www.cooksinfo.com/lime-chemical ३. गंज ही खायची वस्तू नाही... पण पालेभाज्या लोखंडी तव्यात परतून खाण्यास सांगतात . कारण तव्याचे लोह त्यात येते. उसाच्या रसापासूनच साखर व गूळ बनते. पण गुळात लोह भरपूर व साखरेत शून्य असे का ? हेही ओरलला विचारतात ना ? त्याचेही उत्तर तेच आहे. गूळ्निर्मिती लोखंडाच्या भांड्यात होते म्हणून. उगाच वाद घालण्यापेक्षा जरा गंज खरवडून घ्या. आम जनतेला स्वस्त व उपलब्ध पर्याय द्यावे लागतात... ते घरात जेवतात. आर्मीच्या क्यान्टिनात नाही. प्रश्न 'चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी' असा होता. आहारातून हे गृहीत धरुन सर्वानी लिंबू पेरु संत्री ही उत्तरे सांगितली होती. पण गुर्जी चूक म्हणाले. हे पेरु , आवळे फुकट कुठे मिळतात म्हणे ? ( परवा सांताक्रुझात भलेदांडगे पेरु दिसले होते. गंमत म्हणुन एक घेतला होता. पाऊण किलोचा एकच पेरु नव्वद रु मोजुन घेतला होता. चादरीत लपवुन घरात इचारलं होतं ... काय आहे ? बायकु बोल्ली कलंगडं. मुलगी बोल्ली टरबूज .... ) आयला ! काय गंमत आहे ! लोक कलाकंद , गुलाबजामुन , रस्गुल्ला , पनीर , रसमलाई , आइस्क्रीम , श्रीखंड , पेढे , खर्वस ..... काय काय खायला तयार आहेत. व्हिटॅमिन बी १२ बाजारु क्यापसुलातुन स्वस्तात मिळेल, हे मी बोल्लो तर लोक वस्सकन माझ्या अंगावर आले ! असो. आता गोमाता पाळा व तुमची इच्छा पूर्ण करुन घ्या , म्या चाललो क्यापसुल आणायला ! अंडं मासं खात असाल तर या धाग्याची फारशी गरज नव्हती... नॉन व्हेज भरपेट खाल्लं की व्हिटॅमिन बी १२ मिळतं. ..... शाकाहारी असाल तरच प्रॉब्लेम आहे. दूध हे उत्तर बरोबर आहे. पण किती ? हा प्रश्न सोडवणे कठीण आहे. ते वर तज्ञा नी लिहिलय ... १५० मिलि दुधातुन इतकं इतकं बी १२ मिळेल म्हणुन. मला ते पटत नाही... २५० मिलि दुधात १.२ मायक्रोग्रम ब १२ असते. आपली रोजची गरज २.४ ची आहे. किती दुध / ताक लागेल , हिशोब करा. १ अंड्यात साधारण ०.४४ असतॅ . म्हणुनच शाकाहारी लोकांसाठी काही अन्नघटक ब१२ फोर्टिफाइड करुन उपलब्ध आहेत. फोर्टिफाइड करतात म्हणजे काय करतात बुवा ? थोडं जास्तीचं ब१२ त्यात कृत्रिमरीत्या मिसळतात . हेच ना ? दूध व ब्रेअकफास्ट सिरियल्स फोर्टिफाइड उपलब्ध आहेत म्हणे . मिपा लोकांचं मला काय समजना झालय बुवा ! कुनाला शेत घेउन त्यात फळझाड लावुन जुस प्यायचा हाये... कुनाला गोमाता पाळून तिच्या दुधाचा कलाकंद आणि खरवस करुन व्हिट्यामिन बी १२ पायजे हाये. त्या फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधा. एक दिवस तिथे व्हिट्यामिन कट्टा करुया. तुमचे सर्व लेखन एका खाली एक देत आहे एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करताना तुमची सर्व बोटं "थुकरट" झाली आहेतत्याकडे जर लक्ष द्या. HIV चा विषाणू जसा आपल्या गुणसूत्रात सारखे बदल करत राहतो तसेच तुम्ही पण आपली विधाने सरकवत राहता आहात. ते HIV विषाणूचे "गुण" लावून घेतलेले दिसतात. स्वच्छपणे दुधाचा विषय असताना त्यात गोमाता घुसडणे, फळझाडाचा संबंध नसताना तो येथे आणणे असल्या गोष्टी आणल्यामुळे आपण डॉक्टर म्हणून आपली विश्वासार्हता कमी करीत आहात असे वाटत नाही का आपल्यास? . बाकी तुम्ही दिलेल्या पर्यायात चुना वरणात टाकता येतो हे कुठेच आढळले नाही. केवळ द्यायचा म्हणून दुवा देत असाल तर नाही दिलात तरी चालेल. नाही तरी तुमच्या सारखा डॉक्टर असेल तर रुग्ण चार वेळेस विचार करेल.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही दुधाचे उत्तर द्या . १५० मिली मधुन १.२ मा. ग्रॅ . बी १२ खरोखरच मिळते का ? माझीच वाक्ये कट पेस्ट करून तोंडावर फेकून पळून जावू नका.

In reply to by सुबोध खरे

जरा संदर्भ नीट तपासून पहा. ते कप म्हणजे पाव लिटर असते... २५० मिलि. इतर संदर्भ तपासा म्हणजे समजेल. https://en.m.wikipedia.org/wiki/Cup_(unit)

ठीक आहे माझा समाज भारतीय कप बद्दल झाला होता जो १५० मिली होता. चूक झाली. पण २. मायक्रो ग्राम ब १२ साठी ३०० मिली ऐवजी शाकाहारी माणसाला ५०० मिली दुध/ दही / ताक प्यायला लागेल. जे फारसे अवघड नाही. उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का? त्यासाठी एवढे फालतू प्रतिसाद टाकून आपण काय सिद्ध केलेत. एकही चूक मान्य न करता उगाच सारवत बसण्यापेक्षा व्यवस्थित प्रतिसाद देत चला. जिथे तिथे थुकून स्वताचे हसे करण्यापेक्षा हे बरे.

In reply to by सुबोध खरे

आम्ही सगळे रोज सकाळ संध्याकाळ एकेक कप दूध आणि दोन्ही जेवणात दही आणि एकेक वाटी ताक घेतो. झाले की ५०० मिलि. त्याशिवाय आठवड्यात २ वेळा तरी अंडी सगळेच खातो. मुले आणि नवरा मासे चिकन आठवड्यात ३ दिवस खातात ते जास्तीचे.

In reply to by पैसा

उरलेली अर्धी भारतीय जनता प्रतिकुटुंब ३ डॉलरपेक्षा कमी खर्चात रोज जगते. त्यांना रोज प्रतिमाणशी अर्धा लिटर दूध परवडते, असे म्हणावयाचे आहे का?

In reply to by आनंदी गोपाळ

ज्याला इच्छा आहे आणि शक्य आहे त्याना सहज जमेल. बाकी अर्धेच काय ७०-८०% भारतीय लोकाना दूध अंडी, मासे चिकन काहीच परवडणारे नाही. जेवणातल्या डाळी आणि भाज्यासुद्धा परवडणे कठीण आहे.

In reply to by पैसा

उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का?
हे अर्ध्या भारताबद्दलचे डॉक्टरसाहेबांचे स्टेटमेंट आहे. त्या अनुषंगाने लिहिले.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, अन्न म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. शरीर अन्नातला सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि विष्ठा बाहेर टाकतं. यावरून शिखंडीनी मुग्धागोडे उन्हात पडलेली विष्ठा खाण्याचा सल्ला देईल. तिच्या नादी न लागलेलंच श्रेयस्कर. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे विष्ठा व शिखंडी प्रकर्ण मिपाच्या धोरणांत चपखल बसते की क्वॉय? मा. संपादक, फॉर्मल (अधिकृत) कंप्लेंट (तक्रार) केल्याशिवाय आ.न.गापैवर कार्यवाही होत नाही का? :)

In reply to by सुबोध खरे

तुमचे ऐकून लोक १५० मिलि दुध ताक घेत बसले असते तर विनाकारण त्यांचे नुस्कान झाले असते. असो.

In reply to by आनंदी गोपाळ

एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण विषयातले तज्ञ अथवा जाणकार आहोत अथवा नाही हे विशेष /आग्रही सल्ला/मत देताना, होता होईतो नमुद केले जावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लक्षात यावे, अशी सदर धागा लेखकाची अपेक्षा आहे. बाकी चालु द्या

In reply to by माहितगार

माहितगार साहेब, कम ऑन. तुम्हाला जामोप्या यांच्या डिग्रीबद्दल माहिती नाही, असे म्हणवत नाही. अशी माहिती तुम्हास नाही, असे शपथपूर्वक नमूद करता का?

In reply to by आनंदी गोपाळ

तुम्हाला जामोप्या यांच्या डिग्रीबद्दल माहिती नाही, असे म्हणवत नाही.
१) या आपल्या व्यक्तिगत कल्पना आहेत. मला आणि माझ्या प्रमाणे असंख्य सदस्य आणि अनामिक वाचकांना जामोप्या कोण ? अमुक कोण आणि तमुक कोण याची माहिती असेलच असे नाही. हे लक्षात घेऊन धागा लेखक म्हणून 'एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण विषयातले तज्ञ अथवा जाणकार आहोत अथवा नाही हे विशेष /आग्रही सल्ला/मत देताना, होता होईतो नमुद केले जावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लक्षात यावे, अशी सदर धागा लेखकाची अपेक्षा आहे.' हि अत्यंत किमान स्वरुपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या किमान अपेक्षेचा आपण अनादर का करु इच्छिता हे अनाकलनीय आहे. २)
अशी माहिती तुम्हास नाही, असे शपथपूर्वक नमूद करता का?
हि व्यक्तिगत साठमारीची भाषा धागा लेख आणि उपरोक्त विनंतीशी सतर्क्य न जोडता येणारे अवांतर आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष करतो. ३) जे कुणि तज्ञ/ जाणकार आहेत त्यांनी माहिती देताना आपण जाणकार अथवा तद्न्य असल्याचे सुस्पष्ट लक्षात येईल हे पाहिल्यास सर्वसामान्य अनामिक वाचकांचा घोटाळा होणार नाही, व्यक्तिगत मतभेदांपेक्षा धागा विषयावर स्वतंत्रपणे आपल्याकडे असलेली माहिती जाणकार आणि तज्ञांनी दिल्यास, उपकृत राहू. आपल्या मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.

In reply to by आनंदी गोपाळ

सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. तुम्हाला काही प्रोब्लेम ?

In reply to by आनंदी गोपाळ

सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. तुम्हाला काही प्रोब्लेम ?

In reply to by सुबोध खरे

दुर्लक्ष करा असे म्हणेन वेळ , श्रम आणि दिलेले ज्ञान वाया जाईल, बाकी काही होणार नाही

छाण माहिति मिलाले

मोगा"खान" इ. उल्लेख आवडले नाहीत. तुमचा बायस प्रूव्ह होतो. जंत इन्व्हेस्टिगेट करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट गोळ्या खाऊ घालीन, असे सल्ले तुम्ही स्वतः मिपावर इतरत्र टाईप केलेले आहेत. या धाग्यावरील तुमची अ‍ॅटिट्यूड चुकीची वाटली, हे नोंदवितो.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळ राव मोगा खान म्हणण्यामागे शिव्या देणे येते असे नाही कारण याच व्यक्तीने आपल्याला मुसलमानि तत्वे पटतात असे बर्याच धाग्यांवर जाहीर पणे लिहिलेले आहे. "खान" हि शिवी नाही. बाकी या माणसाच्या एकंदर वागणुकीबाबत माझा पूर्वग्रह आहे असे आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. कारण हि व्यक्ती बर्याचशा टोपण नावानी येथे वावरत असून बर्याच धाग्यांवर पिंका टाकत असते त्यामुळे यांच्या बर्याच आय डी संपादक मंडळाने बंद केल्या आहेत. याचा अर्थ या व्यक्तीचे प्रतिसाद आक्षेपार्ह आहेतअसे संपादक मंडळाला वाटते हेही सत्य आहे . अशा माणसाबाबत मला पूर्वग्रह असल्याबद्दल यत्किंचीतही वाईट वाटत नाही. याच व्यक्तीने इतरत्र माझ्या शिक्षणाबद्दल माझ्या विचारसरणी बद्दल आणि मी शिकवत असलेल्या महाविद्यालय याबद्दल हीन पातळीचे प्रतिसाद दिले होते तरीही मी त्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडलो नाही. "जंत इन्व्हेस्टिगेट करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट गोळ्या खाऊ घालीन, असे सल्ले तुम्ही स्वतः मिपावर इतरत्र टाईप केलेले आहेत." मी मिपावर किंवा कुठेही बोलतो किंवा लिहितो यामागे माझी काही ठाम विचार सरणी असते आणि बहुसंख्य वेळेस त्यामागे शास्त्रीय बैठक असते. वर लिहिण्याचे कारण जागतिक आरोग्य संघटना सुद्धा जेथे जंत (endemic) आहेत तेथे दरवर्षी शौच तपासणी न करता जंताचे औषध द्यावे अशी शिफारस केलेली आहे. WHO recommends periodic treatment with anthelminthic (deworming) medicines, without previous individual diagnosis to all at-risk people living in endemic areas. पहा http://www.who.int/elena/titles/deworming/en/ जंत हे बाह्य आक्रमण आहे तर ब १२ हे सदा सर्वकाळ लागणारे आहारातील जीवन सत्त्व आहे आणि विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता भासते म्हणून हा दुध किंवा दही किंवा ताक पिण्याचा सल्ला दिला आहे. अमुलचे ताक रुपये ८ मध्ये ५०० मिली उपलब्ध आहे. जीवन सत्त्व हे आहाराच्या घटकातुंच शक्यतो मिळवले पाहिजे असा संकेत आहे याचे कारण अन्न पदार्थात आपल्याला अजूनही माहित नसलेले सूक्ष्म घटक आहेत/ असू शकतात (हे मी वर लिहीलेलेच आहे) यास्तव गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक अन्नघटक घ्यावेत असेच जागतिक संघटनाच्या शिफारशी असतात. जीवन सत्त्वाच्या गोळ्यांबद्दल असा सल्ला कोणत्याही आरोग्य संघटनेने दिला असल्याचे मी अजून तरी वाचलेले नाही. (तसा सल्ला दिला असेल/ कोणी दाखवला तर मी आपले मत बदलेन. ) या धाग्यावरील तुमची अ‍ॅटिट्यूड चुकीची वाटली, हे नोंदवितो. आपल्याला माझा अ‍ॅटिट्यूड चुकीचा वाटला हे आपले मत आहे. त्याचा मी आदर करतो असो.

In reply to by सुबोध खरे

या माणसाच्या एकंदर वागणुकीबाबत माझा पूर्वग्रह आहे असे आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे.
धन्यवाद! जंतांव्यतिरिक्तही इतर गोळ्यांबद्दलही आपण जे म्हटलात ते योग्य परिप्रेक्ष्यात घेतले गेलेले आहे. आपण या संस्थळावर प्रतिष्ठा राखून आहात. त्याचा फायदा उचलत, कितींदाही आयडी उडालेल्या व्यक्तीबद्दल व्यक्तीगत आकसाने लिहिणे, व क जीवनसत्वाच्या गोळ्या सर्वात स्वस्त सोर्स आहेत, या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवादावरून त्यास झोडपणे, तुम्हास पटले असेलच, असे नाही, असे वाटते. :) तरीही, मानवी स्वभावानुसार, आपण त्यांनी केले तेच करीत आहात, हेही नोंदवितो. धन्यवाद! (पुनः एकदा)

In reply to by आनंदी गोपाळ

http://www.misalpav.com/comment/791049#comment-791049
बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता. उदा ऑस्टो कॅलशियम,कॅलशियम संडोझ ई.
http://www.misalpav.com/comment/791106#comment-791106 I WOULD RATHER BE A सुबोध खरे - Mon, 11/01/2016 - 23:28
I WOULD RATHER BE A PRAGMATIST THAN PURIST. हजार रुपयाची B १२ ची चाचणी करण्यापेक्षा मी २५ रुपयाची न्युरोबायोन ची तीन इंजेक्शने देणे श्रेयस्कर समजतो. कारण कमतरता असेल तर उपाय हाच आहे तुमचे यकृत तीन वर्षे पुरेल एवढा साठा ठेवू शकते आणी B १२ हे पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्व असल्याने त्यचा ओव्हर डोस होऊन अपाय होण्याची शक्यता नाही, आजता गायत मी कोणत्याच रुग्णाला B १२ ची चाचणी करण्यास सांगितलेले नाही. आमच्या वडिलांची B १२ ची चाचणी केली त्यात त्यंची पातळी ४००० आढळली. साधारण हि ५०० च्या आसपास असते. हा त्यांना दिलेल्या न्युरोबायोन चा परिणाम होता यानंतर मी त्यांची चाचणी परत केली नाही. हीच गोष्ट D ३ ची आहे . जर रुग्णाला त्याची कमतरता आहे असे वाटले तर मी सरळ २५ रुपयांची एक गोळी ६०,००० युनिट आठवड्याला एक अशा आठ गोळ्या देतो त्यानंतर रोज दोन कॅलशियम संडोझ च्या गोळ्या वर्षभर घेण्यास सांगतो. चाचणी करून ५०० रुपये फुकट घालवण्यात फायदा नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. वर लिहिल्याप्रमाणे अति डोस काही कुणाचा इतका सहज दिसून येत नाही
एभाप्र. कोणत्याही तपासण्याविना, इथे गोळ्या घेण्यास सांगितलेले चालते का?

In reply to by आनंदी गोपाळ

त्याच धाग्यावरून
वर लिहिल्या प्रमाणे जंतांचे औषध १० रुपयाला घेणे हे २०० रुपये देऊन शौचाची तपासणी करण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. किंवा जीवनसत्त्वाची रक्त तपासणी करण्यापेक्षा ती औषधातून घेणे हे जास्त स्वस्त आणि मस्त आहे. त्यातून तुम्हाला कुणी विचारले कि अशी जीवनसत्त्वे कशी घेता? सरळ माझे नाव सांगा. डॉक्टर खरे एम डी यांनी सुचविले आहे म्हणून घेतो.
डॉक्टर खरे एम डी (रेडिऑलॉजी) यांनी सुचविले आहे म्हणून घेतो :) ९अवांतरः कंसातलं, पिवळं लिहू नये असे फार मनापासून वाटत होते..

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव आपल्या माहिती साठी सांगतो लष्करात प्रत्येक डॉक्टर ला कोणत्याही विषयाचा तज्ञ असो पाळीपाळीने बाह्य रुग्ण विभागात बसून रोजचे साधे रुग्ण पाहावेच लागतात. शिवाय दर पाचव्या दिवशी रात्रपाळी करावी लागते.कुटुंब कल्याण केंद्रातील सिव्हिलियन डॉक्टर नि दांडी मारली कि तेथे जाऊन ६०-७० रुग्ण पाहावे लागत. असे आपली वीस वर्षे नोकरी होई पर्यंत सर्वाना करावे लागते. मला स्त्रीरोग शास्त्रात कोणताही रस नसताना मला प्रसुतीला हजार राहायला लागलेले आहे. गोव्यात असताना १३ सर्प दंशाचे रुग्ण पाहावे लागलेले आहेत. पुण्यात असताना नगरच्या आर्मर्ड रेजिमेंटच्या रणगाड्याची तोफ फुटल्यामुळे एकाच वेळेस भाजेलेले आणि स्फोटात जख्मी झालेल्या ५२ रुंग्नाना पहायची पाळी आली होती. यामुळे लष्करातील रेडियोलोजीस्टच काय पी एस एम किंवा रुग्णालय व्यवस्थापन विषयातील लोकांनाहि मुलभूत वैद्यकशास्त्राचा वापर २० वर्षे नोकरी होईपर्यंत करावाच लागतो. यात आपण म्हणालात त्या पिवळ्या अक्षरातील रेडीयोलोजीचा भाग नसून मुलभूत वैद्यकशास्राचा भाग येतो. माझ्याबरोबर ओपीडी मध्ये हृदय शल्य क्रिया तज्ञ किंवा लहान मुलांच्या मुत्रपिंडाचा( pediatric nephrologist)च्या तज्ञ यानीपण असे साधे रुग्ण पाहिले आहेत आणि आजही पाहत आहेत. लष्करात तुम्हाला मुलभूत वैद्यक शास्त्र "आलेच पाहिजे" हा दंडक आहे. लष्करात फक्त उजव्या डोळ्याचा तज्ञ किंवा डाव्या कानाचा तज्ञ नसतो.आपण बाहेर पाहता तसे चालत नाही. असो.

In reply to by सुबोध खरे

ससून व एएफएमसीच्या पीजी परिक्षा एकत्र होत असत. मी ससूनला शिकलेलो आहे, हे तुम्हास ज्ञात आहेच, So I know exactly how an AFMC person gets his quali. AND what are the shortcomings of that. A blast injury gets treated by civilian surgeons too. So, once again don't flaunt your "military" background. Talk medicine. तेव्हा, मला तुमच्या ट्रेनिंगबद्दल पूर्ण ठाऊक आहे. इतरही पीजी लोकांना यूजीचे पूर्ण ज्ञान असावेच लागते हे वेगळे साका?च का? मे आय सजेस्ट, प्लीज डोंट फ्लाँट युअर एमडी, (रेडिऑलॉजी)(मिलिटरी) अँड बिलिटिल हिज एमबीबीएस.(सिव्हिलियन) त्या व्हिटॅमिनच्या ठिकाणी तुम्ही दोघे एकाच लेव्हलवर बोलत आहात.
लष्करात तुम्हाला मुलभूत वैद्यक शास्त्र "आलेच पाहिजे" हा दंडक आहे.
Sir, Your MD, does NOT stand in court of law, for prescribing ANY medications, even if you keep better knowledge in any other specialty of medicine. And you know that. . In one go you are advocating vitamin tablets, and on other thread bashing another qualified Doctor. You had to say 'चुकल' @ his catching you on that response regarding cup sizes. तुम्हाला दुखावू नये असे वाटत होते, पण नाईलाज झाला. माझ्याकडून पूर्णविरां.

In reply to by आनंदी गोपाळ

Sir, Your MD, does NOT stand in court of law, for prescribing ANY medications respected sir I have the honour to submit you the following for your kind attention please I bring to your attention taht I have MBBS degree which gives me all teh licence to prescribe routine medications and issue death certificate and I have the honour to bring to your attention that I can issue death certificates also. I have issued the same for civilians while treating them in PUNE. If you are not aware, yours and mine MD degree is additional qualification to be registerd with MMC and our basic qualification remains MBBS by IMC act 1957. You may get it confirmed from MMC if you wish. मला माझे रजिस्ट्रेशन नुतानिकरणासाठी दर वर्षी ६ गुण जमा करावे लागतात ते रेडियोलोजी "चेच" असावेत असे नसून वैद्यकशास्त्राच्या मुल्भूत शाखेचे चालतात कारण नुतनीकरण हे अतिरिक्त योग्यतेचे(additional qualification) नसून मुलभूत एम बी बी एस चे आहे हेही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो आपला अहं दुखावला गेला आहे त्यामुळे आपण वितंडवादावर उतरत आहात आणि बेफाट आरोप करीत आहात हे स्पष्ट आहे. आपण आपली माहिती तपासून पाहाल तर बरे होईल असे वाटते. असो मी जे लिहिले आहे याबद्दल माझी १००% खात्री आहे यात मला माझा मुद्दा सिद्ध करण्याची गरज भासत नाही त्यामुळे हा वाद मी येथेच थांबवितो.

In reply to by सुबोध खरे

गोपाळराव ठीक आहे माझा समज भारतीय कप बद्दल झाला होता जो १५० मिली होता. चूक झाली. पण २. मायक्रो ग्राम ब १२ साठी ३०० मिली ऐवजी शाकाहारी माणसाला ५०० मिली दुध/ दही / ताक प्यायला लागेल. जे फारसे अवघड नाही. उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का? त्यासाठी एवढे फालतू प्रतिसाद टाकून आपण काय सिद्ध केलेत. एकही चूक मान्य न करता उगाच सारवत बसण्यापेक्षा व्यवस्थित प्रतिसाद देत चला. जिथे तिथे थुकून स्वताचे हसे करण्यापेक्षा हे बरे. चूक झाली हे मी मान्य केलेलंच आहे. आपल्या दर्शनासाठी प्रतिसाद परत अख्खा उद्धृत करीत आहे. चूक झाली तर मला लाज वाटत नाही. बालादपि सुभाषितम ग्राह्यं. ते न पाहता तुम्ही प्रच्छन्न आरोप करता याचेच आश्चर्य वाटते.

In reply to by सुबोध खरे

महोदय, आपलं बोलून झालं का? १. जर आपण एमबीबीएस क्वालीफिकेशनवर व्हिटॅमिन प्रिस्क्राइब करीत आहात, तर त्या ठिकाणी एमडीचा उल्लेख कुठून आला? (पक्षी: "यांनी सांगितलं म्हणून घेतो म्हणून सांगा". कशाला कुणी विचारणारे तू व्हिटॅमिन का खातोस म्हणून?) २, आपण ज्या प्रकारे व्हिटॅमिन घ्या हे सांगितलेत त्याच प्रकारे त्यांनीही सांगितले. त्यानंतर "घाण करून सारवणे" इ. मृदू शब्दप्रयोग आपण वापरलेले वाचनात आले. ते का? * जोपर्यंत आपण मेडिसीन बोलत होता, तोपर्यंत मी इथे लिहिले नाही. मला तुमचे पॉलिटिक्स आवडत नाही, याचा अर्थ असा नव्हे की मी तुमचे वैद्यकीय ज्ञान हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न करावा. मी तो केलेलाही नाही. तुम्ही जे इतरत्र सांगत होता, तेच तेही साम्गत आहेत, पण त्यानंतर तुम्ही व त्यांचे पॉलिटिकल मत न आवडणारे धागाकर्तेही त्यांच्यावर धावुन गेलेले दिसले. अपुन को नही पट्या. हे का घडले? हे घडले म्हणून तुमच्याच स्टाईलने लिहून दाखवले. त्याबद्दल क्षमस्व. दोघेही एकच बाब (वेगवेगळ्या ठिकाणी) सांगत असूनही, उगंच दोन मेडिकल डॉक्टरांतही एकमत नाही हे सामान्यांचे मत पुष्ट करायला तुम्ही हातभार लावत आहात असे तुम्हास वाटत नाही काय?

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळ राव माझ्या एट्टीट्युड बद्दल शंका घेतलीत बायस(पूर्वग्रह दुषित पण) बद्दल टिप्पणी केलीत. आपण माझ्या मुलभूत ज्ञाना बद्दल शंका घेतलीत माझ्या औषध प्रिस्क्राइब करण्याच्या हक्काबद्दल शंका घेतलीत मी जेंव्हा त्याचे उत्तर म्हणून लिहिले कि मला पण २० वर्षे औषध देण्याचा अनुभव आहे तर त्यावरहि तुमचे मी "टेंभा" मिरवतो म्हणून म्हणणे आहे. माझ्या वैद्यकीय महाविद्यालयातील ( जे भारतात दुसर्या क्रमांकाचे म्हणून गणले जाते) पदवी कशी मिळते आणि त्यात काय कमतरता आहेत हेही आपले सांगून झाले. माझ्या प्रशिक्षणाबद्दल सुद्धा तिरकस शेरा मारून झाला माझी एम डी पदवी न्यायालयात टिकणार नाही हेही आपले म्हणून झाले. "चूक झाली" हे प्रतिसादात स्पष्ट लिहिले असताना ते न वाचता तुम्ही चूक कबुल करायला हवी होती हेही सांगून झाले. आपल्याला माझ्या बद्दल अजूनही काही म्हणायचे असेल तर तेही म्हणून टाका म्हणजे मनात काही राहायला नको. आपण जसे माझ्या जुन्या प्रतिसादातील आपल्याला पाहिजेत तशा गोष्टी उकरून काढल्यात तशा मी मोगा साहेबांनी माझ्याबद्दल "पूर्वी लिहिलेल्या गोष्टी" उकरून काढल्या नाहीत. मला त्यात रस नाही. भूतकाळाचे ओझे डोक्यावर ठेवून स्वतःला त्रास करण्याची मला गरज वाटत नाही. त्या तुम्हाला वेळ आणि उत्साह असेल तर उकरून काढा आणि मग पहा माझे मत असे का झाले ते. मी आपल्यावर कोणताही वैयक्तिक आरोप केलेला नाही. यावर मी "आपल्या दोन मेडिकल डॉक्टरांतही एकमत नाही हे सामान्यांचे मत पुष्ट करायला तुम्ही हातभार लावत आहात" हे आपले म्हणणे मान्य करून वाद इथेच थांबवत आहे. क लो अ

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब , धागा कोणताही असला तरीही तुमचे प्रतीसाद मी अगदी मन लाउन वाचते , कारण अत्यंत माहीतीपू र्ण। असतात . तुमची कळकळ। ज्न्याना चा आवाका नवीन वाचका पर्यंत ही सहज पोहोचतो . उगीच वाद घालणार्या ना अनुल्लेखाने मारु शकता . बाकी तुमच्या प्रतीसादां साठी शतश: धन्यवाद !

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता. कॅल्शियम संडोझ या गोळ्या डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय का मिळतात(OTC over the counter) यात याचे उत्तर आहे. ब १२ चे इंजेक्शन मी रुग्णाला प्रत्यक्ष पाहून इंजेक्शनने देतो. कारण ब १२ जीवन्सात्त्वासाठी १२००/- रुपयाची रक्ताची चाचणी करण्यात मला "रस" नाही. किंवा २०० रुपये देऊन जंताची अंडी शौचाच्या तपसणी पाहण्यात ही मला "रस" नाही. एवढेच म्हणेन. अशी चाचणी "न" करताच जंताचे औषध देण्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस मी या धाग्यात दाखव्लेलीच आहे. मग हा मुद्दा उकरून काढण्यात आपला वैयक्तिक आकस असावा असे वाटते. असो. माझा आपल्याला दुखावण्याचा कोणताही हेतू नाही/ नव्हता. अनवधानाने झाले असेल तर त्याबद्दल क्षमा असावी.

अमूल ताकाची किंमत वाढली असून १० रुपये झाली आहे अर्ध्या लिटर साठी. मुंबईतही १० रुपयातच उपलब्ध आहे. क्षमस्व http://deshgujarat.com/2016/04/01/amul-launches-pouch-milk-in-gandhinag…

डॉ.खरे मी वर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, उत्तर न मिळल्याने पुन्हा विचारतो. पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या पद्धतीमुळे शरीराला व्हिटॅमीन्स मिळत नाही?

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव आपण गृहपाठ न करता वाटेल तसे आरोप करता मी स्पष्टपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. आपण उपस्थित केलेला "बॉडी फॅट इंडेक्स" हा बॉडी मास इंडेक्स पेक्षा चांगला आढळून आलेला नाही असे मी दुव्यासकट स्पष्ट केले होते. यामुळे आपला "अहं" दुखावला गेल्याचे दिसते. तेथे उगाच दोन डॉक्टर मध्ये मतभेद नकोत म्हणून मी पुढे टिप्पणी टाळली होती तरीही तुम्ही असे प्रच्छन्न आरोप करता याचे आश्चर्य वाटते. बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body सुबोध खरे - Sun, 03/01/2016 - 20:08 बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body adiposity index) : https://en.wikipedia.org/wiki/Body_adiposity_index हे सकृतदर्शनी उत्तम असे परिमाण वाटले होते परंतु एक तर तो मोजणे हे फार कटकटी चे आहे आणी BMI इतके सोपे आणी सहज परत परत वापरण्यासारखे नाही. शिवाय A detailed study published in 2012 concluded that estimates of body fat percentage based on BAI were not more accurate than those based on BMI, waist circumference, or hip circumference. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/22484365 यास्तव आणखी जास्त गुंतागुंत न करण्यासाठी मी ते यात उधृत करणे टाळले आहे. हा माझा प्रतिसाद आपल्या अवलोकनासाठी जसाच्या तसा दिला आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे साहेब ब १२ बद्दल वाचताना मी जे अनेक दुवे वाचले होते त्यापैकी एका दुव्यात ते वाचले होते. आपला प्रश्न मी पहिला होता परंतु तो दुवा मला सापडला कि मी जरूर याचे उत्तर देईन.

In reply to by आनंदी गोपाळ

पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या पद्धतीमुळे शरीराला ब १२ मिळत नाही हे कोणत्या टेक्स्टबुक्स मध्ये ते आहे हे मला सांगाल काय ? मी एकच टेक्स्टबुक्स वाचतो (harrison). त्यातले १ टक्का ज्ञान जरी मला आले तरी मी उत्तम डॉक्टर बनू शकेन असा मला विश्वास आहे.

In reply to by सुबोध खरे

गोडसे साहेब हा एक दुवा आहे. पण याहूनही स्पष्टपणे लिहिलेले होते तो दुवा सापडला कि देईन It is commonly theorized that in the nonindustrialized world, bacterial contamination from soil or feces brings traces of B12 to plant foods in sufficient amounts to prevent B12 deficiency in humans who do not consume animal products, or in areas where animal foods do not make up a significant portion of the diet; but that in the industrial world, modern food sanitation practices combined with heavy mineral depletion of soils from pesticides and crop monoculture have eliminated this source of vitamin B12, just as indoor living has largely eliminated sunlight as our natural source of vitamin D. http://freefromharm.org/health-nutrition/b12-magic-pill-veganisms-achil…

In reply to by सुबोध खरे

पेपर प्रेझेंटेशन -> पियर रिव्ह्यूड जर्नल्स पब्लिकेशन्स -> टेक्स्टबुक्स. दुवा करो महाराज!

In reply to by सुबोध खरे

Increased hygiene in the food supply is probably the cause of B12 depletion from plant-based diets.[145][n 13] Neither plants nor animals make B12; it is produced by microorganisms, such as bacteria, fungi and algae. Plants not washed properly may contain B12 from bacteria in the soil, often from faeces, and drinking water may be similarly contaminated, particularly in the developing world. Animals obtain it by eating contaminated plants, other animals, or their own faeces, and become sources of B12 if eaten themselves https://en.wikipedia.org/wiki/Veganism#cite_ref-157

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉ.खरे. एकंदरीत शरीराला vitamin B12 मिळण्यासाठी ठरावीक bacteria ची आवश्यकता असते. मातीत व पाण्यातून आपल्याला ह्या bacteria मिळू शकतात. ह्याचा अर्थ आपण पाणी उकळले वा RO ने शुद्ध केल्यास पाण्यातील उपयुक्त bacteria नष्ट होतात. आपल्याला मिळणारे पाणी अगोदरच क्लोरिनेशन व अजुन काही पद्धतीने शुद्ध केलेले असल्यामुळे त्यातही आपल्याला आवश्यक असणार्‍या bacteria नष्ट झालेल्या असणार. म्हणजे आपल्याला पाणी हा स्रोत अशा bacteria मिळण्याच्या दृष्टीने बाद होतो. भाज्या स्वच्छ न करता खाल्ल्या तरी शिजवल्यामूळे त्यातील bacteria नष्ट होणार. मग शरीराला ह्या bacteria कोठून मिळणार? एक शंका. मातीतील ह्या bacteria प्रयोगशाळेत वाढवता (कल्चर) येतात का? लॅक्टोबॅसिलस कॅपसूलप्रमाणे घेता येतील का?

In reply to by मार्मिक गोडसे

ह्याला जोडून एक प्रश्न जर आपण गोडसे साहेब म्हणाले तसे चांगल्या बॅक्टेरिया (probiotic)चा सोर्स ला मुकत आहोत तर आपण बाजारात उपलब्ध असलेले प्रोबायोटिक ड्रिंक्स प्यायले तर चालण्यासारखे आहे का? (याकुल्ट वगैरे) छोट्या छोट्या डब्या मिळतात त्याच्या बहुतेक, कधी प्यायलो नाहीये पण जाहिरातीतुन प्रचार कायम बघतो

आहारात अजून असे अनेक सूक्ष्म घटक असतील/आहेत जे आपल्याला( शास्त्राला) अजून माहित नाहीत पण जे शरीराला अत्यावश्यक आहेत. हीच परिस्थिती एके काळी ब १२ जीवनसत्त्वाची होती. पंडुरोग (pernicious anemia) झालेल्या काही रुग्णांना फोलिक असिड ( जीवनसत्त्व) देऊनही त्यांची प्रकृती सुधारत नसे. त्यांना यकृताचा अर्क दिल्यावर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होते हे लक्षात आल्यावर अजून संशोधन झाले तेंव्हा अजून एक जीवनसत्त्व आवश्यक आहे असे लक्षात आले हेच ब १२ जीवनसत्त्व होते. जिज्ञासूनी खालील सन १९४७ चा दुवा वाचून घ्यावा. http://www.bloodjournal.org/content/2/1/50?sso-checked=true याच साठी मी केवळ "गोळी घेण्या"ऐवजी आहारात सुधारणा सुचवली आहे. त्यावर एवढा वादंग झाला. असो या धाग्यावर आता माझी लेखनसीमा.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर खरे साहेब, खूपच उपयुक्त माहिती सोप्या शब्दात दिलीत. त्याबद्दल धन्यवाद! तुमच्या संयमालाही सलाम. इथल्या काही महाभागांनी तुमची लायकी काढण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या पदवीबद्दल, ज्ञानाबद्दल शंका घेतली गेली. तुम्हाला मूर्खात काढायचाही प्रयत्न झाला. परंतु तुम्ही ज्या संयमाने प्रतिवाद केलात ते कौतुकास्पद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काही लोकांना आपण डाॅक्टर झालो, म्हणजे आभाळाला हात टेकले आणि कुणाचाही अपमान करायचा अधिकार आपल्याला मिळाला असं वाटतं. अशांना तुमच्यासारख्यांचे sterilized प्रतिसादच उपयुक्त ठरतील.

In reply to by श्रीगुरुजी

काही लोकांना आपण डाॅक्टर झालो, म्हणजे आभाळाला हात टेकले आणि कुणाचाही अपमान करायचा अधिकार आपल्याला मिळाला असं वाटतं. अशांना तुमच्यासारख्यांचे sterilized प्रतिसादच उपयुक्त ठरतील.

सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे काकांचेच म्हणणे जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. आहारातुन ब जीवनसत्व मिळावे ह्यासाठी त्यांनी जे उपाय सांगितले आहेत ते अगदी करण्याजोगे असताना गोळ्या का खायच्या? असा अतिसामान्य फालतु माणुस म्हणुन प्रश्न पडतो. (जिथे खर्‍यांसारख्या सदस्याच्या एम.डी ची लायकी निघते तिथे आम्ही तर निव्वळ छाटछुट..!) माझाही व्यक्तिशः जामोप्या किंवा जो कोणता त्यांचा सध्याचा आयडी असेल, त्यांच्यावर विश्वास नाही. आणि गोपाळराव हुषार डॉक असतील असं वाटत असुनही ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक वाटतात (त्यांना त्याने काडीचाही फरक पडणार नाही.. ठाऊक आहे..). खरे काका संदर्भ देऊन बोलतात आणि समजेल अशा भाषेत नीट सांगतात. अक्कल काढत नाहीत. म्हणुन त्यांचे म्हणणे विश्वासार्ह्य वाटते. अत्यंत बायस्ड असले तरी हेच मत झाले आहे बुवा..! फक्त खरे काकांना सपोर्ट करण्यासाठीच हा प्रतिसाद लिहीलेला आहे. ह्या धाग्यावर लोक फुकट त्यांना टारगेट करु शकतात तर मी किमान सपोर्ट तरी दाखवु शकतेच.

In reply to by पिलीयन रायडर

डॉ खरे यांच्या केवल वैद्यकीयच नव्हे तर इतर आयुष्याच्या अनुभवातून आलेल्या टीपण्ण्या सुद्धा प्रबोधक असतात. (उदा पूर्वेचा समुद्र, प्रसाद भागवतांच्या व इतर लेखांतील अर्थविषयक प्रतिसाद इत्यादी)

In reply to by पिलीयन रायडर

सहमत. डॉक्टर खरे यांनी खोडसाळ आरोपांना प्रतिसाद देण्याऐवजी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारायला हवे होते.

In reply to by पिलीयन रायडर

डॉक्टर तुम्ही अशांकडे कृपया दुर्लक्ष करा आम्ही तुमच्या वैद्यकीय आणि अवैद्यकीय दोन्ही लिखाणाचे फॅन आहोत

In reply to by सामान्य वाचक

१००% सहमत !!